पोस्ट्स

पुरंदर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या आरक्षणात घोळ !

इमेज
 पुरंदर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या आरक्षणात घोळ ! अधिकाऱ्यांनी डावलले निवडणूक आयोगाचे प्रमाण; आरक्षण पुन्हा काढण्याची मागणी  नीरा :     पुरंदर तालुक्यात सरकारी बाबूंनी डिसेंबर २३ पूर्वी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच काढले. मात्र, हे आरक्षण सदोष असल्याचे आता दिसून येत आहे. महिला व ना.म.प्र या प्रवर्गातील आरक्षण चुकीचे काढल्याचा आरोप अनेक ठिकाणांहून होऊ लागला आहे.     निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे ता. १६ जून रोजी ग्रामसभा घेण्याची अधिसूचना प्रसिद्ध करून ता. २१ जून रोजी आरक्षण सोडत काढणे आवश्यक होते. गुळुंचे व कर्नलवाडी येथे मात्र, ता. १९ जून रोजीच आरक्षण सोडत काढण्यात आली. शासकीय नियमाप्रमाणे महिला आरक्षण अंतर्गत आरक्षण धरून ५० टक्के इतके मान्य आहे. असे असतानाही तालुक्यातील ९ सदस्यीय ग्रामपंचायतींचे आरक्षण काढताना हे प्रमाण ५५.५५ टक्के इतके झाले आहे. तर सर्वसाधारण पुरुष संख्या मात्र कमी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुळुंचे (ता. पुरंदर) येथील आरक्षण ता.१९ रोजी काढल्यावर त्यावर अक्षय व नितीन निगडे यांनी ता. २० रोजी पुरंदरच्या तहसीलदार...

पुरंदर तालुक्यातील ३० गावातील पोलीस पाटील आरक्षण सोडत जाहीर

इमेज
 पुरंदर तालुक्यातील ३० गावातील पोलीस पाटील आरक्षण सोडत जाहीर नीरा दि 30   पुरंदर तालुक्यातील 30 गावातील पोलीस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत आज 30 जून रोजी संपन्न झाली पुरंदर-दौंडचे उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हो सोडत पारपडली.   पुरंदर तालुक्यातील आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे चिव्हेवाडी अनुसूचित जमाती, देवडी (अनुसूचित जमाती महिला,), सुपे खुर्द (अनुसूचित जमाती,) देवकरवाडी (अनुसूचित जमाती), काळदरी (अनुसूचित जमाती), राख (विशेष मागास प्रवर्ग), वीर (विशेष मागास प्रवर्ग महिला), तक्रारवाडी (भटक्या जमाती), लपतळवाडी (भटक्या जमाती महिला), तोंडल (भटक्या जमाती महिला), सुकलवाडी (भटक्या जमाती) पिंपळे (भटक्या जाती) आडाचीवाडी (भटक्या जाती) नवलेवाडी (इतर मागास वर्ग) बेलसर (इतर मागासवर्ग महिला), जवळ अजून (इतर मागासवर्गीय), कोळविहिरे( इतर मागासवर्गीय महिला) थोपटेवाडी (इतर मागासवर्गीय) तर वागदरवाडी, सटलवाडी, सोमुर्डी, हरगुडे, आंबोडी,हरणी, नारायणपूर, हिवरे, राजेवाडी, मांडकी, पोंडे या गावातील पोलीस पाटीलपद राखीव असणार आहे.. अशाप्रकारे आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली याबाबतची माहि...

लोणंद येथील बावकालवाडी येथे दीड लाखाच्या दागिन्यांची चोरी

इमेज
लोणंद येथील बावकालवाडी येथे दीड लाखाच्या दागिन्यांची चोरी   लोणंद, २७ लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावकलवाडी ता. खंडाळा गावच्या हद्दीतील शेंडगेवस्ती येथील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीच्या दागिन्यांसह सुमारे दिड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली असून याप्रकरणी लोणंद पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बावकलवाडी ता खंडाळा गावच्या हद्दीतील शेंडगेवस्ती येथील महादेव पांडुरंग शेंडगे यांच्या घराचे कुलूप दि. २६ रोजी भरदिवसा अनोळखी तीन चोरट्यांनी तोडून घरातील बेचाळीस हजारांच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने मिळून सुमारे एक लाख पंचेचाळीस हजारांची चोरी केल्याची फिर्याद महादेव शेंडगे यांनी लोणंद पोलिसात दिली आहे. भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालसिम व लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांनी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत.

निळुंजच्या सरपंचपदी अश्विनी बनकर यांची निवड

इमेज
  निळुंजच्या सरपंचपदी अश्विनी बनकर यांची निवड     खळद ता. २६ : निळुंज (ता.पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस , कॉंग्रेस पक्षाच्या अश्विनी उमेश बनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . सोमवारी झालेल्या निवड नुकीत अश्विनी उमेश बनकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुंभारवळण विभागाचे मंडल अधिकारी दुर्गादास शिळकंदे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक सुरेश जगताप व तलाठीन नीलम   कांबळे यांनी त्यांना या कामी सहकार्य केले.                निळुंजच्या माजी सरपंच रूपाली जगताप यांनी आपला निर्धारित कालावधी पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवरती ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश होले , माजी सरपंच रूपाली जगताप , उपसरपंच उमेश बनकर , ग्रामपंचायत सदस्य रूपाली बनकर , उज्वला बनकर , समिर बनकर उपस्थित होते.    ...

पुरंदर तालुक्यातील ३० गावात होणार पोलीस पाटील भरती आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

इमेज
 पुरंदर तालुक्यातील ३० गावात होणार पोलीस पाटील भरती   शुक्रवारी होणार आरक्षण सोडत  नीरा दि 23   पुरंदर तालुक्यातील 30 गावातील पोलीस पाटील भरतीसाठी 30 जून रोजी आरक्षण सोडत होणार आहे.या बाबतचे आदेश पुरंदर-दौंडचे उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.याबाबतची माहिती प्रत्येक गावात देण्याबाबतच्या सूचना तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत. सबंधित गावातील इच्छुक लोकांनी यावेळी उपस्थित राहण्या बाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुरंदर मधील तीस गावांना लवकरच पोलीस पाटील मिळणार आहेत.गावातील कायदा व सुव्यवस्था पाहण्याचे काम पोलीस पाटील करत असतात. नारायणपूर,काळदरी, सोमुर्डी,हिवरे,तोंडल,सुपे खुर्द हरणी,सोनोरी,आंबोडी,हरगुडे,तक्रारवाडी, कोळविहरे वाल्हे,बेलसर,देवडी,चिव्हेवाडी,थोपटेवाडी,मांडकी, पोंढे,वीर सटलवाडी,नवलेवाडी,लपतळवाडी,वागदरवाडी,आडाचीवाडी,सुकलवाडी जवळार्जुन,राजेवाडी,राख,पिंपळे या गावातील पोलीस पाटील भरती साठी ही सोडत होणार  आहे.

१६ वर्षांची मुलगी सेक्सचा निर्णय घेण्यासाठी सक्षम'; हायकोर्टाने बॉयफ्रेंडवरील पॉक्सोचा गुन्हा केला रद्द!

इमेज
 १६ वर्षांची मुलगी सेक्सचा निर्णय घेण्यासाठी सक्षम'; हायकोर्टाने बॉयफ्रेंडवरील पॉक्सोचा गुन्हा केला रद्द! नवी दिल्ली प्रतिनिधी .२४ मेघालय उच्च न्यायालयाने एका पॉक्सो प्रकरणात महत्त्वाचं मत मांडलं आहे. सेक्सच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी १६ वर्षांची मुलगी सक्षम असते, असं मत मेघालय हायकोर्टाने मांडलं आहे. यासोबतच कोर्टाने पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेली FIR रद्द करण्याचे आदेशही दिले आहेत. लाईव्ह लॉने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीवर १६ वर्षांच्या मुलीशी संबंध ठेवल्यामुळे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हे संबंध सहमतीने झाले असल्याचा दावा तरुणाने केला होता. दोघांचे प्रेम असल्याचा दावा या तरुणाने आपले संबंध सहमतीने झाल्याचे म्हटले होते. तसंच, या मुलीनेही कोर्टात दिलेल्या आपल्या जवाबात दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध असल्याचं कबूल केलं होतं. त्यामुळे शारीरिक संबंधांवेळी कोणतीही जबरदस्ती केली गेली नव्हती. त्यामुळे, याकडे बलात्कार म्हणून पाहू नये अशी मागणी...

बेपत्ता पाणबुडी अखेर सापडली: पर्यटक मात्र गमावले

इमेज
 बेपत्ता पाणबुडी अखेर सापडली: पर्यटक मात्र गमावले  पुणे दि.२३ रविवारी टायटॅनिक च्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा "भयंकर स्फोट " झाला, ज्यात जहाजावरील सर्वांचा मृत्यू झाला असे यूएस कोस्ट गार्ड रिअर ऍडमी. जॉन मॅगर यांनी गुरुवारी सांगितले. ओशियन गेट या पर्यटन कंपनीच्या एका छोट्या पाणबुडीमधून पाच अब्जाधीश टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेले होते. रविवारी टायटन या सबमरीन मधून हे अटलांटिक महासागराच्या तळाशी जात होते. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे या पाणबुडीचा आणि त्यासह त्यातील सर्वांचा संपर्क तुटला. यानंतर बेपत्ता झालेल्या या सर्वांचा शोध सुरू करण्यात आला होता. दुर्दैवाने आज ओशियन गेटने या पाणबुडी मधले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत असे आपल्या अधिकृत स्टेटमेंट मध्ये जाहीर केले आहे. बेपत्ता पाणबुडीत कोण होते? बेपत्ता झालेल्या पाणबुडीत ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हामिश हार्डिंग (वय ५८) यांच्यासह पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती शहजादा दाऊद (वय ४८) आणि त्यांचा मुलगा सुलेमान (वय १९) हे देखील होते. या तीन पर्यटकांशिवाय एक पायलट आणि एक कंटेंट एक्सपर्ट असे एकूण पाच लोक ...