Friday, February 4, 2022

माळशिरसच्या उपसरपंचपदी सारिका यादव यांची बिनविरोध निवड

 माळशिरसच्या उपसरपंचपदी सारिका यादव यांची बिनविरोध निवड



  दि.४ 


      पुरंदर तालुक्यातील माळशिरस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुण यादव यांच्या गटाच्या सारिका नवनाथ यादव यांची निवड करण्यात आली आहे.आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी ही निवड करण्यात आली.कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिल्या पुरंदर तालुक्यातील कृषी उपक्रमांना भेटी

   

     पुरंदर तालुक्यातील महत्त्वाची मानल्या गेलेल्या व शिल्पकलेचा उत्तम नमूना असलेले एतिहासिक भुलेश्वर 

मंदिर ज्या गावात आहे. त्या गावात आज उपसरपंचपदाची निवडणूकपार पडली. आज सकाळी ११ वाजता ग्रामपंचायतीचे सरपंच महादेव बोरावके यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा संपन्न झाली.या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गोकुळ यादव यांनी ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते त्यामूळे आज झालेल्या या मासिक सभेत सर्वानुमते सारिका यादव यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. निवडी नंतर उपसरपंच सारिका यादव यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य ,पोलीस पाटील पूजा यादव व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडी नंतर बोलताना यादव म्हणाल्या की,लोकांमुळे मला ही संधी मिळाली.आता गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच व ग्रामस्थ यांना बरोबर घेऊन काम करेन.





No comments:

Post a Comment

Featured Post

नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप

  नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले  रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप  नीरा : प्रतिनिधी       ...