Thursday, October 31, 2024

ज्यांनी त्यांच्या बायकोला हरवण्यासाठी ताकद लावली त्यांनाच उमेदवारी ?

 

ज्यांनी त्यांच्या बायकोला हरवण्यासाठी ताकद लावली त्यांनाच उमेदवारी ? 

ही तर वैचारिक दिवाळखोरी : विजय शिवतारे







 नीरा दि.३१


    लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभूत करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, आपला पैसा खर्च केला, त्यांना अजित पवार आपल्या पक्षामधून उमेदवारी देतात हे फारच आश्चर्यजनक असल्याचे  

शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही पुरंदर मधून ताकद पणाला लावली म्हणून तरी सुनेत्रा पवार यांना 90 हजारापेक्षा जास्त मते मिळाली. अजित पवारांचे हे वागणं समजण्या पलीकडचे असल्याचे म्हणत, याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील अस विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. ते आज नीरा येथे माध्यमांशी बोलत होते.



      विजय शिवतरे यांनी आज नीरा येथून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. घराघरात जाऊन विजय शिवतारे यांनी मतदारांशी संपर्क साधला. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी फारच कमी कालावधी असल्यामुळे आपला कोणत्याही प्रकारे वेळ वाया न घालवता विजय शिवतरे हे आता कामाला लागले आहेत.या दरम्यान त्यांनी नीरा येथे माध्यमांशी संवाद साधला.यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आहे. आणि महायुती मधून मला यापूर्वी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मी महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . याबाबत त्यांनी लोकसभेच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. सासवड येथील पालखीतळावर झालेल्या सभेमध्ये पुढचा पुरंदरचा किल्लेदार विजय शिवतरेच असतील या मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याची आठवण करून दिली.

       त्याचबरोबर तुम्ही (राष्ट्रवादीने) उमेदवार वेगळा दिला असेल तर तुम्ही महायुती मानत नाहीत का ? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. इतर ठिकाणी बंडखोरी झाली म्हणून तुम्ही या ठिकाणी बंडखोरी करणार असाल तर ते शक्य नाही असं देखील ते म्हणाले. तीस हजार लोकांसमोर तुम्ही शब्द दिला आणि जर आता तुम्ही दुसऱ्याला एबी फॉर्म देत असल तर तुमच्या शब्दाला काही किंमत नाही का ?असं विजय शिवतरे यांनी म्हटलं आहे. मी एकदा तुमच्याशी दुश्मनी केली ती तुम्ही पाहिली आता दोस्ती केली आहे. तर ती मी शेवटपर्यंत दोस्ती निभावणार. आता तुम्ही काय कराल ते तुमचं तुमच्याजवळ. आता इथून पुढे जो काय निर्णय घ्यायचा तो जनता घेणार आहे. असं म्हणत यांनी आपला राग व्यक्त केला.



       महायुतीचे सरकार आणण्यासाठी चार तारखेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यातून मार्ग काढतील असा विश्वास विजय शिवतरे यांनी व्यक्त केला आहे.ज्या व्यक्तीने पवार यांच्या पत्नीला निवडणुकीत पाडण्यासाठी प्रचंड ताकद लावली, प्रचंड पैसा खर्च केला. त्यालाच जर उमेदवारी दिली जात असेल तर हे दुर्दैव आहे. याला वैचारिक दिवाळखोरी म्हणावे लागेल. एखाद्याकडे खर्च करण्यासाठी भरपूर पैसा आहे म्हणून त्याला उमेदवारी देणे योग्य आहे का ? असा प्रश्न विजय शिवतरे यांनी उपस्थित केला.

     महायुतीमध्ये संभाजी झेंडे आणि विजय शिवतरे यांच्या उमेदवारी अर्जा मुले तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता कोण अर्ज माघारी येतो याकडे पुरंदर करायचे लक्ष लागले आहे.



मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने प्रविण जोशी यांच्या 'पनव्या' कादंबरीचे प्रकाशन

 मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने प्रविण जोशी यांच्या 'पनव्या' कादंबरीचे प्रकाशन 



पुरंदर :

   मौजे गुळुंचे (ता. पुरंदर ) येथील प्रसिद्ध ग्रामीण लेखक व कवी प्रविण अशोकराव जोशी यांच्या पनव्या या कादंबरीचे प्रकाशन मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने येत्या (ता. 5) नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. नीरा शिवतक्रार (ता. पुरंदर ) येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.

    नंदीबैलाचा खेळ करणाऱ्या मेढंगी जोशी या भटक्या समाजातील स्त्री जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. स्वातंत्र्योत्तर काळ ते आजातगायत या कालखंडात या जमातीला करावा लागणारा संघर्ष, त्यांच्या व्यथा, वेदना, अडचणी या कादंबरीत लेखक प्रविण जोशी यांनी रेखाटल्या आहेत. कादंबरीचे कथानक काल्पनिक असले तरी वास्तवाला भिडण्याचे सामर्थ्य या कथानकात असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरूर तालुक्याचे अध्यक्ष कुंडलिक कदम यांनी सांगितले.



   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. अध्यक्षस्थानी साहित्य परिषदेचे डॉ. कुंडलिक कदम तर ज्येष्ठ साहित्य समीक्षक व इंद्रायणी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. विजयकुमार खंदारे उपास्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत. टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. महादेव रोकडे पुस्तक परिचय करून देणार आहेत.

    तसेच राज्य मराठी पत्रकार संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख भरत निगडे, जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर यांसह ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिनकर गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत सभागृहात प्रकाशन सोहळा पार पडणार असून साहित्यरसिकांनी आवर्जून उपास्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कांबळे, आदित्य कोंडे, प्रविण ढावरे यांनी केले आहे.



Wednesday, October 30, 2024

पुरंदर मध्ये सात जणांचे उमेदवारी अर्ज अवैध दिगंबर दुर्गाडे, संदीप जगदाळे, जालिंदर कामठे, दत्ता झुरंगे, बळीराम सोनवणे आदींचे उमेदवारी अर्ज अवैध

 पुरंदर मध्ये सात जणांचे  उमेदवारी अर्ज  अवैध 


दिगंबर दुर्गाडे, संदीप जगदाळे, जालिंदर कामठे, दत्ता झुरंगे, बळीराम सोनवणे आदींचे उमेदवारी अर्ज अवैध 



पुरंदर : 


      पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून भरलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी आज बुधवारी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये ७ उमेदवारांचे अर्ज हे अवैध ठरले आहेत. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून ४० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी ३३ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून ७ उमेदवारी अर्ज हे पक्षाचे एबी फॉर्म न मिळाल्याने अवैध ठरले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांचा देखील समावेश आहे. 



   पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महायुती कडून अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे महायुतीतून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले होते. विशेषता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, भारतीय जनता पार्टी, शिवसेना या पक्षांच्यावतीने बहुसंख्य उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांना एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलेला आहेत. ते अवैध ठरले आहेत. विशेषतः पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे त्याच बरोबर दत्ता झुरुंगे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने उमेदवार यअर्ज भरला होता. ए बी फॉर्म न मिळाल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जालिंदर कामठे आणि संदीप उर्फ गंगाराम जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोघांचे देखील उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. त्याचबरोबर बळीराम सोनवणे यांनी यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांना देखील एबी फॉर्म सादर करता आला नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. गंगाराम सोपान माने यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांना देखील एबी फॉर्म मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर शंकर बबन हरपळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना देखील उमेदवार एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध  ठरला आहे. तर एकूण ३३ अर्ज वैद्य ठरवण्यात आले आहेत. ते पुढील प्रमाणे 



श्री. उदयकुमार वसंतराव जगताप 

श्री. सुरेश बाबुराव विर 

श्री. दत्तात्रय मारुती झुरंगे 

श्री. दिगंबर गणपत दुर्गाडे 

श्री. महादेव साहेबराव खेंगरे पाटील 

श्री. अतुल महादेव नागरे

श्री. दिलीप विठ्ठल गिरमे

श्री. संभाजी सदाशिव झेंडे

श्री. संभाजी सदाशिव झेंडे

श्री. संभाजी सदाशिव झेंडे

श्री. गणेश बबनराव जगताप

श्री. विजय सोपानराव शिवतारे

श्री. जालींदर सोपानराव कामठे

श्री. संजय चंद्रकांत जगताप

श्री. उत्तम गुलाब कामठे

श्री. उत्तम गुलाब कामठे

श्री. शेखर भगवान कदम

श्री. विशाल अरूण पवार

श्री. शंकर बबन हरपळे

श्री. दत्तात्रय मारुती झुरंगे

श्री. सुरज संजय भोसले

श्री. अनिल नारायण गायकवाड

श्री. संदीप ऊर्फ गंगाराम मारुती जगदाळे

श्री. अभिजीत मधूकर जगताप

श्री. संदीप बबन मोडक

श्री. संजय चंद्रकांत जगताप

श्री. संजय चंद्रकांत जगताप

श्री. उमेश नारायण जगताप

श्री. संजय चंद्रकांत जगताप

श्री. संजय शहाजी निगडे

श्रीम. कीर्ती श्याम माने

श्री. आकाश विश्वास जगताप

श्री.सुरज राजेंद्र घोरपडे 



   याबाबतची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे..





Tuesday, October 29, 2024

संभाजी झेंडे यांच्याकडून एनसीपी अजित पवार गटाचा एबी फॉर्म सादर : आबासाहेबांना घड्याळ चिन्ह पुरंदर विधानसभा निवडणुकीत २८ उमेवारंनी ४० अर्ज दाखल केले : १०३ अर्जांची विक्री

 संभाजी झेंडे यांच्याकडून एनसीपी अजित पवार गटाचा एबी फॉर्म सादर : आबासाहेबांना घड्याळ चिन्ह 

पुरंदर विधानसभा निवडणुकीत २८ उमेवारंनी ४० अर्ज दाखल केले : १०३ अर्जांची विक्री 



पुरंदर :

      पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २८ उमेदवारांनी ४० अर्ज सादर केले आहेत. आमदार संजय जगताप यांनी आज मंगळवारी मोठ्या जनसमुदायासह शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करत मोठी सभा घेतली. आज शेवटच्या दिवशी संभाजी झेंडे यांनी एनसीपी अजित पवार गटाचा एबी फॉर्म निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. महायुतीतून काल शिवसेनेचे उपनेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेनेच्या एबी फॉर्म दाखल केला आहे. यामुळे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत वाटत असली तरी काटशहच्या या राजकीय खेळीत झेंडेंनी आपलं वर्चस्व सिद्ध केले आहे. 



    आज मंगळवार दि. २९ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे. 1) विशाल अरुण पवार (अपक्ष), २) संदीप उर्फ गंगाराम मारुती जगदाळे(भाजपा, अपक्ष), ३) शंकर बबन हरपळे( अपक्ष शिवसेना उबाठा), ४) जगताप अभिजीत मधुकर (अपक्ष), ५) अनिल नारायण गायकवाड (अपक्ष), ६)संदीप बबन मोडक (अपक्ष), ७) उमेश नारायण जगताप (मनसे), ८) संजय शहाजी निगडे (राष्ट्रीय समाज पक्ष), ९) बळीराम काळूराम सोनवणे (आर पी आय), १०) कीर्ती शाम माने (वंचित बहुजन आघाडी ) ११)  गंगाराम सोपान माने (आरपीआय ए आंबेडकर), १२) आकाश विश्वनाथ जगताप (अपक्ष), १३) सुरज राजेंद्र घोरपडे (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), १४) संजय चंद्रकांत जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), १५)  दत्तात्रय मारुती झुरांगे (अपक्ष), १६) सुरज संजय भोसले (बहुजन समाज पक्ष) असे १६ उमेदवारांनी २० अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत २८ उमेदवारांनी ४० नामनिर्देशन पत्र पुरंदरच्या निवडणूक कार्यालयात दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

तसेच मंगळवारी १) सुरज राजेंद्र घोरपडे, २) दत्तात्रेय मारुती झुरंगे, ३) आकाश विष्णू बहुले या ३ उमेदवारांकडून ५ अर्ज खरेदी करण्यात आले आहेत. 

Monday, October 28, 2024

अखेर आबासाहेबांच ठरलं! साहेबांना एनसीपीच टिकिट!

 अखेर आबासाहेबांच ठरलं! साहेबांना एनसीपीच टिकिट!



पुरंदर : पुरंदरच्या विधानसभा निवडणुकीत मोठे ट्विस्ट होणार असल्याचा अंदाज द न्युज मराठीने वर्तवला होता. सनदी अधिकारी संभाजी झेंडे मोठी राजकीय खेळी खेळत असल्याचेही सांगितले होते. आज मंगळवारी दुपारपर्यंत झेंडे यांना एनसीपी अजित पवार गटाची उमेदवारी जाहीर होऊ शकते असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. 



         महाविकास आघाडीतून विद्यमान आमदारांन टिकिट निश्चित झाले तरी महायुतीतून उमेदवार निश्चित होत नव्हता. माजी राज्यमंत्र्यांना उमेदवारी जाहीर झाली तरी महायूतीत सर्व आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. कारण एनसीपी गटाचे एकही कार्यकर्ता अर्ज दाखल करताना हजर नसल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यातच अजित पवारांचे विश्वासू पिडीसी बॅंकेचे चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी काल सोमवारी अर्ज दाखल केला. माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी ही काल मंगळवारी अर्ज दाखल करत मोठे शक्ती प्रदर्शन केले. झेंडे हे मोठ्या पक्षाचे टिकिट खेचून आणणारच या भुमिकेत आहेत. रात्री झालेल्या हलचालींवरून झेंडे एनसीपी अजित पवार गटाच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. राज्यात कितेक ठिकाणी एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांना थांबवून मेरिट मध्ये आघाडीवर असलेल्या दुसऱ्या उमेदवारंना टिकीट दिल्याचे उदाहरणे समोर येतं आहेत. त्यामुळे झेंडे घड्याळाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात दिसले तर आश्चर्य वाटायला नको. 


   महायुतीतील भाजप व एनसीपीच्या बहुतांश कार्यकर्त्यांना शिवतारेंची उमेदवारी रुचली नाही. पण उघड भुमिका घेता येत नसली तरी मतदान कोणाला करायचे हे त्यांनी निश्चित केले आहे. 'दगडा पेक्षा वीट मऊ' या भुमिकेत एनसीपी गटाची भुमिका आहे. महायुतीतील माजी आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी सभापती यांचे झेंडे साहेबांसोबतचे घनिष्ठ संबंध आहेत हे जगजाहीर आहे. पुर्वाश्रमी हे सगळे एकत्रच होते. काहिंचे नाते गोते ही  झेंडे साहेबांसोबत आहे. साहेबांचा नातलगांचा मोठा गोतावळा संपूर्ण पुरंदर व हवेली तालुक्यात आहे. त्यामुळे ते मेरिट वर सर्वात पुढे आहेत. त्यामुळे महायुतीतून झेंडे यांचे टिकिट निश्चित असून आता त्यांना घड्याळ चिन्ह मिळण्याचे निश्चित झाल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले

 आहे. 

अन् खा.शरद पवार यांनी केली अपघातग्रस्त शालेय विद्यार्थ्यांला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत

 अन् खा.शरद पवार यांनी केली अपघातग्रस्त शालेय विद्यार्थ्यांला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत




बारामती प्रतिनिधी : 

       अन् अवघ्या एका फोनवर जखमी शालेय विद्यार्थ्यावर १५ लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च खा. शरद पवार यांनी उचलुन उपचाराच्या चिंतेत असलेल्या वाईकर कुटुंबाला सुखद धक्का मिळाला आहे.

     २० ऑक्टोबर २०२४ रोजी दहावीत शिकणाऱ्या दादा सदानंद वायकर या पंधरा वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यांचा निरा - बारामती या राज्य मार्गावर शरद संकुल जवळ भिषण अपघात झाला. त्यास सामाजिक कार्यकर्ते संदीप आढाव यांनी वेळीच मदत केल्याने बारामतीत प्राथमिक उपचार करून पुण्यातील नामवंत रुबी हॉल क्लिनिक मधे तातडीने शस्त्रक्रिया केली.

  त्यांच्या पुढील उपचारासाठी १५ लाख रुपये खर्च करावा लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. यावर मोलमजुरी व भिक्षा मागून जिवन जगणाऱ्या भटक्या जोशी समाजाच्या वाईकर कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली. अखेर लोकवर्गणी करुन उपचार करावयाचे ठरविले.

        मात्र खा.शरद पवार यांच्या रुपाने त्यांना देवदुत सापडला. आज गोविंद बागेत जखमी दादा वाईकर यांचे आजोबा हरिभाऊ वायकर, कुमार वायकर, सोपान घाडगे, आनंद गोंडे, अजित गोंडे, निलेश गंगावणे, शाहरुख बागवान यांनी भेट घेऊन आर्थिक मदतीची याचना केली.

         अखेर खा. शरद पवार यांनी विठ्ठल मणियार यांना हि बाब सांगुन थेट रुबी हॉल क्लिनिकशी संपर्क साधून दादा वायकर यांचा सर्व उपचार खर्च मी करेन. तो बरा होई पर्यंत त्यांच्या कुटुंबियांना पैसे मागु नका अशी सुचना केली.

         दरम्यान सदर अपघाताची दैनिक पुण्यनगरी मधील बातमी खा.शरद पवार यांना दाखवण्यात आली. शरद पवार यांच्या मुळे माझ्या नातुला पुनर्जन्म मिळणार असून अपघातात मदत करणारे संदीप आढाव मरेपर्यंत स्मरणात ठेवु असे हरिभाऊ वायकर यांनी सांगितले.

पुरंदर विधानसभा निवडणुकीत १४ उमेवारंनी २० अर्ज दाखल केले : १०० अर्जांची विक्री मतदारसंघात महाविकास आघाडी व महायूतीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

 पुरंदर विधानसभा निवडणुकीत १४ उमेवारंनी २० अर्ज दाखल केले : १०० अर्जांची विक्री 


मतदारसंघात महाविकास आघाडी व महायूतीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. 




पुरंदर : पुरंदर विधानसभा निवडणुकीत सोमवार दि.२८ ऑक्टोबर रोजी १२ नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. महायुती व महाविकास आघाडीतील दिग्गजांना अधिकृत पक्षांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी घटक पक्षातील इच्छूकांनी आप आपल्या पक्षांच्या नावाने व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तालुक्यात निवडणूकीच्या चर्चा झडत आहेत. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायूतीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. 


  शुक्रवार दि २५ रोजी १) उदयकुमार वसंतराव जगताप (अपक्ष), २) सुरेश बाबुराव वीर (अपक्ष), ३) दत्तात्रय मारुती झुरंगे (अपक्ष) या अर्जदारांनी आपले निवडणुकीचे अर्ज सादर केले होते. सोमवार दि.२८ रोजी १) दिगंबर गणपत दुर्गाडे अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, २) महादेव साहेबराव खेंगरे पाटील अपक्ष ३) अतुल महादेव नागरे अपक्ष, ४) दिलीप विठ्ठल गिरमे अपक्ष, ५) संभाजी सदाशिव झेंडे एनसीपी, शेतकरी कामगार पक्ष, अपक्ष, ६) दत्तात्रय मारुती झुरंगे एनसीपी अजित दादा, ७) गणेश बबनराव जगताप अपक्ष, ८)  विजय सोपानराव शिवतारे शिवसेना, ९) जालिंदर सोपानराव कामटे अपक्ष ,भाजपा, १०) उत्तम गुलाब कामठे संभाजी ब्रिगेड, अपक्ष ११) शेखर भगवान कदम अपक्ष,१२) संजय चंद्रकांत जगताप काँग्रेस या अर्जदारांनी आपले निवडणुकीचे अर्ज सादर केले आहेत. 



       सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी ६ उमेदवारांनी १२अर्ज नामनिर्देशक पत्र खरेदी केले आहेत. उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे संजय चंद्रकांत जगताप, शेखर भगवान कदम, महादेव ज्ञानोबा कापरे, संजय शहाजी निगडे, संभाजी सदाशिव झेंडे,  मयूर दत्तात्रय जाधव. सोमवार पर्यंत ५४ उमेदवारांनी १०० अर्ज खरेदी केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Saturday, October 26, 2024

पुरंदरच्या विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट

 पुरंदरच्या विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट 



पुरंदर : राज्याच्या विधानसभेचे बिगूल वाजून आठवडा झाला तरी महायुती, महाविकास आघाडी व तिसऱ्या आघाडीतील उमेदवरांचा मेळ काही केल्या लागेना. पुरंदरच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांन महाविकास आघाडीने राष्ट्रीय काँग्रेस पक्षची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील एक, तर महायुतीतील तब्बल सहा उमेदवार आप आपल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पण शनिवारी मोठी घडामोडी झाली व महाविकास आघाडीतून इच्छूक असलेले उमेदवार चक्क महायुतीतून उमैदवारी मिळवण्यात यशस्वी झाल्याची चर्चा रंगली आहे. 


    पुरंदर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून विद्यमान आमदार, महायुतीतून माजी राज्यमंत्री व हट्ट करत असलेले पुर्वश्रमीचे मोठे अधिकारी हे तीघेच निवडणूक लढवतील अशी अपेक्षा मतदारांना होती. महविकास आघाडीत विद्यमान आमदार व पुर्वश्रमीचे मोठे अधिकारी यांच्यात उमेदवारी वरुन मोठी रस्सीखेच होती. पण राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्याच यादित विद्यमान आमदरांची उमेदवारी जाहीर झाली. यामुळे व्यथित झालेल्या अधिकाऱ्यांनी पर्याय शोधण्याची मोठी कसरत केली. शासकीय सेवेत असताना राष्ट्रीय पातळीवरील राजकीय नेत्यांशी असलेल्या संपर्काच्या जोरावर यांनी दोन दिवसांत मोठी फिलडिंग लावली आहे. थेट केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करत पुरंदरच्या जागेवर दावा केला आहे. महायुतीतून संभावीत उमेदवारांचे मेरिट कमी असल्याचा सर्व्हे महायूतीकडे प्राप्त झाल्याने उमेदवार बदलीचा विचार महायुतीच्या जेष्ठांनी घेतल्याचे बोलले जात आहे. 


      रविवारी दुपारपर्यंत या अधिकारी साहेबांचे टिकिट महायुतीतून एका पक्षाकडून जाहिर होऊ शकते. या बबतच्या मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 'एकदा ठरल की ठरलं.. मग माघार अजिबात नाही !' ही टॅग लाईन घेऊन साहेबंचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियाच्या माध्यमातून साहेब विधानसभा लढविणारच ही भुमिका मांडत आहेत. तालुक्यातील सोशल मीडिया गृप मध्ये मोठ्याप्रमाणावर त्यांचे व्हिडिओ व पोस्टर पाठवले जात आहेत. चिन्हाची खात्री नसली तरी उमेदवार रिंगणात असणार हे खात्रीशीर सांगितले जात आहे. 

Friday, October 25, 2024

पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ उमेदवारांचे अर्ज दाखल ; तर ४७ अर्जदारांनी ८८ अर्ज

 

पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ उमेदवारांचे अर्ज दाखल ; तर ४७ अर्जदारांनी ८८ अर्ज 




पुरंदर : राज्यात विधानसभा निवडणूकीचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर पर्यंत ४७ अर्जदारांनी ८८ अर्ज खरेदी केले आहेत. तर या पैकी ३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र पुरंदर निवडणूक कार्यालयात दाखल केले आहेत. 


      पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत १) उदयकुमार वसंतराव जगताप (अपक्ष), २) सुरेश बाबुराव वीर (अपक्ष), ३) दत्तात्रय मारुती झुरंगे (अपक्ष) या अर्जदारांनी शुक्रवारी आपले निवडणुकीचे अर्ज सादर केले आहेत. पहिल्या दिवशी मंगळवार दि. २४ रोजी उत्तम गुलाब कामटे, दत्तात्रय मारुती झुरंगे, अनिल नारायण गायकवाड, संदीप उर्फ गंगाराम मारुती जगदाळे, चंद्रकांत शंकर भिंताडे, शंकर बबन हरपळे, दिगंबर गणपत दुर्गाडे, उत्तम गुलाब काळे, जालिंदर सोपानराव कामठे, महादेव साहेबराव खेंगरे पाटिल, सुरेश बाबुराव वीर, अतुल महादेव नागरे, उमेश नारायण जगताप, विशाल अरुण पवार, बुधवार दि. २३ रोजी गंगाराम सोपान माने, जितेंद्र बाळासाहेब जगताप, संभाजी सदाशिव झेंडे, दिलीप सोपान यादव, योगेश अर्जुन फडतरे, दिलीप विठ्ठल गिरमे, उदयकुमार वसंतराव जगताप, कैलास दत्तात्रय कटके, विशाल अरुण पवार, बळीराम काळूराम सोनवळे, विशाल वसंत जगताप, गणेशदादा बबनराव जगताप. गुरुवार दि. २४ रोजी चांगदेव नामदेव कारंडे, दीपक जयवंत म्हेत्रे, संजय चंद्रकांत जगताप, अशोक छगन बरकडे, दिगंबर गणपत दुर्गाडे, विराज धनंजय काकडे, आकाश विश्वनाथ जगताप, स्वप्निल पोपट पाटोळे, अभिजीत मधुकर जगताप, विजय सोपानराव शिवतारे, पंडित परशुराम मोडक, वसंत रामराव दगडे, विनय वसंतराव दगडे. शुक्रवार दि. २५ रोजी 


नाम निर्देशन पत्र खरेदी केलेल्या उमेदवारांची नावे खालील प्रमाणे. कीर्ती श्याम माने, श्रीमंत रुद्रअप्पा गायकवाड, हनुमंत जगन्नाथ भुजबळ, दत्तात्रय मारुती झुरंगे, सुरज संजय भोसले,संदीप बबन मोडक, सोमनाथ हिरामण कोकरे, विनय वसंतराव दगडे यांनी नाम निर्देशन पत्र खरेदी केले असून शुक्रवार दि. २५ रोजी पर्यंत ४७अर्जदारांनी उमेदवारांनी ८८ अर्ज खरेदी केले आहेत. तर तीन अर्जदारांनी उमेदवारी अर्ज पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात दाखल केले

 आहेत. 

Sunday, October 20, 2024

अजित पवार यांचा ठरलं.. या मतदारसंघातून लढवणार विधानसभा


 अजित पवार लढवणार बारामती मधून निवडणूक

  पुणे दि.२१



       बारामती विधानसभा मतदारसंघातून आपण जो देईल त्या उमेदवाराला निवडून द्या. अस अजित पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केलं होतं. यानंतर अजित पवार हे बारामती निवडणूक लढवणार नाहीत अशी अटकल बांधली जात होती. त्यामुळेच अजित पवार हे कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र आता अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे.


      बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे. अजित पवार हे 28 ऑक्टोबर रोजी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता बारामतीची लढत ही रंगतदार होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यामध्ये हा सामना प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे. अजित पवारांचा पराभव करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसलेली आहे. अजित पवार देखील आता बारामती मधून निवडणूक लढवण्यासाठी तयार झालेले आहेत. बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनीच निवडणूक लढवावी अशी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली होती . या संदर्भात अजित पवार यांची गाडी अडवून त्यांनीच या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती.. त्यामुळे आता अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत . त्यामुळे बारामतीची निवडणूक ही आता रंगतदार होणार हे निश्चित आहे. यावेळची बारामती विधानसभेची लढत ही पवार विरुद्ध पवार अशी असणार आहे.आता प्रतीक्षा आहे ती शरद पवार कोणता उमेदवार देतायत याची

पुरंदर तालुक्यात ज्वेलर्सचे दुकान फोडून लाखो रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांची चोरी

 नीरा येथे ज्वेलर्सचे दुकान फोडून लाखो रुपयांच्या चांदीच्या  दागिन्यांची चोरी 

अधिक

माहितीसाठी व्हिडिओ पहा....☝️☝️



Saturday, October 19, 2024

माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो- मी लाडकी बहिण योजना कधीही बंद होऊ देणार नाही : अजित पवार

 माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो- मी लाडकी बहिण योजना कधीही बंद होऊ देणार नाही : अजित पवार





 


मुंबई : 


     लाडकी बहिण योजना बंद करण्याचं स्वप्न बघणाऱ्यांना अजित पवारांचे सडेतोड उत्तर, 'सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी वाढीव आर्थिक मदतीचे आश्वासन'; व्हिडिओ संदेशात महिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मानले आभार. 


     राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे महाराष्ट्रातील महिलांचे लाडकी बहीण योजनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. महायुती सरकारच्या माझी लाडकी बहिण योजनेच्या यशाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, या योजनेने महिलांना स्वावलंबी बनवून सक्षम केले आहे. या योजनेमुळे लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यास मदत झाली आहे, असे अजित पवार म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महिलांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 


     आधी या योजनेच्या व्यवहार्यतेवर आणि नंतर त्याच्या अंमलबजावणीवर विरोधकांनी सातत्याने विरोध केला आणि ही योजना अंमलात आल्यानंतर आता पैसे येत असले तरी निवडणुकीनंतर ही योजना बंद केली जाईल, असे विरोधक पसरवताय. लाडकी बहीण योजनेबद्दल सांगताना अजितदादा म्हणाले की, महिलांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांचा वापर केला आहे. दुसऱ्या एका घटनेत एका महिलेने दोन महिन्यांचा हप्ता आणि स्वत:च्या बचतीतून शिवणयंत्र विकत घेतले आहे. राज्यभरात अशा अनेक महिलांच्या यशोगाथा समोर येत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अडीच कोटींहून अधिक महिलांना पाच महिन्यांचा एकूण ७ हजार ५०० रुपयांचा हप्ता मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 


राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आणि ४६ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली. या योजनेअंतर्गत सरकार महिलांना १,५०० रुपये देते. विरोधी पक्षातील अनेकांनी ही योजना बंद केल्याचा दावा केला असला तरी तुम्ही माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो- मी ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही, असे अजित पवार म्हणाले. निवडणुकीनंतर महायुती सरकारकडून योजनेच्या निधीत वाढ करण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. 


महिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत अजित पवार म्हणाले की, 'महाराष्ट्रातील माझ्या बहिणी आगामी निवडणुकीत ही योजना संपवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देतील.'

Thursday, October 17, 2024

पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी वर्षा लांडगे निवडणूक निर्णय अधिकारी. ४ लाख ५८ हजार २८२ मतदार : निवडणूकीसाठी २ हजार १९८ कर्मचारी नियुक्त

 पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी वर्षा लांडगे निवडणूक निर्णय अधिकारी. 


४ लाख ५८ हजार २८२ मतदार : निवडणूकीसाठी २ हजार १९८ कर्मचारी नियुक्त 



पुरंदर : 

      महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांकरीता विधानसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहिर झाला आहे. २०२ पुरंदर विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती. वर्षा लांडगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करणेत आलेली असून व १ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करणेत आली आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये ४ लाख ५८ हजार २८२ मतदार असून, निवडणूक प्रक्रिया पार पाडणेसाठी २ हजार १९८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी नवीन प्रशासकीय इमारत, सासवड (पुरंदर) येथे होणार असल्याची माहिती पुरंदरचे प्रशासनाने दिली आहे. 


        भारत निवडणूक आयोगाने दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये आयोगाने प्रसिध्द केलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक १५ ऑक्टोबर पासून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. २०२ पुरंदर विधानसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचा कक्ष. प्रशासकीय इमारत पहिला मजला, तहसिलदार कार्यालय सासवड (पुरंदर) या ठिकाणी मंगळवार दि. २२/१०/२०२४ ते मंगळवारी २९/१०/२०२४ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्र छाननी बुधवार  दि. ३०/१०/२०२४ आहे. उमेदवारी मागे घेणे सोमवार  दि. ०४/११/२०२४ आहे. मतदान बुधवार दि. २०/११/२०२४ असून मतमोजणी शनिवार दि.  २३/११/२०२४ असा आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली २३ विषय पथके, ११-SST, ९-FST, ४-VST आणि ३- VVT अशा विविध पथकांची नेमणूक करणेत आली आहे. 


     २०२ पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये आज अखेर पुरूष मतदार २,३८,००१, स्त्री मतदार २,२०, २४९, इतर मतदार ३२ असे एकुण ४,५८,२८२ एवढे आज रोजी मतदार आहेत. त्यापैकी दिव्यांग मतदारांची संख्या ४०७५ व ८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांची संख्या ८४२८ आहे. तसेच सैनिक मतदार ६१३ आहेत. सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडणेसाठी २,१९८ मनुष्यबळाची नियुक्ती करणे प्रस्तावित आहे. मतदान यंत्रे ठेवणेसाठी तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत, सासवड (पुरंदर) येथे सुरक्षाकक्ष तयार करणेत आले आहे. त्याच ठिकाणी मतदान साहित्य वाटप व मतदान साहित्य स्विकारणेसाठी व्यवस्था करणेत येणार आहे. तसेच शनिवारी दि. २३/११/२०२४ रोजी मतमोजणी पार पाडण्यात येणार असल्याचे पुरंदरच्या महसूल प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

Wednesday, October 16, 2024

'महायुती सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी काम केले', उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रिपोर्ट कार्ड जारी

 'महायुती सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी काम केले', उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून  रिपोर्ट कार्ड जारी 




मुंबई : 

       महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामांचे रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध करताना अजित पवार म्हणाले की, सरकारने सर्व समाजातील सर्व घटकांसाठी काम केले. ते पुढे म्हणाले, 'आम्ही प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. विरोधकांकडून खोटी मांडणी केली जात आहे; दोन-तीन टप्प्यात निवडणुका होतील, असा दावा त्यांनी केला होता.


     अडीच कोटी महिलांना लाडकी बहिण योजनेचे हप्ते दिले जातात, विरोधकांनी या योजनेच्या बाबतही खोटी मांडणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी आम्ही एक वर्षासाठी ४५,००० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महायुती सरकारचा कामांचा ट्रॅक रेकॉर्ड सिद्ध आहे आणि आम्ही आमच्या कामाच्या आधारे मतदारांकडे जात आहोत.


गेल्या दोन वर्षांतील गुंतवणूक आणि विकास कामांवर प्रकाश टाकताना अजित पवार म्हणाले, आम्ही सर्व क्षेत्रांसाठी निर्णय घेतले आहेत. अर्थमंत्री या नात्याने अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली ज्या अंतर्गत सरकार अडीच कोटी महिलांना १५०० रुपयांची आर्थिक मदत देत आहे. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सरकार ५२ लाखांहून अधिक कुटुंबांना मोफत ३ एलपीजी सिलिंडर देत आहे. बळीराजा विज सवलत योजनेच्या माध्यमातून सरकार साडेसात हजारांपर्यंत वीज उपलब्ध करून देत असून, ४४ लाख ६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. या योजनेसाठी नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात १४ हजार ७६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

Tuesday, October 15, 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना वृत्तसंकलनासाठी ओळखपत्र द्या मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेची मागणी एस.एम.देशमुख यांचे निवडणूक आयोगाला पत्र

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना वृत्तसंकलनासाठी ओळखपत्र द्या

मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेची मागणी

एस.एम.देशमुख यांचे निवडणूक आयोगाला पत्र




मुंबई दि. १५ प्रतिनिधी


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान व मतमोजणीचे वृत्तसंकलन करण्यासाठी मुद्रीत व इलेक्ट्रानिक मीडियाच्या प्रतिनिधींसोबत डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना निवडणूक आयोगाने ओळखपत्र (प्रधिकारपत्र) द्यावे, अशी मागणी मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेच्यावतीने भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी ई-मेलद्वारे पत्र पाठवले आहे. 


एस.एम.देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त या नात्याने आपण १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे, आणि २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत जास्तीतजास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून करण्यात येणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वापरला जातो. तसेच मुद्रीत, इलेक्ट्रानिक, डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी देखील यासाठी प्रयत्न करीत असतात,’ असे देशमुख यांनी पत्रात म्हंटले आहे. 


‘निवडणूक आयोगाच्या मतदारांसाठी उपयुक्त असणाऱ्या बातम्या ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुद्रीत, इलेक्ट्रानिक मीडिया सोबतच डिजिटल मीडियाची भूमिका खूपच महत्त्वपूर्ण आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत वृत्तांकन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रधिकारपत्रे देण्यात येते, तेव्हा केवळ मुद्रीत व इलेक्ट्रानिक मीडियाच्या प्रतिनिधींना ते दिले जातात. डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना मतदान आणि मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी वृत्तांकनासाठी प्रधिकारपत्र दिले जात नाही. त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही निवडणूक विषयी आवश्यक माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यास डिजिटल मीडिया प्रतिनिधींना अडचणी येतात. निवडणूक आयोग स्वतः मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया, यु ट्यूब यासारखी माध्यमे वापरत असल्याने डिजिटल मीडियाची ताकद नेमकी किती आहे, याची कल्पना निवडणूक आयोगाला आहेच,’ असेही देशमुख यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.  


‘यासर्व गोष्टींचा विचार करून कृपया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुद्रीत, इलेक्ट्रानिक मीडिया सोबतच डिजिटल मीडिया (न्यूज पोर्टल, युट्यूब न्यूज चॅनल) यांनाही वृत्तसंकलन करण्यास ओळखपत्र (प्रधिकारपत्र) द्यावे, अशी मागणी मराठी पत्रकार परिषद, मुंबई आणि या संघटनेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद  यांच्या वतीने करण्यात येत असून आपण आमच्या मागणीचा विचार करून योग्य त्या सूचना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा निवडणूक अधिकारी यांना द्याव्यात,’ अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

ऋषिकेश तावरे यांची अन्नपुरवठा निरीक्षकपदी निवड

 ऋषिकेश तावरे यांची अन्नपुरवठा निरीक्षकपदी निवड 



पुरंदर प्रतिनिधी दि. १५:

   पुरंदर तालुक्यातील सासवड येथील ऋषिकेश लक्ष्मण तावरे यांची अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत अन्न पुरवठा निरीक्षक ( Food Supply Inspector ) पदी निवड झाली.

    ऋषिकेश तावरे यांचे १ ली ते १० पर्यंतचे शिक्षण वाघिरे विद्यालय सासवड ,११ वी ते १२ वीचे महाविद्यालयीन शिक्षण वाघिरे कॉलेज सासवड, मेकॅनिकल इंजिनियर शिक्षण के जे कॉलेज येथे पूर्ण केले. 

     ऋषिकेश तावरे यांच्या उज्वल यशाबद्दल विविध संघटना, संस्था, पक्ष ,मंडळे यांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

      ऋषिकेश तावरे यांनी वडील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक लक्ष्मण तावरे,आई आदर्श शिक्षिका दैवता तावरे, बहीण इंटेरियर डिझायनर ऋतुजा गवळी -तावरे यांच्या पाठिंब्याने सातत्य, जिद्द, परिश्रम व चिकाटी याच्या जोरावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवून हे उज्वल यश संपादन केले आहे. 



विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले, “आमचा विकासकामांचा ट्रॅक रेकॉर्ड महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणासाठीच्या आमच्या बांधिलकीची साक्ष देतो."

 विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले, “आमचा विकासकामांचा ट्रॅक रेकॉर्ड महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणासाठीच्या आमच्या बांधिलकीची साक्ष देतो."




मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले,“आमचा विकासकामांचा ट्रॅक रेकॉर्ड महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणासाठीच्या आमच्या बांधिलकीची साक्ष देतो. निवडणुकांच्या घोषणा होताच अजित पवारांनी ट्विट केले आहे. आमचा ऐतिहासिक अर्थसंकल्प, आमचा विकासाचा रेकॉर्ड, लाडकी बहीण योजना, तीन मोफत सिलिंडर, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी’ आमची ही कामं लोकांसमोर आहेत.


पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सज्ज राहा असे सांगून ते म्हणाले की, आपण काळ वेळ न बघता अथक परिश्रम घेतले आहेत, आता लोकांकडे जाऊन हात जोडून मतदान मागण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी विधानसभा निवडणुकांच्या घोेषणांचं स्वागत केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांशी असलेल्या आपल्या बांधिलकीला दुजोरा देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकाचे कल्याण आणि गरिबांच्या उन्नतीसाठी समर्पित असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

Saturday, October 12, 2024

एज्युफंड लिटिल चॅम्प्स ड्रॉइंग स्पर्धा महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात संपन्न

एज्युफंड लिटिल चॅम्प्स ड्रॉइंग स्पर्धा महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात संपन्न 



पुरंदर प्रतिनिधी दि. १२

१०  आणि ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये भरवलेली एज्यूफंड लिटल चॅम्प्स चित्रकला स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली.UTI म्युच्युअल फंड द्वारा पुरस्कृत आणि SmartLinkz डिस्ट्रिब्युशन नेटवर्क द्वारे राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत इयत्ता 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसला. 

स्पर्धेची थीम सामाजिक समस्यांवर केंद्रित होती, जसे की "शिक्षण हे सामाजिक बदलाचे माध्यम आहे" , "स्वच्छतेचे महत्त्व," आणि "प्रदूषण ही गंभीर समस्या आहे".  तरुण कलाकारांनी त्यांच्या सर्जनशील आणि विचारप्रवर्तक रेखाचित्रांद्वारे त्यांची सर्जनशीलता आणि प्रतिभा प्रदर्शित केली आणि या गंभीर समस्यांबद्दल त्यांची समज व्यक्त केली. 

या स्पर्धेने तरुण मनांना प्रेरणा देण्यासाठी आणि आर्थिक नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले. अशा स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्याचा आणि विद्यार्थी व पालक यांना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सक्षम करण्याचा संकल्प एज्यूफंडचा

 आहे.

Friday, October 11, 2024

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून हे अभिनेते काम करणार

 राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून हे अभिनेते काम करणार 


प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, सयाजी शिंदे राज्यभरात पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार 



मुंबई : 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला असून, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांचे पक्षात स्वागत केले. 


सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत समाजातील उपेक्षित घटकांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या प्रबळ मराठा समाजातील शिंदे यांच्याकडे स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आधार असून त्यांच्या 'सह्याद्री देवराई' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते राज्याच्या ग्रामीण भागात सक्रीय पणे कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे यांच्या प्रवेशाचा उद्देश ग्रामीण मतदार तसेच विचारवंत वर्गात पक्षाचा पाया मजबूत करणे हा आहे, कारण ते विचारवंत वर्तुळात चांगलेच लोकप्रिय आहेत. अजित पवार यांनी सयाजी शिंदे हे पक्षाचे स्टार प्रचारक बनून राज्यभर प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. 


अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांचे पक्षात स्वागत करताना सयाजी शिंदे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शिंदे यांनी विशेषत: वृक्षलागवड, पाणी व मृदसंधारण क्षेत्रात घेतलेल्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. ते केवळ अभिनेते नाहीत, तर सच्चे समाजसेवक आहेत, याची साक्ष त्यांचे सामाजिक कार्य आहे. सयाजींची विचारधारा आणि त्यांचे प्रयत्न आमच्या पक्षाच्या मूळ तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहेत, जे समाजाच्या प्रत्येक स्तराच्या उन्नतीसाठी समर्पित आहे, असे अजित पवार म्हणाले. सयाजी शिंदे यांच्या प्रवेशामुळे पक्षाची धोरणे व कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, असे राष्ट्रवादी चे अध्यक्ष म्हणाले.  


राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत बोलताना सयाजी शिंदे यांनी अजितदादांशी असलेल्या आपल्या जुन्या नात्यावर भर दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ते म्हणाले की, "त्यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ते आपल्या शब्दावर ठाम आहेत. ते आतून जसे आहे, तसेच बाहेरही आहे. आणि स्वभावाने मीही तसाच आहे. माझ्या मनात जे काही आहे, ते मी स्पष्टपणे बोलतो, हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. अजितदादा आणि माझ्यात हे काहीतरी साम्य आहे. सयाजी शिंदे आपल्या 'सह्याद्री देवराई' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. राजकारणात येऊन आपण समाजसेवा पुढे नेऊ शकतो आणि समाजासाठी अधिक योगदान देऊ शकतो, असे ते म्हणाले. त्यांच्यासाठी अजित पवारांपेक्षा चांगला पर्याय नाही, कारण त्यांचा पक्ष उपेक्षितांसाठी काम करतो - शेतकरी, महिला, मजूर. राष्ट्रवादीची विचारधारा शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या शिकवणुकीवर आधारित आहे, जी मला मनापासून भावते, असे शिंदे म्हणाले. सर्व पक्षांपैकी आपण राष्ट्रवादीची निवड का केली, या प्रश्नावर अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले की, "इतर पक्षात जाण्यासाठी बरेच पर्याय होते, परंतु मी केवळ अशा पक्षात जाण्याचा विचार केला जिथे नेतृत्व पारदर्शक असेल आणि खऱ्या अर्थाने समाजाच्या कल्याणासाठी काम करेल". अजित पवार यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व वेगळे असून माझ्याप्रमाणेच त्यांचाही दाखवण्यापेक्षा कृतीवर विश्वास आहे, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

Thursday, October 10, 2024

पत्रकारांसाठी महामंडळ हा फक्त निवडणूक जुमला : एस. एम. देशमुख महामंडळ स्थापन करून पत्रकारांचे प्रश्न सुटतील असं आम्हाला वाटत नाही

पत्रकारांसाठी महामंडळ हा फक्त निवडणूक जुमला : एस. एम.  देशमुख 

महामंडळ स्थापन करून पत्रकारांचे प्रश्न सुटतील असं आम्हाला वाटत नाही.



मुंबई : 

     पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन काढून राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यास टाळाटाळ केली जात आहे, पत्रकार पेन्शन योजनेसाठी अनेक ज्येष्ठ पत्रकारांचे अर्ज तांत्रिक दोष काढून हेतूत: प्रलंबित ठेवले जात आहेत, पेन्शनची रक्कम ११,००० वरून २०,००० करण्याची घोषणा तर केली गेली मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही, मजेठिया वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे, अधिस्वीकृती पत्रिका धारकाच्या रेल्वेसह अनेक सवलती रद्द केल्या गेल्या आहेत, साप्ताहिकं आणि छोटी दैनिकं बंद पडतील असं वृत्तपत्र धोरण आखलं जात आहे, चांगल्या युट्यूब चँनल्सना सरकारी जाहिराती सुरू करा, त्यांना अधिस्वीकृती द्या या मागण्यांकडे दुर्लक्ष  केलं जात आहे. या सर्व बुनियादी प्रश्नांची उपेक्षा करून सरकार आता पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करायला निघालं आहे. हा केवळ निवडणूक जुमला आहे..होणार काही नाही.. याचं कारण पत्रकारांचे प्रश्न सुटले पाहिजेत असं सरकारला मुळी वाटतंच नाही. 


महामंडळ स्थापन करून पत्रकारांचे प्रश्न सुटतील असं आम्हाला वाटत नाही. विविध क्षेत्रातील लोकांसाठी अगोदरच राज्यात ५५ महामंडळं आहेत, या महामंडळाची काय अवस्था आहे आणि त्यातून किती लोकांचे कोट कल्याण झाले म्हणून  महामंडळाने पत्रकारांचे होणार आहे? "पांढरे हत्ती" अशीच या सर्व महामंडळाची ओळख आहे. गोदी मिडियातील काही लोकांची सोय करणे एवढाच या घोषणेचा अर्थ असू शकतो. 


कोणी केली होती ही मागणी..? 

राज्यातील कोणत्याही प्रमुख पत्रकार संघटनेनं ही मागणी केलेली नाही किंवा कोणत्याही प्रमुख पत्रकार संघटनेशी सरकारने यासंदर्भात चर्चा, विचारविनिमय केलेला नाही. त्यामुळे निवडणूक काळात पत्रकारांसाठी ही आम्ही काही करतो आहोत एवढायापुरताच आमच्या लेखी या घोषणेला अर्थ आहे. पत्रकारांना गाजर दाखविण्याचा प्रयत्न या घोषणेच्या माध्यमातून सरकारनं केला आहे. 


"प्रेस कॉन्सिल ऑफ इंडिया" च्या धर्तीवर महाराष्ट्रात प्रेस कॉन्सिल स्थापन करावी अशी पत्रकार संघटनांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मागणी केली होती. विलासराव देशमुख त्याबाबत सकारात्मक होते. मात्र तेव्हा ते झाले नाही. नंतरही महत्वाच्या पत्रकार संघटना याचा पाठपुरावा करीत राहिल्या परंतू त्याकडे सत्ताधारी पक्षांनी दुर्लक्ष करून महामंडळासारखी सवंग घोषणा आज सरकारने केली आहे. पत्रकारांना कामगारांच्या श्रेणीत लोटणयाचा प्रयत्न सरकार करीत आहे. यातून पत्रकारांच्या हाती काही लागणार नाही हे स्पष्ट आहे..

आम्हाला हे महामंडळ मान्य नाही. 


एस.एम.देशमुख

मराठी पत्रकार परिषद, मुंबई

Wednesday, October 9, 2024

मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी अष्टीवकर तर कार्याध्यक्षपदी काटकर यांची निवड सरचिटणीस म्हणून नाईकवाडे तर कोषाध्यक्षपदी मन्सुरभाई शेख यांना संधी

मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी अष्टीवकर तर कार्याध्यक्षपदी काटकर यांची निवड 

सरचिटणीस म्हणून नाईकवाडे तर कोषाध्यक्षपदी मन्सुरभाई शेख यांना संधी 

मुंबई येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची घोषणा, माजी अध्यक्ष शरद पाबळे यांची विश्वस्तपदी नियुक्ती 





मुंबई दि. ९ प्रतिनिधी :

       ८६ वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कार्याध्यक्ष म्हणून सांगलीचे पत्रकार शिवराज काटकर आणि सरचिटणीस म्हणून परभणीचे पत्रकार सुरेश नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भोळे यांच्यावतीने एस.एम.देशमुख यांनी काल, ९ ऑक्टोबर रोजी ही घोषणा केली. रोह्याचे मिलिंद अष्टीवकर हे परिषदेचे नवे अध्यक्ष आहेत. 

मराठी पत्रकार परिषदेची सर्वसाधारण सभा काल , बुधवारी (९ ऑगस्ट २०२४) मुंबई प्रेस क्लबच्या सभागृहात उत्साह पार पडली. याप्रसंगी परिषदेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. परिषदेच्या घटनेनुसार १ सप्टेंबर २०२४ रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी मिलिंद अष्टिवकर यांची निवड झाली होती. तर आज मुंबई येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत कार्याध्यक्षपदी शिवराज काटकर, सरचिटणीसपदी प्रा.सुरेश नाईकवाडे व कोषाध्यक्षपदी मन्सूरभाई शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

परिषदेच्या विश्वस्त पदाची एक जागा रिक्त होती. त्या जागेवर माजी अध्यक्ष शरद पाबळे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान, नवीन कार्यकारिणीने परिषदेची सूत्र हाती घेतली असून आता पुढील पंधरा दिवसांमध्ये कार्यकारिणी सदस्य, उपाध्यक्ष, विभागीय सचिव, उपाध्यक्ष पदाच्या  नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहितीही एस.एम.देशमुख यांनी याप्रसंगी दिली. 

‘ स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेली मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची देशातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी पत्रकार संघटना आहे. परिषदेने पत्रकारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून पत्रकारांच्या सुख दुखात सहभागी होण्याची भूमिका परिषदेने घेतलेली असल्याने पत्रकारांनी परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र आलं पाहिजे असं आवाहन एस.एम.देशमुख यांनी केलं आहे.    'काळाची पावले ओळखून परिषदेने सातत्याने नव्या बदलांना अंगिकारणयाची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळेच राज्यातील डिजिटल पत्रकारांसाठी "डिजिटल मिडिया परिषद" सुरू केली असून नुकतीच तिची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. परिषदेच्या सदस्यांनी नव्या युगाच्या मिडियाचे महत्व लक्षात घेऊन त्याची उपेक्षा न करता डिजिटल मिडिया परिषदेला सहकार्य करावे,' असे आवाहनही देशमुख यांनी केले. 'आपली संघटना नवीन उंचीवर नेण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी, सभासद यांनी आगामी काळात काम करावे. परिषदेच्या सर्व बाबी अपडेट असल्यामुळे नवीन पदाधिकारी त्यांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील,’ असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला. 

विश्वस्त किरण नाईक यांनी पदं ही मिरवण्यासाठी नाहीत तर त्या माध्यमातून संघटना भक्कम करणे आणि पत्रकारांना कायम मदत करण्याचे काम पदाधिकऱ्यांनी करावे, असे आवाहन केले. नवनिर्वाचित विश्वस्त शरद पाबळे, शिवराज काटकर, सुरेश नाईकवाडे, अनिल वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना संघटना अधिक भक्कम आणि व्यापक करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. निवडणूक अधिकारी अनिल भोळे याचा यावेळी सन्मान करण्यात आला. बैठक यशस्वी करण्यासाठी मुंबई विभागाचे सचिव दीपक कैतके, अध्यक्ष राजा आदाटे, दीपक पवार आदिंनी विशेष परिश्रम घेतले.. 

निवासी संस्थांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी घ्यावी..... रो. शीतल शहा

 निवासी संस्थांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी घ्यावी..... रो. शीतल शहा 



आजच्या विकसित समाजात वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरण संवर्धन ही आता आपली महत्वाची जबाबदारी आहे. आपण आज समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येत असून हवा,पाणी, ध्वनी प्रदूषण टाळण्याची सार्वत्रिक गरज असल्याचे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल रो. शीतल शहा यांनी केले.


रोटरी क्लब ऑफ बारामतीने शहरातील निवासी सोसायट्यामधील रहिवाश्यांसाठी गरगटे फार्म येथे आयोजित करण्यात आलेल्या "ग्रीन सोसायटी" या कार्यक्रमात उदघाटक म्हणून ते बोलत होते.या प्रसंगी व्यासपीठावर रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या पर्यावरण समितीचे डायरेक्टर रो. वसंतराव माळुंजकर, ग्रीन सोसायटी समितीच्या विभागीय संचालक रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अरविंद गरगटे, सचिव रविकिरण खारतोडे,रोटरी क्लब ऑफ पुणे विसडमचे अध्यक्ष रो. निलेश धोपाडे,प्रमुख मार्गदर्शक महेश देवधर, केतकी साठे- कुलकर्णी,शैलेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शीतल शहा पुढे म्हणाले की आज आपण नैसर्गिक स्रोत ओरबाडून घेत आहोत आणि हे असेच सुरु राहिले तर पुढील पिढीला पृथ्वीवर काहीही शिल्लक राहणार नाही. आपल्या पुढील पिढीची आम्हाला असल्यानेच रोटरी इंटरनॅशनल या संस्थेने जगभर पर्यावरण संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली आहे.

या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना महेश देवधर यांनी ऊर्जा संवर्धन करण्याचा सल्ला दिला. सोसायट्यानी अपारंपरिक ऊर्जा साधनाचा वापर वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर शैलेश देशपांडे यांनी पाणी प्रदूषण टाळण्याचा सल्ला देताना आगामी काळात पाणी स्तोत्र टिकविण्याचे खडतर आव्हान मानव जातीपुढे असल्याचे मत व्यक्त केले. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी नद्यांचे आरोग्य आपण जपले पाहिजे तरच भविष्यात आपणाला पिण्यासाठी चांगले पाणी उपलब्ध होईल अन्यथा मानवाचे अस्तित्व धोक्यात येण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. केतकी साठे - कुलकर्णी यांनी विषमुक्त अन्न ही काळाची गरज असल्याचे सांगताना भविष्यात उत्तम अन्नधान्य तयार करण्याकडे आपण लक्ष द्यायला हवे असे मत व्यक्त केले. आपल्या परसदारात, इमारतीच्या गच्चीत आपल्या कुटुंबासाठी पुरेल इतका भाजीपाला सहज तयार करता येतो मात्र त्यासाठी सोसायट्यानी पुढाकार घ्यायला हवा.

ग्रीन सोसायटी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता भोर यांनी केले. उपस्थित्यांचे आभार रविकिरण खारतोडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा डॉ अजय दरेकर यांनी केले. यावेळी रोटरी ग्रीन सोसायटी न्यूज लेटरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

बारामती शहरातील सुमारे बारा सोसायट्याचे शंभरहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. ग्रीन सोसायटी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या सर्व सदस्यांनी मदत केली.

Sunday, October 6, 2024

लोणंद सातारा मार्ग वाहतुकीसाठी दहा दिवस बंद ; हा आहे पर्यायी मार्ग.

 लोणंद सातारा मार्ग वाहतुकीसाठी दहा दिवस बंद ; हा आहे पर्यायी मार्ग. 





सातारा :

         रेल्वे विभागाने दुहेरी मार्गासाठी सातारा-लोणंद राज्य मार्गावर वाठार स्टेशन हद्दीत काळी मोरी नावाचा जुना ब्रिटीशकालीन रेल्वे पूल पाडून उभारलेल्या नवीन पुलाचे काम निकृष्ट झाल्याने त्याची दुरूस्ती करण्यासाठी या मार्गावरील सर्व वाहतूक पुढील दहा दिवसांसाठी बंद असल्याची अधिसूचना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काढली आहे. 


     मिळालेल्या माहितीनुसार वाठार स्टेशनजवळील काळीमोरी रेल्वे पूल पाडून रेल्वे विभागाने या ठिकाणी नवीन पूल उभारला. परंतु, या नवीन पुलाचे काम निकृष्ट झाल्याने पुलाची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. यासाठी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी वाठार पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना पंधरा दिवसासाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, वाहतुकीचा तसेच लोकांच्या मागणीचा विचार करून पोलीस प्रमुख अधीक्षकांनी सोमवार दि. ७ ते दि. १६ ऑक्टोंबरपर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. 


फलटण व लोणंद बाजूने येणारी अवजड वाहने खंडाळा / शिरवळमार्गे पुणे बंगळुरु महामार्गाने सातारकडे जातील, सातारकडून येणारी अवजड वाहतूक पुणे बंगळूर महामार्गाने खंडाळा शिरवळवरून लोणंदकडे जातील, तसेच फलटण व लोणंद वरून येणारी चारचाकी व दुचाकी वाहने आदर्की फाटा येथून तडवळे संमत, वाघोलीमार्गे पिंपोडे बुद्रुक वरून वाठार स्टेशनमार्गे सातारकडे जातील. 


तसेच सातारा कोरेगाव येथून लोणंद व फलटण बाजूकडे जाणारी सर्व प्रकारचे हलकी व दुचाकी वाहने अंबवडे चौक, वाग्देव चौक येथून पिंपोडे बुद्रुकवरून तडवळे संमत वाघोलीवरून लोणंद व फलटणकडे जातील. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाठार पोलिसांनी केले आहे.

Saturday, October 5, 2024

शहा कन्या विद्यालयात भोंडला उत्साहात

 शहा कन्या विद्यालयात भोंडला उत्साहात

 नीरा दि.५



         नीरा (ता.पुरंदर) येथील सौ लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयांमध्ये नवरात्रौत्सवानिमित्त शनिवारी( ५ ऑक्टोबर) रोजी महा भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते .विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला नायकोडी व स्थानिक स्कुल कमिटीच्या सदस्या रेणुका कोठडीया, तनुजा शहा व उपस्थित शिक्षकांनी हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून या महाभोंडल्याला सुवात करण्यात आली. यावेळी भोंडला गाणी, गरबा गाणी , दांडिया नृत्य यासह भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला .



नवरात्रीमध्ये हस्त नक्षत्राची सुरुवात होते. म्हणून हत्तीची पूजा करून शेतकरी सुख, समृद्धी व ऐश्वर्यासाठी नृत्य गाणी व कथा या माध्यमातून देवाकडे आपली प्रार्थना करत असतात ही माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली .

 यावेळी विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून फुगडी, गाणी , झिम्मा , गरबा, दांडिया यांचा आनंद लुटला . यावेळी विद्यालयाच्या उपशिक्षिका सपना ओव्हाळ यांनी भोंडला गीत गायन केले .तसेच विद्यार्थीनींनी अनेक भोंडला गाणी व गरबा गाणी यावर फेर धरला .महिला शिक्षकांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेतला . खिरापत ओळखीचा कार्यक्रम झाल्यानंतर खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली .

Friday, October 4, 2024

पिंपरे येथील अपघातग्रस्त युवकांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून अर्थसहाय्य

 पिंपरे येथील अपघातग्रस्त युवकांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून अर्थसहाय्य 

शिवतारे यांनी कुटुंबियांना थेट घरी जाऊन दिला धनादेश

नीरा दि. ४



      पिंपरे( ता.पुरंदर ) येथील अपघातग्रस्त तीन युवकांच्या कुटुंबांना. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी तीन लक्ष रुपयाची मदत देण्यात आली आहे. शिव सेनेचे नेते विजय शिवतारे यांनी गुरुवारी सायंकाळी सहाय्यता निधीचे धनादेश अपघात ग्रस्त तरुणांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले.

     सुमारे दीड वर्षापूर्वी पिंपरे खुर्द येथील तरुणाचा नीरा लोणंद दरम्यान अपघात झाला होता.यामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. यावेळी विजय शिवतारे यांनी या तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन शिवतारे यांनी दिले होते. यापूर्वी शेतकरी अपघात विमा योजनेतून प्रत्येकी 2 लक्ष रुपये मदत करण्यात आली होती त्याच बरोबर आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी तीन लक्ष रुपयाची मदत देण्यात आली आहे. पिंपरे खुर्द गावामधील ओंकार थोपटे, अनिल थोपटे आणि पोपट थोपटे या तीन युवकांचा एका भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबातील लोकांना ही मदत देण्यात आली आहे विशेष म्हणजे हे तीनही तरुण आपल्या आई वडिलांसाठी एकुले एक आपत्य होते. त्यामुळे त्यांना मदत करण्याचे आश्वासन शिवतारे यांनी दिले होते.त्याचे धनादेश त्यांच्या आई दाडीलांकडे देण्यात आले.


        यावेळी माजी सभापती अतुल म्हस्के, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य माणिक निंबाळकर, मंडल अधिकारी पी. आर भिसे, सरपंच राजेंद्र थोपटे, उपसरपंच नंदा थोपटे, रवींद्र गायकवाड, भरत थोपटे, स्वप्नील थोपटे, आकाश थोपटे, विश्वजित सोनावणे, प्रमोद सोनावणे, राहुल थोपटे, दिपक थोपटे, प्रशांत थोपटे, प्रकाश थोपटे, सचिन थोपटे, अमोल थोपटे, बाळासाहेब थोपटे, भालचंद्र थोपटे, संतोष थोपटे, सागर चांदे, नाना थोपटे, प्रतिक थोपटे व अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 



      यावेळी बोलताना शिवतारे म्हणाले, या तीनही कुटुंबांनी आपली कर्ती मुलं गमावली. त्यामुळे या कुटुंबांबरोबरच गावावर शोककळा पसरली होती. त्यामुळे या कुटुंबांना सावरण्यासाठी हातभार लावणे आवश्यक होते. या गरीब आई वडिलांची मुलं मी परत आणू शकत नाही पण मानवतेच्या भावनेतून मला जे काही करता येणं शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा मी अत्यंत आभारी आहे असेही शिवतारे म्हणाले.   

 *शिवतारेंनी नाकारला सत्कार* 


     यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी शिवतारे यांचे आभार मानले. ग्रामस्थांच्या वतीने शिवतारे यांच्या सत्काराचे आयोजन ठेवण्यात आले होते. पण शिवतारे यांनी ‘मी माझे कर्तव्य केले असून अशा दु:खद प्रसंगी सत्कार नको’ असे म्हणत सत्कार नाकारला.

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...