संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात एका छायाचित्रकाराचा मृत्यू
सदाशिवनगरच्या गोल रिंगणातील घटना.
अकलूज :
माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण होते. रिंगणात झालेल्या गर्दित एक ४८ वर्षिय छायाचित्रकाराला चक्कर आली व रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच ते मृत झाले. कल्याण चट्टोपाध्याय वय ४८ वर्ष रा. बारानगर, राज्य-पश्चिम बंगाल असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. याबाबतची माहिती मृत वारकरी छायाचित्रकाराचे मित्र आशुतोष आप्पासाहेब कोळी वय ३३ वर्षे, व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर, रा. जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांनी अकलूज पोलीस ठाण्यात दिली आहे.
अकलूज पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि.१२ जुलै रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथे माऊलींच्या पालखीचे गोल रिंगण चालु असताना घोडा पडल्यामुळे गर्दी झाल्याने आशुतोष आप्पासाहेब कोळी यांच्या ओळखीचे कल्याण चट्टोपाध्याय वय ४८ वर्ष हे चक्कर येवून बेशुद्ध पडल्याने त्यांना ॲम्ब्युलन्स मध्ये उपचाराकरीता सरकारी दवाखाना अकलुज येथे दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून ते उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले. पुढील योग्य ती कारवाई होणेस विनंती. अशा मजकूरची खबर दिल्याने ती मयत रजिष्टरी दाखल करून मयताची पुढील प्राथमीक चौकशी स.पो.फौ. भोसले करीत असून, आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती अकलूज पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भानुदास रघुनाथ निंभोरे यांनी दिली आहे.

No comments:
Post a Comment