Thursday, November 28, 2024

फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव कधी प्रभू श्रीरामांचा रथोत्सव यावर्काषी कसा आहे ?

 फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव कधी 

 प्रभू श्रीरामांचा रथोत्सव यावर्काषी कसा आहे ?

फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव सुरु : यात्रेचा मुख्य दिवस दि.२ डिसेंबर 



फलटण : 

     सातारा जिल्ह्यासह राज्यभरात प्रसिद्ध असलेली फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव सुरु झाला आहे. श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवार दि. २७ नोव्हेंबर पासून श्रीराम मंदिर परिसरात दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत प्रभावळ, अंबारी, शेष, गरुड आणि मारुती या ५ वाहनांद्वारे परंपरागत पद्धतीने मिरवणूक काढण्यास सुरुवात  झाली आहे. प्रतिवर्षी ही वाहने व मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. दिनांक २ डिसेंबर हा फलटणच्या रथोत्सवचा मुख्य दिवस आहे. 


     फलटण (जिलहा सातारा) येथील ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा सोमवार दि. २ डिसेंबर हा या यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी श्रीरामाचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी निघणार असून परंपरागत मार्गाने नगर प्रदक्षिणा पूर्ण करुन सायंकाळी श्रीराम मंदिरात पोहोचणार आहे. 


    तत्पूर्वी रविवार दि.१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत प्रभू श्रीरामाच्या रथाला लघुरुद्राभिषेक करण्यात येणार आहे. सोमवार दि.२ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत श्रीराम मंदिरात कीर्तन झाल्यानंतर प्रभू रामचंद्राची मूर्ती राज घराण्यातील मान्यवरांच्या हस्ते रथामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रथ सोहळा परंपरागत पद्धतीने शहरातील रथ मार्गावरुन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन सायंकाळी ७ वाजता रथ सोहळा श्रीराम मंदिरात परत येईल. त्यानंतर शुक्रवार दि.६ डिसेंबर रोजी श्रींची पाकाळणी, सकाळी काकड आरती आणि नंतर ११ ब्राह्मणांच्याकडून लघुरुद्र व महापूजा झाले नंतर या यात्रेची सांगता होणार आहे.    


    नाईक निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी सुमारे २६० वर्षांपूर्वी रथयात्रेची ही प्रथा सुरु केली असून आजही परंपरागत पध्दतीने सुरु आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्री रामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. ह्या उत्सवा दरम्यान शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. या यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने असतात तसेच मोठे पाळणे हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते. श्रीराम मंदिर आणि परिसरासह रथ मार्गावर नगर परिषद नेहमी स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करते, पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेव

ण्यात येतो.

Friday, November 22, 2024

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

 पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी.  


याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा.. 



पुरंदर :

     राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा ज्वर वाढत असतानाच पुरंदर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रशासकीय इमारत सासवड मध्ये होत आहे. पोस्टल मतदान मोजणीला सकाळी सुरवात झाली. यामध्ये पहिल्या फेरीत विजय शिवतारे 1,820 ने पुढे, शिवतारेंना 4727 मते संजय जगताप दुसऱ्या क्रमांकावर 2907 तर संभाजी झेंडे तीसऱ्या क्रमांकावर 1554 होते.  शेवटच्या 30 व्या फेरी अखेर महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी 24 हजार 188 मतांनी आमदार संजय जगताप यांच्या वर दणदणीत विजय मिळवला आहे. 


       पुरंदर विधानसभा निवडणुकीत यावर्षी विक्रमी ६१.०२ टक्के मतदान झाले होते. १६ उमेदवार आपले आमदारकीचे नशीब आजमावत असले तरी, महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महायुतीतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्यातच खरी लढत होताना दिसून आली. 


शिवतारे यांच्या दमदार विजयाचा गुलाल सासवडसह पुरंदरच्या गावागावातील शिवसैनिकांनी उधळला आहे. फटाक्यांची आतषबाजी करता 'कोण आला रे कोण आला शावसेनेचा वाघ आला, 'जय श्रीराम'  अशा घोषणा देत बाईक रॅली काढत आहेत. शिवतारे यांच्या विजयाने शिवसेनीकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. 


     पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी २ लाख ४० हजार ५३८ पुरुष मतदार, २ लाख २३ हजार ४४६ महिला मतदार तर ३३अन्य असे एकुण ४ लाख ६२ हजार १७ मतदारांची नोंद होती. त्यापैकी १ लाख ४९ हजार ०७१ पुरुषांनी, १ लाख ३३ हजार २९९ महिला, तर ६ अन्य असे एकुण २ लाख ८२ हजार ३७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे विक्रमी ६१.०२ टक्के मतदान झाले होते.


दुसऱ्या व तिसऱ्या फेरी अखेर विजय शिवतारे 13,166, संजय जगताप 8,367, संभाजी झेंडे 4,238 मते पडली आहेत. विजय शिवतारे 4 हजार 799 मतांनी आघाडीवर आहेत. 


चौथ्या फेरीत अखेर विजय शिवतारे 17 हजार 828 संजय जगताप 11 हजार 324, तर संभाजी झेंडे यांना 5 हजार 628 मते पडली आहेत. विजय शिवतारे 6 हजार 504 मतांनी आघाडीवर आहेत.

पाचव्या फेरीत अखेर विजय शिवतारे 21 हजार 584 संजय जगताप 14 हजार 353, तर संभाजी झेंडे यांना 7 हजार 499 मते पडली आहेत. विजय शिवतारे 6 हजार 504 मतांनी आघाडीवर आहेत. 


सहाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 25 हजार 104 संजय जगताप 16 हजार 759, तर संभाजी झेंडे यांना 9 हजार 611 मते पडली आहेत. विजय शिवतारे 8 हजार 345 मतांनी आघाडीवर आहेत.


सातव्या फेरी अखेर विजय शिवतारे 28 हजार 757 संजय जगताप 19 हजार 144, तर संभाजी झेंडे यांना 11 हजार 011 मते पडली आहेत. विजय शिवतारे 9 हजार 613 मतांनी आघाडीवर आहेत.


आठव्या फेरी अखेर विजय शिवतारे 33 हजार 751 संजय जगताप 21 हजार 970, तर संभाजी झेंडे यांना 12 हजार 170 मते पडली आहेत. विजय शिवतारे 11 हजार 781 मतांनी आघाडीवर आहेत.

नवव्या फेरी अखेर विजय शिवतारे 39 हजार 036 संजय जगताप 24 हजार 917, तर संभाजी झेंडे यांना 13 हजार 505 मते पडली आहेत. विजय शिवतारे 14 हजार 119 मतांनी आघाडीवर आहेत.


दहाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 44 हजार 624 संजय जगताप 28 हजार 117, तर संभाजी झेंडे यांना 15 हजार 074 मते पडली आहेत. विजय शिवतारे 16  हजार 507 मतांनी आघाडीवर आहेत. 


अकराव्या फेरी अखेर विजय शिवतारे 49 हजार 402 संजय जगताप 31 हजार 164, तर संभाजी झेंडे यांना 16 हजार 678 मते पडली आहेत. विजय शिवतारे 18 हजार 234 मतांनी आघाडीवर आहेत.


बाराव्या फेरी अखेर विजय शिवतारे 53 हजार 961 संजय जगताप 34 हजार 052, तर संभाजी झेंडे यांना 18 हजार 317 मते पडली आहेत. विजय शिवतारे 19 हजार 909 मतांनी आघाडीवर आहेत.


तेराव्या फेरी अखेर विजय शिवतारे 57 हजार 045 संजय जगताप 37 हजार 854, तर संभाजी झेंडे यांना 19 हजार 969 मते पडली आहेत. विजय शिवतारे 19 हजार 191 मतांनी आघाडीवर आहेत.

चौवदाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 62 हजार 214 संजय जगताप 41 हजार 372, तर संभाजी झेंडे यांना 21 हजार 979 मते पडली आहेत. विजय शिवतारे 20 हजार 842 मतांनी आघाडीवर आहेत.

पंधराव्या फेरी अखेर विजय शिवतारे 67 हजार 087 संजय जगताप 44 हजार 903, तर संभाजी झेंडे यांना 23 हजार 645 मते पडली आहेत. विजय शिवतारे 22 हजार 184 मतांनी आघाडीवर आहेत. 


सोळाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 71 हजार 664 संजय जगताप 47 हजार 720, तर संभाजी झेंडे यांना 27 हजार 488 मते पडली आहेत. विजय शिवतारे 23 हजार 944 मतांनी आघाडीवर आहेत.


सतराव्या फेरी अखेर विजय शिवतारे 75 हजार 421 संजय जगताप 49 हजार 735, तर संभाजी झेंडे यांना 30 हजार 142 मते पडली आहेत. विजय शिवतारे 25 हजार 686 मतांनी आघाडीवर आहेत.


अठराव्या फेरी अखेर विजय शिवतारे 80 हजार 081 संजय जगताप 54 हजार 713, तर संभाजी झेंडे यांना 31 हजार 003 मते पडली आहेत. विजय शिवतारे 25 हजार 368 मतांनी आघाडीवर आहेत.


एकोणिसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 83 हजार 786 संजय जगताप 59 हजार 319, तर संभाजी झेंडे यांना 31 हजार 763 मते पडली आहेत. विजय शिवतारे 24 हजार 467 मतांनी आघाडीवर आहेत.


विसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 86 हजार 465 संजय जगताप 63 हजार 701, तर संभाजी झेंडे यांना 33 हजार 253 मते पडली आहेत. विजय शिवतारे 22 हजार 764 मतांनी आघाडीवर आहेत.


एकविसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 90 हजार 464 संजय जगताप 67 हजार 580, तर संभाजी झेंडे यांना 34 हजार 806 मते पडली आहेत. विजय शिवतारे 22 हजार 884 मतांनी आघाडीवर आहेत.

बाविसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 94 हजार 833, संजय जगताप 71 हजार 128, तर संभाजी झेंडे यांना 36 हजार 682 मते पडली आहेत. विजय शिवतारे 23 हजार 705 मतांनी आघाडीवर आहेत.

तेवीसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 99 हजार 001, संजय जगताप 75 हजार 030, तर संभाजी झेंडे यांना 38 हजार 067 मते पडली आहेत. विजय शिवतारे 23 हजार 971 मतांनी आघाडीवर आहेत.


चोवीसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 1लाख 02 हजार 302, संजय जगताप 80 हजार 446, तर संभाजी झेंडे यांना 39 हजार 075 मते पडली आहेत. विजय शिवतारे 21 हजार 856 मतांनी आघाडीवर आहेत. 


पंचवीसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 1लाख 05 हजार 819, संजय जगताप 83 हजार 584, तर संभाजी झेंडे यांना 39 हजार 899 मते पडली आहेत. विजय शिवतारे 22 हजार 235 मतांनी आघाडीवर आहे

26 फेरी अखेर विजय शिवतारे 1लाख 10 हजार 055, संजय जगताप 86 हजार 841, तर संभाजी झेंडे यांना 40 हजार 744 मते पडली आहेत. विजय शिवतारे 23 हजार 214 मतांनी आघाडीवर आहेत. 


27 व्या फेरी अखेर विजय शिवतारे 1लाख 13 हजार 993, संजय जगताप 90 हजार 154, तर संभाजी झेंडे यांना 42 हजार 110 मते पडली आहेत. विजय शिवतारे 23 हजार 839 मतांनी आघाडीवर आहेत. 


28 व्या फेरी अखेर विजय शिवतारे 1लाख 17 हजार 728, संजय जगताप 93 हजार 391, तर संभाजी झेंडे यांना 43 हजार 672 मते पडली आहेत. विजय शिवतारे 24 हजार 337 मतांनी आघाडीवर आहेत.

29 व्या फेरी अखेर विजय शिवतारे 1लाख 22 हजार 325, संजय जगताप 96 हजार 218, तर संभाजी झेंडे यांना 45 हजार 168 मते पडली आहेत. विजय शिवतारे 26 हजार 107 मतांनी आघाडीवर आहेत.

पुरंदर विधानसभा मतदारसंघ मतमोजणी करिता प्रशासन सज्ज

 पुरंदर विधानसभा मतदारसंघ मतमोजणी करिता प्रशासन सज्ज




पुरंदर : 

       पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी 413 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाच्या अनुषंगाने उद्या शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता नवीन प्रशासकीय इमारत सासवड या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 


   मतमोजणी निवडणूक निरीक्षक  म्हणून कुमार राजीव रंजन (भा.प्र.से.) यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांचे समन्वय अधिकारी मिलिंद टांकसाळे, उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर-१ हे असतील. मतमोजणी कामकाजाकरिता विविध २६ पथके स्थापन करण्यात आलेली असून त्यामध्ये एकूण १२६ अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.तसेच आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे. मतमोजणीसाठी १४+(२ राखीव) टेबलचे नियोजन करण्यात आले असून त्यात प्रत्येकी तीन कर्मचारी असतील व दिवसभरामध्ये 30 फेऱ्यांमध्ये मतमोजणीचे काम पूर्ण होईल. 


      नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये  विशेष माध्यम कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून त्यामध्ये जिल्हा माहिती कार्यालय मार्फत प्रवेशपत्र (पास) देण्यात आलेल्या पत्रकार/माध्यम प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या कक्षाचे समन्वय अधिकारी ओंकार शेरकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी हे असून, माध्यमांशी समन्वय साधून त्यांना मतमोजणी संबंधी माहिती पुरवण्याचे कार्य त्यांच्यामार्फत केले जाणार आहे. मतमोजणी दरम्यान नागरिकांना मात्र सदर ठिकाणी प्रवेश मिळणार नसून प्रशासकीय इमारतीच्या 100 मीटर कक्षाच्या बाहेरच थांबावे लागणार आहे. नागरिकांनी  प्रशासनाला सहकार्य करावे व प्रशासकीय इमारत परिसरामध्ये गर्दी करू नये असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री सचिन मस्के यांनी नागरिकांना केले आहे. 


    उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना सकाळी आठ वाजता त्यांना दिलेले प्रवेशपत्राच्या आधारे मतमोजणी उमेदवार प्रतिनिधी कक्षामध्ये प्रवेश करता येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे यांनी दिली.

Wednesday, November 20, 2024

हाय व्होल्टेज बारामतीत विक्रमी मतदान काका पुतण्याचे भविष्य मतदान यंत्रात

 हाय व्होल्टेज बारामतीत विक्रमी मतदान 


काका पुतण्याचे भविष्य मतदान यंत्रात 




बारामती : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या बारामती तालुक्यातील तब्बल 71. 57% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. गेली महिनाभरापासून काका पुतण्याच्या या लढाईमध्ये कोण जिंकणार याची मोठी चर्चा राज्य व रंगत असताना, बारामतीत उत्स्फूर्तपणे मतदान झाल्याने याचा फायदा व तोटा नक्की कोणाला होतो हे उद्याच्या 23 तारखेला सिद्ध होईल.



    201 बारामती विधानसभा मतदार संघात 3लाख 80 हजार 608 मतदारांची नोंद आहे. पैकी 2 लाख 72 हजर 408 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 1 लाख 42 हजार 996 पुरुष मतदार, 1 लाख 29 हजर 401 महिला मतदार तर 11 तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे बारामती विधानसभा निवडणुकीत विक्रमी 71.57टक्के मतदारांनी मतदान करुन काका पुतण्याचे भविष मतदान यंत्रात बंद केले आहे. शनिवार दि. 23 रोजी मतमोजणी नंतर निकाल स्पष्ट होईल. 

पुरंदर विधानसभा निवडणुकीत झाले इतके मतदान सकाळ संध्याकाळी मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रावर.

 

पुरंदर विधानसभा निवडणुकीत झाले इतके मतदान 


सकाळ संध्याकाळी मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रावर. 



पुरंदर : 

    पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३.०२ टक्के मतदान झाले होते, रात्री सव्वा अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार ६०.०१ टक्के मतदान झाले आहे. सकाळी वेगात मतदान झाले, दुपारी वेग मंदावला असला तरी सायंकाळी चार ते सहा दरम्यान मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. 


     पुरंदर विधानसभा निवडणुकीत १६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत ४.२८ टक्के, अकरा वाजेपर्यंत १४.४ टक्के, एक वाजेपर्यंत २७.३५ टक्के, तीन वाजेपर्यंत ४०.३२ टक्के, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३.०२ टक्के, तर सायंकाळी पाच नंतर मतदान प्रक्रिया संपेपर्यंत ६०.०१ टक्के मतदान झाल्याची माहिती पुरंदरच्या निवडणूक अधिकारी वर्षा लांडगे यांनी रात्री सव्वा अकराच्या सुमारास दिली आहे. 


   पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी २ लाख ४० हजार ५३८ पुरुष मतदार, २ लाख २३ हजार ४४६ महिला मतदार तर ३३अन्य असे एकुण ४ लाख ६४ हजार १७ मतदारांची नोंद होती. त्यापैकी पाच वाजेपर्यंत १ लाख २८ हजार ३३९ पुरुषांनी, १ लाख १७ हजार ६६८ महिला, तर २ अन्य असे एकुण २ लाख ४६ हजार ००९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. स्त्री पुरुष मतदानाची अंतिम आकडेवारी व टक्केवारी प्रशासनाकडून प्राप्त होताच टाकण्यात येईल. 

Tuesday, November 19, 2024

पुरंदरमध्ये मतदान साहित्याचे वाटप संपन्न

 

पुरंदरमध्ये मतदान साहित्याचे वाटप संपन्न 



पुरंदर :

       उद्या दि.20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी करता पुरंदर हवेली मतदार संघामधील सर्व 413 मतदान केंद्रांकरिता मतदान साहित्य जसे की सीलबंद ईव्हीएम कंट्रोल युनिट, दोन सीलबंद ईव्हीएम बॅलेट युनिट, सीलबंद व्हीव्हीपॅट, मतदान केंद्रंवर वापरले जाणारे शाही इ. वस्तूंचे वाटप 413 विविध मतदान केंद्रंवरील पथकांना करण्यात आले. 


यासाठी नवीन प्रशासकीय इमारत तळमजल्यावर भव्य मंडप व्यवस्था करून 41 टेबल लावण्यात आले होते. सदर ठिकाणी दोन अग्निशामक बंब, ॲम्बुलन्स, आशा आपत्कालीन सेवा ही देण्यात आल्या होत्या. निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता,पोलीस कर्मचाऱ्यांकरिता भोजन व्यवस्था ही करण्यात आली होती. मतदान साहित्य आपापल्या मतदान केंद्रावर घेऊन जाण्याकरिता 61 बसेस व सात जीप अशा एकूण 68 वाहनांची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली होती. 


यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक नसीम खान, निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के, सर्व समन्वय अधिकारी सर्व क्षेत्रीय अधिकारी व पोलीस कर्मचारी व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.


कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणा दरम्यान दिलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करावे व आपले कर्तव्य निष्पक्षपणे, कुणाच्याही दबावत न येता पार पाडावे, तसेच मतदारांनी उद्या दिनांक 20 रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी वर्ष लांडगे यांनी केले आहे.

Monday, November 18, 2024

१८ नोव्हेंबरला संध्याकाळी सहानंतर सायलेंट पिरियड सुरू ; मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी.

 १८ नोव्हेंबरला संध्याकाळी सहानंतर सायलेंट पिरियड सुरू ; 

मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी. 



पुरंदर : 

     पुरंदर विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदारांना मतदान करतांना आपले ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत ठेवणे बंधनकारक आहे. यासाठी आधारकार्ड, वोटर आयडी, वाहन परवाना असे एकूण बारा दस्ताऐवज निवडणूक आयोगाने ओळखपत्र म्हणून ग्राह्य घोषित केले आहे. त्यापैकी कोणतेही एक ओळखपत्र बुधवारी मतदान करतांना मतदाराने मतदान अधिकारी यांना दाखवून आपली ओळख दर्शवूनच मतदान करता येणार आहे. त्यामुळे बारा ग्राह्य ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदान करतांना सोबत बाळगणे गरजेचे असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे यांनी सांगितले. 


   जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सर्व मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मतदानाच्या दिवशी, बुधवारी सकाळी सहा ते मतदान संपेपर्यंतच्या कालावधीत मतदारांना मोबाइल वापरण्यास मनाई असल्याचा आदेश दिला आहे. मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करून गोपनीयतेचा भंग करणे हा निवडणूकविषयक गुन्हा आहे. त्या दृष्टीने मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मतदान केंद्रात अनुचित प्रकार घडू नये, गोपनीयतेचा भंग होऊ नये यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाऊ नये. तसेच केंद्राध्यक्ष, अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांनी मतदारांना आवाहन केले आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये समावेश असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना भ्रमणध्वनी वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. 


      सोमवार दिनांक १८ नोव्हेंबरला संध्याकाळी सहानंतर सायलेंट पिरेड सुरु होत असून, मतदान पार पडेपर्यंत टीव्ही, केबल, नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडियाद्वारे मतदार तसेच निकालावर परिणाम करू शकणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाची मनाई आहे. राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सभा, मिरवणूका यावरही बंदी आहे. अशा बाबी निदर्शनास आल्या तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Sunday, November 17, 2024

संभाजी झेंडे यांना गद्दारीचा डाग पुसायला आणखी दोन दिवसाची संधी संजय जगताप यांना पाठिंबा द्या पुढे संधी देऊ : शरद पवार

 संभाजी झेंडे यांना गद्दारीचा डाग पुसायला आणखी दोन दिवसाची संधी 


संजय जगताप यांना पाठिंबा द्या पुढे संधी देऊ : शरद पवार 



पुरंदर : 

      पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार ना सोडून राष्ट्रवादी मधून निवडणूक लढवणाऱ्या संभाजी झेंडे यांना शरद पवारांनी संजय जगताप यांना पाठिंबा देण्याचा आवाहन केले आहे. गद्दारीचा डाग पुसण्यासाठी तुम्हाला अजून दोन दिवस आहेत. तुम्ही संजय जगताप यांना पाठिंबा द्या पुढे तुम्हाला समाजसेवेची संधी देऊ असं म्हणून शरद पवार यांनी एक प्रकारे संभाजी झेंडे यांना माघारी येण्याचं आवाहन केलं आहे. 



राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा रणकंद सुरू आहे. अनेक स्टार प्रचारक आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. आज सासवड येथे आमदार संजय जगताप यांचा प्रचार सभेसाठी शरद पवार सासवड येथे आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला लोकसभेच्या निवडणुकीला वेळी भाजपने ४०० पारचा नारा दिला होता. त्यानंतर त्यांच्या अनेक नेत्यांनी संविधानामध्ये बदल करण्यासाठी ४०० पेक्षा जास्त खासदार असावेत असं म्हटलं होतं. आपण त्यावेळी संविधानामध्ये बदल करण्यात त्यांना यश येणार नाही इथपर्यंत लढत दिली. त्यांचा आकडा ४०० च्या आतच रोखला. देशाचं सरकार चालवण्यासाठी ३७५ पेक्षा जास्त खासदार असले तरी चालतात पण ४०० पर करणारा कशासाठी तर तो घटना बदलण्यासाठी होता आणि सामान्य जनतेने आम्हाला पाठिंबा दिला आणि आपण ते घटना बदलण्याचा काम रोखू शकलो असं त्यांनी म्हटलं. 


       त्याचबरोबर राज्यात होत असलेल्या महिला अत्याचारावर देखील त्यांनी सडकून टीका केली. राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार होतात. अनेक गुन्हे दाखल होतात मात्र कोणालाही न्याय मिळत नाही. अनेक महिला बेपत्ता आहेत. ज्याच्याकडे गृहखात आहे तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. केवळ लाडकी बहीण म्हणून महिलांचा सन्मान राहणार नाही किंवा महिलांचा विकास होणार नाही. तर, त्यांना सन्मानाने जगता आलं पाहिजे. निर्भय वातावरणात राहता आलं पाहिजे असे देखील शरद पवार म्हणाले. 


        तर पुरंदर मधील राजकारणावर बोलताना पाच वर्षं  मुंबईत रहायचं निवडणूक आली की पुरंदर मध्ये यायचं. विजय शिवतरे यांनी कोणती कामे आत्तापर्यंत पूर्ण केली? असा सवाल केला. त्याचबरोबर तुमच्याच विचाराचे मुख्यमंत्री आहेत मग पुरंदर उपसा सिंचन योजना किंवा गुंजवणी सिंचन योजना पूर्ण का करता आले नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. 


    त्याचबरोबर शरद पवार यांनी पक्षातून फुटून गेलेल्या गद्दारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. संभाजी झेंडे यांना आणखी दोन दिवस आहेत. आघाडीतून एकाच उमेदवाराला आपण उमेदवारी देऊ शकतो त्यामुळे संभाजी झेंडे यांनी थांबायला हवं होतं. मात्र, त्यांनी चुकीचा मार्ग निवडला अजूनही दोन दिवस संधी आहेत. त्यांनी संजय जगताप यांना पाठिंबा द्यावा आणि आपल्यावरचा गद्दारीचा डाग पुसावा. त्यांना पुढे लोकसेवेची संधी दिली जाईल असा म्हणत शरद पवार यांनी संभाजी झेंडे यांना पुन्हा परतण्याचे आवाहन केले आहे.





Saturday, November 16, 2024

अजित पवारांकडून झेंडेंना खो!! भेकराई नंतर आता सासवडची सभा ही रद्द!

 अजित पवारांकडून झेंडेंना खो!!

भेकराई नंतर आता सासवडची सभा ही रद्द! 



पुरंदर : पुरंदर विधानसभा निवडणुकीत ट्विस्ट निर्माण करत संभाजी झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाची उमेदवारी मिळवली. सुरवातीला भेकराई व आज सासवडच्या पालखी तळावर सभेचे नियोजन केले. पण दोन्ही सभा ऐनवेळी रद्द केल्याने झेंडेंना अजित पवारांकडून खो दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. 


   लोकसभा निवडणूकीत संभाजी झेंडे यांनी शरद पवार गटाचा प्रचार करत, अजित पवारांना आव्हान निर्माण केले. त्याचा परिणाम ही जाणवला. शरद पवार गटाकडून ते प्रबळ दावेदार होते. पण महायुतीच्या पहिल्या यादीत काँग्रेसच्या संजय जगताप यांनी उमेदवारी मिळवली व संभाजी झेंडे यांनी दुसरा पर्याय शोधत अजित पवारांच्या पक्षाची उमेदवारी पटकावत पुरंदरच्या विधानसभेत ट्विस्ट निर्माण करत तिरंगी लढतीचे आव्हान केले. 

    संभाजी झेंडे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी तशी पसंती दिली नसल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांकडून बारामती तालुक्यातील दौऱ्यात निंबूत येथील कोपरा सभेत संभाजी झेंडे यांना साथ देण्याचे आवाहन केले होते. या व्यतिरिक्त एकदा ही अजित पवारांनी झेंडे यांच्या प्रचारार्थ काही वक्तव्य केल्याचे दिसून आले नाही. यामुळे नक्की दादांच्या मनात काय चालू आहे याविषयी पुरंदरच्या राष्ट्रवादी मध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. 


    पुरंदरच्या महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे या आधीच समोर आले होते. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच सासवडच्या पालखी तळावर सभा घेतली. महायुतीच्या वतीने शरद पवारांची आज त्याच मैदानावर सभा होत आहे. तर सायंकाळी नियोजित अजित पवारांची सभा ऐनवेळी रद्द झाल्याने अजित पवार गट व संभाजी झेंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.  

३० वर्षांनंतर एकत्र येत माजी विद्यार्थ्यांकडून शालेय आठवणींना उजाळा ढुमेवाडी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

 ३० वर्षांनंतर एकत्र येत माजी विद्यार्थ्यांकडून शालेय आठवणींना उजाळा 


ढुमेवाडी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न 



पुरंदर : 

शाळेचे व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या निवडलेल्या क्षेत्रात करिअरसाठी जातात. शालेय जीवनात एकत्र भेटलेले विद्यार्थी कधी भविष्यकाळात भेटतील याची शाश्वती नसते. परंतु पुरंदर तालुक्यातील पुरंदर ज्युनिअर कॉलेज येथे १९९२ ते ९४ साली ११ वी ते १२ वी  विज्ञान शाखेमध्ये शिकलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी तब्बल ३० वर्षांनी एकत्र येत स्नेह मेळावा साजरा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्याकाळी शिकवलेल्या गुरुजनांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मानित करण्यात आले. 


    यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सकाळी पुरंदर जूनियर कॉलेजमध्ये एकत्रित जमून त्या काळात घालवलेल्या सुखद क्षणांच्या आठवणी जाग्या केल्या. त्यानंतर ढुमेवाडी येथील वैभव हॉटेलमध्ये नियोजित कार्यक्रम संपन्न केला. यावेळी सर्वांनी  शिक्षण व शिक्षकांप्रती भावना व्यक्त केल्या. 


     यावेळी पुरंदर कॉलेजचे प्राचार्य आय.आर. सय्यद, राष्ट्रपती पारितोषिक विजेते प्राचार्य ए. बी. सुळगेकर, प्रा.आर.के. पाचुपते, प्रा.एस.जी. थोरात, प्रा.एस.के.हराळे, प्रा.एस.बी. देशपांडे, प्रा.सी.जी. सदाकळे, प्रा.एच.एल. काळभोर, प्रा.के.जे. मांडवेकरआदी शिक्षकवृंद उपस्थित होते. 


       यावेळी पुरंदर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान विभागात सन १९९२ ते ९४ साली शिक्षण घेतलेले सुनील लोणकर, अरुण खेनट, संतोष झेंडे, दादासाहेब कटके, भाऊसाहेब जगताप, सचिन कोंडे, राहुल मोरे, शरद बोबडे, रविंद्र कुंभार, स्नेहल खेनट, शबाना मुल्ला, प्रिया मोरे, चित्रलेखा केसकर, मनिषा खोमणे, भाग्यश्री शिणगारे, विद्या बोरावके, शितल चौधरी, रविंद्र कांबळे, संतोष झेंडे, संजय थोरात, अंजली ओदेल, अविनाश धायगुडे, मेघा शिंदे, रमेश लडकत, हरिश्चंद्र जाधव, मंगेश राऊत, मनिषा जगताप, मंगल कदम, इरफान मुल्ला, भूषण पवार, राजेंद्र राऊत, रशीद शेख, भारती पाटील, घनश्याम कामठे, संजीवनी वाघमोडे, शिवाजी खेडेकर, अशपाक बागवान, संतोष कामथे, किशोर आबनावे, देवेंद्र बारभाई, राहुल सागर, वैशाली झेंडे, शबाना मोकाशी, वैशाली गोळे, नंदा गायकवाड, प्रकाश का. फडतरे, प्रकाश पां.फडतरे, शांताराम सुतार, रविंद्र काळे, रामदास ताम्हाणे, उज्वला पवार, विकास जगताप, धनंजय गाडेकर, अर्पिता कादबाने, प्रकाश कामठे, संगिता झगडे, मिनाक्षी कामठे, शैला इंगळे आदी उपस्थित होते. 


    यावेळी उपस्थित शिक्षक वृंदांनी सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण खेनट व संतोष झेंडे यांनी केले. अनुमोदन घनश्याम कामठे यांनी दिले. सूत्रसंचालन  सुनील लोणकर व चित्रलेखा केसकर यांनी केले. आभार दादासाहेब कटके यांनी मानले. 


      यावेळी दिवंगत झालेल्या संजय हिंगमिरे, कल्पेश कालवडीया, रुपेश चिंबळकर, सुजित न्हालवे या विद्यार्थ्यांना सर्वांनी विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 


     पुरंदर गोल्डन केराओके ग्रुप राम दहिवाळ, शरद बोबडे, सुजाता गुरव, शुभांगी महामुनी, वर्षा भालेराव यांनी सादर केलेल्या गाण्यांनी सर्वांची मने जिंकली. 


     प्रिया मोरे व संतोष झेंडे यांनी काढलेल्या फुलांच्या रांगोळीने कार्यक्रमांमध्ये रंगत आली. प्रिया मोरे हिने सादर केलेल्या नृत्याला अनेकांनी दाद दिली. संजय थोरात, भाऊसाहेब जगताप, संजीवनी वाघमोडे, चित्रलेखा केसकर यांनी हिंदी मराठी चित्रपटातील गीते सादर केली. सचिन कोंडे, राहुल मोरे, मंगेश राऊत, अविनाश धायगुडे यांनी नियोजन केलेल्या फेट्यांमुळे सर्वजण आनंदित झाले.

      दादासाहेब कटके यांनी सर्वांना अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था केली. भाऊसाहेब जगताप, धनंजय गाडेकर, संतोष कामथे, रमेश लडकत यांनी आर्थिक संयोजन केले. मंगेश ढवळे यांनी फोटोग्राफीचे उत्तम नियोजन केले. मनिषा खोमणे हिचा आर्थिक हातभाराबद्दल सन्मान करण्यात आला. आदर्श उपक्रमाशील शिक्षिका भाग्यश्री शिणगारे -दिवटे यांनी सर्व मित्र मैत्रिणींच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त केले.

    स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी अनमोल योगदान दिलेल्या सुनील लोणकर, अरूण खेनट, संतोष झेंडे यांचा दादासाहेब कटके व मित्रपरिवाराने शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

   स्नेह मेळाव्यात एकमेकांच्या भेटीगाठी बरोबर अनेक आठवणींचा ठेवा उराशी बाळगून परत भेटण्याचा संकल्प करत सर्व विद्यार्थ्यांनी 

एकमेकांचा निरोप घेतला.

Monday, November 11, 2024

पुरंदरमध्ये 418 मतदान केंद्राकरिता 2, 145 कर्मचारी. पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रशिक्षण संपन्न

 

पुरंदरमध्ये 418 मतदान केंद्राकरिता 2, 145 कर्मचारी. 

पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रशिक्षण संपन्न 



पुरंदर : 

     पुरंदर विधानसभा मतदारसंघ दि. 11 व 12 नोव्हेंबर 2024 रोजी आचार्य अत्रे सभागृह सासवड येथे मतदान अधिकारी कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण घेण्यात आले. दरम्यान मुख्य निवडणूक निरीक्षक नसीम खान, निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के निवडणूक नायब तहसीलदार श्रीम. गोंजारी, प्रशिक्षण समन्वयक श्रीम. वाघ व मतदान अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 


      प्रशिक्षण  दि.11 नोव्हेंबर रोजी दोन सत्रांमध्ये (सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 2 ते 5) या वेळेमध्ये व 12 नोव्हेंबर रोजी एका सत्रात सकाळी 10 ते 12 या वेळेत अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण घेण्यात आले. सादर ठिकाणी चौकशी कक्ष, वैद्यकीय मदत कक्ष, टपाली मतदान कक्ष तसेच प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळणी करता अठरा विविध कक्षांची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये 18 ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या व अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळण्याची घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. 


       मतदार प्रक्रिया सुरळीत होण्याकरिता पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रावरील कामकाजासाठी एकूण 2145 कर्मचाऱ्यांचा समावेश असून, पुरंदर विधानसभा मतदार संघामधील एकूण 418 मतदान केंद्राकरिता विविध कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यामध्ये केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्रअध्यक्ष, मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2, मतदान अधिकारी 3, अशा एकूण पाच कर्मचाऱ्यांच्या विविध 418 टीमस् तयार करण्यात आलेल्या आहेत. 


       मतदान साहित्य वाटपाच्या दिवशी घ्यावयाची काळजी जसे की मतदान साहित्य प्राप्त झाल्यानंतर तपासून घेणे व मतदान केंद्रावर गेल्यावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची जोडताना घेण्याची खबरदारी, मॉक पोल घेणे, तसेच मतदान पार पडल्यानंतर मशीन पुन्हा जमा करणे इत्यादी संदर्भात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देण्यात आले.

मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणालाही स्मार्टघड्याळ, सेल फोन, कॉर्ड लेस फोन, वायर लेस संच वापरण्यास परवानगी नाही. तसेच निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्याची आव्हान करण्यात करण्यात आले. 


     पुरंदर विधानसभा मतदारसंघांमधील अधिकारी कर्मचारी यांची प्रशिक्षण घेण्यात आले आहे व आम्ही येणारी निवडणूक पार पडण्याकरिता सज्ज आहोत असे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी सांगितले.

Saturday, November 9, 2024

पुरंदर विधानसभा आदर्श आचारसंहिता भंग केल्याबद्दल गुन्हा नोंद

 

पुरंदर विधानसभा आदर्श आचारसंहिता भंग केल्याबद्दल गुन्हा नोंद 



पुरंदर दि. ९ 

    पुरंदर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये मौजे फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंग या लॉजवर पुरंदर विधान सभेचे शिवसेना उमेदवार माजी मंत्री व उमेदवार विजय शिवतारे, यांच्या प्रचारार्थ एअर बलून हा परवानगी न घेता लावून आचार संहिता भंग केल्या बाबतची तक्रार या कार्यालयास प्राप्त झालेली असता नोडल अधिकारी, आचार संहिता कक्ष यांनी कर्तव्यावर असलेल्या FST पथक प्रमुख ३, यांना संदर्भ क्रमांक २ अन्वये कळविले आहे. 


      उपरोक्त तक्रारीचे अनुषंगाने FST पथक क्रमांक ३ यांनी प्रत्यक्ष मौजे फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंग येथे भेट दिली असता त्या ठिकाणी इमारतीच्या टेरेस लगत सदरचा एअर बलून बांधलेला दिसून आलेला आहे. याबाबत लॉजच्या मालकांबाबत विचारणा केली असता त्यांचे नाव अक्षय अरुण पवार असून ते बाहेर असल्याचे तेथील कामगार नामे शुभम श्रीमंत रसाळ यांने सांगितले सदर मालकांना दूरध्वनीव्दारे संपर्क करुन एअर बलून लावण्यासाठी परवानगी घेतली आहे का या बाबत विचारण केली असता सदर बलूनच्या परवानगीसाठी अर्ज केला असून अद्याप परवानगी मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. 


       विधानसभा निवडणूक आदर्श आचार संहिता लागु असताना फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉज चे मालक अक्षय अरुण पवार यांनी पुरंदर विधानसभा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे, यांचा शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण असलेला एअर बलून कोणतीही परवानगी न घेता सदर लॉजच्या इमारतीच्या टेरेसवर बांधून आदर्श आचार संहितेचा भंग करुन खाजगी ठिकाणच्या जागेचे विद्रपीकरण झाल्याने संबंधितां विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ कलम ३, व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५०,१९५१,१९८९ कलम १३० कलमातील तरतूदी अन्वये आचारसंहिता कक्षाकडील भरारी पथक क्रमांक ३ यांनी हडपसर, पोलिस स्टेशन, हडपसर येथे FIR क्रमांक १७२५/२०२४ दिनांक ०९.११.२०२४ वेळ ००.२५ वा. नुसार संबंधिताविरुध्द गुन्हा नोंद केला आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्ष लांडगे यांनी दिली.

Friday, November 8, 2024

संवेदना बोथट होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे ; डॉ. संदीप सांगळे. प्रविण जोशी यांच्या पनव्या कादंबरीचे नीरा येथे प्रकाशन

 संवेदना बोथट होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे ; डॉ. संदीप सांगळे.

प्रविण जोशी यांच्या पनव्या कादंबरीचे नीरा येथे प्रकाशन 



पुरंदर : 

   प्रविण जोशी यांची 'पनव्या' कादंबरी हा मैलाचा दगड ठरेल. नंदीवाल्या समाजाची बोलीभाषा व भटक्या जमातीचा संघर्ष दाखवणारी ही कादंबरी अस्वस्थ करून सोडते. ज्या समाजाच्या संवेदना जागृत आहेत त्या समाजात समतेसाठी, दुःख निर्मूलनासाठी प्रयत्न होतात आणि ते राष्ट्र प्रगती करते. परंतु, भौतिक संपन्नता संवेदना बोथट करत असेल तर हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अस्वस्थ आणि वेडं झाल्याशिवाय समाजाला दिशा देता येत नाही. " असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांनी केले. 

    नीरा (ता. पुरंदर ) येथील ग्रामपंचायत सभागृहात प्रसिद्ध ग्रामीण लेखक व कवी प्रविण जोशी यांच्या पनव्या या कादंबरीचे प्रकाशन डॉ. सांगळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

   यावेळी टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. महादेव रोकडे, कवयित्री रुपाली फरांदे, गिरीश भांडवलकर, कांचन निगडे, राजेंद्र बरकडे, दादासाहेब गायकवाड, बाळासाहेब ननावरे, अमृता निगडे, पी. डी. कांबळे आदी उपस्थित होते.

   डॉ. सांगळे म्हणाले, "समाजात आहे रे वर्गाने नाही रे वर्गाच्या कल्याणासाठी झटले पाहिजे. तरच सामाजिक समातेचे तत्व वृद्धिंगत होईल. आपण भारतीय म्हणून हे आपले कर्तव्य आहे. भटक्या जमातीतील नंदीबैल घेऊन फिरणाऱ्या जमातीतील स्त्री जीवनाचे चित्रण लेखकाने बरकाईने व अभ्यासपूर्ण केले आहे."

   यावेळी दादासाहेब गायकवाड म्हणाले, "या जमातीचे प्रश्न जोशी यांनी मांडले आहेत. पण, ते सोडविण्याची जबाबदारी आपली आहे. ओळखपत्र, घरांना जागा व त्यांना घरकुल  मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत."

   कांचन निगडे, राहुल शिंदे, केशव गोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्रा. कुंडलिक कदम होते. भरत निगडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रविण जोशी यांनी मानले.


"प्रविण जोशी हा जातीने ब्राम्हण असला तरी कर्माने बहुजन आहे. भटक्या जमातींशी एकरूप झालेला हा लेखक, कवी जातीवादाला कडाडून विरोध करतो. समतेचा संदेश देतो, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमातीतील देऊळवाले, नंदीवाले, मसनजोगी यांच्या कल्याणासाठी झटणारा हा आधुनिक कर्मयोगी आहे."

  - डॉ. महादेव रोकडे 

    मराठी विभागप्रमुख, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय.



"कादंबरी दर्जेदार असून तिचा विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा. या कादंबरीने या जमातीची बोली प्रथमच साहित्यात आली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर झालेले या कादंबरीचे प्रकाशन ही अमूल्य भेट आहे. "

  - प्रा. कुंडलिक कदम 

   महाराष्ट्र साहित्य परिषद 

पदाधिकारी.









Thursday, November 7, 2024

पुरंदरच्या निवडणुकीत म.वी. आघाडी व महायुतीत सर्व काही आलबेल आहे? दुखावलेली मने जुळवण्यासाठी अर्थपूर्ण कसरत : रातोरात नेते भुमिका तर नाही बदलणार?

 पुरंदरच्या निवडणुकीत म.वी. आघाडी व महायुतीत सर्व काही आलबेल आहे? 


दुखावलेली मने जुळवण्यासाठी अर्थपूर्ण कसरत : रातोरात नेते भुमिका तर नाही बदलणार?




पुरंदर : पुरंदर विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार असली तरी, उमेदवारी न मिळालेल्यांची मनधरणी करण्यात उमेदवारांची कसरत पणाला लागली आहे. महाविकास आघाडीचे सहकारी एकसंध दिसतं असले तरी ऐनवेळी काही दिग्गज रातोरात काही वेगळी भुमिका घेतील का हे पहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. तसेच महायुतीत दुखावलेली मने जुळवण्यासाठी दोन्ही उमेदवारांना अर्थपूर्ण कसरत करावी लागत असल्याची चर्चा आहे. 


    काल बुधवारी द न्युज मराठीने महायुतीचे पक्षाचे दिग्गज प्रचारात दिसत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याची दखल रातोरात घेत आज गुरवारी सकाळीच पुण्यात पक्षाच्या अध्यक्षांन समोर हजेरी लावून बोलणी करण्यात आली. फक्त उमेदवाराचा प्रचारच करायचा नाही तर उमेदवार निवडूनच आणायचा असा चंग बांधण्यात आला आहे. 


   महाविकास आघाडीतून संजय जगताप यांची उमेदवारी सर्वात आधी जाहीर झाल्याने त्यांनी प्रचारात ही आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचारात प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे. सासवड, जेजुरी नीरा शहरांसह ग्रामीण भागातील युवक कार्यकर्ते घरोघरी जाऊन उमेदवाराचे चिन्ह पोहचवत आहेत. फिरत्या प्रचाराच्या गाड्यांचा ताफा ही जगतापांचा जास्तीचा दिसून येत आहे. 


    महायुतीच्या वतीने दोन उमेदवार जाहीर केल्याने घटक पक्षातील नेते व कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. शिवसेनेच्या विजय शिवतारे यांचा अर्ज भरते वेळी भाजपचे नेते व माजी आमदार अशोक टेकवडे व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र भाजपच्या इतर दिग्गजांनी शिवतारेंकडे पाठ फिरवली होती. सोमवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर दोन दिवस काहीही भुमिका घेतली गेली नाही. आज गुरुवारी ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार आता शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचारात सहभागी होणार आहेत. एका भाजपच्या नेत्याने विमानतळाला विरोध दर्शवत चक्क पक्षाच्या पदाचा राजीनामा तालुका अध्यक्षांकडे दिला आहे. तर निवडणुक लढविण्यावर ठाम असलेले पण पक्ष हितासाठी माघार घेतलेले गंगाराम जगदाळे यांनी गुरुवारच्या बैठकीकडे पाठ फिरवत आपली भुमिका शनिवारी ९ नोव्हेंबरला जाहीर करणार असल्याचे समजते. 


      सोमवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक महायुती कोणाचा प्रचार करणार हे निश्चित झाले नाही. परिणामी मंगळवार व बुधवारी ते वेट अँड वॉचच्या भुमिकेत दिसून आले. अजित पवार गटाचे दत्ता झुरुंगे व राजेंद्र धुमाळ यांनी झेंडे यांनी घड्याळाच झेंडा घेऊन प्रचारात आघाडी घेतली. तर पक्षाचे जेष्ठ प्रा. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष उत्तम धुमाळ,पुरंदर हवेली अध्यक्ष वामनराव जगताप, विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे, सोमेश्वर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कामथे, गणेश जगताप, अरुण जगताप, यांनी गुरुवारी पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांची भेट घेऊन पुढिल काळात यांची पदे मिळावीत यासाठी बोलणी केल्याचे समजते. 


चौकट १)

  महायुतीतून संभाजी झेंडे व विजय शिवतारे यांन उमेदवारी दिली गेल्याने मैत्रीपूर्ण लढत असे गोंडस नाव देण्यात आले आहे. दोघे ही तालुक्यात दिग्गज मानले जातात. शिवतारे यांचे मेव्हणे दिलिप यादव तसेच यादवांचे नातेवाईक व कट्टर शिवसैनिक यांच्या पाठिंब्यावर शिवतारे पुरंदरचा गड सर करतात का? हे आगामी काळात समजेल. तर संभाजी झेंडे यांची दोन गावात मोठी भावकी, त्यांचे तालुकाभर तसेच हवेली तालुक्यात गावोगावी असलेले पाहूणे यांनी झेंडे साहेबांसोबतचे राहण्याचा मार्ग अवलंबलेला दिसून येत आहे. झेंडे आडनावाच्या एकातरी कुटुंबातील सदस्यांचे थेट नातेवाईक पुरंदरच्या ९० गावात दिसून येत आहेत. या नातेगोत्यातील प्रत्येक माणूस बदल हवाची हाक देत आहे. 

  

Wednesday, November 6, 2024

पुरंदर-हवेलीमध्ये तिरंगी लढत : आश्चर्यकारक निकाल लागू शकतो. संजय जगताप, विजय शिवतारे, संभाजी झेंडे आखाड्यात : दिग्गजांच्या तलवारी म्यान : माघार घेतलेले प्रचारात फिरकेनात.

 पुरंदर-हवेलीमध्ये तिरंगी लढत : आश्चर्यकारक निकाल लागू शकतो. 


संजय जगताप, विजय शिवतारे, संभाजी झेंडे आखाड्यात : दिग्गजांच्या तलवारी म्यान : माघार घेतलेले प्रचारात फिरकेनात. 



पुरंदर : 


        पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी अजित पवार यांच्यामध्ये काट्याची लढत रंगणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे संभाजी झेंडे यांचा अर्ज माघारी घेण्यात आला नाही. त्याचबरोबर महायुतीतून शिंदे शिवसेनेचे विजय शिवतारे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महायुतीतून मैत्रीपूर्ण लढत होणार, हे आता स्पष्ट झालेले असून. माघारी घेतलेले नेते नाराज दिसून येत आहेत. त्यामुळे तिरंगी लढतीत आश्चर्यकारक निकाल लागू शकतो अशी चर्चा पुरंदरच्या गावखेड्यात होत आहे. 


      महाविकास आघाडीच्या वतीने कॉग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांचे पहिल्या यादीत नाव आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची उमेद वाढली. शिवसेना उबाठा गटाचे शंकर हरपळे व अभिजित जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण पक्षाने अधिकृत घोषणा न केल्याने सोमवारी आपले अर्ज माघारी घेत थेट संजय जगतापांना पाठिंबा दर्शवत प्रचारात सहभागी झाले. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, महिला अध्यक्ष गौरीताई कुंजीर, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, जेष्ठ विजय कोलते, बबूसाहेब माहुरकर, सुदामराव इंगळे, दत्ता चव्हाण आदिंनी संजय जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात सहभाग घेतलय. 


     महायुतीने पुरंदर विधानसभेची उमेदवारी माजी राज्यमंत्री शिवसेनेचे विजय शिवतारे यांना दिली. परंतु त्याचवेळी पुरंदरमधून शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षात घेऊन घड्याळ चिन्हावर उमेदवारी दिली. महायुतीमध्ये यामुळे संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. 


    उमेदवारी माघारी घेण्याच्या वेळेपर्यंत ३३ उमेदवारी अर्जापैकी १७ उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. आता १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. पक्षांचे एबी फॉर्म नसलेल्या उमेदवारांनीही आपले अपक्ष अर्ज ही माघारी घेतले आहेत. 


    पुरंदर विधानसभेच्या आखाड्यातून भाजप नेते संदीप ऊर्फ गंगाराम मारुती जगदाळे, जालिंदर सोपानराव कामठे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते प्रा. दिगंबर गणपत दुर्गाडे, दत्तात्रय मारुती झुरंगे यांच्यासह १० दिग्गज उमेदवारांनी आपली तलवार म्यान केली आहे. यातील दत्ता झुरुंगे व गंगाराम जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अजित पवारांचे खंदे समर्थक दिगंबर दुर्गाडे मंगळवारी दुपारपर्यंत झेंडे यांच्या जवळ ही फिरकले नसल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते जालिंदर कामठे यांंनी ही आपली भुमिका स्पष्ट केली नसल्याने ते ही संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुरंदरचा वेगळा निकाल लागला तर आश्चर्य वाटायला नको. 

Tuesday, November 5, 2024

पुरंदर विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांचा क्रम पहा पुरंदरच्या निवडणुकीसाठी दोन मशीन.

 पुरंदर विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांचा क्रम पहा 


पुरंदरच्या निवडणुकीसाठी दोन मशीन. 



पुरंदर :  पुरंदर विधानसभा निवडणुकीचे चित्र काल स्पष्ट झाले आहे. आज सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३३ उमेदवारी अर्जांपैकी १७ उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असणार आहेत. निवडणूक यंत्रामध्ये १६ उमेदवारांची नावे समाविष्ट करता येतात. नोटा पर्यासाठी जागा नसल्याने या निवडणुकीत मतदान करताना मतदान कक्षात दोन मशिन असणार आहेत. 


      पुरंदर विधानसभा निवडणुकीत आपल्या पसंतीच्या उमेदवारांचा क्रम, नाव व चिन्ह 


१) उमेश नारायण जगताप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रेल्वे इंजिन

२) विजयबापू शिवतारे, शिवसेना, धनुष्यबाण

३) सुरज संजय भोसले, बहुजन समाज पार्टी, हत्ती

४) संजय चंदुकाका जगताप, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हात

५) संभाजी सदाशिव (अण्णा) झेंडे (कलेक्टर साहेब) आय.ए.एस., नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी, घड्याळ

६) उत्तम गुलाब कामठे, संभाजी ब्रिगेड पार्टी, ट्रम्पेट

७) किर्ती श्याम माने, वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर 

८) सुरज राजेंद्र घोरपडे, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, पेनाची निब सात किरणांसह

९) संजय शहाजी निगडे, राष्ट्रीय समाज पक्ष, शिट्टी 

१०) अतुल महादेव नागरे, अपक्ष, कढई 

११) अनिल नारायण गायकवाड, अपक्ष, लिफाफा

१२) डॉ.उदयकुमार वसंतराव जगताप, अपक्ष, स्टेस्थोस्कोप

१३) पवार विशाल अरुण, अपक्ष, सितार

१४) महादेव साहेबराव खेंगरे, अपक्ष, पेट्रोल पंप

१५) शेखर भगवान कदम, अपक्ष, विहीर

१६) सुरेश बाबुराव वीर, अपक्ष, ग्रामोफोन

१७) या पैकी कोणीही नाही (नोटा)

Monday, November 4, 2024

पुरंदर विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांचे चिन्ह. नऊ उमेदवारांना राष्ट्रीय पक्षांचे तर सात अपक्षांना वेगवेगळी चिन्हे.

 पुरंदर विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांचे चिन्ह. 


नऊ उमेदवारांना राष्ट्रीय पक्षांचे तर सात अपक्षांना वेगवेगळी चिन्हे. 



पुरंदर :  पुरंदर विधानसभा निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. आज सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३३ उमेदवारी अर्जांपैकी १७ उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असणार आहेत. या निवडणुकीत नऊ उमेदवारांनी आपल्या राष्ट्रीय पक्षांकडून अर्ज ठेवत पक्षांची अधिकृत चिन्हे पटकावली तर सात अपक्ष वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणुकीला सामोरे जात आहेत. 


      पुरंदरच्या विधानसभा निवडणुकीत दिग्गजांनी आप आपल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते. या शिवाय अपक्ष ही अर्ज दाखल केले होते. आता या दिग्गजांनी अर्ज माघारी घेतले असले तरी ते आपल्या मुळ पक्षाच्या उमेदवाराला मतदान करुन सहकार्य करतात की पुरंदरचा पुर्वीचा इतिहास गिरवतात हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. सर्व सामान्य मतदारांनी मात्र आजच आपले मत कोणाला द्यायचे हे निश्चित केले आहे. उद्या पासून निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचेल. मोठ्या सभा, आरोप, प्रत्यारोप, विकास कामांचे श्रेयवाद हे सांगण्यात नेते दंग होतील. 


      पुरंदर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे नाव व चिन्ह 


१) सुरज घोरपडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष पेनाची निब सात किरणांसह

२) किर्ती माने वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर

३) संजय निगडे राष्ट्रीय समाज पक्ष शिट्टी 

४) संजय जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हात

५) सुरज भोसले बहुजन समाज पार्टी हत्ती

६) अनिल गायकवाड अपक्ष लिफाफा

७) उमेश जगताप महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे इंजिन

८) अतुल नागरे अपक्ष कढई 

९) संभाजी झेंडे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ

१०) विजय शिवतारे शिवसेना धनुष्यबाण

११) महादेव खेंगरे पाटील पेट्रोल पंप

१२) उत्तम कामठे संभाजी ब्रिगेड पार्टी ट्रमपेट 

१३) शेखर कदम अपक्ष विहीर

१४) विशाल पवार अपक्ष सितार

१५) डॉ.उदयकुमार जगताप अपक्ष स्टेस्थोस्कोप

१६) सुरेश वीर अपक्ष ग्रामोफोन

पुरंदरच्या निवडणुकीत १६ उमेदवार रिंगणात संजय जगताप, विजय शिवतारे, संभाजी झेंडे निवडणूक लढवणार : दिग्गजांच्या तलवारी म्यान.

 पुरंदरच्या निवडणुकीत १६ उमेदवार रिंगणात 


संजय जगताप, विजय शिवतारे, संभाजी झेंडे निवडणूक लढवणार : दिग्गजांच्या तलवारी म्यान. 



पुरंदर : 

     पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरपर्यंत संभाजी झेंडे यांचा अर्ज माघारी घेण्यात आला नाही. त्याचबरोबर विजय शिवतरे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे महायुतीतून मैत्रीपूर्ण लढत होणार हे आता स्पष्ट झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी झेंडे यांना घड्याळाचे चिन्हावर उमेदवारी दिली आणि त्यामुळे महायुतीमध्ये संघर्ष होताना पाहायला मिळणार आहे. उमेदवारी माघारी घेण्याच्या वेळेपर्यंत ३३ उमेदवारी अर्जांपैकी १७ उमेदवारी अर्ज अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असणार आहेत. पक्षांचे एबी फॉर्म असलेल्या उमेदवारांनी ही आपले अपक्ष अर्ज माघारी घेतले आहेत. या बाबतीची अधिकृत घोषणा सायंकाळी पाच वाजता पुरंदर विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करणार आहेत. 


यामध्ये काँग्रेस कडून म्हणजेच महाविकास आघाडी कडून संजय जगताप हाताचा पंजा, महायुती मधून शिवसेनेचे विजय शिवतरे हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे संभाजी झेंडे हे घड्याळाच्या चिन्हावर असतील. 


नामनिर्देशन पत्र मागे घेतलेले उमेदवारांची नावे 

1. दत्तात्रय मारुती झुरंगे अपक्ष 

2. दिगंबर गणपत दुर्गाडे अपक्ष 

3. दिलीप विठ्ठल गिरमे अपक्ष 

4. शंकर बबन हरपळे अपक्ष 

5. संदीप उर्फ गंगाराम मारुती जगदाळे अपक्ष 

6. जगताप अभिजीत मधुकर अपक्ष 

7. संदीप बबन मोडक अपक्ष 

8. आकाश विश्वनाथ जगताप अपक्ष

9. जालिंदर सोपान कामटे अपक्ष 

10. गणेश बबनराव जगताप अपक्ष

Sunday, November 3, 2024

पुरंदर विधानसभा निवडणुकीतील आपला उमेदवार किती शिकलाय? सोमवारी कोण अर्ज मागे घेतय

 

पुरंदर विधानसभा निवडणुकीतील आपला उमेदवार किती शिकलाय? 


सोमवारी कोण अर्ज मागे घेतय 



पुरंदर : पुरंदर विधानसभा निवडणुकीत शुक्रवारी २६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. पैकी उद्या सोमवारी कोण अर्ज मागे घेतय हे पाहणे आता औत्सुक्याचे असणार आहे. या २६ उमेदवारांची शैक्षणिक पात्रता काय आहे हे वाचकांसमोर ठेवण्यात येत आहे. २६ उमेदवारांपैकी एकाचे शिक्षण ४ थी, एकाचे ६ वी एकाचे ८ वी पास, १३ उमेदवार १० वी १२ तर १० उमेदवारी उच्च शिक्षित आहेत. 



     पुरंदर विधानसभा निवडणुकीत सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी अर्जा सोबत शपथ पत्रात नमुद केल्याप्रमाणे त्यांची शैक्षणिक पात्रता समोर येत आहे. आपला उमेदवार किती शिकलाय हे यामुळे सर्वसामान्य मतदारांना समजणार असून योग्य उमेदवाराला मतदार मतदान करतील. 


      पुरंदर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे नाव व शिक्षण. दत्तात्रय झुरंगे १२ वी पास, शंकर हरपळे (२) १० वी नापास, विशाल पवार ८ वी पास, सुरज घोरपडे बी.ए., गंगाराम माने १० वी पास, आकाश जगताप १२ वी पास, किर्ती माने एम.ए, बी.एड., संजय निगडे १२ वी, संजय जगताप बी.कॉम, ई.एम.बी.ए.(बॅंकींग), उमेश जगताप १० वी नापास, बळीराम कुलकर्णी १० वी पास, संदिप उर्फ गंगाराम जगदाळे १० वी पास, संदिप मोडक १२ वी पास, अभिजित जगताप डिप्लोमा इन सिव्हील इंजिनियरींग, सुरज भोसले १२ वी पास, अनिल गायकवाड १२ वी नापास, दिगंबर दुर्गाडे बी.कॉम, एम.कॉम, एम.एड, पी.एच.डी. (२०१२- २०१७), अतुल नागरे ४ थी पास, संभाजी झेंडे बी.एस.सी.ॲग्री, एम.एस.सी. ॲग्री, एल.एल.बी., दिलीप गिरमे कृषी पदवी अपुर्ण, विजय शिवतारे डि.एम.डी, डि.एम.इ, गणेश जगताप एफ.वाय. बी.ए, जालिंदर कामठे बी.कॉम, एम.कॉम, महादेव खेंगरे पाटील ६ वी पास, उत्तम कामठे १२ वी नापास, शेखर कदम बी.कॉम, एम.कॉम, डि.टी.एल, आयसीडब्ल्यू, डॉ.उदयकुमार जगताप बैचलर ऑफ होमिओपैथिक मेडीसीन ॲड सर्जरी, बैचलर ऑफ लॉज, सुरेश वीर जुनी एस.एस.सी

 (११ वी).

Featured Post

"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

"विस्तव तळहातावर घेऊनही निर्भय पत्रकारिता सुरू आहे" : भरत निगडे  नीरा कन्या विद्यालयात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा  नीरा :   ...