Monday, December 6, 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जेजुरी येथील अस्थी स्मारक हे राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणी साठी जेजुरी येथे एक दिवसीय धरणे आंदोलन

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जेजुरी येथील अस्थी स्मारक हे राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणी साठी जेजुरी येथे  एक दिवसीय धरणे आंदोलन



  जेजुरी दि.६

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्ती स्मारकाचे राष्ट्रीय स्मारकामध्ये रूपांतर करण्याच्या मागणीसाठी आज (दि.६)जेजुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

       तमाम महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे जेजुरी मध्ये खंडोबा गड पायथ्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थीस्मारक हे अतिशय दुर्लकक्षित आवस्थेत आहे. ज्या महामानवाला जागतिक कीर्तीचे विचारवंत म्हणून संबोधले जाते त्या महामानवाच्या अस्थी उपेक्षित वंचित ठेवण्यात आलेल्या आहेत त्या महामानवाचे अस्थी स्मारक राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणीसाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ना अभिवादन करुन परिवर्तनवादी भिमशक्ती चे अध्यक्ष ॲड विजय गव्हाळे व सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंकज धिवार यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन पार पाडले या वेळी आंबेडकर चळवळीतील सर्व संघटना, भारतीय बौद्ध महासभा पुरंदर तालुका तसेच जेजुरी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते जयदिप बारभाई व हजारो कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. यावेळी सासवड व जेजुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धा कृती पुतळे हे पूर्णाकृती पुतळे व्हावे आशीही मागणी करण्यात आली. त्याचबरोबर दरवर्षी शासकीय इतमामात ६  डिसेंबर व १४ एप्रिल रोजी शासकीय मानवंदना देण्यात यावी. जो पर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सातत्याने हा लढा सुरू ठेवण्यात येईल असे ॲड.विजय गव्हाळे यांनी म्हटले आहे.



No comments:

Post a Comment

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...