Wednesday, November 30, 2022

जर सूर्य एकाच ठिकाणी असेल, तर जपानमध्येच प्रथम का उगवतो? खास आहे यामागचं कारण


 उगवत्या सूर्याचे(Sun Rise) नयनरम्य दृश्य पाहणे प्रत्येकाला आवडते.

दिवसाची चांगली सुरुवात करायची असेल तर सकाळी लवकर उठून सूर्योदय पाहावे, असेही म्हटले जाते. यामुळे संपूर्ण दिवस चांगला असतो. सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. पण, प्रत्यक्षात पाहता सूर्य स्वतःच्या जागी स्थिर राहतो आणि पृथ्वी त्याच्याभोवती फिरते. सूर्याच्या प्रदक्षिणाबरोबरच पृथ्वीही स्वत:भोवती फिरते. यामुळे दिवस आणि रात्र होते.

पृथ्वीवरील असे कोणते ठिकाण आहे जिथे सूर्य प्रथम दिसतो?

आपण सर्वांनी सूर्य उगवताना आणि मावळताना पाहिला आहे, परंतु उगवता सूर्य प्रथम कुठे दिसतो हे तुम्हाला माहिती आहे का? पृथ्वीवरील असे कोणते ठिकाण आहे जिथे सूर्य प्रथम दिसतो? या प्रश्नांची उत्तरे खूप मनोरंजक आहेत, हे जाणून घेणे तुमच्यासाठी आश्चर्यकारक आणि माहितीपूर्ण असेल.

जपानमध्ये सूर्य प्रथम का उगवतो?
यापूर्वी जपान ही सूर्योदयाची भूमी मानली जात होती, परंतु सर्व देशांनी GMT (Greenwich Mean Time) वेळला मान्यता दिली असल्याने, तेव्हापासून हा मान न्यूझीलंडकडे गेला आहे. न्यूझीलंडची वेळ GMT+13 आहे, तर जपानची वेळ GMT+9 आहे. जेव्हा न्यूझीलंडमध्ये सकाळचे 6 वाजलेले असतात, तेव्हा जपानमध्ये रात्रीचे 2 वाजलेले असतात. तसेच, जेव्हा नवीन वर्ष येते, तेव्हा न्यूझीलंडमध्येच नवीन वर्ष प्रथम साजरे केले जाते. या नवीन टाइम झोननुसार, सूर्य जगात प्रथम न्यूझीलंडमध्ये उगवतो.

जपानला उगवत्या सूर्याची भूमी का म्हणतात?
आता प्रश्न असा पडतो की, जपानमध्ये जर सूर्य प्रथम उगवत नाही, तर मग त्याला सूर्योदयाची भूमी का म्हणतात? या देशाला जपानी भाषेत निहोन (निप्पॉन) म्हणतात. निहोन आणि जपान हे शब्द एकाच शब्दापासून आले आहेत, ज्याचा शाब्दिक अर्थ "जेथे सूर्य उगवतो" असा होतो. इटालियन व्यापारी आणि प्रवासी मार्को पोलो याने १३व्या शतकात जपानची पाश्चात्य जगाशी ओळख करून दिली. तो प्रत्यक्षात कधीच जपानला गेला नाही, तर त्याऐवजी चीनच्या दक्षिण भागात गेला. तिथे लोकांनी त्याला जपानबद्दल सांगितले. दक्षिण चीनच्या लोकांसाठी, जपान ज्या दिशेला सूर्य उगवतो त्या दिशेने स्थित आहे. म्हणून, लोकांनी त्याला जी-पॅंग किंवा झु-पॅंग म्हटले, ज्याचे भाषांतर "सूर्याचे मूळ" म्हणून देखील केले जाऊ शकते, याचा अर्थ सूर्य उगवतो ते ठिकाण.

जपानी "उगवत्या सूर्याचा ध्वज"

जपानच्या राष्ट्रीय ध्वजाला "उगवत्या सूर्याचा ध्वज" म्हणतात. 7 व्या शतकाच्या सुरूवातीस, मध्यभागी सूर्य असलेला जपानी ध्वज प्रथमच वापरला गेला. मात्र, त्यावेळच्या ध्वजाचे रंग आताच्या रंगांपेक्षा वेगळे होते, असे सांगितले जाते. त्यावेळच्या ध्वजावर पिवळा सूर्य आणि लाल पार्श्वभूमी होती. हा ध्वज एखाद्याचे राष्ट्रीयत्व दर्शविण्यासाठी जहाजांवर वापरला जात असे. याशिवाय इतरही अनेक ठिकाणी त्याचा वापर केला जात होता.

फेसबुकवरची 'ती' एक चूक पडली महागात; थेट 2 वर्षांचा तुरुंगवास; तुम्ही करत नाही ना असं काही?

 


फेसबुकवरील चुकीची माहिती एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. या एका चुकीमुळे त्या व्यक्तीला तुरुंगात जावे लागले. चुकीची शिक्षा म्हणून त्या व्यक्तीला दोन वर्ष जेलमध्ये टाकण्यात आले.

व्हिएतनाममध्ये ही घटना घडली आहे, जिथे फेसबुकवर चुकीची पोस्ट केल्यानंतर जेलमध्ये जावं लागतं.

फक्त व्हिएतनाममध्येच नाही तर भारतातही फेसबुकवर चुकीची पोस्ट करणं महागात 

पडू शकतं. कारण फेक न्यूजला आळा घालण्यासाठी सरकार आणि फेसबुकने कडक 

नियम लागू केले आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या चुका तुम्हाला तुरुंगात टाकू 

शकतात .

ते जाणून घेऊया.

फक्त फेसबुकच नाही, तर तुम्ही इन्स्टाग्राम, Whatsapp सारख्या इतर सोशल मीडियावर 

चुकीच्या पोस्ट टाकल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. सोशल मीडियाचा वापर 

सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो.

सोशल मीडियावर चुकीची माहिती देणं टाळा. सोशल मीडियावर डोळे झाक करून 

कोणताही मेसेज पाठवू नये. तसेच मेसेज पाठवण्यापूर्वी एकदा क्रॉस चेक करून घ्या. 

अफवा पसरवणारे अनेक मेसेज हे तुफान व्हायरल होत असतात. पण हे दुसऱ्यांना पाठवू 

नका. याबाबत अलर्ट राहा.

जर तुम्ही चित्रपट पायरसीमध्ये सामील असाल तर तुम्हाला सिनेमॅटोग्राफी कायदा 1952 

अंतर्गत किमान 3 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. अशा 

परिस्थितीत कोणताही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी कॉपीराईटची काळजी घेतली पाहिजे.

गर्भपात कसा करायचा हे गुगलवर सर्च केल्यास ते बेकायदेशीर आहे. असं केल्याने 

तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते, कारण भारतात गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. 

अशा परिस्थितीत सोशल मीडियावर गर्भपाताचा सल्ला पोस्ट करणे टाळावे.

सोशल मीडियावर परवानगीशिवाय कोणाचाही फोटो किंवा व्हिडीओ शेअर करणे गुन्हा 

आहे. यासाठी तुरुंगात जावे लागू शकते. प्रत्येक जण आपल्या भावना, फोटो, व्हिडीओ हे 

सोशल मीडियावर शेअर करत असतं पण असं असताना इतरांच्या भावना त्यामुळे 

दुखावल्या जाऊ नये याची काळजी घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

पत्रिका नसताना लग्नात गेला MBA विद्यार्थी, पकडला गेला तर घासून घेतली भांडी

 


लग्नाच्या मंडपात किंवा लग्नात गोंधळाच्या अनेक घटना समोर येत असतात. सोशल मीडियावर या घटनांचे अनेक व्हिडीओही व्हायरल होत असतात. अशातच एक अशी घटना समोर आली आहे ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले.

झालं असं की, एक एमबीएचा विद्यार्थी इन्व्हिटेशन नसताना एका लग्नात गेला. यानंतर असं काही झालं ज्याचा त्याने विचारही केला नसेल.

संशय आला आणि ओळख विचारली

ही घटना मध्य प्रदेशच्या भोपाळमधील आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ शेअर करण्यात आल्यावर लोक यावर आक्षेप घेत आहेत की, अशाप्रकारे कुणाचा व्हिडीओ व्हायरल करणं योग्य नाही. एका लग्नात लग्न सुरू होतं. अशातच एका तरूणावर लग्नातील लोकांना संशय आला आणि त्याला ओळख विचारण्यात आली.

तरूण काही सांगू शकला नाही आणि तो पकडला गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने तो जबलपूरचा असल्याचं सांगितलं आणि भोपाळमध्ये तो एका प्रायव्हेट कॉलेजमधून एमबीएच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. जेव्हा समजलं की, तो पत्रिका नसताना आलाय तर त्याला लग्नातील भांडी घासण्यास सांगण्यात आली. त्याला शिक्षा म्हणून भांडी घासण्यास सांगण्यात आलं.

भांडी घासताना त्याच्या व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला. व्हिडीओ काढताना त्याला त्याचं नाव, शिक्षण, कुठे राहणारा आहे हेही विचारण्यात आलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण काही लोकांनी यावर आक्षेप घेतला आहे. तर काही लोकांनी हे योग्य केल्याचं म्हणत आहेत.

 

केळी हेअर कंडिशनर घरी सहज बनवता येईल, केस मजबूत आणि चमकदार होतील


 केळी जशी आरोग्यासाठी चांगली असते, त्याचप्रमाणे त्वचेसाठी आणि विशेषत: केसांसाठी खूप पौष्टिक मानली जाते. वास्तविक, केळ्यामध्ये आढळणारे अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि अँटी-ऑक्सिडंट केस मजबूत आणि चमकदार बनवतात.

विशेषत: हिवाळ्यात, जे कोरडे आणि निर्जीव असतात त्यांच्यासाठी केळीचे कंडिशनर बनवून लावले तर बाजारातील केमिकलयुक्त केसांच्या कंडिशनरपेक्षा खूप फायदा होऊ शकतो.

त्यामुळे केसांना नैसर्गिक पद्धतीने चमकदार, मुलायम आणि मजबूत बनवण्यासाठी केळी हेअर कंडिशनर घरी लावता येते. पिकलेल्या केळ्याच्या हेअर कंडिशनरच्या वापराने केसांसाठी आवश्यक प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी6 तसेच व्हिटॅमिन-ई देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. घरी केळी हेअर कंडिशनर कसे बनवायचे आणि ते कसे लावायचे ते जाणून घेऊया-

केळीचे केस कंडिशनर कसे बनवायचे

·         सर्व प्रथम दोन पिकलेली केळी घ्या.

·         2 चमचे बदाम तेल (आपण ऑलिव्ह तेल देखील वापरू शकता)

·         1 चमचे शुद्ध मध

·         दोन पिकलेली केळी सोलून त्याची पेस्ट बनवा.

·         आता या पेस्टमध्ये तुम्ही दोन चमचे बदामाचे तेल (ऑलिव्ह तेल हवे असल्यास) घालू शकता.

·         एक चमचा मधही मिसळा.

अशा प्रकारे केसांना लावा

·         आता तुम्ही ज्याप्रमाणे कंडिशनर लावता त्याच पद्धतीने केसांच्या मुळांमध्ये लावा.

·         हे कंडिशनर तुम्ही केसांच्या लांबीवरही लावू शकता.

·         अर्ध्या तासानंतर आपले डोके सौम्य शैम्पूने धुवा.

आठवड्यातून एकदा अर्ज करा
तुम्ही आठवड्यातून एकदा केळी कंडिशनर लावू शकता. यामुळे केस चमकदारही होतात आणि पुरेशा पोषणासोबतच मुळांना मजबुती मिळू शकते, ज्यामुळे मुळांमध्ये नवीन केस वाढू शकतात.

 

ऊस उत्पादकांना खऱ्या अर्थाने न्याय


 बारामती-राज्य शासनाने एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. राज्य शासनाचे शेतकरी कृती समितीच्या वतीने विशेष अभिनंदन केल्याचे राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले.

बारामती येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जाचक म्हणाले, साखर उद्योगाच्या पाच मागण्यांबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सहकारमंत्री अतुल सावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते. महाविकास आघाडीने खासगी कारखान्यांना पोषक एफआरपी दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता. त्यामुळे उत्पादकांवर अन्याय होत होता. यंदा रिकव्हरीवर एफआरपीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एफआरपीसाठी हंगाम संपण्याची वाट पहावी लागणार होती.

मात्र, शासनाने मागील रिकव्हरीवर त्वरित एफआरपी एका टप्प्यात देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. अनेक कारखान्यांवर उसाच्या वजन काट्याबाबत तफावत होती. त्यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. मात्र, आता शासनाने सर्व वजनकाटे ऑनलाइन डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. वजनात तूट न येता शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळण्यास मदत होणार आहे.

बऱ्याच ठिकाणी पैसे घेऊन ऊस तोडणी टोळ्या पळून जातात. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे चुकीच्या गोष्टींना आळा बसेल, याबाबत चर्चा केली. दोन कारखान्यांतील अंतराची मर्यादा 25 किमी केली आहे. अंतराची मर्यादा हटविल्यास निकोप स्पर्धा होईल. शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळतील. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या खासगी कारखान्यांसाठी हा निर्णय राबविला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरविले आहे. सतीश काकडे म्हणाले, साखरेला प्रतिक्‍विंटल 3500 रुपये दर केंद्र सरकारने जाहीर करावा.

दोन साखर कारखान्यांतील 25 किलोमीटर अंतराची मर्यादा पूर्ण रद्द करण्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मर्यादा हटविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मागील आठवड्यात पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे आदींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना एकरकमी एफआरपीबाबत मागणी केली होती. त्याची दखल घेत पालकमंत्री पाटील यांनी साखर आयुक्‍तांना एकरकमी एफआरपी देण्याची सूचना केली होती.

राजेंद्र ढवाण म्हणाले की, राजू शेट्टी यांच्या आवाहनानंतर परिसरातील कारखाने बंद ठेवण्यात आले. त्यानंतर राज्य शासनाने एकरकमी एफआरपी देण्याबाबत निर्णय घेतला आहे. पांडुरंग कचरे म्हणाले की, केवळ भाजपच शेतकऱ्यांचे खरे कैवारी असल्याचे या निर्णयाने सिद्ध झाले आहे.

खासगी कारखानदारी वृत्ती संपुष्टात- रंजन तावरे
माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले, ऊस उत्पादनाबाबत महत्वाचे निर्णय घेतले. शेतकरी कृती समितीच्या वतीने अभिनंदन करतो. खासगी कारखानदारी पहिला हफ्ता दिल्यावर पुढील विषय येत नसायचा. शेतकऱ्यांची उपासमार होत होती. एकरकमी एफआरपीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. ब्राझीलच्या धर्तीवर इथेनॉल निर्मिती करावी. सहकारी साखर कारखानदारांनी शक्‍य तेवढी क्षमतेच्या प्रकल्प उभारावे. भविष्यात जगातील इंधनसाठे संपुष्टात येतील. त्यामुळे इथेनॉलच्या दिशेने जाणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळणार आहेत. इथेनॉल धोरण राबविल्यावर कारखाने आणि शेतकरी समृद्ध होतील. डिजिटल वजनकाट्यांमुळे काटामारी थांबविण्याचा, शेतकऱ्यांचे पैसे वापरण्याची खासगी कारखानदारी वृत्ती संपुष्टात येणार आहे.

सोमेश्‍वरविरोधात तक्रार द्या- काकडे
काकडे म्हणाले की, सोमेश्‍वर कारखान्याच्या चेअरमन यांनी एकरकमी एफआरपी सव्वा महिन्याच्या 15 टक्‍के व्याजासह द्यावी. सभासदांच्या खात्यावर वर्ग करावे. कायदा हातात घेऊ नये. 10 डिसेंबरपर्यंत ते पैसे वर्ग न झाल्यास नाईलाजस्तव कारखाना बंद पाडण्याचा इशारा काकडे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. सोमेश्‍वर परिसरात शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी 5 हजार, 10 हजार मागण्यास सुरूवात झाली आहे. संचालक मंडळाने यात लक्ष घालावे. शेतकरी कृती समितीकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

आजपासून तुमच्या आयुष्यात होणार हे मोठे बदल

 


मुंबई : 1 डिसेंबर 2022 पासून बँकिंग, आर्थिक आणि संबंधित क्षेत्रांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत.

नव्या नियमांचा परिणाम तुमच्या बजेटवर होणार असला, तरी काही बदल तुमच्या भल्यासाठी देखील असणार आहेत. या बदलांचा परिणाम प्रत्येक सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. लाईफ सर्टिफिकेटबाबत महत्त्वाचा बदल केंद्र व राज्य सरकारकडून पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींना वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. पेन्शनरांना हे प्रमाणपत्र ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत सादर करायचे आहे.

पेन्शनर बँक शाखेत किंवा ऑनलाइन जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात, जेणेकरून त्यांची पेन्शन थांबणार नाही आणि त्यांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये. हे काम ३० नोव्हेंबरपर्यंतच होणे आवश्यक होते. आतापर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली नाही. म्हणजेच आज म्हणजेच १ डिसेंबर रोजी किंवा त्यानंतर सादर केलेले जीवन प्रमाणपत्र वैध ठरणार नाही.

गाड्यांच्या वेळा बदलणार भारतात थंडीचा मोसम सुरू झाला आहे. या काळात देशातील बहुतांश भागात धुके वाढू लागते, त्यामुळे गाड्यांच्या वाहतुकीत अडचणी निर्माण होतात. त्यामुळे एकतर या गाड्या उशिराने धावतात किंवा अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वेला घ्यावा लागतो. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी रेल्वे आपल्या टाइम टेबलमध्येही बदल करू शकते.

अशा परिस्थितीत रेल्वे या महिन्यात रेल्वेच्या टाइम टेबलमध्ये बदल करेल आणि नव्या टाइम टेबलनुसार गाड्या चालवल्या जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बँकेची सुट्टी यंदा डिसेंबर महिन्यात एकूण १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकेच्या १३ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि सर्व रविवारच्या वीकेंडच्या सुट्टीचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे नाताळ आणि गुरू गोविंदसिंगजी यांचा वाढदिवसही सुट्टीचा असतो, या दिवशी बँका बंद असतात.

भारतातील सर्व खासगी आणि सार्वजनिक बँका सुट्टीच्या दिवशी बंद असतात. काही बँका स्थानिक सण आणि सुट्ट्या पाळतात आणि त्या दिवशी राज्यात बंद राहतात. अशा परिस्थितीत तुम्ही बँकेचे कोणतेही महत्त्वाचे काम दीर्घकाळापासून पुढे ढकलत असाल तर लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करा. गॅस सिलिंडरचे दर इंडियन ऑइलने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही प्रकारचे गॅस सिलिंडर आणि कमर्शिअल गॅस सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 115.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. गेल्या 6 वेळा सतत 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात कपात केली जात होती.

मुंबईपेक्षा पुणे महापालिका मोठी.नगरसेवकांची संख्या मात्र छोटी

 


पुणे  -पुणे महापालिकेत 34 गावांचा समावेश झाल्यानंतर क्षेत्रफळानुसार पुण्याने मुंबई महापालिकेला मागे टाकले. पुणे ही राज्यातील सर्वाधीक मोठी महापालिका झाली. पुणे शहर क्षेत्रफळाने मुंबईपेक्षा मोठे झाले, त्याचवेळी पालिकेला विस्तारित कारभार झेपणार का?

अशी चर्चा सुरू होती. परंतु, राजकीय सारीपाटावर आखणी करताना राजकीय कारभाऱ्यांनी यामुद्याकडे दुर्लक्ष केले. 2011 मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत 11 गावांसाठीचा प्रभाग क्र. 42 तयार होऊन पालिकेत दोन नगरसेवक वाढले. त्यानंतर 2017 मध्ये आणखी 23 गावांचा समावेश झाल्यानंतर नगरसेवकांची संख्या त्यापटीत वाढेल, अशी अपेक्षा त्या-त्या गावातील राजकीय नेते मंडळींची होती. परंतु, महापालिका निवडणूक लांबली. शिवाय 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचना करण्याचे राज्य शासानाचे आदेश आल्याने आता 23 गावांतून अवघे 4 नगरसेवक वाढणार आहेत. मुंबई पेक्षा पुणे महापालिका क्षेत्रफळानुसार मोठी असताना जनगणना मात्र 2011ची गृहित धरली जात असल्याने पुण्यात नगरसेवकांची संख्या वाढण्याऐवजी कमी असणार आहे. मुंबईत 227 नगरसेवक आणि पुणे महापालिकेत 166 नगरसेवक, ही आकडेवारी पुण्यात निवडणुकीसाठी इच्छुकअसणाऱ्यांसाठी भुवया उंचावणारी ठरत आहे.

पुणे शहरातील संभाव्य प्रभाग रचना :
राज्य सरकारने 173 ऐवजी 166 नगरसेवक संख्या निश्‍चीत केली आहे. तीन सदस्यांचे प्रभाग झाल्यास तीन प्रभाग कमी होतील. यामध्ये 55 प्रभाग तीन सदस्यांचे आणि 1 प्रभाग चार सदस्यांचा असू शकतो. तर चार सदस्यांचा प्रभाग झाल्यास 4 सदस्यांचे 41 प्रभाग आणि एक प्रभाग 2 सदस्यांचा होऊ शकतो. किंवा 4 सदस्यांचे 40 प्रभाग आणि दोन प्रभाग तीन सदस्यांचे होऊ शकतात. नगरसेवकांची संख्या मात्र 166 असेल. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावेळी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत नगरसेवक पदांची संख्या वाढून आपापल्या गावातील प्रथम नगरसेवकहोण्याचा मान मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. परंतु, पदांची संख्या वाढण्याऐवजी ती कमी झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्‍त केली. त्यात राज्या शासनाने पुन्हा नव्याने प्रभाग रचना जाहीर करण्यास सांगितल्याने ज्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी केली त्यांच्याही अडचणीत वाढ झाली.

गावे समाविष्टची प्रक्रिया
भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात 1997 मध्ये 38 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2001 मध्ये 15 पूर्ण आणि पाच अंशत: गावे महापालिका हद्दीतून वगळण्यात आली, त्यामुळे महापालिका हद्दवाढ 23 गावांपुरती मर्यादित राहिली. तर, त्यातही पाच गावे अंशत: होती. पुन्हा 2012 मध्ये येवलेवाडी गावाचा महापालिका हद्दीत समावेश करण्यात आला तर नव्याने 28 गावे समाविष्टची चर्चा सुरू झाली. अखेर, 2014 मध्ये उर्वरीत आणि नवी अशी एकूण 34 गावे महापालिकेत समाविष्टचा निर्णय जाहीर झाला. तर, 2017 मध्ये फुरसुंगी आणि देवाची उरळी ही गावे पूर्ण आणि अशंत: असलेली नऊ गावे अशा 11 गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आली.

मुंबईतील नगरसेवक :
मुंबई महापालिकेसाठी 236 वॉर्ड जाहीर झाल्यानंतर पालिकेने पहिली सोडत 30 मे मध्ये (ओबीसी आरक्षण वगळून) काढली होती. परंतु, राज्यात सत्तांतर झाल्याने नव्या सरकारने वाढलेल्या 9 वॉर्डचा निर्णय रद्द करून पूर्वी प्रमाणे 227 वॉर्डनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 236 ऐवजी आता किमान 227 नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून जाणार आहेत.

पुण्यातील नगरसेवक :
राज्य सरकारने महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाने दिलेल्या पत्रांच्या संदर्भानुसार पुणे शहरात 166 नगरसेवक असणार आहेत. महापालिकेमध्ये नगरसेवकांची वाढविलेली 173 संख्या कमी झाल्याने 166 नगरसेवकच आता असणार आहेत.

मुंबईची स्थिती अशी
शहराचे क्षेत्रफळ :
450
चौरस किलोमीटर
पालिकेचे प्रभाग:
226 (
वाढलेले 9 कमी झाले अन्यथा 236)

पुण्याची स्थिती अशी
पुणे शहराचे क्षेत्रफळ :
517.77
चौरस किलोमीटर
पुणे पालिकेचे प्रभाग :
166 (
एकूण 23 गावांचा नव्याने समावेश)

 

मुंबईच्या रस्त्यावर कोरियन तरुणीसोबत लाज वाटणारे कृत्य, तरुणाने हात पकडला आणि... VIDEO

 


मुंबई, 01 डिसेंबर : जगभरातील व्यक्तींना भारतीय संस्कृतीबद्दल कायम आकर्षण वाटत आलेलं आहे. त्यामुळे जगभरातून लाखो विदेशी पर्यटक भारतात येतात. भारतीय लोक त्यांचे अतिशय चांगल्या प्रकारे आदरातिथ्यही करतात.

मात्र, काही समाजकंटक आणि वाईट प्रवृत्तीचे लोक पर्यटकांशी गैरवर्तन करतात. मुंबईमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबईतील रस्त्यावर एका दक्षिण कोरियातील युट्यूबर मुलीची छेड काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून नेटिझन्सनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई पोलिसांनीही या मागणीला प्रतिसाद दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य नावाच्या युजरनं ट्विटरवर एका दक्षिण कोरियन युट्यूबर मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ती युट्यूब लाइव्ह करत असताना एका तरुणानं तिचा हात पकडून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. साधारण एक मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये ती तरुणी विरोध करत असतानाही एक व्यक्ती तिचा हात पकडून तिला गाडीवरून लिफ्ट देतो असं म्हणत असल्याचं दिसत आहे.

तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे संबंधित तरुणी लाइव्ह स्ट्रिमिंग करत आहे. तिने अतिशय शांत राहून आणि प्रसंगावधान राखत त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. लाइव्ह स्ट्रीम संपवण्याचा प्रयत्न करून ती तिथून निघते.

पण, तिची छेड काढणारा तरुण काही वेळातच बाईकवर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत तिच्या मागे येतो आणि पुन्हा लिफ्ट देऊ करतो. मोडक्या-तोडक्या इंग्रजीत तो तिला गाडीवर बसण्यास सांगतो. आपली गाडी जवळच पार्क केलेली आहे, असं उत्तर देऊन ती मुलगी तिथून निघण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे" @MumbaiPolice काल रात्री खार परिसरामध्ये कोरियातील एका स्ट्रीमर मुलीची या मुलांनी छेड काढली.

लाइव्ह स्ट्रीमिंगमधील हजारपेक्षा जास्त लोकांसमोर ही घटना घडली आहे. हे अतिशय घृणास्पद असून त्यांच्यावर काही कारवाई होणं गरजेचं आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे," अशा कॅप्शनसह आदित्य नावाच्या युजरनं ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ नंतर Mhyochi नावाच्या अकाउंटनं रिट्विट केला आहे.

अकाउंटच्या बायोमधील माहितीनुसार, हे अकाउंट एका 24 वर्षीय कंटेंट क्रिएटर आणि गेमर मुलीचं आहे. "काल रात्री लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान एका तरुणानं मला त्रास दिला. ती व्यक्ती मित्रासोबत होती. परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न केले.

काही लोकांच्या मते, मी खूप मैत्रीपूर्ण संभाषणात गुंतल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे मला स्ट्रीमिंग करण्याबाबत पुन्हा विचार करायला भाग पाडलं आहे," असं Mhyochiनं म्हटलं आहे. भारतीय युजरनं मुंबई पोलिसांना टॅग करून व्हिडीओ पोस्ट केला होता. मुंबई पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद दिला. मुंबई पोलिसांनी संबंधित तरुणीला आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करण्यास सांगितले आहेत, जेणेकरुन या प्रकरणाची चौकशी करता येईल. पीटीआयनं स्थानिक पोलीस अधिकाऱ्याचा हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, पोलिसांनी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

 

पहिल्या टप्प्यात 2.39 कोटी मतदार करणार मतदान, जाणून घ्या पहिल्या टप्प्याची संपूर्ण माहिती


 गुजरात विधानसभा निवडणूक 2022 च्या पहिल्या टप्प्यात आज (गुरुवारी) राज्यातील 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान होत आहे. साधारणत: आतापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली आहे.

मात्र यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने राजकीय मैदानात उतरून ही निवडणूक रंजक बनवली आहे. आम आदमी पक्षाने 182 पैकी 181 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

पहिल्या टप्प्यासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. यासोबतच मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गुजरातच्या १८२ सदस्यीय विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्याचे ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल ८ डिसेंबरला लागणार आहेत.

२.३९ कोटी मतदार
राज्यात पहिल्या टप्प्यात मतदारांचे समीकरण कसे आहे ते जाणून घेऊया. गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण २.३९ कोटी (२,३९,७६,६७०) मतदार आहेत. त्यापैकी १,२४,३३,३६२ पुरूष तर १,१५,४२,८११ महिला मतदार आहेत. याशिवाय पहिल्या टप्प्यात ४९७ तृतीय लिंग मतदारही मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

25,434 मतदान केंद्रे
मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यासाठी एकूण 25,434 मतदान केंद्रे उभारली आहेत. त्यापैकी 9,018 शहरी मतदान केंद्रे आणि 16,416 ग्रामीण मतदान केंद्रे आहेत. दक्षिण गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र प्रदेशातील 19 जिल्ह्यांतील एकूण 89 जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या गुजरात निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेस केवळ 77 जागांवर घसरली होती.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दिग्गजांनी ताकद पणाला लावली होती
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी सायंकाळी ५ वाजता संपला. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने राज्यभर अनेक सभा घेतल्या. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आदींचा समावेश होता.

त्याचवेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पक्षाचा जोरदार प्रचार केला.

 

रणशिंग फुंकले; खोके सरकारला घेरणार! महाविकास आघाडीच्या बैठकीत अ‍ॅक्शन प्लान ठरला


 विदर्भात अवकाळी पाऊस, कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱयांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून सर्वसामान्यांना भेडसावणारे महागाई, बेरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ईडी सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नागपूर येथे 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱया विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधान भवनातील कार्यालयात झाली. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, एकनाथराव खडसे, हसन मुश्रीफ, अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी, शशिकांत शिंदे, भाई जगताप, सचिन अहिर, सुरेश वरपूडकर, अमिन पटेल, अनिल पाटील, बाळाराम पाटील, अबू आझमी, कपिल पाटील, रईस शेख असे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित होते.

एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी महाराष्ट्र मागे चाललाय - आदित्य ठाकरे

शेतकऱयांना न मिळालेली मदत, पीक विमा यावर आज चर्चा झाली. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार काम न करता नुसत्या घोषणा करीत आहे. महाराष्ट्राच्या डोळय़ासमोर हे सर्व घडत आहे. एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी महाराष्ट्र मागे चालला आहे याचे अधिक दुःख आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर दिली.

किमान तीन आठवडय़ांचे अधिवेशन हवेच!

या अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, शेतकऱयांच्या विषयांसोबतच विदर्भाचे अनेक प्रश्न अधिवेशनात मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे असा विरोधकांचा आग्रह आहे, मात्र सरकारने हिवाळी अधिवेशनसाठी दोन आठवडय़ांचा कालावधी प्रस्तावित केला असून तो आम्हाला मान्य नाही. हे अधिवेशन किमान तीन आठवडे चालले पाहिजे अशी आमची मागणी आहे.

विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या येत्या 5 डिसेंबरला होणाऱया बैठकीत अधिवेशनाच्या वाढीव कालावधीचा विषय लावून धरणार आहोत. तसेच आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र आणि संघटितपणे सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आवाज उठवू, असे अजित पवार म्हणाले.

वाचाळवीरांना आवरा, नाही तर निवडणुकीत काय ते कळेल, अजित पवार यांचा इशारा

राज्यातल्या या वाचाळवीरांना आवरा, त्यांच्यात चुका करण्याची स्पर्धाच लागली आहे. हे सर्व राज्यातील जनता बघत आहे. एकदा निवडणुका लागू द्या. मग त्यांना काय ते कळेल, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ईडी सरकारमधील वादग्रस्त वक्तव्य करणाऱयांचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

 

Featured Post

बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  बारामती :           डिजिटल तंत्रज्ञानाच्या साह...