नीरा येथे ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा ४५वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नीरा दि.२
१९७८ साली मुंबईतील चुनाभट्टी येथे दहा बाय दहाच्या जागेत व 300 सभासद आणि तीन हजार रुपयांच्या भांडवलावर स्थापन झालेल्या आणि संपूर्ण राज्यभरात आपले जाळे पसरवलेल्या ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा (दि.2) स्थापना दिवस आहे. निरा येथील ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेमध्ये हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
'एकमेका साह्य अवघे धरू सुपंथ ' या उक्ती प्रमाणे व सावकारी पाशातून सर्वसामान्य लोकांची मुक्तता करण्यासाठी आणि तळागाळातील लोकांना बचतीची सवय लागावी व त्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता होऊन, उन्नती व्हावी या मुख्य उद्देशातून ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. अवघ्या 300 सभासदांच्या माध्यमातून ही सोसायटी सुरू करण्यात आली आणि आज या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. राज्यभरात या संस्थेच्या १७७५ शाखा आहेत. तर या संस्थेकडे आज रोजी १५१ कोटीचे भाग भांडवला असून संस्थेकडे ३२०४ कोटींची ठेव आहे l. संस्थेने २६०७ कोटींचं कर्ज वितरीत केले आहे तर संस्थेची गुंतवणूक म्हणजेच, संस्थेचे बँक डिपॉझिट १२४८ रुपये आहे. तर सोसायटीचा संमिस्त्र व्यवसाय हा ५६११कोटीच्या आसपास केल्याची माहिती नीरा शाखेचे कार्यालय प्रमुख चारुदत्त येवले यांनी दिली
आज शनिवारी सकाळी निरा येथील विधीतज्ज्ञ आदेश गिरमे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून निरा येथील ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेमध्ये वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी नीरा शहरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने यशवंत खरात ,कालिदाम निगडे, संजय सोडमिसे, राहुल शिंदे भरत निगडे,सुनिल सोनवणे, चंद्र शेखर, ठोंबरे विलास चौधरी, नितीन साळुंखे,चेतन घुले, कांतीलाल गायकवाड़,भास्कर जाधव इत्यादी सभासद ठेवीदार व कार्यालय प्रमुख- चारुदत्त येवले. वरीष्ठ अधिकारी अमीत सोळसकर,शामराव साळुंखे,सागर गावडे, तुषार फडतरे,शुभ पवार व दैनंदिन ठेव प्रतिनिधी उपस्थित होते.