वाल्हे,ता.०2:
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील वातावरण ढवळुन निघालं आहे. या
घटनेनंतर शासन व पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे.त्यापार्श्वभुमीवर वाल्हे(ता.पुरंदर) येथे मराठा सकल समाजबांधवांच्या वतीने महात्मा फुले
व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तीव्र संताप व्यक्त करुन घटनेचा निषेध व्यक्त केला.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्या घटनेचा राज्यभरातुन
निषेध केला जात आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे पडसाद उमटले. वाल्हे(ता.पुरंदर) येथील एस.टी स्टॅड शेजारील महात्मा
फुले व बाजारपेठमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वाल्हे सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन
विविध घोषणा देत घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा सकल समाज बांधव उपस्थित होते.
दरम्यान यावेळी 'एक मराठा लाख मराठा', 'महिलांवर लाठीमार कराणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', 'मराठ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांचा
धिक्कार असो' अशा विविध प्रकारच्या घोषणा देत सकल मराठा समाजाने वाल्हेत संताप व्यक्त केला.