Thursday, February 29, 2024

पुरंदर मध्ये पुन्हा सापडली अफूची शेती : जेजुरी पोलिसांची कारवाई

 मावडी कडेपठार येथे अफूची लागवड : जेजुरी पोलिसांची कारवाई


जेजुरी दिनांक २९ 







पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार येथे दोन शेतकऱ्यांनी आपुची लागवड केल्या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी कारवाई केली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली अफूची बोंडे आणि झाडे ताब्यात घेऊन दोन्ही शेतकऱ्यांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी या शेतकऱ्यांवर गुंगीकारक औषधीद्रव्य आणी मनोव्यापारावर परीणामकरणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 ब, 18 क. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



  यासंदर्भात जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक २९ फेब्रुवारी दुपारी चार ते सहा वाजलेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांना अफूच्या बोंडासह ३८ किलो अफूची झाडे आढळून आली.त्याची बाजारभावानुसार किंमत ७६ हजाराच्या आसपास होते आहे.या प्रकरणी पोलिसांनी 

१) किरण पुंडलीक जगताप वय ४० वर्षे रा मावडी.क.प ता पुरंदर जि पुणे २ )रोहीदास चांगदेव जगताप वय ५५ वर्षे रा मावडी क.प ता. पुरंदर जि पुणे यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. तर या दोघांनी त्यांचे मालकीचे मावडी क.प गावातील जमीन गट नं 189,व 200 मधे ही अफूची लागवड केली होती. या प्रकरणी सहाय्यक फौजदार उदय हिरामण पवार यांनी फिर्याद दिली आहे.जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.तर याबाबतचं अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत.

तरुणाला ऑन लाईन शेअर मधील गुंतवणुकीत तीन लाखाचा गंडा

 नीरा येथील तरुणाची ऑनलाईन शेअर्स खरेदीमध्ये फसवणूक : तीन लाख रुपयाला घातला गंडा



नीरा दि.२९

नीरा (ता. पुरंदर) येथे मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शेअर्स खरेदी मध्ये तरुणाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. शेअर मार्केट मध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यासाठी नीरा येथील तरुणाचा विश्वास संपादन करून तीन लाख रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी मोबाईल ॲप आणि ग्रुप एडमिनच्या विरोधात जेजुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नीरा येथील स्वप्निल सुधाकर मोरे या 29 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.


  पुरंदर तालुक्यातील नीरा येथे राहणारा तरुण स्वप्नील सुधाकर मोरे हा रिटेल होम अँपच्या माध्यमातून डिसेंबर 2023 पासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होता. त्यांना अँव्हेनिव्ह ऑफ स्टार या शेर मार्केट ग्रुपचे अँडमीन आर्यन रेड्डी व असिस्टन ऐश्वर्या कुमार हे मार्गदर्शन करीत होते. मोरे यांचा विश्वास संपादन करून त्यांनी वेळोवेळी करून ४८०००० हजाराची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र यातील केवळ एक लाख ८० हजार रुपये मोरे यांना परत मिळाले.यातील तीन लक्ष रुपये त्यांना परत मिळाले नाही.म्हणून त्यांनी जेजुरी पोलिसात दिनांक २८ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली आहे.तर या प्रकरणी जेजुरी पोलिसात भारतीय दंड विधान कलम 409,419,420,34 माहीती तंत्रज्ञान अँक्ट 2000 चे कलम 66 (C),66 (D) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतचा अधिकचा तपास भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक आण्णा पवार करीत आहेत.

Wednesday, February 28, 2024

पत्रकार समाजाचा घटक असतांनाही त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद नाही पत्रकारांबद्दल महाराष्ट्र सरकारच्या मनात अढी आहे काय? एस.एम.देशमुख

 पत्रकार समाजाचा घटक असतांनाही त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद नाही


पत्रकारांबद्दल महाराष्ट्र सरकारच्या मनात अढी आहे काय? एस.एम.देशमुख





मुंबई :- अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना काहीना काही योजना दिल्या आहेत, विकासाची संधी दिली आहे असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पत्रकारांना तर काहीच दिलं नाही, का? पत्रकारही समाजाचा एक घटक आहे हे सरकारला माहिती नाही की, पत्रकारांबद्दल सरकारच्या मनात अढी आहे काय? असा सवाल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

     एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, काय असेल ते असेल पण पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकारनं कायम कानाडोळा केलेला आहे. हे संतापजनक वास्तव आहे. काय मागण्या आहेत पत्रकारांच्या ? सरकारनं ५० कोटी रूपये फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले आहेत. त्याच्या व्याजातून सरकार पत्रकारांना पेन्शन देते, आरोग्याच्या सुविधा देते. व्याजातून येणारी रक्कम तुटपुंजी आहे. त्या रक्कमेतून पेन्शन योजनाही व्यवस्थित चालत नाही. त्यामुळं आतापर्यत केवळ १२६ पत्रकारांनाच या योजनेचा लाभ मिळालेला आहे. इतर असंख्य गरजू पत्रकार योजनेपासून वंचित आहेत. पेन्शनसाठी पैसे नसल्याने या योजनेच्या अटी अत्यंत जटील केलेल्या असल्याने मान्यवर पत्रकारांचे अर्ज देखील किरकोळ कारणं देऊन नाकारले गेले आहेत.

      आरोग्य योजनेचे देखील असंच आहे. पैसेच नाहीत. त्यामुळे गरजू पत्रकारांना वेळेवर मदत मिळतच नाही. या दोन्ही योजनांची बजेटमध्ये तरतूद करावी जेणेकरून पैसे कमी पडणार नाहीत. अशी आमची मागणी आहे. अशक्य कोटीतली ही मागणी नाही. पण पत्रकारांबद्दलचा नकारात्मक दृष्टीकोण आडवा येतो. यातून ठरवून पत्रकारांच्या विषयाची उपेक्षा केली जाते.

      आणखी एक, पत्रकार संरक्षण कायद्याबाबत सरकारनं पत्रकारांची घोर फसवणूक केलीय. कायदा तर झाला पण अंमलबजावणीबाबत नोटिफिकेशन न काढल्यानं कायदाच अस्तित्वात येऊ शकला नाही. "महाराष्ट्र हे देशातले पहिले असे राज्य आहे की, जेथे पत्रकार सरक्षण कायदा केला गेला" अशा जाहिराती करून सरकार स्वता:ची पाठ थोपटून घेते. प्रत्यक्षात कायदाच अमलात आला नाही. याला काय म्हणतात फसवणूकच नं? बजेटनंतरच्या पत्रकार परिषदेत मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह प्रवीण पुरो यांनी या सर्व मुद्द्यांवरून जोरदार आवाज उठविला.

     पेन्शन योजनेत वाढ करण्याची घोषणा हवेत विरली ही बाबही निदर्शनास आणून दिली. त्यावर नेहमीप्रमाणे आश्वासनं दिली गेली. पत्रकारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे अधिकारी तसेच प्रमुख पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींची एक व्यापक बैठक बोलवावी अशी विनंती करणारे एक पत्र मराठी पत्रकार परिषद आणि अन्य दहा संघटनांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. अशी बैठक झाली तर सर्व मुद्द्यांवर व्यवस्थित चर्चा होईल. सरकारनं तातडीनं अशी बैठक लावावी? बघू, पत्रकारांसाठी देखील सरकारकडे वेळ आहे की नाही ते असे एस.एम. देशमुख यांनी नमूद केले.

भोसलेवाडी येथे गावठी दारूच्या भट्टीवर जेजुरी पोलिसांची कारवाई

 भोसलेवाडी येथे गावठी दारूच्या भट्टीवर जेजुरी पोलिसांची कारवाई 

जेजुरी दिनांक २८ 



   पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भोसलेवाडी येथे सुरू असलेल्या गावठी हातभट्टी जेजुरी पोलिसांनी उध्वस्त केली आहे.यामध्ये 298150 रुपयाचे रसायन,तयार दारू आणि गावठी दारू बनवण्याच साहित्य पोलिसांनी नष्ट केले आहे.तर याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रविण श्रीमंत शेंडेयांनी दिलेल्या फिर्यादी नुसार भारतीय दंड विधान कलम 328 आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम1949 चे कलम 65 फ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिसांनी ही कारवाई आज रात्री म्हणजेच दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पहाटे १.४५ वाजता केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हरीश्चंद्र अण्णा राठोड वय 42 वर्षे रा भोसलेवाडी ता.पुरंदर जि.पुणे यांचे विरूध्द भा.द.वि.क 328 सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या कारवाई मध्ये पोलिसांनी 245 लिटर तयार दारू ,सरपण आणि 7000 लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे.

Monday, February 26, 2024

पुरंदर तालुक्यात अफूची शेती करणाऱ्यावर कारवाई

 कोडीत येथे अफूची शेती करणाऱ्यावर कारवाई


सासवड पोलीसांची कारवाई ; दोघांना अटक



सासवड  २६ : पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परीसरात सासवड पोलीस पथकाने शनिवार (दि २४) टाकलेल्या छाप्यात अफूची १० किलोची झाडे जप्त केली तसेच अफूची लागवड करणाऱ्या दोन जनांनवर गुन्हा दाखल करून अटक केली याबाबत पोलीस शिपाई धिरज भानुदास जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे

          पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दशरथ सिताराम बडदे (रा. कोडीत बुद्रुक ता.पुरंदर) व तानाजी निवृत्ती बडधे (रा.कोडीत बुद्रुक ता.पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परीसरात दोन इसमांनी शेतात अफूच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना मिळाली त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक आर. डी. गावडे, पोलीस हवालदार एस.डी.घाडगे, व्ही.टी.कांचन, धी. भा.जाधव, वाय.सी.नागरगोजे, ए.ए.भुजबळ, डी.पी.विरकर, एस.सी.नांगरे, जे.एच.सय्यद, पी. बी.धिवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील स्टाफ यांनी तेथे जावून पाहणी केली तानाजी बडदे यांनी शेतात शेवंतीच्या झाडांला लागूनच अफुची लागवड केल्याचे दिसले दरम्यान सासवड पोलीसांनी शेतातून ८ किलो अफूची झाडे जप्त केली त्यानंतर दशरथ बडदे यांनी कांदयाच्या शेतात अफुची लागवड केल्याचे दिसले शेतातून २ किलो ५०० ग्रॅम असलेली ही बोंडे प्रतिकिलो २००० रुपये दराने विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड केलेली मिळून आली या दोन इसमांनी आपल्या शेतात अफूची बेकायदेशीर लागवड केली होती. 

       पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे हे करीत आहे

Sunday, February 25, 2024

बारामती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस ओबीसी सेलचा दावा

 बारामती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस ओबीसी सेलचा दावा

      ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांना उमेदवारी देण्याची मागणी 





नीरा दि. २६


         देशात लोकसभा निवडणूक होऊ घातल्या आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर विविध पक्ष आघाडी आणि युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहेत. आघाडी किंवा युतीमधून आपल्याच पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात याबाबत सर्वच पक्षांची धावपळ सुरू आहे. अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या ओबीसी सेलचेवतीने बारामती लोकसभा मतदार संघासाठी पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांच्या नावाची शिफारस केली आहे. काँग्रेसने या जागेवर राजेंद्र बरकडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.



         बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा तशी पाहिली तर आघाडी मध्ये ती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे या मागील तीन टर्म बारामतीच्या खासदार आहेत. आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे जाईल असं म्हटलं जात असलं तरी काँग्रेसच्या ओबीसी सेलने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. या मतदारसंघांमध्ये ओबीसी मतदारांची संख्या पाहता ही जागा ओबीसी समाजातून येणाऱ्या उमेदवाराला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यातही पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस ओबीसी सेलचे काम करणारे राजेंद्र बरकडे यांना ही उमेदवारी द्यावी असं राज्य ओबीसी सेलच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी किमान नऊ जागा या ओबीसी समाजासाठी देण्यात याव्यात अशी मागणी देखील करण्यात आली आहे.




    काँग्रेसचे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांनी नुकतीच निरा येथील शिवशक्ती पतसंस्थेच्या कार्यालय मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करून याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाच मोठे प्राबल्य आहे. खा. सुप्रिया यांच्या विरोधात लढताना धनगर नेते महादेव जानकर यांनी मोठे मतदान मिळवलं होतं. आयात केलेल्या या उमेदवाराला ओबीसी समाजाने मोठा पाठिंबा दिला होता. बाहेरून येणाऱ्या ओबिसी उमेदवारस लोकांनी मोठा पाठिंबा दिला. तर हीच संधी स्थानिक मतदारसंघात काम करणाऱ्या उमेदवाराला मिळाली तर बारामती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा एक खासदार होऊ शकतो याचाच विचार करून राज्याच्या ओबीसी वतीने ही मागणी करण्यात आली आहे. आपण गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रिय आहोत. ग्रामपंचायती पासून आपल्या कामाला सुरुवात झाली असून पक्षाच्या ओबीसीच्या जिल्हा अध्यक्ष पर्यंत आपण काम केले आहे. या देशामध्ये लोकशाही आहे आणि अनेक घराण्यांनी देशांमध्ये काही चौकटी घालून दिलेले आहेत. या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करने गरजेच आहे . एखादा मतदारसंघ म्हटलं की एखाद्याचं नेत्याच नाव घेतलं जातं, ही चौकट आता आपल्याला मोडायची आहे. देशातील सर्वसामान्य माणूस देखील संसदेत जायला हवा.त्यानेही आपण संसदेत जाऊ शकतो असा विचार करायला हवा. राजकारण ही काही कोणाची मक्तेदारी नाही. सर्वसामान्य माणूस लोकसभेमध्ये गेला तर तो सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडले. एखादा व्यापारी, व्यवसायिक, उद्योगपती, भांडवलदार जर लोकसभेत गेला तर तो व्यापारी ल, व्यवसायीक, उद्योगपती आणि भांडवलदारांचे हित पाहणारा विचार लोकसभेत मांडेल. मग एखादा शेतकरी ओबीसी लोकांचे प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी लोकसभेत गेला तर तो त्यांचा हिताचं रक्षण करण्यासाठी त्या पद्धतीचे विचार लोकसभेत मांडेल, कायदे बनवेल. म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लोकसभेचे तिकीट मिळाव म्हणून ओबीसी सेलने शिफारस केली असेल तर यात गैर काय? संधी मिळाली तर आम्ही सुद्धा चांगलं काम करू शकतो असेही ते म्हणाले.


Thursday, February 22, 2024

राहुल नार्वेकर संजय जगताप यांच्यात खलबते

 राहुल नार्वेकर संजय जगताप यांच्यात खलबते



 सासवड नगरपालिकेला दिली भेट


सासवड (प्रतिनिधी) 


    देशात सध्या लोकसभेचे पडघम वाचण्यास सुरुवात झाली असून राज्याच्या विधान सभेचे आध्यक्ष राहुल नार्वेकर  यांनी आज  पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांची  भेट घेतली आहे.त्यामुळे पुरंदर मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुरंदरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

         कॉग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्या निवासस्थानी तब्बल दोन ते आडीच तास विधान सभेचे आध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खलबत केली. वास्तविक राहुल नार्वेकर यांचा नियोजित दौरा हा मुंबई ते सासवड येथील वाघिरे कॉलेज व हेलीपॅड ते सासवड येथील शासकीय विश्राम गृहातुन  तेथून जेजुरी आसा होता. परंतु हेलिपॅड वरुन ते थेट आमदार संजय जगताप यांच्या निवासस्थानी गेल्याने चर्चाला उधाण आले



         या भेटीच्या वृत्ताने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय जगताप हे भाजप प्रवेश करणार असल्याच्या अधून मधून बातम्या येत असतात. मात्र आज अचानक राहूल नार्वेकर यांनी संजय जगताप यांची भेट घेऊन सर्वानाच धक्का दिला. या भेटीचा तपशील समजला नाही. याबाबत आमदार संजय जगताप यांच्याशी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. 

        सासवड नगरपालिकेला मिळालेल्या स्वच्छता पुरस्काराबद्दल राहुल नार्वेकर यांनी सासवड नगरपालिकेतील अधिकारी यांची भेट घेतली व शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार संजय जगताप उपस्थित होते.

Sunday, February 18, 2024

जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अनिल सौंदडे यांची निवड

 जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अनिल सौंदडे यांची निवड 



  पुरंदर दि.१८


        अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीचा खंडोबाच्या मार्तंड देव संस्थांचे प्रमुख विश्वस्तपदी अनिल सौंदंडे यांची निवड करण्यात आली आहे. आज रविवारी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जेजुरी येथे ही निवड जाहीर करण्यात आली.  



        जेजुरी देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे यांनी ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. त्यानंतर आज ही निवड करण्यात आली. जेजुरी येथील देवस्थानाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत अनिल सौंदडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडी नंतर विश्वस्त व जेजुरीच्या नागरिकांच्यावतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.यावेळी देवस्थानचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. निवडी नंतर बोलताना सौंदडे म्हणाले की , देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे.त्याच बरोबर येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याबाबत उपाय योजना करण्यावर आपला भर असेल, असेही ते म्हणाले.....

Thursday, February 15, 2024

जरांगे पाटीलांच्या दीर्घायुष्यासाठी नीरेतील दत्त घाटावर प्रार्थना. युवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या तर काही अश्रू अनावर.

 जरांगे पाटीलांच्या दीर्घायुष्यासाठी नीरेतील दत्त घाटावर प्रार्थना. 


युवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या तर काही  अश्रू अनावर. 





पुरंदर : 

    मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज सहा दिवस. माध्यमातून आज त्यांची तब्येत खालवल्याचे दाखवल्यानंतर नीरा येथील मराठा बांधवांनी एकत्रीत येत प्रसिद्धी दत्त मांदिरात आरती केली. जरांगे पाटलांची तब्यातीत सुधारणा व्हावी व ते दिर्घायुष्यी व्हवे यांची प्रार्थना केली. 


       जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरु आहे. सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसागणिक खालवत आहे. जरांगे यांची तब्येत खालावलमुळे त्यांना सलाईन लावण्यात आले होते. मात्र जरांगेनी ते सलाईन काढून टाकली. जरांगेंच्या उपोषणस्थळाची बातमी माध्यमातून पाहिल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव गहिवरून गेले आहेत. नीरेतही युवकांना अश्रू अनावर झाले होते. 


    जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी काल बुधवारी राज्यभरात बंद पाळण्यात आला होता. नीरा येथील आठवडे बाजार असल्याने मराठा बांधवांनी बंदची भुमिका मागे घेतली. पण आज गुरुवारी दुपारी चर्चा करून सायंकाळी जरांगे पाटीलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी नीरा नदीतील प्रसिद्धी दत्तघाटावर एकत्रीत येत. आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या, काही युवकांना अश्रू अनावर झाले तर काहींंनी मराठा राजकारण्यांना खडेबोल सुनावले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते टि.के. जगताप, सचिन मोरे, मंगेश ढमाळ, अजित सोनवणे, दयानंद चव्हाण, कौस्तुभ पवार, शिवकन्या समृद्ध देशमुख यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. चंद्रशेखर पवार, सचिन कदम, आबा घुले, कुलदीप पवार, दत्ता निंबाळकर, किरण बोधे आदी मराठा बांधव उपस्थित होते. 


अखेस तो आदेश आला: पुनर्वसनाचे शिक्के निघणार

 पुरंदर तालुक्यात  विविध प्रकल्प पुनर्वसनासाठी घेतलेल्या जमिनीवरील अधीग्रहनाचे शिक्के काढण्याचा शासनाचा आदेश 

  गुंजवणी,रायता प्रकल्पासाठी गेलेल्या


जमिनी राहणार मूळ मालकाकडे


पुरंदर दि.१६


    पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्याची मागणी अनेक वर्ष पासून केली जातं होती.त्याबाबत आता १५ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने आदेश काढला असून तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या सात बारावरील पुनर्वसनासाठी असलेले शिक्के काढले जाणार आहेत.त्यामुळे मागील चाळीस वर्षांपासून पुनर्वसनासाठी अडकलेल्या जमिनी मूळ मालकांना पूर्ण अधिकाराने वापरता येणार आहेत.



     गुंजवणी प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील हिवरे, जेऊर, थोपटेवाडी, पिसूर्टी,वीर, तोंडल, परिंचे, वाल्हे, हरणी,राख, गुळूंचे,माहूर, मांडकी, गावातील जमिनींवर पुनर्वसनाचे शिक्के होते.त्याच बरोबर रायता प्रकल्पासाठी चांबळी,बोपगाव,हिवरे,भिवरी या गावातील जमिनींवर पुनर्वसनाचे शिक्के मारण्यात आले होते.त्यामुळे या भागातील लोकांना आपल्या जमिनी कसताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.मागील चाळीस वर्षा पासून या लोकांना या प्रकल्पातून शेतीसाठी पाणीही मिळालं नव्हत किंवा भविष्यात या प्रकल्पातून शेतीसाठी पाणी मिळेल या बाबत शेतकऱ्यांना शास्वती नव्हती. त्यामुळे हे शिक्के काढा. आम्हाला पाणी नको आमची शेती आम्हाला द्या. अशी मागणी प्रामुख्याने गुंजवणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. प्रामुख्याने राख, गुळूंचे, कर्नलवाडी,वाल्हे या भागातील शेतकऱ्यांनी ही मागणी लावून धरली होती.आता या शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. याबाबतचं एक परिपत्रक राज्य सरकारच्यावतीने १५ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले आहे

.




Wednesday, February 14, 2024

"परीक्षेला सामोरे जाताना तणावमुक्त जायला हवे" : प्रा. डॉ. अजय दरेकर चौगुले क्लासेसच्या वतीने बोर्ड परीक्षा मार्गदर्शन व करीयर व्याख्यान संपन्न.

 "परीक्षेला सामोरे जाताना तणावमुक्त जायला हवे" : प्रा. डॉ. अजय दरेकर


     चौगुले क्लासेसच्या वतीने बोर्ड परीक्षा मार्गदर्शन व करीयर व्याख्यान संपन्न.





पुरंदर :
      "पालकांनी परीक्षेदरम्यान मुलांचे मनोबल कसे वाढेल, याकडे लक्ष द्यावे. त्याला कुठलाही ताण तणाव येणार नाही याची काळजीही घ्यावी. सर्वच विद्यार्थ्यांना मेडिकल, आयआयटी यामध्ये प्रवेश मिळेलच असे नाही. जागा खूप मर्यादित असतात; परंतु या व्यतिरिक्तही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठलाही ताणतणाव न घेता परीक्षेस सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी यापुढे सेल्फ स्टडीला महत्त्व द्यावे." असे मत प्रा. डॉ. अजय दरेकर यांनी व्यक्त केले.

     नीरेतील चौगुले क्लासेसच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा तयारी मार्गदर्शन व करियर व्याख्यान श्री समर्थ पतसंस्था येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रा. डॉ. दरेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, सदस्या राधा माने,  स्वामी विवेकानंद अभ्यासिका सोमेश्वरचे संस्थापक गणेश सावंत, ॲड. पृथ्वीराज चव्हाण, राजेश चव्हाण, आर पी आयचे तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे, सचिन मोरे, सुभाष पवार, उन्मेष कदम, विजय सपकाळ यांसह क्लासेस मधील ३०० विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

         प्रा. दरेकर यांनी विद्यार्थ्यांना थ्री इडीयट्स फिल्म मधील डायलॉग सांगून विद्यार्थ्यांचे माईंड फ्रेश ठेवण्याचे मार्गदर्शन केले. आपण पेपरला सामोरे जाताना पेपर लिहिताना लागणारे साहित्य तसेच प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यावा याचे देखील मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अत्यंत गरीब कुटुंबातील पोलीस अधिकारी म्हणून बारामती तालुक्यातील होळगावचे सागर होळकर यांनी देखील त्यांचा जीवन संघर्षमय सांगत मी पोलीस खात्यात पीएसआय या पदावर कसा विराजमान झालो याचे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

        त्याचप्रमाणे दोन वेळा एम.पी.एस.सी पास झालेले ज्ञानेश्वर मदने यांनी त्यांचा जीवन संघर्ष सांगताना स्वतः अपंग असताना देखील हार न मानता उच्च शिक्षण घेऊन मंत्रालयात क्लार्क या पदापर्यंत पोहोचलो असे सांगत भविष्यात तुम्ही विद्यार्थी माझे सहकारी अधिकारी म्हणून लाभताल अशीही अशा व्यक्त केली.

         या सर्व वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकून चौगुले क्लासेस मधील ३०० विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी हा उपक्रम पहिल्यांदाच नीरेत राबवत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासोबत त्यांचा माईंड कसा सेट करता येईल त्यांच्या डोक्यावरचा तणाव कसा कमी होईल यासाठी प्रयत्न केले. प्रतीक चौगुले यांचे आभार व्यक्त केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराज शहा यांनी केले. तर, आभार नितीन भोसले यांनी मानले.

Monday, February 12, 2024

निखिल वागळे यांच्यावरील हल्ला : ठोस भूमिका ठरविण्यासाठी राज्यातील पत्रकार संघटनांची 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक

 निखिल वागळे यांच्यावरील हल्ला : ठोस भूमिका ठरविण्यासाठी राज्यातील पत्रकार संघटनांची 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक




मुंबई : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला आणि एकूणच राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले या संदर्भात ठोस आणि निर्णायक भूमिका घेण्यासाठी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांची महत्वाची बैठक 21 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात होणार असल्याची घोषणा एस.एम.देशमुख यांनी केली.


      निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघात निदर्शने करण्यात आली. यावेळी मुंबईतील सर्व प्रमुख पत्रकार संघटना सहभागी झाल्या होत्या.

निखिल वागळे यांच्यावरील हल्ला म्हणजे माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे. या विरोधात सर्व पत्रकार संघटनांनी एकजूट कायम ठेवण्याची गरज सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली. निखिल वागळे यांच्या प्रमाणेच राज्यात गेल्या सहा महिन्यात 36 पत्रकारांवर हल्ले झाले असून निवडणुकांच्या काळात असे हल्ले वाढणार आहेत. या विरोधात केवळ निषेध करून चालणार नाही तर काही ठोस भूमिका घ्यावी लागेल अशी सूचना बहुतेक वक्त्यांनी केली. त्यानुसार विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांची २१ फेब्रुवारी २०२४  रोजी दुपारी २ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात बैठक घेण्यात येणार आहे. या बेठकीत आंदोलनाचा पुढील दिशा ठरविली जाईल. 

        आजच्या निदर्शने आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघ, मंत्रालय आणि विधिमंडळ  वार्ताहर संघ, टीव्हीजेए, मुंबई प्रेस क्लब, म्हाडा पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, बृहन्मुंबई महापालिका पत्रकार संघाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी काही सामाजिक संघटना, कामगार संघटनानी सहभागी होत आंदोलनास पाठिंबा दर्शविला. निदर्शकांनी गगनभेदी घोषणा दिल्या. 

एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निषेध सभेत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीरसिंग, जतीन देसाई, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह प्रवीण पुरो, मुंबई क्राईम रिपोर्टर असो.चे शाहिद अन्सारी, म्हाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक पवार, मुंबई महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू सोनावणे तसेच ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, युवराज मोहिते, संजीव साबडे, संजय परब, एनडीटीव्हीचे मिश्रा आदिंनी निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. हे आंदोलन दोन तास चालले. कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज राज्यात अनेक ठिकाणी पत्रकार संघटनांनी आंदोलनं करून निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. आजच्या निदर्शनात अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, (रायगड) मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई  मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर आणि विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा पुरंदर मध्ये निषेध. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाने मोर्चा काढत पोलिसांना दिले निवेदन.

 निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा पुरंदर मध्ये निषेध.

पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाने मोर्चा काढत पोलिसांना दिले निवेदन.





सासवड : (प्रतिनिधी)
      जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याचा पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या वतीने सासवड (ता पुरंदर) येथे निषेध व्यक्त करण्यात आला. त्याच बरोबर संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या बाबतचं एक पत्र सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना देण्यात आले.

         सासवड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून शिवतीर्थ ते पोलीस स्टेशन असा मोर्चा पत्रकारांच्या वतीने काढण्यात आला. यावेळी हल्लेखोरांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकार पुरस्कृत काही व्यक्ती घाला घालत आहेत. असा आरोप यावेळी करण्यात आला.



     यावेळी पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे, प्रवीण नवले, अमोल बनकर, निलेश भुजबळ, एम.जी शेलार, दत्ता भोंगळे, बी. एम. काळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पुणे डिजिटल मिडिया परिषदेचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, निखिल जगताप, संतोष डुबल, किशोर कुदळे, संतोष जंगम, एन. आर जगताप, निलेश जगताप, आजिम आत्तार, हनुमंत वाबळे, सुनील धिवार, सुजाता गुरव, छाया नानगुडे, शिवदास शितोळे, अमृत भांडवलकर, ए.टी माने, राजेश काकडे, बाळासाहेब पवार, नवनाथ राणे, बाळासाहेब धुमाळ, रामदास लांघी, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लक्ष्मी शंकर, सचिन मोरे, शिवाजी राणे आदी उपस्थित होते.

कोट........
      पत्रकारांवरील हल्ले खपून घेतले जाणार नाही. त्याच बरोबर पत्रकार संसक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष बी. एम. काळे यांनी यावेळी केली.



      

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...