Type Here to Get Search Results !

अमिताभ बच्चन यांनी जयासोबत का केले लग्न? फक्त प्रेमच नाही तर 'हे' हाेते मुख्य कारण

 


कौन बनेगा करोडपती 14' होस्ट करताना अभिनेता आजकाल अनेक खुलासे करत आहेत.

गेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्याने स्पर्धकांशी संवाद साधताना फिल्मी जगाशी संबंधित अनेक सेलिब्रिटींबद्दल अशा गोष्टी सांगितल्या, ज्या फार कमी लाेकांना माहित आहे. इतकंच नाही तर, पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री यांच्यासोबतच्या लग्नाच्या अनेक कारणांपैकी एक कारणही त्यांनी उघड केलं.

मेगास्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन हे बाॅलिवूडच्या लाेकप्रिय जाेडप्यांपैकी एक आहे. या दोन्ही दिग्गज कलाकारांनी 3 जून 1973ला लग्न केले. पुढच्या वर्षी ते लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा करणार आहे. क्वचितच कोणाला ठाऊक असेल की, जयाच्या कोणत्या वैशिष्ट्याने बिग बींना तिच्याकडे आकर्षित केले होते.

तर झाले असे की, मंगळवारी (15 नाेव्हेंबर)ला प्रियंका महर्षी नावाची स्पर्धक कौन बनेगा करोडपती 14’ च्या हॉटसीटवर बसली होती, जिचे केस खूप सुंदर आणि लांब आहेत. अमिताभ बच्चन यांनी तिच्या लांब केसांची प्रशंसा करण्यास सुरुवात केली आणि जेव्हा तिला केस दाखवण्यास सांगितले तेव्हा प्रियांकाने तिचे केस पुढे केले आणि सांगितले की, “असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे कोणीही माझ्यासारखे केस मिळवू शकते. मात्र, त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल. मी शोमध्ये येण्यापूर्वी काही केस कापले, नाहीतर माझे केस अधिक लांब होते.असे प्रियांका हिने सांगितले. यावर अमिताभ म्हणाले की, “आम्ही आमच्या पत्नीशी लग्न केले कारण तिचे केस खूप लांब होते.हे ऐकताच शाेमध्ये उपस्थितांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies