यूईआय ग्लोबल एज्युकेशन तर्फे गोवा फूड फेस्टिव्हल चे आयोजन.
शिवाजी नगर पुणे येथील हॉटेल मॅनेजमेंट चे शिक्षण देणार्या यूईआय ग्लोबल एज्युकेशन तर्फे आज पुण्यात गोवा फूड फेस्टिव्हल ( खाद्य महोत्सव) चे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये गोवा राज्यातील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. यूइआय ग्लोबल एज्युकेशन च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी *फिशरमॅन्स व्हार्फ - गोवा फन अनलिमिटेड* या गोवन थीम मध्ये अनेक रुचकर पदार्थ बनवून पाहुणे म्हणून आलेल्या त्यांच्याच पालकांना जेवणात दिले. यामेनू मध्ये वेलकम ड्रिंक मिंटी पिंक कूलर, स्टार्टर मध्ये व्हेज पाय ओवर स्पाइसी पोटेटो, मेन कोर्स मध्ये ग्रिल ओबरजीन, ग्रील मॅकरेल, ब्राऊन राईस, पोइ इन स्पाइसी रस आणि डेझर्ट मध्ये बीबीनका, नेवरी अश्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद पाहुण्यांनी घेतला. या वेळी विद्यार्थ्यांनी गोवन नृत्याचे सादरीकरण केले आणि त्यांच्या संस्कृतीची कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख करून दिली. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद या खाद्य महोत्सवाला मिळाला. यूईआय ग्लोबल एज्युकेशन ही संस्था गेली 16 वर्षे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या क्षेत्रात कार्यरत आहे. रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने यूईआय ग्लोबल एज्युकेशन त्यांच्या अभ्यासक्रमात वेळोवेळी नवनवीन गोष्टीचा समावेश करत आहे. त्यामुळे मुलांना 100% रोजगार मिळण्यास मदत होते. अश्या फूड फेस्टिव्हल च्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांना प्रत्यक्ष हॉटेल मध्ये काम करण्याचा प्रॅक्टिकल अनुभव मिळतो. यामुळे दरवर्षी यूईआय ग्लोबल एज्युकेशन च्या सर्व शाखामध्ये अश्या प्रकारच्या फूड फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात येते अशी माहिती यूईआय ग्लोबल एज्युकेशन चे व्यवस्थापकीय संचालक श्री. मनीष खन्ना यांनी दिली. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी पाहुणे म्हणून उपस्थित होती. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आज आम्ही हा गोवा खाद्य महोत्सव उत्तम पद्धतीने साजरा करू शकलो अशी भावना उपसंचालिका सौ.वैशाली चव्हाण यांनी व्यक्त केली.युईआय ग्लोबल मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे विशेष सहकार्य या महोत्सवाला मिळाले.