नीरा येथील ज्युबिलंट इंग्रिव्हीया कंपनीमध्ये अपघात : अपघातामध्ये तीन जण जखमी

 नीरा येथील ज्युबिलंट इंग्रिव्हीया कंपनीमध्ये अपघात अपघातामध्ये तीन जण जखमी 



नीरा दि. २


       नीरा ता.पुरंदर येथील ज्युबिलंट इंग्रिव्हीया कंपनीमध्ये आज मेंटेनन्सचे काम सुरू असताना अपघात झाला आहे .यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून यातील एकाला पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.कंपनी मध्ये मेंटेनन्स चे काम सुरू होते. यावेळी ऍसिड कॉम्प्रेसरच्या दुरुस्तीचे काम करत असताना हा मोठा स्पोट झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.तर यातील एक जण अत्यवस्थ आहे . पाच वर्षा पूर्वी सुद्धा कंपनीत असाच अपघात झाला होता.यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता.अपघातानंतर नीरा आणि परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झालय.


  पुरंदर आणि बारामतीच्या सीमेवर असलेल्या ज्युबिलंट कंपनीमध्ये अनेक वेळा अपघात होत असतात. मागील चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघात लोकांच्या अजूनही लक्षात असून आज शनिवारी सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा एक स्पोट झाला. इथेनॉल असिटप्लांटच्या मेंटनंसचे काम सुरू असताना हा स्पोट झाला. या स्फोटामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.यामध्ये तिघा जणांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून दोघांना लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर यातील एकाला उपचारासाठी पुण्यामध्ये पाठवण्यात आले आहे. या संदर्भात कंपनी प्रशासनाशी संपर्क केला असता.कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांनी यामध्ये दोन जण जखमी झाल्याच्या वृत्ताला दुसरा दिला आहे. उत्तरप्रदेश मधील पवन कुमार, वा बिहारमधील महेश माथुर (बिहार) या दोघांना लोणंदच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे तर गंभीर जखमी भरत सिंग हे अत्यवस्थ झाले असून त्यांना पुण्याच्या सुर्या हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..