Actress Nithya Menon pregnant? : गेल्या काही दिवसांपासून झगमगत्या विश्वातून आनंदाच्या बातम्या येत आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट - अभिनेता रणबीर कपूर यांच्यानंतर अभिनेत्री बिपाशा बासू - अभिनेता करण ग्रोव्हरने चिमुकलीचं जगात स्वागत केलं.
फोटोमध्ये
अभिनेत्रीचे 'बेबी बम्प दिसत आहे. नित्याचे बेबी बम्पचे फोटो पाहून चाहत्यांना देखील मोठा
धक्का बसला आहे. कारण नित्याचं अद्याप लग्न झालेलं नाही. त्यामुळे नित्याने
प्रेग्नेंसीची बातमी दिल्यानंतर चाहते गोंधळात पडले आहेत.
नित्याने
बेबी बम्पसोबत फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री लवकरच 'वंडर वुमन' सिनेमाच्या माध्यमातून
चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा आणि तिच्या भूमिकेबद्दल नित्याने सांगितलं
की, 'नोरा!
प्रग्नेंसी कधीही क्यूट वाटत नाही!' पोस्टमध्ये अभिनेत्री पुढे
म्हणाली, 'ही भूमिका
साकारताना चांगलं वाटलं आणि मजा येत आहे.' सांगायचं झालं तर नित्या गरोदर
नाही. शिवाय तिने पोस्टमध्ये शेवटी मी खरंच गरोदर नाही... अशी नोट देखील लिहिली
आहे.
नित्या
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती लवकरच 'वंडर वुमन'मध्ये महत्त्वाची भूमिका
साकारताना दिसणार आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री तिच्या प्रत्येक आगामी सिनेमाबद्दल
सांगत असते.
सोशल
मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
सध्या अभिनेत्री प्रेग्नेंसीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.