नीरा येथील तरुणाची ऑनलाईन शेअर्स खरेदीमध्ये फसवणूक : तीन लाख रुपयाला घातला गंडा
नीरा दि.२९
नीरा (ता. पुरंदर) येथे मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शेअर्स खरेदी मध्ये तरुणाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. शेअर मार्केट मध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यासाठी नीरा येथील तरुणाचा विश्वास संपादन करून तीन लाख रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी मोबाईल ॲप आणि ग्रुप एडमिनच्या विरोधात जेजुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नीरा येथील स्वप्निल सुधाकर मोरे या 29 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे राहणारा तरुण स्वप्नील सुधाकर मोरे हा रिटेल होम अँपच्या माध्यमातून डिसेंबर 2023 पासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होता. त्यांना अँव्हेनिव्ह ऑफ स्टार या शेर मार्केट ग्रुपचे अँडमीन आर्यन रेड्डी व असिस्टन ऐश्वर्या कुमार हे मार्गदर्शन करीत होते. मोरे यांचा विश्वास संपादन करून त्यांनी वेळोवेळी करून ४८०००० हजाराची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र यातील केवळ एक लाख ८० हजार रुपये मोरे यांना परत मिळाले.यातील तीन लक्ष रुपये त्यांना परत मिळाले नाही.म्हणून त्यांनी जेजुरी पोलिसात दिनांक २८ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली आहे.तर या प्रकरणी जेजुरी पोलिसात भारतीय दंड विधान कलम 409,419,420,34 माहीती तंत्रज्ञान अँक्ट 2000 चे कलम 66 (C),66 (D) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतचा अधिकचा तपास भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक आण्णा पवार करीत आहेत.