छोट्या छोट्या प्रसंगातूनही आनंद मिळवायला शिका ; निलिमा दगडे
शिवतक्रार येथे शिक्षक व विद्यार्थी यांचा वाढदिवस साजरा
निरा :दि १५
नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच. सामाजिक जीवनाची माहिती देण्याबाबत उपक्रमशिल असलेल्या नीरा- शिवतक्रार येथील तक्रारवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक आणि विद्यर्थी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . एक प्रकारे एकमेकांच्या आनंदात सहभागी कास व्हायचं? व आपल्या सहकाऱ्यांच सुद्धा कौतुक कस करायच? या बाबतचा पाठ आज या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवतक्रार येथे जि प शाळा निरा येथील उपक्रमशील प्राथमिक शिक्षिका सौ नीलम दगडे व शिवतक्रार शाळेतील विद्यार्थी अमितेश लकडे यांचा वाढदिवस शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ,मराठी पत्रकार परिषदेचे सोशल मीडिया परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे, मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जेधे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम लकडे ,ग्रामस्थ विलास धायगुडे, पुणे जिल्हा शिक्षक समिती पतसंस्थेचे सभापती मनोज दिक्षित व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी राहुल शिंदे,सुभाष जेधे यांनी मनोगत व्यक्त करीत विद्यार्थी व शिक्षक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.उपशिक्षक निलम दगडे आपला व विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.त्याच बरोबर सामाजिक जीवन जगत असताना एक मेकांना कशा प्रकारे सहकार्य करायला हवे याबाबत मार्गदर्शन केले. जीवनात छोट्या छोट्या प्रसंगातून आपण आनंद मिळवून शकतो त्यामूळे आपण सर्व छोटे मोठे क्षण आनंदात कसे जगायचे हे शिकले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
या वेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दत्तात्रेय हाडंबर यांनी केले तर आभार नंदकुमार चव्हाण यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना अमितेश लकडे व शिक्षिका निलम दगडे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.