Posts

Showing posts from April, 2024

अबब... पुरंदरचे तापमान प्रचंड वाढत वाढे... पुढिल आठवड्यात तब्बल किती अंश तापमान होईल पहा...

Image
 अबब...   पुरंदरचे तापमान प्रचंड वाढत वाढे... पुढिल आठवड्यात तब्बल किती अंश तापमान होईल पहा... पुरंदर :      दुष्काळी पुरंदरमधील उन्हाचा पारा वाढता वाढत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक मेटाकुटीला आले आहेत. काल परवा पर्यंत ३८-३९ अंश सेल्सिअस तापमान असेल पुरंदरच्या ग्रामीण भागात पुढिल आठवड्यात तब्बल ३९ ते ४२ अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुरंदर तालुका, जि. पुणे : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार पुरंदर तालुक्यात दिनांक ३० एप्रिल, २०२४ ते ०४ मे, २०२४ दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत कमाल तापमान ३९ ते ४२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ११ ते १८ कि.मी. दरम्यान राहील. आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहील. प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषि मौसम सेवा तथा प्रमुख, कृषि हवामानशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, पुणे...

पुणे जिल्हा पत्रकार संघाची बैठक जिल्हा कार्यकारणी निवडी विषयी चर्चा.

Image
 पुणे जिल्हा पत्रकार संघाची बैठक  जिल्हा कार्यकारणी निवडी विषयी चर्चा.  पुणे :          मराठी पत्रकार परिषद मुंबई संचलित पुणे जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच बरखास्त करण्यात आली आहे. नवीन कार्यकारणी निवडीसाठी पुणे येथे बैठक झाली. १९ मे रोजी नवीन कार्यकारिणीची नियुक्ती होणार असून, प्रत्येक तालुक्यातील दोन सदस्य जिल्हा कार्यकारणी सदस्यपदासाठी नियुक्त करण्याच्या सुचना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे.        मराठी पत्रकार परिषदेच्या नियमानुसार कार्यकारिणीची निवड लोकशाही मार्गाने होत असतात. सर्वांनुमते किंवा थेट निवडणूकीच्या माध्यमातून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कार्यकरणीची निवड केली जाते. पुणे जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणीची मुदत संपल्याने बरखास्त करण्यात आली आहे. नव्याने कार्यकारणी निवडण्याबाबत चर्चा करण्यासाठी पुणे येथील आयबी हॉल येथे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची व पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांची बैठक रविवारी पार पडली.       नव्याने कार्यकारणी निवडण्याबाबत म...

नीरेत मोटरसायकलींची समोरा समोर धडक : अपघातात एक ठार तर तीन जखमी

Image
  नीरेत मोटरसायकलींची समोरा समोर धडक :  अपघातात एक ठार तर तीन जखमी पुरंदर :          पुरंदर तालुक्यातील नीरा येथे नीरा - बारामती मार्गावर दोन मोटासायकलींची समोरा समोर जोरदार धडक झाली. यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर तीन जन जखमी झाले आहेत. यामध्ये बंटी सुरेश गमंडे रा.आनंदनगर निंबुत या ३५ वर्ष व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला. तर तुकाराम सुखदेव माने (२०) आणि तेजस राहुल शिंदे, इरफान आरिफ सय्यद रा.निंबुत (ता.बारामती) हे जखमी झाले आहेत.        याबाबत नीरा पोलिसांनी मंगळवारी दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता दिलेल्या माहिती नुसार नीरा गावचे हद्दीत नीरा ते बारामती रोडवर बुवासहेब ओढ्यावरिल पुलावर बुवासाहेब मंदिराचे समोर मोटरसायकल क्र. एम. एच. ४२ w ३४४८ व मोटरसायकल क्र. एम. एच. ४२ बी. एम. ३३२५ यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात नंतर  सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोकाशी आणि सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमींना लोणंद येथे हॉस्पिटलमध्ये उपचारा पाठवले व  वाहत...

नीरा येथे दोन मोटरसायकलची समोरा समोर धडक अपघातात एक जण ठार तर तीन जन जखमी

 नीरा येथे दोन मोटरसायकलची समोरा समोर धडक अपघातात एक जण ठार तर तीन जन जखमी   नीरा दि.२३     पुरंदर तालुक्यातील नीरा येथे नीरा बारामती मार्गावर  दोन मोटासायकलची समोरा समोर जोरदार धडक झाली. यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर तीन जन जखमी झाले आहेत. यामध्ये बंटी सुरेश गमंडे रा.आनंदनगर निबुत या 35 वर्षीय व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला. तर तुकाराम सुखदेव माने (२०) आणि तेजस राहुल शिंदे व  इरफान आरिफ सय्यद रा.निंबुत ता.बारामती ,जी.पुणे हे जखमी झाले आहेत.        याबाबत नीरा पोलिसांनी आज दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता दिलेल्या माहिती नुसार   निरा गावचे हद्दीत निरा ते बारामती रोडवर बुवासहेब ओढ्यावरिल  पुलावर जवळ बुवासाहेब मंदिराचे समोर मोटरसायकल क्रमांक एम एच 42/w/34 48   व मोटरसायकल क्रमांक एम एच 42/ बी एम/ 33 25 यांचा अपघात झाला.यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात नंतर  सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोकाशी आणि सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमींना लोणंद येथे हॉस्पिटलमध्ये उपचारा पाठवले व  वा...

अजितदादांची अपघातग्रस्त पत्रकारांना मदत; ताफ्यातील गाडीतून पाठवले रुग्णालयात, डॉक्टरांना उपचाराबाबत दिल्या सुचना.

Image
  अजितदादांची अपघातग्रस्त पत्रकारांना मदत; ताफ्यातील गाडीतून पाठवले रुग्णालयात, डॉक्टरांना उपचाराबाबत दिल्या सुचना. बारामती :          बारामतीहून काटेवाडीकडे जात असताना वाटेत झालेला अपघात पाहून क्षणात आपला ताफा थांबवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जखमी झालेले जेष्ठ पत्रकार रामभाऊ तावरे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रुग्णालयात उपचाराच्याही सुचना दिल्या.      याबाबत अधिक माहिती अशी, सोनगाव येथील आनंदराव देवकाते पत्नी संगीतासह आपल्या कारमधून बारामतीहून सोनगावकडे निघाले होते. त्यावेळी रामभाऊ तावरे यांच्या दुचाकीची कारला धडक होऊन तावरे खाली पडले. त्यानंतर काही वेळातच तिथून कन्हेरीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली गाडी थांबवण्याच्या सूचना चालकाला दिल्या. हे तर रामभाऊ, असं म्हणत तातडीने स्वत:च्या ताफ्यातील गाडीत तावरे यांना बसवले, सोबत काही लोक दिले आणि दवाखान्यात पाठवले.      पत्रकार तावरे यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. मात्र अशातही क्षणाचा विलं...

आळंदी मंदिरातून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला प्रस्थान. पुणे, सासवड दोन दिवस मुक्काम होणार लोणंदला अडीच दिवस मुक्काम

Image
  आळंदी मंदिरातून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला प्रस्थान. पुणे, सासवड दोन दिवस मुक्काम होणार लोणंदला अडीच दिवस मुक्काम पालखी सोहळा दिंडी समाज बैठकीत निर्णय १७ जुलैला पंढरपूर आषाढी एकादशी  आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवार २९ जून २०२४ रोजी आषाढी वारीसाठी आळंदी मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असून पहिला मुक्काम आळंदीतील गांधी वाड्यातील दर्शनबारी मंडपात होणार आहे. यावर्षी पुणे येथे ( दि. ३० जून व १ जुलै )  व सासवड ( दि. २ व ३ जुलै ) येथे सोहळ्याचा दोन दिवस तसेच लोणंदला अडीच दिवस सोहळा मुक्कामी राहणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला असल्याचे माऊलींचे  पालखी सोहळा प्रमुख व देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी सांगितले.        पंढरपूर येथील आळंदी देवस्थानच्या माऊली मंदिर मठात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली परंपरेने उत्साहात झाली. या बैठकीस श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख...

गुरुवारी निरा शहरासह ग्रामीण भागातील बत्तीगुल होणार. निरा महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका बसणार : तब्बल सहा तास खंडित राहणार.

Image
 गुरुवारी निरा शहरासह ग्रामीण भागातील बत्तीगुल होणार.  निरा महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका बसणार : तब्बल सहा तास खंडित राहणार.  पुरंदर :         लोणंद येथील अतीउच्च वीजवाहीनीचे पोल बदलण्याच्या कामामुळे निरा शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा तब्बल सहा तास खंडित होणार आहे. गुरुवार दि. १८ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित ठेवावा लागणार असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या निरा कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात भरदूपारी वीज पुरवठा खंडित झाल्यावर निरा बाजारपेठेतील व्यावसायिकांचे, रहिवाशांचे हाल होणार असून, ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे वेळापत्रक बिघडणार आहे.        महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या निरा कार्यालयाकडून करण्यात आलेल्या जाहीर आवाहना नुसार दिनांक 18.04.2024 रोजी 220 केवी  लोणंद अतिउच्च उपकेंद्र येथून निघणारे 22 केवी निरा अर्बन एजी व 22 केवी निरा ग्रामीण फिडर वरील उच्च दाब पोल बदलवयाचे असल्याने निरा  ग्रामीण (नींबूत)  शाखा कार्यालयाकडून आव...

पुण्यातील धायरी भागात सुनेत्रा पवार यांचा झंझावाती प्रचार

Image
 पुण्यातील धायरी भागात सुनेत्रा पवार यांचा झंझावाती प्रचार पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील शहरी भागावर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघातील धायरी परिसरात सुनेत्रा पवार यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. या प्रचारादरम्यान सुनेत्रा पवार यांनी सामाजिक, उद्योग आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेत महायुतीला निवडून देण्याचे आवाहन केले.  धायरी येथील उद्योजक यशवंत कांबळे आणि हेमंत कांबळे यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली.  तसेच उद्योजक संतोष कदम यांच्या व्यंकटसाई होंडा शोरूमला सदिच्छा भेट दिली. यावेळी कदम व त्यांच्या संपूर्ण स्टाफने सुनेत्रा वाहिनींचे  आपुलकीने स्वागत केले. मनसेच्या माजी नगरसेविका युगंधरा चाकणकर यांच्या धायरी येथील संपर्क कार्यालयास पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सनी चाकणकर, सुहास चाकणकर, विक्रम चाकणकर, संतोष कदम यांच्यासह त्यांचे सहकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीच्या घटक पक्षातील एक असणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या स्वागताबद्दल...

जनसागराच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही", राजगड तालुक्यातला सुनेत्रा पवारांचा दौरा चर्चेत

Image
 "जनसागराच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही", राजगड तालुक्यातला सुनेत्रा पवारांचा दौरा चर्चेत बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना काल वेगळाच प्रचारादरम्यान अनुभव आला. काल सुनेत्रा पवार या प्रचारासाठी राजगड तालुक्यातील वडगाव झांजेमध्ये पोहचल्या असता त्यांचा गावाच्या वेशीवरच प्रचंड उत्साहाने गावकऱ्यांनी स्वागत केले. गावच्या वेशापासून सुमारे अर्धा किलोमीटर आत गावापर्यंत रांगोळ्यांच्या अंथरलेलया पायघड्या. गावातील तमाम ज्येष्ठ मंडळीनी तरूणांसह धरलेला लेझिमचा डाव, युवकांचे ढोल पथक आणि प्रत्येक घरातील माता भगिनींनी माझे केलेले औक्षण अशा अफाट उत्साहात सुनेत्रा पवार यांचं स्वागत करण्यात आलं. यातच सुनेत्रा पवार यांची पदयात्रा या अशा मिरवणुकीने भैरवनाथ मंदिरासमोर पोहोचली आणि लेझीमचा डाव टिपेला पोहोचला. त्याने वातावरण एवढे भारून गेले की पुणे जिल्हा कात्रज दुध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, जिल्हा सरचिटणीस अर्जून भिलारे, वेल्हे खुर्दचे सरपंच प्रकाश जेधे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी लेझीमच्या डावावर ताल धरला. तर र...

खा.शरद पवार यांनी घेतली माजी खा. स्व. संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबीयांची भेट पारंपरिक विरोधकांच्या भेटीने चर्चा.

Image
 खा.शरद पवार यांनी घेतली माजी खा. स्व. संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबीयांची भेट      पारंपरिक विरोधकांच्या भेटीने चर्चा.  पुरंदर  :         बारामती तालुक्यातील निंबुत येथे आज शुक्रवारी खा. शरद पवार यांनी माजी खासदार स्वर्गीय संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यावेळी काकडे यांचे पुत्र पृथ्वीराज काकडे, जयराज काकडे, मेघराज काकडे व काकडे कुटुंबातील जेष्ठांची भेट घेत पवार यांनी त्यांचं सांत्वन केले.     माजी केंद्रीय संरक्षण व कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील निंबुत येथील काकडे कुटुंबांतील माजी खासदार स्व.संभाजीराव काकडे यांच्या पत्नींचे कांठवती काकडे यांचे नुकतच निधन झाले. यानंतर आज शुक्रवारी पवार यांनी काकडे कुटुंबातील सदस्यांची सांत्वन भेट घेतली आहे. यावेळी शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे, मार्केटिंग फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष शामकाका काकडे, संचालक राहुल शामराव काकडे, सोमेश्वरचे संचालक अभिजित काकडे उपस्थित होते.          निंबूतचे काकडे हे शरद पवार यांचे पारंपरिक व...

छंद व कला आनंदी जीवनाचा मंत्र - प्रदीप कोथमिरे

Image
 छंद व कला आनंदी जीवनाचा मंत्र - प्रदीप कोथमिरे  "आयुष्यात माणूस भौतिक सुख, संपत्ती द्वारे सहजपणे मिळवू शकतो परंतु माणसाच्या जीवनात खरे समाधान आणि आनंद मिळविण्यासाठी एखादा चांगला छंद व कला जोपासणे गरजेचे आहे" असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने व नाट्य अभिनेते प्रदीप कोथमीरे यांनी केले. विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बारामती व माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या क्रीडा, सांस्कृतिक व विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर आवड, प्रामाणिक प्रयत्न व निष्ठापूर्वक साधना करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव अँड. नीलिमाताई गुजर होत्या. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांनी वर्षभरात राबविलेल्या विशेष उपक्रमांचा आढावा घेऊन विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रा बरोब...

सुनेत्रा पवार यांनी घेतली विजय शिवतारे आणि कुटुंबियांची भेट..

Image
 सुनेत्रा पवार यांनी घेतली विजय शिवतारे आणि कुटुंबियांची भेट.. पुरंदरमध्ये सक्रिय झाल्याचं सांगत विजय शिवतारे यांनी दिल्या शुभेच्छा..  सासवड :        बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज पुरंदर दौऱ्यादरम्यान शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे व त्यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. शिवतारे यांच्या सासवड येथील निवासस्थानी झालेल्या भेटीत सुनेत्रा पवार यांनी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी विजय शिवतारे यांनी आम्ही सर्वजण मनापासून सक्रिय झालो असून कार्यकर्तेही विविध गावात प्रचार करत आहेत. त्यामुळे पुरंदर तालुक्यातून ५० हजारपेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असं विजय शिवतारे यांनी यावेळी सांगितलं.         यावेळी शिवतारे कुटुंबियांकडून सुनेत्रा पवार यांचा सन्मान करण्यात आला. तसेच निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या भेटीप्रसंगी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

माजी आमदार संभाजीराव कुंजीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार

Image
 माजी आमदार संभाजीराव कुंजीर  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अजित पवार यांची घेतली पुण्यात भेट    सासवड तां ८: पुरंदरचे माजी आमदार संभाजी राव कुंजीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत नुकतीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार् यांच्या पुणे येथील जिजाऊ बंगला या निवासस्थानी त्यांची भेट घेतली,  ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत बैठक झाली, यावेळी, सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मोहनशेठ वांढेकर, पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य बाळुतात्या यादव, शिवसेना युवा नेते प्रवीण कदम, गुर्होळीचे माजी सरपंच हिरामण खेडेकर, आदी उपस्थित होते. माजी आमदार कुंजीर यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा तालुक्यात रंगली आहे, गेली अनेक वर्षे  ते सक्रिय राजकारणातून बाहेर होते, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची चर्चा सुरू झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत, माजी मंत्री दादासाहेब जाधवराव यांचा पराभव करून १९८० साली ते निवडून आले होते, श्री कुंजीर यांच्या बरोबर तालुक्यातील अनेक गा...