Wednesday, May 24, 2023

पोलिसांनी मोकाट सुटलेल्या ‘सोशल मिडिया’वर नियंत्रण ठेवावे

 पोलिसांनी मोकाट सुटलेल्या ‘सोशल मिडिया’वर नियंत्रण ठेवावे


उठसुठ माध्यमांनाच काय दम देतात?- एम.एम.देशमुख



मुंबई- वर्तमानपत्रात किंवा चॅनेलवरून प्रसिध्द झालेल्या एखाद्या बातमीमुळे अलिकडे दंगल झालीय असं महाराष्ट्रात कुठं घडलंय का? अकोल्यात जी दंगल झाली ती सोशल मिडियावरून कोणी तरी धार्मिक भावना दुखावल्यामुळे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी पत्रकारांना नोटीस पाठवून त्यांनी कशा बातम्या द्याव्यात यावर प्रवचन दिलं आहे. त्यामुळे पोलिसांना नियंत्रण ठेवायचेच असेल तर ते मोकाट सुटलेल्या सोशल मिडियावर ठेवले पाहिजे.. ते न करता पोलीस ऊठसुठ माध्यमांना काय दम देतात? या शब्दात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पोलीस प्रशासनाला सुनावले आहे. एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी माध्यमांनी नेहमीच घेतलीय.. दंगलीच्या काळातही माध्यमांनी संयमानं वार्तांकन करीत जबाबदार माध्यमं म्हणून आपली भूमिका नेहमीच पार पाडली.. त्यामुळे आम्ही कश्या बातम्या द्यायच्या हे पोलिसांनी आम्हाला शिकविण्याची गरज नाही.. असं असताना देखील पोलीसांनी दिलेली नोटीस म्हणजे माध्यमांना कारवाईची भिती घालून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे.. हा प्रयत्न माध्यमं खपवून घेणार नाहीत.. तेव्हा तळेगाव दाभाडे पोलिसांनी ही नोटीस तातडीने मागे घेऊन आपण माध्यम स्वातंत्र्याचा आदर करतो हे दाखवून द्यावे.. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संबंधितांना तश्या सूचना द्याव्यात अशी विनंती एस.एम.देशमुख यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...