गुजरात विधानसभा निवडणूक 2022 च्या पहिल्या टप्प्यात आज (गुरुवारी) राज्यातील 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान होत आहे. साधारणत: आतापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली आहे.
पहिल्या
टप्प्यासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने
मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. यासोबतच मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा
व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गुजरातच्या १८२ सदस्यीय विधानसभेसाठी दोन टप्प्यात
मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्याचे ५
डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल ८ डिसेंबरला लागणार आहेत.
२.३९ कोटी मतदार
राज्यात पहिल्या टप्प्यात
मतदारांचे समीकरण कसे आहे ते जाणून घेऊया. गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात
एकूण २.३९ कोटी (२,३९,७६,६७०) मतदार
आहेत. त्यापैकी १,२४,३३,३६२ पुरूष
तर १,१५,४२,८११ महिला मतदार आहेत. याशिवाय पहिल्या
टप्प्यात ४९७ तृतीय लिंग मतदारही मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
25,434 मतदान केंद्रे
मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये
म्हणून निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यासाठी एकूण 25,434 मतदान केंद्रे उभारली आहेत. त्यापैकी 9,018 शहरी मतदान केंद्रे आणि 16,416 ग्रामीण
मतदान केंद्रे आहेत. दक्षिण गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र प्रदेशातील 19 जिल्ह्यांतील एकूण 89 जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या गुजरात निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या, तर
काँग्रेस केवळ 77
जागांवर घसरली होती.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दिग्गजांनी ताकद
पणाला लावली होती
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या
पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी सायंकाळी ५ वाजता संपला. निवडणूक प्रचाराच्या
शेवटच्या टप्प्यात सत्ताधारी भारतीय जनता
पक्षाने राज्यभर अनेक सभा घेतल्या. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री
हिमंता बिस्वा सरमा आदींचा समावेश होता.
त्याचवेळी
काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पक्षाचा जोरदार
प्रचार केला.