पोस्ट्स

नीरा येथे येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती नीरा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली साजरी

इमेज
 नीरा  येथे  येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती नीरा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली साजरी     पुरंदर तालुक्यातील नीरा येथे साहित्यरत्न, शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.आज सकाळी नीरा ग्रामपंचायत, अण्णाभाऊ साठे विकास प्रतिष्ठान व नीरा ग्रामस्थ यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .    नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री काकडे यांच्या हस्ते पतीमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नीरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विरज काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण ,प्रमोद काकडे,अभिषेक भालेराव,सुनील चव्हाण, अनंता शिंदे,वकील आदेश गिरमे,अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पाटोळे राष्ट्रवादीचे अजित जैन,भारतीय बौध्द महासंघाचे दादा गायकवाड यांचासह नीरा आणि परिसरातील अनेक लोक उपस्थित होते.

कपलिंग तुटल्याने निरा येथे रेल्वे गाडीचे झाले दोन भाग

इमेज
 कपलिंग तुटल्याने निरा येथे रेल्वे गाडीचे झाले दोन भाग  नीरा दि.१     पुरंदर तालुक्यातील निरा रेल्वे स्टेशनवर मालगाडी येत असताना दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटल्याने मालगाडीचे दोन भाग झाले. अर्धा भाग पाठीमागे राहिलाच राहिला . तर इंजिनचा भाग नीरा रेल्वे स्टेशनवर दाखल झाला होता. याबाबतची घटना समोर आलीय.         रविवारी सायंकाळी पुण्याहून आलेल्या मालगाडीच्या बाबत हिंघटना ही घटना घडली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने पुन्हा पुढे गेलेला इंहिनाचा भाग माघारी आणून या दोन्ही रेल्वेभाग जोडले.यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान रेल्वेचे किंवा स्थानिक लोकांच झालं नाही. मात्र रेल्वेचा कपलिंग तुटून अर्धी रेल्वे (म्हणजे गार्डचा भाग) पिंपरे येथील फाटकात उभी राहिली. तर अर्धी गाडी रेल्वे ( इंजिन कडील अर्धा भाग) स्टेशन मध्ये गेली. यामुळे पिंपरे आणि परिसरातील अनेक लोक या ठिकाणी बघ्याच्या भूमिकेत आले होते.        मालवाहू गाडी असल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा अपघात होण्याच्या धोका नव्हता. कपलिंग तुटलेले रेल्वेचे डबे ऑटोमॅ...

पोलिस असल्याचे भासवून नीरेत दागिने लुटले.

इमेज
 पोलिस असल्याचे भासवून नीरेत दागिने लुटले.  व्यापाऱ्याचे तीन तोळे सोने केले लंपास  नीरा :         नीरा (ता.पुरंदर) येथे पोलिस असल्याचा बनाव करून भररस्त्यात जेष्ठ व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाम रामचंद्र सोनी (वय ७३) यांची सोन्याची एक चैन व एक अंगठी असे तीन तोळे सोने लंपास करुन चोरांनी पोबारा केला आहे. याबाबत सोनी यांनी जेजूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .          याबाबतीत जेजूरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शाम सोनी हे शनिवार दि. ३० जुलै रोजी दुपारी ०३:१५ च्या सुमारास रहदारी असलेल्या पालखी महामार्गावरील नीरा रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल जवळ चालत होते. त्याचवेळी एका अनोळखी इसमाने मोटरसायकल वरून येऊन पोलीस असल्याचा बहाना करत ओळखपत्र दाखविले. फिर्यादी यांना म्हणाला की या ठिकाणी चोऱ्या होतात, आम्ही तपासणी करीत आहोत. तुम्ही तुमचे हातातील सोन्याची अंगठी व गळ्यातील सोन्याची चैन माझे ताब्यात द्या. असे म्हणाल्यावर फिर्यादी यांनी त्यांच्या हातातील अंगठी व गळ्यातील चैन त्या इसमाचे ताब्यात दि...

पुण्यातील व्यापाऱ्याची वीर धरणाच्या पाण्यात आत्महत्या

इमेज
 पुण्यातील व्यापाऱ्याची वीर धरणाच्या  पाण्यात  आत्महत्या     वीर दि.३० खंडाळा तालुक्यातील तोंडल गावच्या हद्दीमध्ये वीर धरण परिसरातील नीरा नदीच्या पात्रामध्ये पुणे येथील व्यापारी सुरज हणमंत सुंदर (वय ४२,रा.पुणे) असे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  दरम्यान सुरज सुंदर यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज शिरवळ पोलीसांनी वर्तविला आहे.          याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, पुणे येथील जमीन व्यवहार व लाइजनिंगचा व्यवसाय करणारे सुरज सुंदर हे बुधवार दि.२७ जुलै रोजी पुणे येथील घरामधून पैश्यांचे काम आहे असे सांगत घरातून कार (क्रं.एमएच-०२-डिजे-४७६१) घेऊन बाहेर आले होते. यावेळी सुरज सुंदर यांनी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान व्हिडिओ दूरध्वनीद्वारे पत्नी ज्योती सुंदर यांना आला असता त्यांनी मी हरलो आहे व सिधुला मुलगा आर्यनवर लक्ष ठेवण्यास सांग मी माझे जीवन संपवणार आहे असे सांगितले.दरम्यान,गुरुवार दि.२८ जुलै रोजी सुरज सुंदर यांनी आणलेली...

कोल्हापूर ते गोंदिया रेल्वेने नीरा रेल्वे स्टेशनवर रात्री घेतला 5 तासाचा ब्लॉक. प्रवाशांचे झाले हाल

इमेज
 कोल्हापूर ते गोंदिया रेल्वेने नीरा रेल्वे स्टेशनवर रात्री घेतला 5 तासाचा ब्लॉक. प्रवाशांचे झाले हाल   कोल्हापूर ते गोंदिया या रेल्वे गाडीने गुरवारी नीरा रेल्वे स्टेशनवर रात्री अचानक 5 तासांचा ब्लॉक घेतला .यामुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यातच परीक्षेसाठी निघालेले परीक्षार्थी व आजारी असलेल्या लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. येथील रेल्वे प्रशासनाने कोणतेही सहकार्य केले नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय.दरम्यान येथील कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्थानिक तरुणांना मदतीला घेत या प्रवाशांना मदत पोचविण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी रेल्वे प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं दिली गेल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड चिडचिड वाढल्याचा पाहायला मिळाले     दिनांक 28 जुलै रोजी पुणे कोल्हापूर रेल्वे लईन काही कामानिमित्त दिवस भर बंद ठेवण्यात आली होती. मात्र सायंकाळी कोल्हापूर वरुन गोंदिया ला जाणारी गाडी नंबर 11039 या रेल्वे ने तब्बल नीरा रेल्वे स्टेशन वर चक्क 5 तासांचा ब्रेक घेतला. प्रवाशांनी आणि कोल्हापूर वरुन पुण्यामध्ये परीक्षेला जा...

राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावे

इमेज
 *राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावे* : *एस.एम.देशमुख यांची सरकारकडे मागणी*  *वडवणी* : राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावे आणि त्यासाठी जागा आणि निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त *एस.एम देशमुख* यांनी केली.. बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज एस.एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी देशमुख बोलत होते.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शेषराव जगताप होते.. एस.एम देशमुख पुढे म्हणाले, शासन जिल्हा स्तरावर पत्रकार भवनासाठी जागा आणि निधी देते मात्र तालुका स्तरावरील पत्रकारांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने आपल्या धोरणात बदल करीत प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवनासाठी जागा आणि निधी दिला पाहिजे.. त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.. वडवणी नगर पालिकेने मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे केले आहे तेथील एखादा गाळा नगरपालिकेने पत्रकारांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी सूचना देखील देशमुख यांनी य...

पुरंदर तालुक्यातील दिग्गजांची तयारी गेली वाया ; पाहा जिल्हापरिषद निवडनुकीसाठी गटनिहाय आरक्षण

इमेज
 पुरंदर तालुक्यातील दिग्गजांची तयारी गेली  वाया ;  पाहा  जिल्हापरिषद निवडनुकीसाठी  गटनिहाय आरक्षण  पुणे जिल्हा परिषदेच्या पुरंदर तालुक्यातील पाच गटांसाठी आरक्षण खालील प्रमाणे.  मांडकी - परींचे  = सर्वसाधारण  दिवे - गराडे =   सर्वसाधारण महिला पिसर्वे - माळशिरस = सर्वसाधारण  वाल्हा - नीरा = सर्वसाधारण महिला बेलसर - कोळविहिरे = सर्वसाधारण महिला.