श्रीकांत देशमुखांवर गुन्हा दाखल करा ; तृप्ती देसाई भडकल्या
सोलापूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा वादग्रस्त अश्लील व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोशल
मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. व्हायरल व्हिडीओवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया देत देशमुखांचा चांगलाच समाचार घेतला आहे. श्रीकांत देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याची आणि भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी मागणी केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका महिलेनं श्रीकांत देशमुख यांनी अनैतिक संबंध ठेवून फसवणूक केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
No comments:
Post a Comment