बैलगाडी शर्यतीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी
पुणे दि.१६
तब्बल सात वर्षांच्या प्रतिक्षे नंतर आता बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. बैलगाडा शर्यतीचं प्रकरण आता घटनापीठाकडे देण्यात आले आहे. आज ३ न्यायाधीशांच्या बेंच समोर सुनावणी पार पडली. न्या. खानविलकर, न्या. रविकुमार न्यायाधीश माहेश्र्वरी यांच्या समोर ही सुनावणी पार पडली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहोतगी यांनी राज्य सरकारकडून बाजू मांडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यात बैलगाडा शर्यतीची प्राचीन परंपरा आहेच मात्र तो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि अतिशय आवडीचा छंद म्हणून या शर्यतींकडे पाहिलं जातं. मात्र हायकोर्टाने या शर्यतींवरती बंदी घातल्यापासून शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे, आणि त्यामुळेच बैलगाडा मालक आणि राज्य सरकारवर या शर्यती सुरु करण्यासाठी विनंती आणि दबाव आणत होते. राज्यातील बैलगाडा शर्यंतींवरील बंदी हटवण्याबाबत महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेची आज सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली. दरम्यान राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर असून या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दुध उत्पादन आणि पैदास वाढविण्यासाठीही महत्त्वाची असून त्यासोबतच बैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती बैलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत त्यामुळे शर्यत सुरु होणे गरजेचे आहे अशी याचिका राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.