Wednesday, May 24, 2023

वीर पत्नीस सौभाग्याचे लेणं बहाल

 वीर पत्नीस सौभाग्याचे लेणं बहाल 




भोर: दि.२३      

       तालुक्यातील भोंगवली येथे वीर पत्नी सौ.विजया नवनाथ भांडे यांना जयहिंद फाउंडेशनच्या वतीने सौभाग्याचे लेणे बहाल करण्यात आले.पतीच्या प्रथम वर्ष श्राध्द दिनाचे (दि.२३) औचित्याने समारंभपूर्वक सौ.विजया यांना कुंकू लावून साडी,चोळी,बांगड्या देण्यात आल्या.

    भोंगवली येथील सी आर पी एफ जवान नवनाथ शंकर भांडे यांना रायपूर ( छतीससगड ) येथे दि.३जून २०२२ रोजी वीरगती प्राप्त झाले.दि.२३ मे २०२३ रोजी त्यांचे प्रथम वर्ष श्राद्ध होते.याच दिवसाचे औचित्य साधून वीर पत्नी सौ.विजया नवनाथ भांडे यांचे सौभाग्य लेणे त्यांना सन्मान पूर्वक देण्याचे कार्य जयहिंद फौंडेशनच्या सभासदांनी केले.कार्यक्रमासाठी उपस्थित महिला व पुरुषांच्या मान्यतेने वीर पत्नी सौ.विजया यांना हळद - कुंकू लावण्यात आले.हिरव्या बांगड्या भरण्यात आल्या.जोडवी घातली. केसात गजरे व गळ्यात मंगळसूत्र घालण्यात आले.साडी देवून ओटी भरण्यात आली.कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिलांना वीर पत्नीने हळद - कुंकू लावले.याच पद्धतीने वीर माता सौ.पार्वती भांडे यांना हळद - कुंकूचा मान दिला.सौ.स्नेहलता जगताप यांनी साडी - चोळी देवून ओटी भरली. वीर पुत्र चि.राज यास सन्मान पत्र, शाल - श्रीफळ देऊन,प्रा.श्री. सचिन तावरे लिखित शहीदगाथा पुस्तकाची प्रत देण्यात आली.विधवा स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळावे तसेच विधवा प्रथा मुक्ती यासाठी सौभाग्य लेणं बहाल केल्याचे स्नेहलता जगताप म्हणाल्या.यावेळी सरपंच अरुण पवार,सदस्य मंदा कुंभार,जयहिंद फौंडेशनचे विजया तावरे,प्रीती बैलकर भोर तालुका अध्यक्ष व संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर बैलकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिसांनी मोकाट सुटलेल्या ‘सोशल मिडिया’वर नियंत्रण ठेवावे

 पोलिसांनी मोकाट सुटलेल्या ‘सोशल मिडिया’वर नियंत्रण ठेवावे


उठसुठ माध्यमांनाच काय दम देतात?- एम.एम.देशमुख



मुंबई- वर्तमानपत्रात किंवा चॅनेलवरून प्रसिध्द झालेल्या एखाद्या बातमीमुळे अलिकडे दंगल झालीय असं महाराष्ट्रात कुठं घडलंय का? अकोल्यात जी दंगल झाली ती सोशल मिडियावरून कोणी तरी धार्मिक भावना दुखावल्यामुळे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी पत्रकारांना नोटीस पाठवून त्यांनी कशा बातम्या द्याव्यात यावर प्रवचन दिलं आहे. त्यामुळे पोलिसांना नियंत्रण ठेवायचेच असेल तर ते मोकाट सुटलेल्या सोशल मिडियावर ठेवले पाहिजे.. ते न करता पोलीस ऊठसुठ माध्यमांना काय दम देतात? या शब्दात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पोलीस प्रशासनाला सुनावले आहे. एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी माध्यमांनी नेहमीच घेतलीय.. दंगलीच्या काळातही माध्यमांनी संयमानं वार्तांकन करीत जबाबदार माध्यमं म्हणून आपली भूमिका नेहमीच पार पाडली.. त्यामुळे आम्ही कश्या बातम्या द्यायच्या हे पोलिसांनी आम्हाला शिकविण्याची गरज नाही.. असं असताना देखील पोलीसांनी दिलेली नोटीस म्हणजे माध्यमांना कारवाईची भिती घालून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे.. हा प्रयत्न माध्यमं खपवून घेणार नाहीत.. तेव्हा तळेगाव दाभाडे पोलिसांनी ही नोटीस तातडीने मागे घेऊन आपण माध्यम स्वातंत्र्याचा आदर करतो हे दाखवून द्यावे.. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संबंधितांना तश्या सूचना द्याव्यात अशी विनंती एस.एम.देशमुख यांनी केली आहे.


जेजुरी नजीकच्या भोरवाडी फाट्यावर टेम्पो थेट रेल्वे रुळावर झाला पलटी

 जेजुरी नजीकच्या भोरवाडी फाट्यावर टेम्पो थेट रेल्वे रुळावर झाला पलटी



  नीरा दि. 24


   वाहतुकीसाठी धोकेदायक असलेल्या पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील अपघाताचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. आज बुधवारी सकाळी जेजुरी नजीक भोरवाडी फटा येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने एक टेम्पो थेट पुणे मिरज लोहमार्गावर जाऊन पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी अथवा मृत्यू झाला नाही. 


      प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेजुरी औद्योगिक वसाहत सोडल्यानंतर भोरवाडी फाट्यापासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हा एकेरी होतो. याच दरम्यान भरधाव टेम्पो जेजुरीकडून नीरा बाजूकडे भरधाव निघाला होता. चारपदरी रस्ता अचानक एकेरी झाल्याने टेम्पो चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. वेगात असलेल्या टेम्पो थेट रस्त्याच्या डाव्या बाजूने दगड गोट्यातून रस्त्याच्या लगत असणाऱ्या पुणे मिरज रेल्वे लाईन वर जाऊन पलटी झाला. या टेम्पोमध्ये ब्रिटानिया कंपनीचे बिस्किटचे बॉक्स होते. मोठ्या उंचीवरून हा टेम्पो खाली पडला.सुदैवाने टेम्पो चालक मात्र सुखरूप बाहेर आला. तो किरकोळ जखमी आहे. सचिन सखाराम कारंडे अस चालकाच नाव असून तो पुण्यातील सहजपुरवाडी येथील रहिवाशी आहे.



   धोकादायक पालखीमार्ग 


       थोड्याच दिवसात या धोकेदायक पालखी मार्गावरून लाखो वैष्णवांचा मेळा जाणार आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी पुण्याचे जिल्हाधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक, बांधकाम, आरोग्य विभागाचे अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी या रस्त्यांवरून आपल्या उन्हाळी अर्थात पालखी सोहळा पूर्व सहली काढल्या . दरवर्षी पालखी सोहळ्यापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाकडून अशा उन्हाळी सहली पुणे ते नीरा शहरापर्यंत काढल्या जातात. मात्र, गेली दहा ते बारा वर्षे झाले या रस्त्याचे रुंदीकरण अथवा धोकेदायक ठिकाणे काढण्याचा कुठल्याही प्रयत्न केला नाही.पालखी गेल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी अपघाताचे सत्र तसेच राहते ही बाब गंभीर असल्याचे लोक आता बोलून दाखवत आहेत. मात्र अधिकारी आणि राजकीय पुढारी याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात.

बाजार समितीचा संचालक मंडळात तज्ञ संचालकांची नियुक्ती करा : शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे यांची मागणी

 बाजार समितीचा संचालक मंडळात तज्ञ संचालकांची नियुक्ती करा : शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे यांची मागणी



नीरा दि.२४


      कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळामध्ये तज्ञ संचालक नियुक्त करण्याची किंवा स्वीकृत संचालक घेण्याची पद्धत यापूर्वी होती. ती पद्धत पुन्हा सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष दिलीप गिरमे यांनी केली आहे. याबाबतची मागणी करणार पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सहकार विभाग आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्याकडे दिले आहे.


      सहकारी क्षेत्रातील बहुतांश संस्थांमध्ये तज्ञ संचालक नियुक्त करण्याची पद्धत पूर्वीपासून सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा अशा प्रकारची तरतूद होती. मात्र २०१६ मध्ये या तरतुदीमध्ये राज्य सरकारकडून बदल करण्यात आला आणि तेव्हापासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर तज्ञ संचालक नियुक्ती करणे बंद झाले. ही पद्धत पुन्हा सुरू करावी आणि तज्ञ संचालक किंवा तज्ञ शेतकरी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष दिलीप गिरमे यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी संबंधित विभागांना दिला आहे.


राज्यभरात नुकतीच बाजार समितीची निवडणूक प्रक्रियापार पडली आहे.अनेक बाजार समितीवर सभापती,उपसभापती यांची सुद्धा निवड झाली आहे. मात्र बाजार समितीवर सध्या असणारे संचालक हे सर्व सामान्य कुटुंबातील आहेत.त्यांना सर्वच बाबींचे ज्ञान असेल असे नाही.त्यामुळे सहकारातील सर्वच संस्थांमध्ये ज्या पद्धतीने तज्ञ संचालकांची नियुक्ती केली जाते त्याच नैसर्गिक न्यायाने बाजार समितीत सुद्धा तज्ञ संचाकलकाची नियुक्ती व्हायला हवी आहे. साखर कारखाना ,जिल्हा बँक, सोसायटी याठिकाणी तज्ञ संचालक नेमण्यात येतो. किंवा नियुक्ती करण्यात येते. तज्ञ व्यक्ती किंवा एखादा प्रगतिशील शेतकरी. 

बाजार समितीत असल्यास शेतकऱ्यांना आणि बाजार समितीला त्याचा फायदा होईल.अनेक वेळा तज्ञ लोक निवडणुकी मध्ये होणार खर्च व जाणारा वेळ यामुळे निवडणुकीत सहभागी होत नाहीत.मात्र अशा लोकांना सहकारी सांस्थेत संचालक म्हणून घेणे फायद्याचे आहे असे गिरमे यांनी म्हटले आहे.

Monday, May 22, 2023

पिंगोरी येथे विविध विकास कामांचे माजीमंत्री विजय शिवतारे व माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते शुभारंभ

 पिंगोरी येथे विविध विकास कामांचे माजीमंत्री विजय शिवतारे व माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते शुभारंभ 



   नीरा  दि. २२

        पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे 3 कोटी 35 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी मंत्री विजय शिवतारे व माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. अशोकराव टेकवडे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर तालुक्यात आता विकास कामांच्या भूमिपूजनाला सुरवात केलीय...

  पिंगोरी येथील जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 94 लक्ष रुपयांची नळ पाणी पुरवठा येजना,60 लक्ष रुपयांचा आदर्श नगर येथील साकव पुल ,50 लक्ष रुपयांचा हरणी - पिंगोरी रस्ता, 20 लक्ष रुपयाचा आदर्श नगर ते पिंगोरी गावठाण रस्ता, त्याच बरोबर शहीद रमेश शिंदे यांच्या घराकडे जाणाऱ्या 10 लक्ष रुपयांच्या रस्त्याचे भूमी पूजन यावेळी करण्यात करण्यात आले 

       यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार , दिलीप यादव , भाजपचे ओबीसी सेलचे अध्यक्ष सचिन लंबाते,भाजप तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे ,आरपिआरचे तालुका अध्यक्ष पंकज धीवार, पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती अतुल म्हस्के,पिंगोरीचे सरपंच संदीप.यादव उपसरपंच प्रकाश शिंदे माजी सरपंच जीवन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते बाबा शिंदे ,निलेश शिंदे, गोविंद उर्फ सचिन शिंदे  इत्यादीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

  यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश शिंदे यांनी केले तर आभार बाबासाहेब शिंदे यांनी केले...

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शरद जगताप यांची बिन विरोध निवड

 नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी  शरद जगताप यांची बिन विरोध निवड 




   नीरा दि.२२

       पुरंदर तालुका आणि  बारामती तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या नीरा  कृषी उत्पन्न समितीच्या सभापती पदासाठीची  निवडणूक प्रक्रिया आज सोमवारी सासवड येथील बाजार समितीच्या कार्यालयात  पारपडलीय..यामध्ये राष्ट्रवादीचे शरद जगताप यांची  सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आलीय...

      या बाजार समितीच्या  संचालक पदाच्या निवड निवडणुकीत आघाडीने सर्व जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे 10 तर काँग्रेसचे 8 उमेदवार होते.निवडी नंतर आमदार संजय जगताप यांनी  सभापती शरद जगताप  यांचा सत्कार करून अभिनंदन केलंय... यावेळी राष्ट्रवादीचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे, बारामती तालुका अध्यक्ष    संभाजी होळकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप पोमान, शिवसेना तालुका अध्यक्ष अभिजित जगताप,माजी जिल्हा परिषद सदस्य  सुदाम इंगळे, दत्ता झुरूंगे,माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे, राष्ट्रवादीचे राहुल गिरमे यांच्या सहसंचालक मंडळ व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते 



       क वर्गात असलेली  ही  बाजार समिती  मागील संचालक मंडळाने ब वर्गात आणली होती ..ती  अ आणण्याचे मोठे आव्हान या संचालक मंडळ आणि सभापतींवर असणार आहे

Thursday, May 18, 2023

सासवड येथील तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

 धक्कादायक! सासवड येथील तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

   नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता 



  सासवड दि.18


        सासवड ( ता.पुरंदर ) येथील  तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव ईश्वर रोहिदास शिंदे  असून वय २९ वर्षे असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा तरुण  महात्मा फुले हौ.सोसायटी,सासवड ता.पुरंदर जि.पुणे  या ठिकाणचा रहिवाशी आहे..हा तरूण हा ११ मे २०२३ पासून बेपत्ता होता. तरूण बेपत्ता असल्याची तक्रार मयत तरुणाचे वडील रोहिदास शिंदे यांनी सासवड पोलीस ठाण्यात दिली होती. सासवड पोलीस या तरुणाचा शोध घेत असतानाच दिनांक 17 मे 2023 रोजी हा करून घरी परतला. तरुण घरी परतल्यानंतर वडिलांनी त्यास सासवड पोलीस स्टेशन येथे आणून हा तरुण सापडल्याचे कळविले. यानंतर आज दुसऱ्या दिवशी दिनांक 18 मे 2023 रोजी या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा तरुण हा कर्जबाजारी असल्याने आत्महत्या केल्याची ही प्राथमिक माहिती मिळते आहे. याबाबत सासवड पोलीस पुढील तपास करत आहेत.

कर्नाटकचे मुखमंत्री होणार सिद्धरमय्या

 कर्नाटकचे मुखमंत्री होणार सिद्धरमय्या निश्चित




दि.18


कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहे. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.


सिद्धरामय्या यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांचे नावं आघाडीवर होते. पण काँग्रेस पक्षानं मोठा निर्णय घेत सिद्धारामय्या यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे. 


सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री? 


सिद्धरमय्या १९८३ साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेत निवडून आले. १९९४ मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युअरची साथ सोडली. २००८ मध्ये काँग्रेसचा हात पकडला.


सिद्धरमय्या २०१३ ते २०१८ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी १२ निवडणुका लढल्या. त्यापैकी नऊ निवडणुकांमध्ये जिंकले. सात किलो अन्न देणारी भाग्य योजना, शाळेत जाणाऱ्या मुलांना १५० ग्राम दूध आणि इंदिरा कँटीन या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या योजना आहेत.


सिद्धरमय्या यांचा जन्म तीन ऑगस्ट १९४७ रोजी म्हैसूर येथे झाला. तेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते. त्यांचे वडील म्हैसूर जिल्ह्यात के. टी. नरसीपुराजवळ शेती करत होते. आई बोरम्मा गृहिणी होती. 


दहा वर्षांपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले नव्हते. बीएसस्सी आणि एलएलबी त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून केली. पाच भाऊ-बहिणींमध्ये सिद्धरमय्या हे दुसऱ्या क्रमांकाचे. ते कुरुबा गौडा समाजाचे आहेत. सिद्धरमय्या म्हैसूरचे वकील चिक्काबोरय्याचे ज्युनिअर होते. काही दिवस त्यांनी कायद्याचे शिक्षण दिले.


सिद्धरामय्या यांच्याकडे एकूण ५१ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यापैकी २१ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. तसेच दोघांच्या नावावर ३० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 


यापैकी सिद्धरामय्या यांच्याकडे ९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडे २० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सिद्धरामय्या यांच्या कुटुंबावर २३ कोटी रुपयांचं कर्जदेखील आहे.

लहान मुलांना मारहाण प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दखल

 पुणे शहर पोलिसांचे वैभव लोणी काळभोरकरांच्या मुळावर, घऱासमोर शांततेत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना, नागरीकांना पोलिसांची बेदम मारहाण, मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यासह चार पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी.. 




लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीत घरासमोर शांततेत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना व नागरीकांना लोणी काळभोर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १६ ) रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास घडली आहे. विशेष बाब म्हणजे अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याबरोबरच, महिलांनाही शिवीगाळ केल्याची व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पोलिसांच्या विरोधात लोणी काळभोर नागरीकांच्याते मोठा रोष पसरला आहे. 


पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे हे त्या मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे नाव असुन, वैभव मोरे यांच्या समवेत असलेल्या पोलिसांनी अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याबरोबरच, महिलांनाही शिवीगाळ केल्याचा आरोप भोसले चाळीतील नागरिकांनी केला आहे. या मारहानीच्या व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या असून, पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या सहकारी पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी संतोष भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. 


 लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीमधील स्थानिक नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार, पदाधिकारी संतोष भोसले यांचा वाढदिवस असल्याने, चाळीतील काही नागरीक घरासमोरील रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापत होते. या कार्यक्रमासाठी अल्पवयीन मुले व महिलाही हजर होत्या. त्याचवेळी पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांचे चार सहकारी पोलिसांच्या वाहनातुन घटनास्थळी आले. पोलिसांनी गाडीतुन उतरताच, केक कापणाऱ्या नागरीकांना व अल्पवयीन मुलांना समज देण्याऐवजी हातातील काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मुलांना मारहाण करु नये यासाठी काही महिलांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वैभव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलांना शिवीगाळ करण्याबरोबरच दिसेल त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. 



दरम्यान पोलिस मारहाण करत असल्याचे पाहुन संतोष भोसले व त्यांच्या घरातील नातेवाईकांनी पोलिसांना वरील प्रकार थांबवण्याची विनंती केली. मात्र वैभव मोरे यांनी भोसले कुटुबियांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तबब्ल दहा ते पंधरा मिनिटे चालु होता. हा प्रकार मोबाईलमध्ये शुट होत असल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी घडत असलेली घटना शुट करणाऱ्यांचे मोबाईल जप्त करुन, मोबाईलमधील व्हिडोओ डिलीट करुन टाकले. अल्पवयीन मुलांना व नागरीकांना होत असलेली मारहाण वाढत चालल्याने, स्थानिक नागरीकांनी मध्यस्थी करुन मारहाण थांबवली. तसेच पोलिसांच्या विरोधात नागरीक पोलिस ठाण्यात पोचले. नागरीकात पोलिसांच्या विरोधात असलेला राग पाहुन, संतोष भोसले यांनी वैभव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत लेखी अर्ज दिला. 


पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे कायमच वादग्रस्त...

दरम्यान मागील वर्षभराच्या काळात पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांचा एक पोलिस सहकाऱ्याची कारकीर्द कायमच वादग्रस्त राहिलेली आहे. रस्त्यातुन जाताना एखाद्याने साहेबांच्याकडे पाहिले तरी मारहाण व शिवीगाळ केल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल झालेल्या आहेत. एका स्थानिक नागरीकांच्या मदतीने वैभव मोरे व त्यांचा सहकाऱ्याने पैशासाठी अनेकांना त्रास दिल्याचा चर्चाही मोठ्या प्रमाणात चालु आहेत. रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यास कोणाचाही ना नव्हती. मात्र एका राजकीय पुढाऱ्यांच्या फोनवरुन पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप संतोष भोसले व मारहाण झालेल्या नागरिकांनी केली आहे.

Wednesday, May 17, 2023

हवेली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे तर उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम यांची निवड

 हवेली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे तर उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम यांची निवड



    लोणी काळभोर दि.१७

       

   मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ यांचेशी संलग्न असलेल्या हवेली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे तर उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव अरुण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नव्या कार्यकारणीची निवड करण्यात आली.


      हवेली पत्रकार संघाची कार्यकारिणी निवड बुधवारी हॉटेल एसफोरजी येथे पार पडली. यावेळी रमेश निकाळजे यांची अध्यक्षपदी, तर स्वप्नील कदम यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्याच बरोबर इतरही निवडी जाहीर करण्यात आल्या.कार्याध्यक्षपदी विकास काळभोर, कोषाध्यक्षपदी अक्षय दोमाले, पत्रकार हल्ला कृती समितीपदी दिगंबर जोगदंड यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनीत जैनजागडे, रुपालीताई काळभोर,मंगल बोरावके,मिलन दाभाडे,सुवर्णा हिरवे यांची निवड करण्यात आल्याचे पुणे जिल्हा संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी जाहीर केले.

    यावेळी लोणी काळभोरचे सरपंच श्री.योगेशनाना काळभोर,उपसरपंच सौ.ललिताताई राजेंद्र काळभोर, ऍड. सुजित कांबळे ऍड. श्रीकांत भिसे,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजयमामा भालेराव,केतन निकाळजे,संदीप बडेकर,विशाल वेदपाठक,सिद्धार्थ काळभोर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी श्री.एम. जी. शेलार परिषदेचे पुणे जील्हा प्रशिद्दी प्रमुख भरत निगडे, जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्ष ,राहुल शिंदे, पुणे जिल्हा पत्रकार संघ महिला प्रतिनिधी श्रावणी कामत, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे संघटक राजू वारभुवन व हवेली पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते .



Monday, May 15, 2023

थोपटेवाडी येथे 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून पाझर तलावाच्या बाजूला मृत देह दिला होता फेकून

 थोपटेवाडी येथे 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून 

     पाझर तलावाच्या बाजूला मृत देह दिला होता फेकून 



    नीरा दि.१६ 


         पुण्यातील पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी येथे एका पन्नास वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून निर्घृनपणे  खून केल्याची घटना समोर आली आहे.. यासंदर्भात या महिलेच्या जावयाने जेजुरी पोलिसात सोमवारी रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. अत्यंत निर्दयीपणे हा खून करण्यात आले नाही परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे या कोणाचा तपास लावणे आता पोलिसांकडे मोठा आव्हान ठाकले आहे .



      याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सोमवारी सायंकाळी साडेसात वाजलेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे... थोपटेवाडी येथील पाझर तलावाच्या बाजूला या महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आला आहे. ही महिला  सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कापडगाव येथील ही महिला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलय... तर संगिता शरद करे अस या महीलेच नाव आहे. माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे  व मृतदेह  ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी साठी पाठवला आहे.

      मृत महिलेच्या  मुलगी ही पिसुर्टी येथील गोपीनाथ जगन्नाथ बरकडे यांच्याशी विवाह झाला आहे. त्यामुळे मुलीला भेटण्यासाठी त्या अनेक वेळा पिसुर्टी येथे येत असतात. यावेळी सुद्धा त्या आल्या होत्या मात्र त्यांचा कोणीतरी दगडांचे ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.थोपटेवाडी  येथील पाझर तलावाच्या बाजूला त्यांचा मृत देह आढळून आला आहे.त्यांच्या मृत देहाच्या बाजूला दोन मोठे दगड पडलेलं असून त्याला रक्त लागलेले आहे.त्यामुळे दगडाने ठेचून हा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संदर्भातील फिरतात मृताचा जावई  गोपीनाथ बारकडे यांनी जेजुरी पोलिसात दिली आहे .पोलिसांनी भा.द.वि.कायदा कलम 302,201 नुसार गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिकचा तपास  पोलीस निरीक्षक उमेश तावसकर करीत आहेत

Friday, May 12, 2023

अग्रभागी असणाऱ्या पत्रकारांना योग्य सहाय्याची गरज

 अग्रभागी असणाऱ्या पत्रकारांना योग्य सहाय्याची गरज

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या पेन्शन योजना शुभारंभ समारंभात आयुक्त शेखर सिंह यांचे प्रतिपादन



पिंपरी

पत्रकार हा नेहमी अग्रभागी असतो परंतु त्याला आवश्यक योग्य ते सहाय्य मिळत नाही हे कोविडच्या काळात दिसून आले. कोविड काळात अग्रभागी राहून काम करणाऱ्या पत्रकारांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी मी प्रयत्न केले अशा पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर प्रमाणे सहाय्याची आवश्यकता आहे असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

 मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने वय वर्षे साठ वरील पत्रकारांना दरमहा 5000 रुपयांच्या पेन्शन योजनेचा शुभारंभ आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आज येथे केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे निवासी संपादक हणमंत पाटील, पुढारीचे निवासी संपादक किरण जोशी, मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक गोविंद वाकडे, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नाना कांबळे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अविनाश आदक, डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष राजू वारभुवन, महिला पत्रकार आघाडीच्या अध्यक्ष अर्चना मेंगडे, उपाध्यक्ष गणेश मोरे, पत्रकार भवन समितीचे निमंत्रण गोपाळ मोटघरे, प्रशिक्षण वर्ग समितीचे निमंत्रक मारुती बाणेवार, महिला उपाध्यक्ष सीता जगताप, पत्रकार संघाचे खजिनदार राम बनसोडे, समन्वयक राकेश पगारे, सहचिटणीस गौरव साळुंखे, अशोक पगारे, पत्रकार हल्ला कृती समितीचे अनिल भालेराव, अविनाश कांबीकर आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले की पिंपरीकर संघाने पेन्शन योजनेचा घेतलेला निर्णय अतिशय धाडसी व कौतुकास्पद आहे पत्रकार संघ चांगले काम करत असल्याचे आपण पाहतो आहोत संघाला चांगले सहकार्य करण्याचे माझे प्रयत्न असतील पिंपरी चिंचवड शहरात पत्रकार भवन लवकरात लवकर पूर्ण व्हावे म्हणून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगून पत्रकार संघाला महाविद्यालयासाठी इमारत उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी आश्वासन दिले. पत्रकार हाउसिंग सोसायटी साठी पीएमआरडीए च्या आयुक्तांबरोबर चर्चा करू असे आश्वासनही आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिले.

पुढारीचे निवासी संपादक किरण जोशी यावेळी बोलताना म्हणाले की पत्रकार संघाच्या योजना खूप कौतुकास्पद आहेत या योजना कार्यान्वित व्हाव्यात याकरिता आपण पाठपुरावा करू. लोकमतचे निवासी संपादक हणमंत पाटील यांनी यावेळी बोलताना पत्रकार संघ खूप चांगले काम पहात आहे मी स्वतः जी मदत हवी ती करण्यास तयार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना विभागीय सचिव नाना कांबळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ लवकरच रेड स्वस्तिक सोसायटी बरोबर पत्रकारांच्या आरोग्यविषयक उपचाराबाबतचा करार करत आहे. रेड स्वस्तिक सोसायटी मार्फत शहरातील पत्रकारांना सर्व मोठ्या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण मोफत उपचार करण्यासंदर्भात सहकार्य करण्यात येणार आहे यामुळे लाखो रुपयांचे उपचार देखील संपूर्ण मोफत मिळू शकणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या पेन्शन योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम घेत असल्याचे सांगत पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या उपक्रमांना आयुक्त शेखर सिंह यांनी आवश्यक ते सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ यांनी पत्रकारांना पेन्शन योजनेसारख्या अशा सहकार्याची का आवश्यकता आहे हे विशद करत अशा योजनेसाठी पत्रकार संघाच्या वतीने स्वतंत्र विश्वस्त संस्था निर्माण करून हा उपक्रम कायमस्वरूपी राबविला जावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमात उपस्थित त्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के यांनी केले.

Thursday, May 11, 2023

भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांवर यापुढे विश्वास ठेऊ नका महादेव जानकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

 भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांवर यापुढे विश्वास ठेऊ नका 

महादेव जानकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 



नीरा : दि.११


   भाजप आणि राष्ट्रीय काँग्रेस हे दोन्ही पक्ष विश्वास ठेवण्यासारखे पक्ष नाहीत. हे दोन्ही पक्ष छोट्या पक्षांना संपवून टाकतात आणि म्हणूनच यापुढे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर विश्वास ठेवू नका. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करू नका, असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा त्याचबरोबर माजी खासदार महादेव जानकर यांनी केल आहे ते गुरुवारी निरा येथे बोलत होते.



   भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे राजकारण हे दिल्लीतून चालते. ते राज्य पातळीवरील पक्ष्यांना फारशी किंमत देत नाहीत. ते त्यांना बरोबर घेतात आणि संपवून टाकतात. त्यामुळे अशा पक्षांवर विश्वास न ठेवलेला बरा. त्यापेक्षा शरद पवारांचा पक्ष असो, उद्धव ठाकरे यांचा पक्ष असो की एकनाथ शिंदेंचा पक्ष असो अशा छोट्या पक्षांना यापुढे मदत करा. पण राष्ट्रीय पक्षांना मदत करू नका असे स्पष्ट आवाहन जानकर यांनी यावेळी केले.सत्यशोधक समाज प्रबोधन राष्ट्रसंघटना व राष्ट्रीय समाज पक्ष पुरंदर तालुका यांच्यावतीने माजी मंत्री महादेव जानकर यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा नीरा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात झाला. यावेळी जानकर बोलत होते. यावेळी जानकर यांंना ५५ हजार रुपयाचा लोकनिधी संकलन करून देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी संजय निगडे यांची नियुक्ती करण्यात आली. 


       यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कशिनाथ शेवते होते. यावेळी     माऊली सरगर,पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रूपनवर, सातारा जि. अध्यक्ष खंडेराव सरक, किरण गोपणे, पश्चिम महाराष्ट्र समन्वय सचिन गुरव, अँड.संजय माने, तानाजी शिंगाडे, निलेश लांडगे, विषाणु गोरे, अंकुश देवडकर आदी उपस्थित होते. नीरा येथील शिवसेनेचे दयानंद चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कशिनाथ शेवते यांनी जानकर यांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. 

       संजय निगडे मित्रपरिवाराच्या वतीने कर्नलवाडीचे माजी सरपंच सुधीर निगडे, पृथ्वीराज निगडे, दयानंद चव्हाण, प्रमोद निगडे, सत्यवान निगडे, धनराज कोंडे, दत्तात्रय निगडे, राहुल निगडे यांच्या हस्ते ५५ हजार रुपयांची माळ जानकर यांना घालण्यात आली. 


यावेळी झालेल्या कर्यक्रमाचे प्रास्ताविक संजय निगडे यांनी केले. सुत्रसंचलन विनायक रुपनवर तर आभार शेखर खरात यांनी मानले.

     

Tuesday, May 9, 2023

ब्रेक न लागल्याने एसटी शिवशाहीवर धडकली, पिंपरीत दोन बसमध्ये चिरडून महिला कर्मचारी ठार

 ब्रेक न लागल्याने एसटी शिवशाहीवर धडकली, पिंपरीत दोन बसमध्ये चिरडून महिला कर्मचारी ठार 

पिंपरीत दोन बसच्या धडकेत महिला मेकॅनिकचा मृत्यू

       


पिंपरी चिंचवड : 

    ब्रेक न लागल्याने एसटी शिवशाहीवर धडकली, पिंपरीत दोन बसमध्ये चिरडून महिला कर्मचारी ठार झाली आहे .

         मृत्यू कुणाला  कुठे गाठेल, हे कोणीही सांगू शकत नाही. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड येथून समोर आली आहे. वल्लभनगर आगारात पार्किंगमधील एसटी बस काढताना ब्रेक न लागल्याने ती समोर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर आदळली. यावेळी शिवशाही बससमोर तिचे ऑईल चेक करण्यासाठी उभ्या असलेल्या मॅकेनिक विभागातील सहाय्यक शिल्पा कैलास गेडाम (वय ३८ वर्ष) यांचा दोन्ही बसच्यामध्ये चिरडून दुःखद अंत झाला.



पिंपरीतील वल्लभ नगर बस आगारातील एसटी बाहेर काढताना बसचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे ती समोर असलेल्या शिवशाही बसवर जाऊन धडकली. त्यावेळी एसटी विभागतील महिला कर्मचारी त्या बसचे ऑईल चेक करण्यासाठी उभ्या होत्या. या दोन्ही बसच्या मधोमध सापडून त्यांचा मृत्यू झाला आहे. शिल्पा कैलास गेडाम (वय ३८) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वल्लभनगर बस आगारामध्ये परतूर आगाराची बस पार्किंग मधून बाहेर काढण्यासाठी चालक बऱ्याच वेळापासून प्रयत्न करत होता. मात्र समोर बस असल्याने त्याला गाडी काढता येत नव्हती. मात्र त्यावेळी परतूर आगाराच्या बसचा वाहक अहमदपूर आगाराच्या बस चालकाच्या सीटवर बसला आणि बस सुरू करून त्याने बाजूला घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्या बसचा ब्रेक न लागल्याने ती बस समोर असलेल्या शिवशाही बसवर जाऊन जोरात आदळली.

Sunday, May 7, 2023

विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून चांगले काम करु शकतात : राजेंद्रकुमार सराफ


विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून चांगले काम करु शकतात.: राजेंद्रकुमार सराफ



सोमेश्वरनगर: ७ मे 

आजच्या समाजात पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी 

शालेय विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून प्रभावी काम करु शकतात. शालेय जीवनातच मुलांमध्ये पर्यावरण विषयक सजगता निर्माण झाल्यास  हीच मुले मोठी झाल्यावर पर्यावरण संवर्धनाचे काम प्रामाणिकपणे करतील असा विश्वास पर्यावरण अभ्यासक रो. राजेंद्रकुमार सराफ यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ बारामती आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण संवर्धन कार्यशाळेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ बारामती चे अध्यक्ष रो. प्रा. डॉ अजय दरेकर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या पर्यावरण समितीच्या डायरेक्टर रो. गौरी शिकारपुर, विद्या प्रतिष्ठानच्या सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल चे मुख्याध्यापक सचिन पाठक, रो. दर्शना गुजर, रो. अरविंद गरगटे, रोटरी क्लब ऑफ ई डायमंड चे अध्यक्ष रो. प्रकाश सुतार, रोट्रॅक्ट क्लब ऑफ बारामती चे अध्यक्ष रोट्रॅक्टर आदित्य भावसार, रोट्रॅक्टर आशिष आदी मान्यवर उपस्थित होते.

आपले म्हणजे मानवाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपण पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी आहे. आज आपण पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर उद्याच्या पिढीचे भवितव्य धोक्यात येईल म्हणून उद्याच्या पिढीचे प्रतिनिधी असलेल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण दूत म्हणून प्रभावी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राजेंद्रकुमार सराफ यांनी केले.



पर्यावरण अभियंता व चेअरमन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 सपोर्टिंग द एन्व्हायरमेंट, रोटेरियन राजेंद्रकुमार सराफ यांनी विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे 300 विद्यार्थ्या करिता एनवायरनमेंट स्टीवर्डशिप पर्यावरणीय कारभारी / दूत कसे व्हायचे यावर कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

प्रगती, आर्थिक सुबत्ता, राहणीमानातील बदल, शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे संसाधनाचा वापर व प्रदूषणात वाढ झाली आहे. त्याचे विपरीत परिणाम दिसत आहेत. आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणीय कारभारी / दूत ( एन्व्हायरमेंट   स्टीवर्ड)होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रमुख कार्य पर्यावरण शिक्षण, नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन, नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत वापर, पर्यावरण निरीक्षण, जैवविविधतेचे रक्षण, परिसंस्था पुनर्संचयित करणे, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरणीय प्रचार व तरफदारी आहेत. सामाजिक आणि पर्यावरणीय बदल व संदर्भ वापरून सामाजिक व पर्यावरणीय बदल घडवून आणता येतील. अनेक उदाहरणे देऊन हे कसे सहजपणे करता येईल हे समजावून सांगितले. पर्यावरण शिक्षणासाठी स्थानिक परिसंस्था, हवामान, भूविज्ञान, जलस्त्रोत, व नगर वस्तीचा परिसंस्थेवर परिणाम याचा अभ्यास. नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करण्यासाठी परिसरातील वनस्पती, पशु, पक्षी, कीटक, माती, खडक व खनिजे याची माहिती व संवर्धन. नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत वापर याच्या अंतर्गत मर्यादित संसाधनाचा काळजीपूर्वक वापर, न्याय्य वितरण,  ती काढताना निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास व निर्मित कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट या साठी प्रयत्न करणे. परिसंस्था पुनर्संचयित करण्यासाठी सोपे उपाय आहेत उदाहरणार्थ नगर वस्तीत पक्ष्यासाठी घरटी, बिया जमा करून त्याचे रोप करून लावणे व झाड वाढवणे, मधुमाशी पालन, परदेशी प्रजातीचा नायनाट व स्वदेशी प्रजातींचे संवर्धन इत्यादी. जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी कागद वाचवा झाडे वाचवा, पायी चालणे किव्हा सायकलचा वापर, शून्य कचरा निर्मिती, किटकाना त्रास न देणे व आपल्या परंपरेत असलेले जैवविविधतेचे सन्मान करणारे सण. टूवे चिकटपट्टी घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी चीटकावी व त्यावर जमा झालेली धूळ बघा, झाडांच्या पानावर जमा झालेली धूळ, पाऊस किती पडतो, जल स्त्रोताचे पाणी कसे आहे याचे निरीक्षण व अभ्यास. सायकल किवा सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा वापर, पाण्याची बचत, प्लास्टिकचा व रसायनाचा वापर टाळणे. कमीत कमी कचरा निर्मिती असे केल्यास प्रदूषण नियंत्रित करणे शक्य होईल. पर्यावरणीय प्रचार व तरफदारी करण्यासाठी चालता चालता कचरा उचलणे, टेकड्या जल स्त्रोत प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न, ओल्या कचर्या पासून खत निर्मिती इत्यादी. फेर वापर, पुनर्वापर, अपसायकलिंग केल्यास संसाधनाचावापर कमी होऊन प्रदूषण कमी होईल. हे सर्व विद्यार्थ्यांना सहज करणे शक्य आहे.  राजेन्द्रकुमार सराफ यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की ( एन्व्हायरमेंट   स्टीवर्ड) पर्यावरणीय कारभारी / दूत व्हा व इतरा साठी आदर्श व्हा. सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणीय कारभारी / दूत होऊ असा संकल्प सोडला. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष प्रा डॉ अजय दरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले रोटरी क्लब कायमच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कामे करत असतात.पर्यावरण संवर्धन जागृती हे रोटरीचे जगभर चालणारे प्रभावी काम आहे.अशा कार्यशाळांमधून पर्यावरणाबाबत  संवेदनशील विद्यार्थी निर्माण करण्याचा वसा रोटरी क्लब ऑफ बारामतीने घेतला आहे. कार्यशाळेच्या सुरुवातीला दर्शना गुजर यांनी प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय करून दिला.

कार्यशाळेच्या शेवटी रोटरी क्लब ऑफ बारामती चे सचिव अरविंद गरगटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यशाळेच्या आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ बारामती, रोटरी क्लब ऑफ दौंड, रोटरी क्लब ऑफ ई डायमंड, रोटरी क्लब ऑफ पुणे गणेशखिंड, रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांनी विशेष परिश्रम घेतले.

Wednesday, May 3, 2023

शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा ,कार्याध्यक्ष पदाची नेमणूक करून पक्षाचा कारभार चालावा पुरंदर राष्ट्रवादीचा ठराव

 शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा ,कार्याध्यक्ष पदाची नेमणूक करून पक्षाचा कारभार चालावा पुरंदर राष्ट्रवादीचा ठराव



शरद पवारांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आणि संपूर्ण राजकीय वातावरणात खळबळ उडाली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांनी आपल्या भूमिका प्रतिक्रिया आग्रहीपणे मांडण्यास सुरुवात केली आणि शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी संपूर्ण राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांना विनंती व विनवणी केली जात आहे पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे देखील आज पक्ष कार्यालयामध्ये बैठकीचा आयोजन करून एकत्रितपणे ठराव संमत करण्यात आला या ठरावांमध्ये शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा व कार्याध्यक्ष ची निर्मिती करून या पदावर ती त्यांना योग्य असणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करावी आणि कार्याध्यक्ष पदाच्या माध्यमातून पक्षाचा कारभार चालवा शरद पवार हे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत तेच प्रमुख आहेत त्यामुळे त्यांच पद या पदावर ती कोणाचीही नेमणूक केली जाऊ नये फक्त त्यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पक्षाचे नाते तोडू नये असा ठराव पुरंदर राष्ट्रवादीच्या वतीने पारित करण्यात आला आजच्या या बैठकीस पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे,पुरंदर युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, सासवडच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गिरमे, महेश जगताप, यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

कर्नलवाडी येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह : घातपात की आत्महत्या चर्चांना उधाण

 कर्नलवाडी येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृत देह  : घातपात की आत्महत्या  चर्चांना उधाण 



दि.३

       पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे एक मृतदेह आढळून आला आहे. कर्नलवाडी गावचे हद्दीतील झिरपवस्ती या ठिकाणी हा मृतदेह आढळून आला आहे.


         कर्नलवाडी ता. पुरंदर येथे झिरीपवस्ती जवळ असलेल्या निर्जन शेतामध्ये  अनोळखी व्यक्तीचा हा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह रानटी जनावरांनी किंवा कुत्र्यांनी खाल्ल्यामुळे आता केवळ हाडांचा सांगाडा हाडांचा सांगाडा उरला आहे.... या मृत व्यक्तीने निळ्या रंगाची प्यांट परिधान  केली असून पिवळ्या रंगाचा शर्ट त्याच्या बाजूला पडलेला दिसून येतो आहे.... तर हा मृतदेह सत्तर टक्के जनावरांनी खाल्ला असून पायाच्या मांडीचा भाग केवळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे  या मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांना अवघड असणार आहे. अत्यंत निर्जनस्थळी हा मृतदेह असल्याने याबाबतची माहिती कोणाला मिळून आली नाही..आज बुधवारी दुपारी कर्नलवाडीचे  पोलीस पाटील यांनी याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबतची अधिकची कारवाई जेजुरी पोलीस करत आहेत.

Tuesday, May 2, 2023

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन

 महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन


दि.2

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन झाले आहे त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे कोल्हापुरातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी माध्यमांशी बोलताना दिली अरुण गांधी हे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध लेखक होते ते दीर्घ काळापासून आजारी होते अखेर मंगळवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला


  अरुण गांधी हे महात्मा गांधी यांचे दुसरे पुत्र मणिलाल गांधी यांचे पुत्र होते त्यांचा जन्म 14 एप्रिल 1934 रोजी दक्षिण आफ्रिकेतील दर्बन येथे झाला त्यांचे वडील इंडियन ऑपिनियन या वृत्तपत्राचे संपादक होते तर त्यांची आई त्याच वृत्तपत्रात प्रकाशित होती वरून गांधी यांनी नंतर आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक राजकीय क्षेत्रात काम केले त्यांनी काही पुस्तके लिहिले आहेत ते गिफ्ट ऑफ अंगर लेसन फॉर्म माय गॉडफादर महात्मा गांधी हे त्यापैकीच एक पुस्तक आहे वरून गांधी 1987 मध्ये सहकुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले ते त्यांनी आपल्या आयुष्यातील बरीच वर्ष घालवली ख्रिश्चन ब्रदर्स विद्यापीठातील संबंधित एक संस्था ही त्यांनी स्थापन केली

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा

 राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा



दि.2 


         राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मंगळवारी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला असून जोपर्यंत हा निर्णय माघारी घेतला जात नाही तोपर्यंत सभागृह सोडणार नाही असे म्हणत राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी यशवंतराव चव्हाण सहभागृहात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.


       शरद पवार यांच्या 'लोक माझ्यासंगती: या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकर्षणाचा सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभागृहाला मार्गदर्शन करताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच बरोबर नेत्यांनी विरोध केला. संपूर्ण सभागृह वाहक झालं होतं यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी थेट शरद पवार यांचे पाय धरत हा निर्णय माघारी घेण्याची विनंती केली.


         यावेळी शरद पवार म्हणाले की 56 वर्षे सत्तेच्या राजकारणामध्ये माझा सहभाग राहिला. आता मी निवडणुकीला उभा राहणार नाही. आता राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नावर अधिक लक्ष घालण्यावर माझा भर असणार आहे. याशिवाय मी कोणतीही दुसरी अन्य जबाबदारी घेणार नाही. एक मे 1960 ते 1 मे 2023 या प्रदीर्घ कालखंडानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदावरुन पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

Featured Post

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.

 निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.  पुरंदर :       पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद ...