मावडी कडेपठार येथे अफूची लागवड : जेजुरी पोलिसांची कारवाई
जेजुरी दिनांक २९
पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार येथे दोन शेतकऱ्यांनी आपुची लागवड केल्या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी कारवाई केली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली अफूची बोंडे आणि झाडे ताब्यात घेऊन दोन्ही शेतकऱ्यांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी या शेतकऱ्यांवर गुंगीकारक औषधीद्रव्य आणी मनोव्यापारावर परीणामकरणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 ब, 18 क. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक २९ फेब्रुवारी दुपारी चार ते सहा वाजलेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांना अफूच्या बोंडासह ३८ किलो अफूची झाडे आढळून आली.त्याची बाजारभावानुसार किंमत ७६ हजाराच्या आसपास होते आहे.या प्रकरणी पोलिसांनी
१) किरण पुंडलीक जगताप वय ४० वर्षे रा मावडी.क.प ता पुरंदर जि पुणे २ )रोहीदास चांगदेव जगताप वय ५५ वर्षे रा मावडी क.प ता. पुरंदर जि पुणे यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. तर या दोघांनी त्यांचे मालकीचे मावडी क.प गावातील जमीन गट नं 189,व 200 मधे ही अफूची लागवड केली होती. या प्रकरणी सहाय्यक फौजदार उदय हिरामण पवार यांनी फिर्याद दिली आहे.जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.तर याबाबतचं अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत.


No comments:
Post a Comment