Type Here to Get Search Results !

पुरंदरमध्ये मतदान साहित्याचे वाटप संपन्न

 

पुरंदरमध्ये मतदान साहित्याचे वाटप संपन्न 



पुरंदर :

       उद्या दि.20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी करता पुरंदर हवेली मतदार संघामधील सर्व 413 मतदान केंद्रांकरिता मतदान साहित्य जसे की सीलबंद ईव्हीएम कंट्रोल युनिट, दोन सीलबंद ईव्हीएम बॅलेट युनिट, सीलबंद व्हीव्हीपॅट, मतदान केंद्रंवर वापरले जाणारे शाही इ. वस्तूंचे वाटप 413 विविध मतदान केंद्रंवरील पथकांना करण्यात आले. 


यासाठी नवीन प्रशासकीय इमारत तळमजल्यावर भव्य मंडप व्यवस्था करून 41 टेबल लावण्यात आले होते. सदर ठिकाणी दोन अग्निशामक बंब, ॲम्बुलन्स, आशा आपत्कालीन सेवा ही देण्यात आल्या होत्या. निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता,पोलीस कर्मचाऱ्यांकरिता भोजन व्यवस्था ही करण्यात आली होती. मतदान साहित्य आपापल्या मतदान केंद्रावर घेऊन जाण्याकरिता 61 बसेस व सात जीप अशा एकूण 68 वाहनांची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली होती. 


यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक नसीम खान, निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के, सर्व समन्वय अधिकारी सर्व क्षेत्रीय अधिकारी व पोलीस कर्मचारी व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.


कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणा दरम्यान दिलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करावे व आपले कर्तव्य निष्पक्षपणे, कुणाच्याही दबावत न येता पार पाडावे, तसेच मतदारांनी उद्या दिनांक 20 रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी वर्ष लांडगे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies