Type Here to Get Search Results !

संभाजी झेंडे यांना गद्दारीचा डाग पुसायला आणखी दोन दिवसाची संधी संजय जगताप यांना पाठिंबा द्या पुढे संधी देऊ : शरद पवार

 संभाजी झेंडे यांना गद्दारीचा डाग पुसायला आणखी दोन दिवसाची संधी 


संजय जगताप यांना पाठिंबा द्या पुढे संधी देऊ : शरद पवार 



पुरंदर : 

      पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार ना सोडून राष्ट्रवादी मधून निवडणूक लढवणाऱ्या संभाजी झेंडे यांना शरद पवारांनी संजय जगताप यांना पाठिंबा देण्याचा आवाहन केले आहे. गद्दारीचा डाग पुसण्यासाठी तुम्हाला अजून दोन दिवस आहेत. तुम्ही संजय जगताप यांना पाठिंबा द्या पुढे तुम्हाला समाजसेवेची संधी देऊ असं म्हणून शरद पवार यांनी एक प्रकारे संभाजी झेंडे यांना माघारी येण्याचं आवाहन केलं आहे. 



राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा रणकंद सुरू आहे. अनेक स्टार प्रचारक आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. आज सासवड येथे आमदार संजय जगताप यांचा प्रचार सभेसाठी शरद पवार सासवड येथे आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला लोकसभेच्या निवडणुकीला वेळी भाजपने ४०० पारचा नारा दिला होता. त्यानंतर त्यांच्या अनेक नेत्यांनी संविधानामध्ये बदल करण्यासाठी ४०० पेक्षा जास्त खासदार असावेत असं म्हटलं होतं. आपण त्यावेळी संविधानामध्ये बदल करण्यात त्यांना यश येणार नाही इथपर्यंत लढत दिली. त्यांचा आकडा ४०० च्या आतच रोखला. देशाचं सरकार चालवण्यासाठी ३७५ पेक्षा जास्त खासदार असले तरी चालतात पण ४०० पर करणारा कशासाठी तर तो घटना बदलण्यासाठी होता आणि सामान्य जनतेने आम्हाला पाठिंबा दिला आणि आपण ते घटना बदलण्याचा काम रोखू शकलो असं त्यांनी म्हटलं. 


       त्याचबरोबर राज्यात होत असलेल्या महिला अत्याचारावर देखील त्यांनी सडकून टीका केली. राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार होतात. अनेक गुन्हे दाखल होतात मात्र कोणालाही न्याय मिळत नाही. अनेक महिला बेपत्ता आहेत. ज्याच्याकडे गृहखात आहे तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. केवळ लाडकी बहीण म्हणून महिलांचा सन्मान राहणार नाही किंवा महिलांचा विकास होणार नाही. तर, त्यांना सन्मानाने जगता आलं पाहिजे. निर्भय वातावरणात राहता आलं पाहिजे असे देखील शरद पवार म्हणाले. 


        तर पुरंदर मधील राजकारणावर बोलताना पाच वर्षं  मुंबईत रहायचं निवडणूक आली की पुरंदर मध्ये यायचं. विजय शिवतरे यांनी कोणती कामे आत्तापर्यंत पूर्ण केली? असा सवाल केला. त्याचबरोबर तुमच्याच विचाराचे मुख्यमंत्री आहेत मग पुरंदर उपसा सिंचन योजना किंवा गुंजवणी सिंचन योजना पूर्ण का करता आले नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. 


    त्याचबरोबर शरद पवार यांनी पक्षातून फुटून गेलेल्या गद्दारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. संभाजी झेंडे यांना आणखी दोन दिवस आहेत. आघाडीतून एकाच उमेदवाराला आपण उमेदवारी देऊ शकतो त्यामुळे संभाजी झेंडे यांनी थांबायला हवं होतं. मात्र, त्यांनी चुकीचा मार्ग निवडला अजूनही दोन दिवस संधी आहेत. त्यांनी संजय जगताप यांना पाठिंबा द्यावा आणि आपल्यावरचा गद्दारीचा डाग पुसावा. त्यांना पुढे लोकसेवेची संधी दिली जाईल असा म्हणत शरद पवार यांनी संभाजी झेंडे यांना पुन्हा परतण्याचे आवाहन केले आहे.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies