Wednesday, March 27, 2024

माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा..

 माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा..



आज पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर करणार.


:- शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आले. त्यामुळे आज आपण या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचे शिवतारे यांनी ठरवले आहे. या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हे देखील उपस्थित होते.

Tuesday, March 26, 2024

मराठा उमेदवार कोणाच्या पथ्यावर ?

 मराठा उमेदवार कोणाच्या पथ्यावर ?


केवळ जातीच्या आधारावर निवडणूक लोकशाहीला घातक 



 नीरा दि.२६ ( राहुल शिंदे )


         मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे स्वतंत्र उमेदवार देण्याचे जाहीर केल आहे.मात्र त्यांच्या या निर्णयाचा फायदा नक्की कोणाला होणार आहे? हे देखील पाहावं लागणार आहे.ज्या सरकारने मराठा आंदोलकांवर लाठी काठी चालवली त्याच सरकारला चालवणाऱ्या पक्षाला याचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाचे उमेदवार हे महायुतीच्या पथ्यावर पडतील आणि येणाऱ्या काळात महायुतीचे उमेदवार निवडून येथील.

यातून मराठा समाजाला फार मोठी चपराक बसणार आहे.

आता वेळ आली आहे.मराठा आंदोलनाची चिक्तीसा करण्याची यातून काय मिळवलं? काय गमावलं ? याचा हिशोब लावण्याची. जरांगे यांनी मुंबईला जाऊन काय आणलं ? आता निवडणूक लढवून काय साध्य करणार ? यावर सुज्ञ मराठा समाजाने विचार करायला हवा. केवळ मेंढरा प्रमाण एखादा नेता मी तुम्हाला हे देतो ते देतो म्हणतोय म्हणून त्याच्या पाठीमागे पाळायला नको.तो यातून काय सध्या करतो आहे. आणि तो सांगतो ते वास्तवाला धरून आहे का हे ही पाहायला हवे.


       मागील वर्षभरात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू ठेवले आहे.या आंदोलनात अनेक मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.तर या आंदोलनात झालेल्या लाठी चार्ज मुळे अनेक जन जखमी झाले आहेत.या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाज सरकारच्या विरोधात उभा ठाकला आहे.मराठा समाजाच्या मनात सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे.त्यामुळे या निवडणुकीत मराठा समाज महा युतीच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करणार हे निश्चित झाले आहे. त्याच बरोबर हे मतदान महाविकस आघाडीचा विजय सुखकर करेल असही निश्चिती झाले आहे. ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही.आपल्या आंदोलनाची दाखल घेतली नाही. त्याला.धडा शिकवण्यासाठी मराठा समाज या निवडणुकीत एकावटणार आहे. 

      तर मराठा आंदोलनाच्या काळात ओबीसी समाजाला मराठा समजा बद्दल चिथावणी देऊन सरकार मधील मंत्र्यांनी मराठा आणि ओबीसी यांच्या मध्ये मोठी फूट पाडली आहे.मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आता भाजपच्या बाजूला गेला आहे.त्यामुळे भाजपला मोठा मतदार मिळाला आहे. विरोधकांकडे आता काही उरलेला ओबीसी आणि मराठा मतदार शिल्लक राहिला आहे. जातीवर मतदान झाले तर भाजपला ओबीसीचा मोठा फायदा होऊ शकतो.आणि भाजप निवडणुकीत हा मुद्दा नक्कीच पुढे करणार.

       आपण राजकीय भूमिका घेणार नाही म्हणणाऱ्या मनोज जरांगे आणि त्यांच्या टीमने आता राज्यात प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक मराठा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.ज्यांनी आम्हाला मराठा आरक्षण दिलं नाही त्या सरकारला आमची ताकद दाखवून देण्यासाठी आम्ही आमचा उमेदवार उभा करणार आणि सर्व मराठा समाज या उमेदवारांना मतदान करणार. आमचा मतांचा आकडा आणि ताकद दाखऊन देऊ अस मराठा आंदोलक सांगत आहेत. मात्र यातून कोणाची मते कमी होणार आणि कोणाला फायदा होणार हे देखील पाहावे लागणार आहे. केवळ जातीच्या आधारावर निवडणूक लढविणाऱ्या मराठा उमेदवारांना महाराष्ट्रतील इतर समाजातील लोक मतदान करतील का ? तर याच उत्तर नाही असेच असणार आहे.मग खासदार निवडून आणण्या इतकं मतदान मराठा समाजाकडे आहे का ? त्याच उत्तरही नाही असच आहे. कारण मराठा समाज राज्यात ३५ टक्के आहे अस ग्रहीत धरले तरी यातील मोठा समाज वेगवेगळ्या पक्षात विभागाला आहे.त्यामुळे पूर्ण समाज हा जरांगे किंवा मराठा उमेदवारांच्या पाठीमागे येणार नाही.मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस,छगन भुजबळ,गोपीचंद पडळकर,महादेव जानकर अशा नेत्यांनी ओबीसी समाजाची चांगलीच मोठ बांधली आहे.त्यामुळे या समाजाच मोठ मतदान हे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाना मिळणार आहे. त्यामुळे मराठा उमेदवार उभे केले तर आणि मराठा समाजाने केंद्र सरकारला आपली ताकद दाखवण्या साठी मराठा उमेदवाराला मतदान केले तरी महायुतीला त्याचा फायदाच होणार आहे. ओबीसींची मोठे मतदान घेऊन महायुतीला मोठा विजय मिळू शकतो. यामधून सरकारला धडा शिकवण्याचा मराठा समाजच इच्छित साध्य तर होणार नाहीच.पण महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा मतांच महत्त्व देखील संपणार आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजप तेच दाखवून देणार आहे.



    फक्त मतांचा आकडा दाखवून जरांगेंना काय सध्या होणार? 


   संपूर्ण मराठा समाजाने स्वतंत्र लढणाऱ्या मराठा उमेदवारांना मतदान करून मराठा समाजाची एक गठ्ठा मते दाखवून देण्याचा प्रयत्न जरांगे करणार असतील तर त्यातून मतांचा मोठा आकडा निश्चित मिळेल.पण त्याचा मराठा समाजाला फायदा काय? तर काहीच नाही. जरांगे यांनी मराठा समाजाच मोठ आंदोलन उभ केलं.लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला पण अपेक्षित यश मिळालं का ? तर नाही असच म्हणावं लागणार आहे.कारण सरकारने दिलेल्या आरक्षणावर स्वतः मनोज जरांगे समाधानी नाहीत. त्यामुळेच ते सरकारला धडा शिकवण्याची भाषा करीत आहेत. स्वतंत्र मराठा उमेदवार देऊन सरकारला धडा शिकवू म्हणत आहेत.पण या मुळे सरकारचा पराभव न होता सरकारचा ( महायुतीचा) विजय होण्यातच मदत होणार आहे.पुन्हा महायुतीचे उमेदवार निवडून येणार . मग मराठा आरक्षण न देणाऱ्या आणि आपल्या आया बहिणींना मारहाण करणाऱ्या सरकारला यातून कोणता धडा शिकवला जाणार? मराठा समाजाने निवडणुकीत विरोधी पक्षाच्या लोकांना मतदान केलं तरच त्याचा परिणाम सरकारवर होऊ शकतो. यातून आम्ही सरकार बदलू शकतो एवढा संदेश राज्यकर्त्यांना मिळू शकतो. सत्तेत राहायचं आहे. मात्र लोकसभेसाठी स्वतंत्र मराठा उमेदवार देऊन जरांगे मराठा समाजच मोठ नुकसानच करणार आहेत. हे निच्छित आहे

.

Saturday, March 16, 2024

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले. देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, ४ जून रोजी निकाल

 लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले. देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, ४ जून रोजी निकाल







मुंबई :

       केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे.
देशभरात सात टप्प्यात एप्रिल, मे, जून अशा तीन महिन्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. सर्व टप्प्यातील मतदानाचे निकाल मंगळवार ४ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. यासोबतच देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

      २०२४ हे वर्ष जगभरात निवडणुकांचं असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी केलं.केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील १८ व्या लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन केली. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सात टप्प्यांत देशभरात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

       देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम पार पडणार असून १९ एप्रिल २०२४ रोजी देशात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून २०२४ रोजी देशभरातील लोकसभा निवडणुकांचा निकाल एकत्रित जाहीर होईल.

मतदानाची वैशिष्ट्ये
- आमच्याकडे ९७ कोटी नोंदणीकृत मतदार, १०.५ लाख मतदान केंद्रे, १.५ कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी, ५५ लाख ईव्हीएम, चार लाख वाहने आहेत.
४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेणार, फॉर्म १२ डी भरुन देणाऱ्यांना सुविधा
- मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, शौचालय, दिव्यांगांसाठी रॅम्प या व्यवस्था असणार.
- Know Your Candidate अॅपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या उमेदवाराची माहिती मिळवता येणार
- हिंसा रोखण्यासाठी अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
- 4 Ms: Muscle (शक्ती), money (पैसा), misinformation (अफवा) आणि MCC violations (आचारसंहिता भंग) या चार गोष्टींवर विशेष लक्ष.

________________________________________
महाराष्ट्रातील निवडणुकांचे टप्पे.     मतदानाची तारीख
                              
पहिला टप्पा
(देशभरातील दुसरा टप्पा)             26 एप्रिल 2024
दुसरा टप्पा
(देशभरातील तिसरा टप्पा)                 7 मे 2024
तिसरा टप्पा
(देशभरातील चौथा टप्पा)                13 मे 2024
चौथा टप्पा
(देशभरातील पाचवा टप्पा)               20 मे 2024
पाचवा टप्पा
(देशभरातील सहावा टप्पा)              25 मे 2024


- निवडणुकीत रक्तपात आणि हिंसाचाराला जागा नाही, जिथून हिंसाचाराची माहिती मिळेल, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू.
- स्टार कॅम्पेनर्शना नियमावली देण्याचे पक्षांना आदेश, प्रचारात लहान मुलांना समाविष्ट न करण्याच्या स्पष्ट सूचना.
- संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर २१०० निरीक्षकांची करडी नजर.


देशभरात कधी मतदान?
पहिला टप्पा - १९ एप्रिल २०२४
दुसरा टप्पा - २६ एप्रिल २०२४
तिसरा टप्पा - ७ मे २०२४
चौथा टप्पा - १३ मे २०२४
पाचवा टप्पा - २० मे २०२४
सहावा टप्पा - २५ मे २०२४
सातवा टप्पा - १ जून २०२४
निकाल - ४ जून २०२४

Monday, March 11, 2024

वडकीचा पै अमित गायकवाड ठरला " पुरंदर केसरी " चा मानकरी, पिसर्वेचा पै प्रसाद जगदाळे उपविजेता

 वडकीचा पै अमित गायकवाड ठरला " पुरंदर केसरी " चा मानकरी, पिसर्वेचा पै प्रसाद जगदाळे उपविजेता 



सासवड ( प्रतिनिधी ) :- 


   पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि सासवड येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था व पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दिवंगत लोकनेते चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ सासवड येथे दि १० व ११ मार्च रोजी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत वडकीचा ( ता हवेली ) पै अमित गायकवाड याने पिसर्वेचा ( ता पुरंदर ) चा पै प्रसाद जगदाळे याला चितपट करून २०२४ चा पुरंदर केसरीचा आखाडा मारला. जेष्ठ मल्ल तात्यासाहेब भिंताडे यांनी अंतिम कुस्तीचे पंच म्हणून काम पाहिले. 


   पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, महाराष्ट्र केसरी व कर्नाटक केसरी जेष्ठ मल्ल पै रघुनाथ पवार, महाराष्ट्र केसरी पै सिकंदर शेख, पै तात्यासाहेब भिंताडे, पै सागर बिराजदार, उपमहाराष्ट्र केसरी महेश मोहोळ, पै योगेश बोंबाळे, पै मोहन खोपडे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, सुदामराव इंगळे, पै सर्जेराव जगदाळे आदींच्या हस्ते पै अमित गायकवाडला ३५ हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्रक, चांदीची गदा आणि मानाचा " पुरंदर केसरी " २०२४ चा किताब तर उपविजेता पै प्रसाद जगदाळे याला २७ हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देण्यात आली. सिल्व्हर ज्युबिली मोटर्सच्या वतीने ही दोन्ही बक्षिसे देण्यात आली. प्रसिद्ध कुस्ती निवेदक पै युवराज केचे यांच्या समालोचनाने आणि कोल्हापूरचे हालगीवादक बापू आवाळे यांच्या हालगीवादनाने आखाड्यात रंग भरला.  


चौकट...... 

  एकूण १० गटांत पार पडलेल्या कुस्त्यांचे वजन गटनिहाय विजेते, उपविजेते अनुक्रमे :- ३० किलो - आर्यन सोळंकी, प्रशांत ढाकणे (दोन्ही सासवड). ३५ किलो - वेदांत भांडवलकर ( आंबोडी), अर्णव हिवरकर( सासवड). ४० किलो - आर्यन मोडक (वडकी), सोहम काळे (सोनोरी). ४५ किलो- सोहम हिवरकर, तिर्थराज जाधव ( दोन्ही सासवड). ५० किलो - अथर्व भिसे( पानवडी), सोहम झेंडे( झेंडेवाडी ). ५५ किलो - अक्षय धायगुडे (जेऊर), ओम गायकवाड (वडकी). ६० किलो - राहुल कुंभारकर ( सासवड), समर्थ शेंडगे (होळकरवाडी). ६६ किलो - आदित्य कुंभारकर (सासवड), प्रथमेश ढोणे (गराडे). ७४ किलो- गणेश जगताप (सासवड), यशराज गाढवे (आंबेगाव खुर्द) आणि खुला गट अमित गायकवाड, प्रसाद जगदाळे. सर्व विजेते व उपविजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी, प्रशस्तिपत्रक देण्यात आले. 


   याप्रसंगी प्रदीप पोमण, नंदकुमार जगताप, अभिजित जगताप, देविदास कामथे, गणेश होले, प्रकाश पवार, पै मंगेश ठाकूर, राजेंद्र लिमण, माऊली शेलार, उत्तम गायकवाड, राहूल गिरमे, रफिक शेख, देविदास नाझीरकर, संजय हरपळे, संदीप बांदल, तानाजी जगताप, खंडू पिसाळ, महेश भागवत, अंकुश जगताप, डॉ विनायक खाडे, कल्याण जेधे, रत्नाकर फाटे, माणिक चोरमले, पै मोहन आप्पा जगताप, सुधाकर गिरमे, संभाजी काळाणे, डॉ मनोज शिंदे, अंकुश भगत, सुहास लांडगे, यशवंतकाका जगताप, अजित जगताप, मनोहर जगताप, संदीप जगताप, विजय वढणे, योगेश गिरमे, संतोष खोपडे, विकास कामथे, संतोष गिरमे, राहूल गिरमे, संदीप राऊत, नितीन भोंगळे, चेतन महाजन, तुषार जगताप, पुरंदर केसरी पै निलेश खटाटे, नितीन मोडक, पै विजय साबळे, पै बंटी मोडक, पै प्रतिक जगताप, पै रितेश मुळीक, विठ्ठल मोकाशी, पिनू काकडे, संदीपबापू जगताप, बाळासो जगताप, रमेश जगताप, अतुल जगताप, मयूर जगताप, ज्ञानदेव दिघे, रमेश मोडक, म्हस्कू दळवी, वासुदेव बनकर, आण्णा काळे, डॉ सुमित काकडेे, सत्यजित जगताप, दिलीप मोरे यांसह हजारो कुस्तीशौकीन, जेष्ठ मल्ल, पुरंदर नागरीचे सर्व संचालक उपस्थित होते. 


   पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे पै राजेंद्र जगताप, पै बाळासाहेब कोलते, तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव पै रविंद्रपंत जगताप, सदस्य पै मोहन जगताप, पै विनोद जगताप, पै अशोक झेंडे, पै आण्णा कामथे, पै अभिजित मोडक, पै तानाजी काकडे, पै चंद्रकांत गिरमे, पै रमेश जगताप, पै भाऊ मोरे, पै गुलाब गायकवाड, पै संतोष सोनवणे, पै शरद जगदाळे, पै संतोष काळांगे, पै हरीभाऊ जेधे, पै शेखर कटके, पै तात्या झेंडे, पै लक्ष्मण दिघे, पै रघुनाथ जगताप, पै विशाल जगताप, पै संजय क्षीरसागर पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, सतीश शिंदे, हरीभाऊ शिंदे, कानिफनाथ आमराळे, दिपक जगताप, प्रशिक्षक पै माऊली खोपडे, आंतरराष्ट्रीय कोच पै तानाजी जाधव उपस्थित होते. पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था व श्री शिवाजी शिक्षणच्या कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले. अंतिम सर्व कुस्त्या प्रेक्षणीय आणि चितपट झाल्या. पंच म्हणून पै मोहन खोपडे, पै हेमंत शितोळे, पै तुषार गोळे, पै राजेंद्र वरे, पै अथर्व रणवरे, पै सागर माने, पै शेखर गोडांबे, मोहन मानकर, सागर भोंडवे, राहूल शेटे यांनी काम पाहिले. रविंद्रपंत जगताप व जालिंदर काळे यांनी सुत्रसंचलन केले. महेश राऊत यांनी मानपत्र वाचन केले. 





Saturday, March 2, 2024

पुरंदर मध्ये प्रत्येक मंडल विभागात सुरू होणार चारा छावणी

 मी काँग्रेसची विचारधारा सोडणार नाही : आ.संजय जगताप

 पुरंदर मध्ये प्रत्येक मंडल विभागात सुरू होणार चारा छावणी



    नीरा दि.२ ( राहुल शिंदे)


      मी काँग्रेसच्या विचारधारेचा आहे.मी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आहे.मी आजपर्यंत माझी विचारधारा बदलली नाही आणि यापुढेही मी माझी काँगेसची विचारधारा सोडणार नाही. अस म्हणत आ.संजय जगताप यांनी आपण काँग्रेस सोडून जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.संजय जगताप हे आज नीरा येथे आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.


    आ.संजय जगताप हे आज नीरा बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या कांदा बाजाराला भेट देण्यासाठी आले होते.यानंतर त्यांनी पुरंदरच्या दुष्काळ उपाय योजना संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की,पुरंदर तालुक्यात आता ७ मंडल निहाय चार छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यां समोरील चाऱ्याचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. त्याच बरोबर पिण्याच्या पाण्यासाठी आता तालुक्यात ३६ टँकर सध्या सुरू आहेत तर आणखी १८ गावातून टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.त्याच बरोबर हे टँकर भरण्यासाठी जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये सोय करण्यात आली आहे.याबाबत उद्योग मंत्री उदय सावंत यांनी सूचना दिल्या नंतर त्याला परवानगी देण्यात आली आहे.याबद्दल त्यांनी सावंत यांचं आभार मानले .

     दुष्काळ निवारण्यासाठी सरकारने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्या बद्दल आमदार संजय जगताप यांनी नाराजी व्यक्त केली. दुष्काळ जाहीर केला असला तरी सरकारने अद्याप शेतकऱ्यांची कर्ज वसुली सुरूच ठेवली आहे.त्याच बरोबर वीज वितरांची वसुली देखील सुरूच आहे.त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तर विद्यार्थ्यांची फी माफ व्हायला पाहिजे होती. मात्र याबाबतही कार्यवाही झाली नाही. प्रत्येक विभाग वेगळा आदेश येण्याची वाट पाहत आहे.सरकारने याबाबत निर्णय घेण्याची व सबंधित विभागांना सूचना करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.


   सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन 


  पुरंदर मध्ये सध्या चार टंचाई मोठ्या प्रमाणात आहे.रोज किमान ७ हजार टन चारा छावण्यासाठी आवश्यक आहे.त्यामुळे सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती यांनी पुढे येऊन चारा उपलब्ध करून द्यावा असं आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले आहे.त्याच बरोबर माहूर येथील तात्या जगताप यांनी ४० एकर मका चारा छावणी साठी देण्याचे सांगितले आहे त्याबद्दल जगताप यांनी त्यांचे आभार मानले.




मी काँग्रेस सोडणार नाही : चर्चांना पूर्णविराम 


 मी काँग्रेस विचारधारेचा स्वीकार केला आहे.माझ्या वडिलांनी सुद्धा काँग्रेसची विचारधारा स्वीकारली होती.ती त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही.मीसुद्धा माझ्या विचार धारेशी कायम राहणार आहे.मी दिलेला शब्द कधीच मोडत नाही. कितीही मोठं संकट आले. किंवा कोणताही सहकारी मला सोडून गेला तरी मी मात्र काँग्रेस मध्येच आहे आणि काँग्रेसच राहणार. खा.सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र यावं त्यांच्यात फूट पडू नये म्हणून आम्ही प्रयत्न केले. मात्र आम्हाला त्यात यश आले नाही.पण एखाद्याच्या घरात फूट पडली म्हणून त्याच्यावर आपल्या पोळ्या भाजरे आम्ही नाही. मला कोणी सोडून दुसऱ्या पक्षात गेले म्हणजे मी जाणार अस ही नाही. मी माझ्या विचार धारेवर ठाम असल्याचे म्हणत जगताप यांनी भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

Friday, March 1, 2024

पुणे पंढरपूर मार्गावर मोटासायकल कार अपघात अपघातात दोनजण जखमी

   पुणे पंढरपूर मार्गावर मोटासायकल कार अपघात अपघातात दोनजण जखमी




  नीरा दि .२


     पुरंदर तालुक्यात पुणे पंढरपूर मार्गावर मोटासायकल आणि कार यांच्या आज शनिवारी 2 मार्च रोजी सकाळी 8 वाजता अपघात झालाय.यामध्ये मोटार सायकल वरील दोन जन जखमी झालेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शी लोकांनी दिलीय.दरम्यान अपघातानंतर नीरा येथील पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.त्याच बरोबर पोलिसांनी अपघात ग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला घेत वाहतूक सुरळीत केलीय. 

 

     याबाबत प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहिती नुसार सकाळी 8 वाजता मारुती अल्टो कार नंबर एम एच १२ ए एस २४८९ जेजुरीहून नीरा कडे निघाली होती.तर मोटरसायकल क्रमांक एम एच ४२ डब्ल्यू ३३४६ ही निरेकडू वाल्हे येथे निघाली होती या दोन वाहनांमध्ये समोर समोर धडक होऊन मोटरसायकल वरील दोन जन जखमी झाले. लोकांकडून मिळालेल्या माहिती नुसार दोघे जखमी वाल्हे येथील.रहिवाशी असून अप्पा धनंजय चव्हाण, राहुल शिंदे.अशी दोघांची नावे आहेत.तर यातील एक जण गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.पोलीस कर्मचारी संदीप मोकाशी आणि निलेश जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्थांना मदत केली. त्याच बरोबर पुणे पंढरपूर मार्गावरील वाहतूक सुरळीत केलीय..

पुरंदर काँग्रेस मधील आ. संजय जगताप यांचे दोन शिलेदार अजित दादांच्या छावणीत दाखल

 पुरंदर काँग्रेस मधील आ. संजय जगताप यांचे दोन शिलेदार अजित दादांच्या छावणीत दाखल



पुरंदर दि.१


पुरंदर तालुक्यातील काँग्रेसला मोठा झटका बसलेला आहे लोकसभेच्या निवडणुका समोर येत असतानाच पुरंदर तालुक्यातील संजय जगताप यांचे दोन शिलेदार हे आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षांमध्ये सामील झालेले आहेत आज दिनांक 1 मार्च रोजी सकाळी आठ वाजता मुंबई येथे अजित पवार यांच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला आहे.


   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित दादा गटाकडून आपली बाजू भक्कम करण्याचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि आमदार संजय जगताप यांचे खंदे समर्थक दत्ता झुरुंगे त्याचबरोबर आमदार संजय जगताप यांचे दुसरे खंदे समर्थक गणेश जगताप यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या दोघांच्या अचानक आमदार संजय जगताप यांना सोडून जाण्याने पुरंदर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे एकेकाळी आमदार संजय जगताप यांचे खंदे समर्थक असलेले हे दोन शिलेदार अचानक राष्ट्रवादीमध्ये गेले कसे? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. लोकांमध्ये आज सकाळपासूनच ही चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भात गणेश जगताप यांच्याकडे विचारणा केली असताते म्हणाले की, दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची चांगली संधी असल्यामुळे त्याचबरोबर दादांचा नेतृत्व चांगलं काम करत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जात आहोत.  अशी प्रतिक्रिया दुपारी बारावजाता माध्यमांशी बोलताना दिली आहे.



Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...