Type Here to Get Search Results !

पुरंदर तालुक्यात अफूची शेती करणाऱ्यावर कारवाई

 कोडीत येथे अफूची शेती करणाऱ्यावर कारवाई


सासवड पोलीसांची कारवाई ; दोघांना अटकसासवड  २६ : पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परीसरात सासवड पोलीस पथकाने शनिवार (दि २४) टाकलेल्या छाप्यात अफूची १० किलोची झाडे जप्त केली तसेच अफूची लागवड करणाऱ्या दोन जनांनवर गुन्हा दाखल करून अटक केली याबाबत पोलीस शिपाई धिरज भानुदास जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे

          पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दशरथ सिताराम बडदे (रा. कोडीत बुद्रुक ता.पुरंदर) व तानाजी निवृत्ती बडधे (रा.कोडीत बुद्रुक ता.पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परीसरात दोन इसमांनी शेतात अफूच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना मिळाली त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक आर. डी. गावडे, पोलीस हवालदार एस.डी.घाडगे, व्ही.टी.कांचन, धी. भा.जाधव, वाय.सी.नागरगोजे, ए.ए.भुजबळ, डी.पी.विरकर, एस.सी.नांगरे, जे.एच.सय्यद, पी. बी.धिवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील स्टाफ यांनी तेथे जावून पाहणी केली तानाजी बडदे यांनी शेतात शेवंतीच्या झाडांला लागूनच अफुची लागवड केल्याचे दिसले दरम्यान सासवड पोलीसांनी शेतातून ८ किलो अफूची झाडे जप्त केली त्यानंतर दशरथ बडदे यांनी कांदयाच्या शेतात अफुची लागवड केल्याचे दिसले शेतातून २ किलो ५०० ग्रॅम असलेली ही बोंडे प्रतिकिलो २००० रुपये दराने विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड केलेली मिळून आली या दोन इसमांनी आपल्या शेतात अफूची बेकायदेशीर लागवड केली होती. 

       पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे हे करीत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies