पोस्ट्स

श्रीकांत देशमुखांवर गुन्हा दाखल करा ; तृप्ती देसाई भडकल्या

इमेज
  श्रीकांत देशमुखांवर गुन्हा दाखल करा ; तृप्ती देसाई भडकल्या सोलापूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा वादग्रस्त अश्लील व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोशल   मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली . व्हायरल व्हिडीओवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया देत देशमुखांचा चांगलाच समाचार घेतला आहे . श्रीकांत देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याची आणि भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी मागणी केली आहे . व्हायरल व्हिडीओमध्ये एका महिलेनं श्रीकांत देशमुख यांनी अनैतिक संबंध ठेवून फसवणूक केल्याचे गंभीर आरोप केले आहेत .  

व्हॉट्सॲपवर या सात चुका केल्यास खावी लागणार जेलची हवा .

इमेज
  व्हॉट्स ॲ पवर या सात चुका केल्यास खावी लागणार जेलची हवा . व्हॉट्स ॲ पचा वापर आपण सतत करीत असतो मात्र व्हॉट्स ॲ पवर काही चुकीच्या गोष्ठी केल्यास जेलची हवा ही खावी लागू शकते.   १. व्हॉट्स ॲ पवर वर अश्लिल क्लिप जर तुम्ही कोणाला पाठवली तर तुम्ही जेलला जावू शकता. तसेच तुम्हाला दंड सुद्धा बसू शकतो. २. व्हॉट्स ॲ प ग्रुप वर कोणासोबत छेडछाड करण्यात आलेले व्हिडिओ , मॉर्फ्ड फोटो शेअर करण्यावर तुम्हाला अटक केली जावू शकते. ३. जर कोणतीही महीला व्हॉट्स ॲ प वर लैंगिक छळाची तक्रार करीत असेल तर पोलिस तुम्हाला अटक करू शकतात. ४. अन्य कोणाच्या नावाने व्हॉट्स ॲ प अकाउंट बनवल्यास तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. ५. कोणत्याही धर्मा विरुद्ध किंवा पुजा स्थळाला नुकसान पोहोचवण्यासाठी चुकीचे मेसेज पसरवल्यास तुम्हाला अटक केली जावू शकते. ६. हिंसाचार पसरवण्यासाठी संवेदनशील विषयावर फेक न्यूज किंवा मल्टिमीडीया फाइल शेअर करणे तुम्हाला अडचणीत आणू शकतात. ७. नागरिकांना ड्रग्न किंवा अन्य प्रतिबंधित वस्तूला विकण्यासाठी व्हॉट्स ॲ प चा वापर केल्यास तुम्ही अडचणीत येवू शकता. ८. व्हॉट्स ॲ पवर ...

हुल्लडबाजी करणारांना पोलिसांचा चाप : मिळणार पोलिसांचा प्रसाद

इमेज
  ·           हुल्लडबाजी करणारांना पोलिसांचा चाप : मिळणार पोलिसांचा प्रसाद ·                     पुणे दि.१३  ·                सध्या पावसाळा सुरू झाला आहे .त्यामुळे अनेक तरुण पर्यटनासाठी बाहेत पडत आहेत. त्यात अनेक पर्यटक राज्यभरातून दाखल होतात. बाहेर फिरण्यासाठी आल्यावर पर्यटक   कुठलेही नियम पाळताना ते दिसत नाहीत. अशा हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे डीजे लावून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. यावेळी पोलिसांनी तरूणांचा डिजे व गाड्या जप्त करत त्यांच्यावर कारवाई केली आहे. ·          भीमा शंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या आवाजात डीजे लावून अनेक प्रवासी गाड्या चालवत असल्याचे. तसेच अनेक जण गाड्या थांबवून डीजे लावून रस्त्यावरच डान्स करत हुल्लडबाजी करत होते. या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई ...

सत्तांतरानंतर आता अधिकाऱ्यांच्या बदल्यांना होणार सुरवात

इमेज
  ·          सत्तांतरानंतर आता अधिकाऱ्यांच्या   बदल्यांना होणार सुरवात ·          मुंबई : १३ ·          राज्यात सत्तांतर होताच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात मंगळवारी झाली. सनदी अधिकारी श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशी हे एप्रिल २०१५ पासून पंतप्रधान कार्यालयात संचालक म्हणून कार्यरत होते. गतवर्षी ते एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी विदेशात गेले होते. तिथून परतल्यानंतर आता त्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. आपल्या कार्यालयाचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान मोदी यांनी विविध राज्यांमधील आयएएस अधिकाऱ्यांचा एक कोअर गट स्थापन केला होता. त्यात परदेशी यांचा समावेश होता. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना मुंबई मेट्रो ; मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक...

शिवसेनेचा एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा ; कॉंग्रेस नाराज

इमेज
    शिवसेनेचा एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा ; कॉंग्रेस नाराज     शिवसेना पक्षात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. पक्षात अजूनही गळती सुरुच असून शिंदे गटाकडे इनकमिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने काल एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केला आहे. दरम्यान , मुर्मू यांना पाठींबा दिल्याने काँग्रेस नाराज झाली आहे.          आत्ता महाराष्ट्रात चाललेलं राजकारण पाहता मी पाठिंब्यासाठी विरोध करायला हवा होता. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. आताही शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असा सांगत मी कोत्या मनाचा नाही. आदिवासी समाजाच्या अनेक नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे फोन आल्या नंतर प्रेमाच्या आग्रहाखातर आम्ही मूर्मू यांना पाठिबा देण्याचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.          एकनाथ शिंदे यांच्या बांधावे शरद पवार यांची प्रतिक्रिया   लोकशाहीमध्ये तुम्ही आणि मी यापेक्षा सामान्य लोक अधिक हुशार असतात. आपल्याकडे...

वीर धरणाच्या पणीसाठ्यात एका दिवसात मोठी वाढ

इमेज
 वीर धरणाच्या पणीसाठ्यात एका दिवसात मोठी वाढ    नीरा दि.१२   पुरंदर तालुक्यातील वीर धरणाच्या पणी साठ्यात काल सोमवारी दिवसभरात मोठी वाढ झाली आहे. काल दिवस भरात जवळ जवळ १ टीएमसी पाणी वीर धरणात आले असल्याची माहिती अभियंता विजय नलावडे यांनी दिली आहे.       काल दिनांक ११ जून रोजी सकाळी वीर धरणात ४.३९ टीएमसी म्हणजे ४६ टक्के पाणी साठा होता. काल दिवसभर आणि आज रात्री झालेल्या पावसामुळे वीर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पाणीसाठ्यात एक टीएमसी ने वाढ झाली आहे.आज मंगळवारी सकाळी वीर धरणातील एकूण पाणीसाठा ५.३६ टीएमसी झाला आहे.वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याची माहिती शाखा अभियंता विजय नलावडे यांनी दिली आहे.असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणात मोठ्या प्रमाणत पणी येणार आहे या पाण्याचा उपयोग धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतीसाठी होणार आहे. त्यामूळे कालव्याच्या पाण्यावर शेती अवलंबून असणारा शेतकरी सुखावला आहे.

यावेळी शेतकरी बेंदराचा सन करणार उत्साहात साजरा.

इमेज
 यावेळी शेतकरी बेंदराचा सन करणार उत्साहात साजरा.   कोरोनामुळे दोन वर्षानंतर शेतकरी साजरा करणार बेंदुर नीरा दि.११    गेली दोन वर्ष बळीराजाला आपल्या सर्जा राजाचा सन असलेला बेंडुर मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नव्हता. कोणतीही मिरवणूक काढता आली नव्हती की सर्जा राजाला देवाचे दर्शनाला नेहता आले नव्हते. मात्र या वेळेस कोणताही  अडथळा नसल्याने आता उद्या होणारा बेंदूर सर शेतकरी मोठा उत्साहात साजरा करणार आहे.    पुरंदर तालुक्यातील दक्षिण पट्ट्यात नीरा नदी काठच्या वीर, पारिंचे,कांबळवाडी, जेऊर मांडाकी, पिंपरे , गुळूंचे या गावामधून बेंदुर सन साजरा केला जातो.उद्या ( दि.१२) रोजी हा सन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे पाऊस असूनही बेंदराच्या सणाच्या खरेदीसाठी शेतकरी दुकानात आल्याचे पाहायला मिळाले .कोरोणाचे निर्बंध नाहीत आणि बैल गाडा शर्यातही सुरू झाली आहे. त्यामुळे बैल गाडाशौकीन आणि शेतकरी दोघेही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करणार आहेत.नीरा बाजारपेठेत आज बेंदूर सणाच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली....