Type Here to Get Search Results !

लहान मुलांना मारहाण प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दखल

 पुणे शहर पोलिसांचे वैभव लोणी काळभोरकरांच्या मुळावर, घऱासमोर शांततेत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना, नागरीकांना पोलिसांची बेदम मारहाण, मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यासह चार पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी.. 




लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीत घरासमोर शांततेत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना व नागरीकांना लोणी काळभोर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १६ ) रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास घडली आहे. विशेष बाब म्हणजे अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याबरोबरच, महिलांनाही शिवीगाळ केल्याची व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पोलिसांच्या विरोधात लोणी काळभोर नागरीकांच्याते मोठा रोष पसरला आहे. 


पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे हे त्या मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे नाव असुन, वैभव मोरे यांच्या समवेत असलेल्या पोलिसांनी अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याबरोबरच, महिलांनाही शिवीगाळ केल्याचा आरोप भोसले चाळीतील नागरिकांनी केला आहे. या मारहानीच्या व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या असून, पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या सहकारी पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी संतोष भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. 


 लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीमधील स्थानिक नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार, पदाधिकारी संतोष भोसले यांचा वाढदिवस असल्याने, चाळीतील काही नागरीक घरासमोरील रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापत होते. या कार्यक्रमासाठी अल्पवयीन मुले व महिलाही हजर होत्या. त्याचवेळी पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांचे चार सहकारी पोलिसांच्या वाहनातुन घटनास्थळी आले. पोलिसांनी गाडीतुन उतरताच, केक कापणाऱ्या नागरीकांना व अल्पवयीन मुलांना समज देण्याऐवजी हातातील काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मुलांना मारहाण करु नये यासाठी काही महिलांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वैभव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलांना शिवीगाळ करण्याबरोबरच दिसेल त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. 



दरम्यान पोलिस मारहाण करत असल्याचे पाहुन संतोष भोसले व त्यांच्या घरातील नातेवाईकांनी पोलिसांना वरील प्रकार थांबवण्याची विनंती केली. मात्र वैभव मोरे यांनी भोसले कुटुबियांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तबब्ल दहा ते पंधरा मिनिटे चालु होता. हा प्रकार मोबाईलमध्ये शुट होत असल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी घडत असलेली घटना शुट करणाऱ्यांचे मोबाईल जप्त करुन, मोबाईलमधील व्हिडोओ डिलीट करुन टाकले. अल्पवयीन मुलांना व नागरीकांना होत असलेली मारहाण वाढत चालल्याने, स्थानिक नागरीकांनी मध्यस्थी करुन मारहाण थांबवली. तसेच पोलिसांच्या विरोधात नागरीक पोलिस ठाण्यात पोचले. नागरीकात पोलिसांच्या विरोधात असलेला राग पाहुन, संतोष भोसले यांनी वैभव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत लेखी अर्ज दिला. 


पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे कायमच वादग्रस्त...

दरम्यान मागील वर्षभराच्या काळात पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांचा एक पोलिस सहकाऱ्याची कारकीर्द कायमच वादग्रस्त राहिलेली आहे. रस्त्यातुन जाताना एखाद्याने साहेबांच्याकडे पाहिले तरी मारहाण व शिवीगाळ केल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल झालेल्या आहेत. एका स्थानिक नागरीकांच्या मदतीने वैभव मोरे व त्यांचा सहकाऱ्याने पैशासाठी अनेकांना त्रास दिल्याचा चर्चाही मोठ्या प्रमाणात चालु आहेत. रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यास कोणाचाही ना नव्हती. मात्र एका राजकीय पुढाऱ्यांच्या फोनवरुन पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप संतोष भोसले व मारहाण झालेल्या नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies