Type Here to Get Search Results !

पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्णपणे बंद ठेऊ नका : माजी आमदार अशोकराव टेकावडे

 पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्णपणे बंद ठेऊ नका : माजी आमदार अशोकराव टेकावडेपुरंदर दि.३१
पुरंदर आणि बारामती तालुक्यातील काही गावांसाठी संजीवनी ठरलेली पुरंदर उपसा सिंचन योजना दुरुस्तीसाठी ४५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला होता. मात्र याबाबत पुरंदरचे माजी आमदार अशोकराव टेकवडे यांनी ही योजना पूर्णपणे बंद ठेवू नका अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. त्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद आला असून ही योजना पूर्णपणे बंद ठेवणार नसल्याची माहिती माजी आ. अशोकराव टेकवडे यांनी माध्यमांना दिली आहे

        पुरंदर उपसा योजना ही दुरुस्ती यासाठी दीड महिना बंद राहणार होती. परंतु या योजनेवर अवलंबून असणारे शेतकरी, उद्योजक यांना त्याचा मोठा फटका बसण्याचा धोका निर्माण झाला होता. पारगाव,आंबळे,टेकवडी, माळशिरस,पोंढे, पिसर्वे, नायगाव, मावडी सुपे, नायगाव, राजेवाडी, राजुरी आदी गावातील शेतकऱ्यांना घेऊन माजी आमदार अशोक टेकवडे यांनी जलसंपदा विभागाच्या पुणे येथील सिंचन भवन या ठिकाणी धडक देत मुख्य अभियंता ह.वी.गुणाले यांच्याशी चर्चा करून अडचणी समजून सांगितल्या. त्यानंतर यावर तात्काळ कारवाई करत ही योजना पूर्ण बंद राहणार नसून एका पंपाद्वारे २४ तास सेवा देणार असून बाकीची पंपाची देखभाल व दुरुस्ती तसेच पाईपलाईनचे काम करण्यात येणार आहे. तर दुरुस्तीसाठी डबल यंत्रणा कामी लावण्यात येईल व रात्र दिवस काम करून कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याची दखल जलसंपदा विभाग घेईल यात शंका नाही. असे मुख्य अभियंता ह. वि.गुणाले यांनी सांगितले. यावेळी कनिष्ठ अभियंता कानिटकर हे देखील उपस्थित होते. पुरंदर उपसा सिंचन योजना दुरूस्तीसाठी 45 दिवस बंद राहणार होती. याबाबतची बातमी माध्यमांच्यावर प्रसिद्ध झाली होती.अस झाल असत तर शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असते. ही परिस्थिती लक्षात घेता दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे ही योजना तात्काळ बंद न करता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. यासाठी भाजपा नेते मा.आमदार अशोक टेकवडे यांच्या उपस्थितीत सिंचनभवन येथे मुख्य अभियांता यांना लेखी निवेदन दिले. योजना बंद न करण्याचे मा.गुणालेसाहेब यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.      यावेळी कृषिभुषण महादेव शेंडकर (भाजपचे पुणे जिल्हा किसान मोर्चा उपाध्यक्ष) गणेश मेमाणे (सरचिटणीस भाजपा पुरंदर),हनुमंत काळाणे (भाजपा तालुका उपाध्यक्ष),राजेश कोलते ,राहुल यादव यांच्यासह पिंपरी,नायगांव,माळशिरस ,पिसर्वे ,पारगांव,चाचर मावडी,जवळार्जुन,मावडी सुपे, या गावातील प्रमुख शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies