वीर पत्नीस सौभाग्याचे लेणं बहाल

 वीर पत्नीस सौभाग्याचे लेणं बहाल 




भोर: दि.२३      

       तालुक्यातील भोंगवली येथे वीर पत्नी सौ.विजया नवनाथ भांडे यांना जयहिंद फाउंडेशनच्या वतीने सौभाग्याचे लेणे बहाल करण्यात आले.पतीच्या प्रथम वर्ष श्राध्द दिनाचे (दि.२३) औचित्याने समारंभपूर्वक सौ.विजया यांना कुंकू लावून साडी,चोळी,बांगड्या देण्यात आल्या.

    भोंगवली येथील सी आर पी एफ जवान नवनाथ शंकर भांडे यांना रायपूर ( छतीससगड ) येथे दि.३जून २०२२ रोजी वीरगती प्राप्त झाले.दि.२३ मे २०२३ रोजी त्यांचे प्रथम वर्ष श्राद्ध होते.याच दिवसाचे औचित्य साधून वीर पत्नी सौ.विजया नवनाथ भांडे यांचे सौभाग्य लेणे त्यांना सन्मान पूर्वक देण्याचे कार्य जयहिंद फौंडेशनच्या सभासदांनी केले.कार्यक्रमासाठी उपस्थित महिला व पुरुषांच्या मान्यतेने वीर पत्नी सौ.विजया यांना हळद - कुंकू लावण्यात आले.हिरव्या बांगड्या भरण्यात आल्या.जोडवी घातली. केसात गजरे व गळ्यात मंगळसूत्र घालण्यात आले.साडी देवून ओटी भरण्यात आली.कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिलांना वीर पत्नीने हळद - कुंकू लावले.याच पद्धतीने वीर माता सौ.पार्वती भांडे यांना हळद - कुंकूचा मान दिला.सौ.स्नेहलता जगताप यांनी साडी - चोळी देवून ओटी भरली. वीर पुत्र चि.राज यास सन्मान पत्र, शाल - श्रीफळ देऊन,प्रा.श्री. सचिन तावरे लिखित शहीदगाथा पुस्तकाची प्रत देण्यात आली.विधवा स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळावे तसेच विधवा प्रथा मुक्ती यासाठी सौभाग्य लेणं बहाल केल्याचे स्नेहलता जगताप म्हणाल्या.यावेळी सरपंच अरुण पवार,सदस्य मंदा कुंभार,जयहिंद फौंडेशनचे विजया तावरे,प्रीती बैलकर भोर तालुका अध्यक्ष व संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर बैलकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.