गुळूंचे कर्नलवाडी नियोजित खडिमशीन विरोधात आंदोलनाचा इशारा.
खा. सुप्रिया सुळेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक नियोजिन केले.
नीरा :
गुळूंचे कर्नलवाडीसह चार गावच्या ग्रामस्थांचा विरोध असतानाही नियोजित खडिमशीन मालाक कामाच्या हालचाली सुरुच आहेत. खडिमशीन मालकाने नियोजित खडिमशीनच्या ठिकाणी मागील आठवड्यात जिलेटीनचा स्फोट उडवल्याने बोलाईमातेच्या प्रचिन गुफेत हदरे बसले होते. ग्रामस्थांनी या नंतर प्रशासनाला खडिमशीन विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत बैठक नियोजित केले होती. यानिमित्ताने ग्रामस्थांनी या खडिमशीन विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दादा मागतली आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरचे संचालक शैलेंद्र रासकर यांंनी गेली तीन वर्षांपासून खडिमशन टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गुळूंचे, कर्नलवाडी, पिसुर्टी, पिंपरे, थोपटेवाडी, वाल्हे, सुकलवाडी, कामठवाडी या गावातील लोकांचा या नियोजित खडिमशीनला विरोध आहे. या खडिमशीन विरोधात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांच्या भावना तिव्र होत असुन, ग्रामस्थांनी पुरंदरच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर अमरण सोमवार दि. २७ रोजी उपोषण करत असल्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र शासनाचा तीर्थक्षेत्र 'ब' दर्जा असलेल्या गुळूंचे व कर्नलवाडी गावच्या पश्चिम बाजूला डोंगरावर प्राचीन गुफेमध्ये बोलाईमातेचे जागृत देवस्थान आहे. राज्यभरात फक्त दोनच ठिकाणी बोलाईमातेची जागृत देवस्थान आहे. या देवस्थानच्या पायथ्याला मेंढपाळांच्या चराऊ जमिनी कवडीमोल भावात खरेदी करून मागील तीन वर्षापासून खडीमशीनचा घाट घातला जात आहे. मात्र या खडीमशीनच्या हदऱ्यांनी, होणाऱ्या स्फोटांमुळे बोलाईमातीचे गुहा धोक्यात येऊ शकते, हे लक्षात घेता ग्रामस्थांनी खडीमशीन या परिसरात होऊच नये असा ठराव शुक्रवार दि. ०३ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत घेतला आहे. या ठरावाला दोन्ही गावचे प्रमुख व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने खडीमशीन या परिसरात होऊच नये असा ठराव संमत केला. मागील महिन्यात विरोधी पक्षनेते अजित पवार, पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतार आणि नुक्तेच खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन खडिमशीनला विरोध असल्याचे सांगितले आहे.