Thursday, December 16, 2021

बैलगाडी शर्यतीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी


 बैलगाडी शर्यतीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी


 पुणे दि.१६


    तब्बल सात वर्षांच्या प्रतिक्षे नंतर आता बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. बैलगाडा शर्यतीचं प्रकरण आता घटनापीठाकडे देण्यात आले आहे. आज ३ न्यायाधीशांच्या बेंच समोर सुनावणी पार पडली. न्या. खानविलकर, न्या. रविकुमार न्यायाधीश माहेश्र्वरी यांच्या समोर ही सुनावणी पार पडली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहोतगी यांनी राज्य सरकारकडून बाजू मांडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

      राज्यात बैलगाडा शर्यतीची प्राचीन परंपरा आहेच मात्र तो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि अतिशय आवडीचा छंद म्हणून या शर्यतींकडे पाहिलं जातं. मात्र हायकोर्टाने या शर्यतींवरती बंदी घातल्यापासून शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे, आणि त्यामुळेच बैलगाडा मालक आणि राज्य सरकारवर या शर्यती सुरु करण्यासाठी विनंती आणि दबाव आणत होते. राज्यातील बैलगाडा शर्यंतींवरील बंदी हटवण्याबाबत महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेची आज सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली. दरम्यान राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर असून या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दुध उत्पादन आणि पैदास वाढविण्यासाठीही महत्त्वाची असून त्यासोबतच बैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती बैलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत त्यामुळे शर्यत सुरु होणे गरजेचे आहे अशी याचिका राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

Monday, December 6, 2021

शिवतक्रार येथे विद्यार्थ्यांचे स्वागत ; प्राथमिक शाळा सुरू

 शिवतक्रार येथे विद्यार्थ्यांचे स्वागत ; प्राथमिक शाळा सुरू

     


   दि.६


            राज्यात २०महिन्यानंतर आता प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत.नीरा येथील शिवतक्रार येथील जि प प्राथमीक शाळा शिवतक्रार येथे इयत्ता १ ते ४ ची शाळा उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाली आहे.मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच द डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला .
        नीरा येथील शिवतक्रार येथील शाळेत प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य संदीप धायगुडे यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.२० महिन्यानंतर शाळा सुरू झाल्याने मुलांमध्ये तसेच पालकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.त्याच बरोबर यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरी निर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
      
      याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री उत्तम लकडे , ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप धायगुडे, वर्षा जावळे, वैशाली बंडगर, व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत निरा यांच्यावतीने विद्यार्थ्यांची तापमान मोजण्यासाठी ऑक्सीमीटर व थर्मलगण इत्यादी देण्यात आले तर विद्यार्थ्यांसाठी मास्कचे ग्रामपंचायतीच्यावतीने वाटप करण्यात आले .या प्रसंगी ग्राम पंचायत समिती पुरंदरच्या विषय तज्ञ शेख मॅडम यांनी भेट दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रम शील शिक्षक श्री दत्तात्रय हाडंबर यांनी केले व आभार श्री नंदकुमार चव्हाण यांनी मानले.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन दि.६

 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन



      दि.६


     आज सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. देशामध्ये या निमित्त डॉ.बाबासाहेबांना अभिवादन केलं जातं. पुरंदर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. 

      


              पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा ग्रामपंचायत कार्यालया मध्ये त्याच बरोबर सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या कार्यालयांमध्ये ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश काकडे नीरा पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर पिंगोरी येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये पोलीस पाटील राहुल शिंदे आणि आरोग्य सेवक दळवी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नीरा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते त्याचबरोबर पिंगोरी येथे पिंगोरी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार संजय जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने नीरा येथे जल्लोष

 पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार संजय जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने नीरा येथे जल्लोष



 नीरा दि.६

        जिल्हा बँकेच्या नीवडणुकित पुरंदर तालुका सोसायटी मतदार संघातून संजय जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने त्याची जिल्हा बँके वरील निवड निश्चित झाली आहे.त्यामुळे नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीले पेढे वाटून व फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला आहे...यावेळी उपसरपंच राजेश काकडे,माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे,कल्याण जेधे,ग्रामपंचायत सदस्य अभिजित भालेराव, जावेद शेख,अभिजित जगताप, राजेंद्र निगडे, इजाज पठाण,दत्ता निंबाळकर, राहुल चव्हाण,अनिकेत शिंदे ऋत्विक बाबर,उमेश तिकोने,सुनील गवळी राजू मनेर,आदी उपस्थित होते

नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली नीरा व वाल्हा येथील पत्रकारांची आरोग्य तपासणी

 नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली नीरा व वाल्हा येथील पत्रकारांची आरोग्य तपासणी 



 नीरा दि.६


     मराठी पत्रकार परिषदेच्या ८३व्या वर्धापनदिना निमित्त पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना परिषदेचे विश्वस्थ एस.एम.देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यास अनुसरून नीरा प्रेस कल्बच्यावतीने पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज दि.६ डिसेंबर रोजी ही आरोग्य तपासणी करण्यात आली. 


    यावेळी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. समिक्षा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी सर्व तपासण्या केल्या. यामध्ये रक्ताची तपासणी, रक्तगट, H.B A1c, थायरॉईड, शुगर,लिपिड प्रोफाईल यांसह इतर तपासण्या करण्यात आल्या. हे रक्त नमुने बारामतीच्या मंगल लँब येथे पाठवण्यात आले आहेत. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक बाप्पु भंडलकर, आरोग्य सेवीका बेबी तांबे, परिचारक सचिन गायकवाड, लँब अँसिस्टन अमित चव्हाण, सत्वशिला बंडगर यांनी आरोग्य शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. नीरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी यावेळी आरोग्यमय शुभेच्छा दिल्या व नाष्टाची सोय केली.


    यावेळे नीरा प्रेस क्लबचे जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ननवरे, पुणे जिल्हा सोशल मिडियाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य रामदास राऊत, विजय पवार, सोशल मिडियाचे सचिव स्वप्नील कांबळे, सोशल मिडियाचे कार्यकारणी सदस्य समिर भुजबळ, एम. एम. अतार, महावीर भुजबळ, श्रद्धा जोशी, सुरज अतार, सुभाष जेधे आदी उपस्थित होते. मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जेजुरी येथील अस्थी स्मारक हे राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणी साठी जेजुरी येथे एक दिवसीय धरणे आंदोलन

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जेजुरी येथील अस्थी स्मारक हे राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणी साठी जेजुरी येथे  एक दिवसीय धरणे आंदोलन



  जेजुरी दि.६

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्ती स्मारकाचे राष्ट्रीय स्मारकामध्ये रूपांतर करण्याच्या मागणीसाठी आज (दि.६)जेजुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

       तमाम महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे जेजुरी मध्ये खंडोबा गड पायथ्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थीस्मारक हे अतिशय दुर्लकक्षित आवस्थेत आहे. ज्या महामानवाला जागतिक कीर्तीचे विचारवंत म्हणून संबोधले जाते त्या महामानवाच्या अस्थी उपेक्षित वंचित ठेवण्यात आलेल्या आहेत त्या महामानवाचे अस्थी स्मारक राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणीसाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ना अभिवादन करुन परिवर्तनवादी भिमशक्ती चे अध्यक्ष ॲड विजय गव्हाळे व सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंकज धिवार यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन पार पाडले या वेळी आंबेडकर चळवळीतील सर्व संघटना, भारतीय बौद्ध महासभा पुरंदर तालुका तसेच जेजुरी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते जयदिप बारभाई व हजारो कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. यावेळी सासवड व जेजुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धा कृती पुतळे हे पूर्णाकृती पुतळे व्हावे आशीही मागणी करण्यात आली. त्याचबरोबर दरवर्षी शासकीय इतमामात ६  डिसेंबर व १४ एप्रिल रोजी शासकीय मानवंदना देण्यात यावी. जो पर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सातत्याने हा लढा सुरू ठेवण्यात येईल असे ॲड.विजय गव्हाळे यांनी म्हटले आहे.



Sunday, December 5, 2021

मावडी येथे बांधकाम विभागाने अपघात ग्रस्त ठिकाणी तातडीने केली दुरुस्तीस सुरुवात

 मावडी येथे बांधकाम विभागाने अपघात ग्रस्त ठिकाणी तातडीने केली दुरुस्तीस सुरुवात




    जेजुरी दि.५

          

       जेजुरी मोरगाव रस्त्यावर काल दोन चारचाकी एका दुचाकीचा अपघात झालेल्या ठिकाणची दुरुस्ती करण्याचे काम बांधकाम विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी अजिंक्य तेकवडे यानी केली होती.याची दखल घेत हे काम सुरू करण्यात आले आहे.

       


        काल जेजुरी मोरगाव रोडवर मवडी का.प.येथील जवळार्जुन फाटा येथे रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे चार अपघात झाले व त्याअगोदर गेल्या पाच ते सहा महिन्यात जवळपास 100 ते 110 छोटे-मोठे अपघात झाले आहेत.त्यामुळे मावडी व जवळार्जुन येथील संतप्त नागरिकांनी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अजिंक्यभैय्या टेकवडे यांनी या रस्त्याची दुरुस्ती करून अपघाताचे सत्र न थांबविल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.

त्याचबरोबर संबंधित कामासाठी बारामती मतदार संघाच्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्याशी संपर्क साधला. तसेच मा.अशोकभाऊ टेकवडे (मा. आमदार), माणिकराव झेंडे पाटील (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदर तालुका), बापूसो भोर, सुकुमार भामे, सोमनाथ कणसे (सरपंच) या सर्वांनी प्रयत्न केल्यामुळे कालच सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता दुरुस्ती सुरुवात करून अपघात होऊ नयेत म्हणून इतरही उपाययोजना करण्याचे नियोजन तातडीने सुरू केले आहेत. बांधकाम खात्याने दखल घेऊन दुरुस्ती करण्यास सुरुवात करून पुढील अपघात टाळणे बाबत नियोजन केल्यामुळे अजिंक्य टेकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले व शासनाने दखल घेतल्याबद्दल व खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्वरित दखल घेतल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.

     यावेळी सचिन टेकवडे (ग्रा. पं. सदस्य), तेजस चाचर, दत्तात्रेय भामे, सोमनाथ खोमणे सर, महेंद्र भामे, विकास चाचर, विठ्ठल झगडे, आकाश चाचर, संतोष भामे, नारायण गुळूमकर, संतोष टेकवडे, तुषार लव्हाळे, अनिकेत लव्हाळे, सनी चाचर, दादा पांडे, राजेंद्र जगताप, ओंकार टेकवडे, हरी गोळे व मावडी क.प. आणि जवळार्जुन गावचे नागरिक उपस्थित होते.

मावडी क.प.येथे ग्रामस्थांच्यावतीने ऊसतोड मजुरांना मदत

 मावडी क.प.येथे ग्रामस्थांच्यावतीने ऊसतोड मजुरांना मदत 

      जेजुरी दि.५

           


        पावसाने नुकसान झालेल्या ऊस तोड मजुरांच्या मदतीसाठी मावडी येथील ग्रामस्थ तसेच शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी येथील शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी पुढाकार घेतला आहे. या ऊस तोड मजुरांना आज जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले आहे.

         

        गेल्या चार-पाच दिवसांपासून पुरंदर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शेती , शेतकरी आणि ऊसतोड मजुरांचे अतोनात नुकसान आणि हाल झाले आहेत. सोमेश्वर कारखानान्यासाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या राहत्या झोपड्या आणि संसार जलमय होऊन गेले आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काही एक मदतीचा हात म्हणून मावडी क. प. येथील उद्योजक सत्यवान चाचर, संकेत मोहन चाचर, तेजस चाचर, आकाश हनुमंतराव चाचर तसेच शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी येथील शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी मजुरांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप करुन त्यांना मदतीचा हात दिला आहे. या मदतीबद्दल समस्त मंजुर वर्गांने समाधान व्यक्त केले आहे. 

       


  

          यावेळी मावाडी गावचे पोलीस पाटील दादासो पांडे, सोमेश्वर कारखान्याचे आनंदा पाटोळे, सुकुमार भामे, विलास चाचर, विकास चाचर,सनी चाचर, दत्तात्रय भामे, सुनिल भामे, किशोर भामे, संतोष भामे, बाळासाहेब गायकवाड, सचिन गायकवाड, योगेश विभाड, योगेश भामे, राजेंद्र भामे, देवीदास जगताप, मानसिग भामे, बाळासाहेब जगताप, ललित जगताप,बाबा तोरवे, आप्पा तोरवे, काशिनाथ तोरवे ग्रामस्थ आणि युवा कार्यकर्तै उपस्थित होते. यापूर्वीही या युवकांनी अशी सामाजिक मदत केली आहे. अशा मदतीचे या परिसरात कौतुक होत आहे.*

Saturday, December 4, 2021

मतदार यादीतील दुबार नावे वगळण्याच्या मागणीसाठी सासवड तहसील समोर उपोषण.

 मतदार यादीतील दुबार नावे वगळण्याच्या मागणीसाठी सासवड तहसील समोर उपोषण.


  निवडणूक शाखेच्या आश्वासनानंतर उपोषण १५ दिवस साठी स्थगिती 


  दि.३

  

     पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावातील नागरिकाची मतदार यादीत लावलेली दुबार नावे वगळण्याच्या मागणीसाठी आज पुरंदरच्या तहसील कार्यालयासमोर नितीन निगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळपासून उपोषण सुरू केले होते.

       दुपारी तीन वाजता निवडणूक विभागाच्यावतीने दुबार नावे १५ दिवसात काढून टाकण्याचे आश्वासन दिल्या नंतर दुपारी ३ वाजता हे उपोषण तत्पूर्ते स्थगित करण्यात आले आहे. गुळूंचेसह तालुक्यातील अनेक गावामध्ये मतदार यादीत.दुबार नावे नोंदवण्यात आली आहेत. अनेक वेळा सांगूनही ही नावे वगळण्यात येत नसल्याने निगडे यानी नाराजी व्यक्त केली आहे.तसेच १५ दिवसात ही नावे न वगळल्यास अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे..

जेजुरी मोरगाव रोडवर दोन चारचाकी वाहनांचा व एका दुचाकीचा अपघात. सुदैवाने कोणीही

 जेजुरी मोरगाव रोडवर दोन चारचाकी वाहनांचा व एका दुचाकीचा अपघात.

  सुदैवाने कोणीही जखमी नाही

   

 


जेजुरी दि.४

  

    पुरंदर तालुक्यातील जेजुरी मोरगाव रोडवर मावडी गाव परिसरात सातत्याने अपघात होत असतात. आज दिनांक ४ डिसेंबर रोजी देखील सकाळी १० ते १२ वाजण्याच्या सुमारास दोन चार चाकी वाहने तसेच एक दुचाकीचा असे तीन स्वतंत्र अपघात झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही. 



      या ठिकाणी राष्ट्रवादी युवकया काँग्रेसचे बारामती लोकसभेचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांनी तातमीडीने भेट दिली आणि गाडीतील प्रवाशांची विचारपूस केली. तसेच या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून ताबडतोब रस्त्याची दुरुस्ती करण्याची विनंती केली. तसे न झाल्यास या ठिकाणी दहा दिवसात मोठा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.



पुणे पंढरपूर मार्गावर पिंपरे येथे वाळलेल्या झाडामुळे अपघाताचा धोका ; रस्ते विभागाने हे झाड

 पुणे पंढरपूर मार्गावर पिंपरे येथे वाळलेल्या झाडामुळे अपघाताचा धोका ;


 रस्ते विभागाने हे झाड त्वरित काडण्याची स्था


निकांची मागणी

   नीरा दि.

  

      पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर महामार्गावर नीरा नजीक पिंपरे येथे दोन वाळलेली आंब्याची झाडे यमदूत म्हणून उभे आहेत.  मात्र याकडे पीडब्ल्यूडीचा कोणताही अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे याठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.

     आज सकाळी या एका झाडाची फांदी रस्त्यावर पडली सुमारे ७० ते ८० किलो वजनाचे फांदी चार चाकी कार वर पडली असती. मात्र दैव बलवत्तर म्हणून हा कारचालक व त्यातील प्रवाशी वाचले.ती फांदी स्थानिक लोकांनी रस्त्यावरून बाजूला केली आहे.मात्र गेली पाच ते सहा वर्ष हे वाळलेले झाड तसेच उभे आहे.हे झाड तातडीने काढून टाकावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. याबाबत केंद्रीय बांधकाम विभागाच्या श्रुती नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नसल्याने बंधक.विभागाची अडचण समजू शकली नाही.

   " आजा सकाळी ९ वाजले च्या सुमारास या वाळलेल्या आंब्याच्या झाडाची फांदी रस्त्यावर पडली.पावसामुळे वाळलेल्या फांद्या जड होतात.त्यात पावसाचे पाणी मुरत राहते त्या कुजलेल्या फांद्या मग केव्हाही खाली पडतात.त्यातून एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.त्यामूळे संबधित लोकांनी तातडीने या फांद्या काढून टाकाव्यात "

     ;- उत्तम टकले स्थानिक नागरिक

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...