पोस्ट्स

फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव कधी प्रभू श्रीरामांचा रथोत्सव यावर्काषी कसा आहे ?

इमेज
 फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव कधी   प्रभू श्रीरामांचा रथोत्सव यावर्काषी कसा आहे ? फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव सुरु : यात्रेचा मुख्य दिवस दि.२ डिसेंबर  फलटण :       सातारा जिल्ह्यासह राज्यभरात प्रसिद्ध असलेली फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव सुरु झाला आहे. श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवार दि. २७ नोव्हेंबर पासून श्रीराम मंदिर परिसरात दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत प्रभावळ, अंबारी, शेष, गरुड आणि मारुती या ५ वाहनांद्वारे परंपरागत पद्धतीने मिरवणूक काढण्यास सुरुवात  झाली आहे. प्रतिवर्षी ही वाहने व मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. दिनांक २ डिसेंबर हा फलटणच्या रथोत्सवचा मुख्य दिवस आहे.       फलटण (जिलहा सातारा) येथील ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा सोमवार दि. २ डिसेंबर हा या यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी श्रीरामाचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी निघणार असून परंपरागत मार्गाने नगर प्रदक्षिणा पूर्ण ...

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

इमेज
 पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी.   याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..  पुरंदर :      राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा ज्वर वाढत असतानाच पुरंदर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रशासकीय इमारत सासवड मध्ये होत आहे. पोस्टल मतदान मोजणीला सकाळी सुरवात झाली. यामध्ये पहिल्या फेरीत विजय शिवतारे 1,820 ने पुढे, शिवतारेंना 4727 मते संजय जगताप दुसऱ्या क्रमांकावर 2907 तर संभाजी झेंडे तीसऱ्या क्रमांकावर 1554 होते.  शेवटच्या 30 व्या फेरी अखेर महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी 24 हजार 188 मतांनी आमदार संजय जगताप यांच्या वर दणदणीत विजय मिळवला आहे.         पुरंदर विधानसभा निवडणुकीत यावर्षी विक्रमी ६१.०२ टक्के मतदान झाले होते. १६ उमेदवार आपले आमदारकीचे नशीब आजमावत असले तरी, महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महायुतीतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्यातच खरी ल...

पुरंदर विधानसभा मतदारसंघ मतमोजणी करिता प्रशासन सज्ज

इमेज
 पुरंदर विधानसभा मतदारसंघ मतमोजणी करिता प्रशासन सज्ज पुरंदर :         पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी 413 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाच्या अनुषंगाने उद्या शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता नवीन प्रशासकीय इमारत सासवड या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.     मतमोजणी निवडणूक निरीक्षक  म्हणून कुमार राजीव रंजन (भा.प्र.से.) यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांचे समन्वय अधिकारी मिलिंद टांकसाळे, उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर-१ हे असतील. मतमोजणी कामकाजाकरिता विविध २६ पथके स्थापन करण्यात आलेली असून त्यामध्ये एकूण १२६ अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.तसेच आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे. मतमोजणीसाठी १४+(२ राखीव) टेबलचे नियोजन करण्यात आले असून त्यात प्रत्येकी तीन कर्मचारी असतील व दिवसभरामध्ये 30 फेऱ्यांमध्ये मतमोजणीचे काम पूर्ण होईल.        नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये  विशेष माध्यम कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून त्...

हाय व्होल्टेज बारामतीत विक्रमी मतदान काका पुतण्याचे भविष्य मतदान यंत्रात

इमेज
 हाय व्होल्टेज बारामतीत विक्रमी मतदान  काका पुतण्याचे भविष्य मतदान यंत्रात  बारामती : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या बारामती तालुक्यातील तब्बल 71. 57% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. गेली महिनाभरापासून काका पुतण्याच्या या लढाईमध्ये कोण जिंकणार याची मोठी चर्चा राज्य व रंगत असताना, बारामतीत उत्स्फूर्तपणे मतदान झाल्याने याचा फायदा व तोटा नक्की कोणाला होतो हे उद्याच्या 23 तारखेला सिद्ध होईल.     201 बारामती विधानसभा मतदार संघात 3लाख 80 हजार 608 मतदारांची नोंद आहे. पैकी 2 लाख 72 हजर 408 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 1 लाख 42 हजार 996 पुरुष मतदार, 1 लाख 29 हजर 401 महिला मतदार तर 11 तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे बारामती विधानसभा निवडणुकीत विक्रमी 71.57टक्के मतदारांनी मतदान करुन काका पुतण्याचे भविष मतदान यंत्रात बंद केले आहे. शनिवार दि. 23 रोजी मतमोजणी नंतर निकाल स्पष्ट होईल. 

पुरंदर विधानसभा निवडणुकीत झाले इतके मतदान सकाळ संध्याकाळी मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रावर.

इमेज
  पुरंदर विधानसभा निवडणुकीत झाले इतके मतदान  सकाळ संध्याकाळी मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रावर.  पुरंदर :      पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३.०२ टक्के मतदान झाले होते, रात्री सव्वा अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार ६०.०१ टक्के मतदान झाले आहे. सकाळी वेगात मतदान झाले, दुपारी वेग मंदावला असला तरी सायंकाळी चार ते सहा दरम्यान मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला.       पुरंदर विधानसभा निवडणुकीत १६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत ४.२८ टक्के, अकरा वाजेपर्यंत १४.४ टक्के, एक वाजेपर्यंत २७.३५ टक्के, तीन वाजेपर्यंत ४०.३२ टक्के, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३.०२ टक्के, तर सायंकाळी पाच नंतर मतदान प्रक्रिया संपेपर्यंत ६०.०१ टक्के मतदान झाल्याची माहिती पुरंदरच्या निवडणूक अधिकारी वर्षा लांडगे यांनी रात्री सव्वा अकराच्या सुमारास दिली आहे.     पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी २ लाख ४० हजार ५३८ पुरुष मतदार, २ लाख २३ हजार ४४६ मह...

पुरंदरमध्ये मतदान साहित्याचे वाटप संपन्न

इमेज
  पुरंदरमध्ये मतदान साहित्याचे वाटप संपन्न  पुरंदर :        उद्या दि.20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी करता पुरंदर हवेली मतदार संघामधील सर्व 413 मतदान केंद्रांकरिता मतदान साहित्य जसे की सीलबंद ईव्हीएम कंट्रोल युनिट, दोन सीलबंद ईव्हीएम बॅलेट युनिट, सीलबंद व्हीव्हीपॅट, मतदान केंद्रंवर वापरले जाणारे शाही इ. वस्तूंचे वाटप 413 विविध मतदान केंद्रंवरील पथकांना करण्यात आले.  यासाठी नवीन प्रशासकीय इमारत तळमजल्यावर भव्य मंडप व्यवस्था करून 41 टेबल लावण्यात आले होते. सदर ठिकाणी दोन अग्निशामक बंब, ॲम्बुलन्स, आशा आपत्कालीन सेवा ही देण्यात आल्या होत्या. निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता,पोलीस कर्मचाऱ्यांकरिता भोजन व्यवस्था ही करण्यात आली होती. मतदान साहित्य आपापल्या मतदान केंद्रावर घेऊन जाण्याकरिता 61 बसेस व सात जीप अशा एकूण 68 वाहनांची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली होती.  यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक नसीम खान, निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के, सर्व समन्वय अधिकारी सर्व क्षेत्री...

१८ नोव्हेंबरला संध्याकाळी सहानंतर सायलेंट पिरियड सुरू ; मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी.

इमेज
 १८ नोव्हेंबरला संध्याकाळी सहानंतर सायलेंट पिरियड सुरू ;  मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी.  पुरंदर :       पुरंदर विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदारांना मतदान करतांना आपले ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत ठेवणे बंधनकारक आहे. यासाठी आधारकार्ड, वोटर आयडी, वाहन परवाना असे एकूण बारा दस्ताऐवज निवडणूक आयोगाने ओळखपत्र म्हणून ग्राह्य घोषित केले आहे. त्यापैकी कोणतेही एक ओळखपत्र बुधवारी मतदान करतांना मतदाराने मतदान अधिकारी यांना दाखवून आपली ओळख दर्शवूनच मतदान करता येणार आहे. त्यामुळे बारा ग्राह्य ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदान करतांना सोबत बाळगणे गरजेचे असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे यांनी सांगितले.     जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सर्व मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मतदानाच्या दिवशी, बुधवारी सकाळी सहा ते मतदान संपेपर्यंतच्या कालावधीत मतदारांना मोबाइल वापरण्यास मनाई असल्याचा आदेश दिला आहे. मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करून गोपनीयतेचा भंग करणे हा निवडणूकविषयक गुन्हा आहे. त...