Type Here to Get Search Results !

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले. देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, ४ जून रोजी निकाल

 लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले. देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, ४ जून रोजी निकाल







मुंबई :

       केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे.
देशभरात सात टप्प्यात एप्रिल, मे, जून अशा तीन महिन्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. सर्व टप्प्यातील मतदानाचे निकाल मंगळवार ४ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. यासोबतच देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

      २०२४ हे वर्ष जगभरात निवडणुकांचं असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी केलं.केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील १८ व्या लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन केली. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सात टप्प्यांत देशभरात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

       देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम पार पडणार असून १९ एप्रिल २०२४ रोजी देशात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून २०२४ रोजी देशभरातील लोकसभा निवडणुकांचा निकाल एकत्रित जाहीर होईल.

मतदानाची वैशिष्ट्ये
- आमच्याकडे ९७ कोटी नोंदणीकृत मतदार, १०.५ लाख मतदान केंद्रे, १.५ कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी, ५५ लाख ईव्हीएम, चार लाख वाहने आहेत.
४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेणार, फॉर्म १२ डी भरुन देणाऱ्यांना सुविधा
- मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, शौचालय, दिव्यांगांसाठी रॅम्प या व्यवस्था असणार.
- Know Your Candidate अॅपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या उमेदवाराची माहिती मिळवता येणार
- हिंसा रोखण्यासाठी अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
- 4 Ms: Muscle (शक्ती), money (पैसा), misinformation (अफवा) आणि MCC violations (आचारसंहिता भंग) या चार गोष्टींवर विशेष लक्ष.

________________________________________
महाराष्ट्रातील निवडणुकांचे टप्पे.     मतदानाची तारीख
                              
पहिला टप्पा
(देशभरातील दुसरा टप्पा)             26 एप्रिल 2024
दुसरा टप्पा
(देशभरातील तिसरा टप्पा)                 7 मे 2024
तिसरा टप्पा
(देशभरातील चौथा टप्पा)                13 मे 2024
चौथा टप्पा
(देशभरातील पाचवा टप्पा)               20 मे 2024
पाचवा टप्पा
(देशभरातील सहावा टप्पा)              25 मे 2024


- निवडणुकीत रक्तपात आणि हिंसाचाराला जागा नाही, जिथून हिंसाचाराची माहिती मिळेल, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू.
- स्टार कॅम्पेनर्शना नियमावली देण्याचे पक्षांना आदेश, प्रचारात लहान मुलांना समाविष्ट न करण्याच्या स्पष्ट सूचना.
- संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर २१०० निरीक्षकांची करडी नजर.


देशभरात कधी मतदान?
पहिला टप्पा - १९ एप्रिल २०२४
दुसरा टप्पा - २६ एप्रिल २०२४
तिसरा टप्पा - ७ मे २०२४
चौथा टप्पा - १३ मे २०२४
पाचवा टप्पा - २० मे २०२४
सहावा टप्पा - २५ मे २०२४
सातवा टप्पा - १ जून २०२४
निकाल - ४ जून २०२४

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies