निरेच्या शिरपेचात मानाचा तुरा.. या कलाकाराला पुन्हा राज्य शासनाचा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित
निरेच्या शिरपेचात मानाचा तुरा..
अमर झेंडे यांना पुन्हा राज्य शासनाचा पुरस्कार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित
पुरंदर : निरा येथिल अमर झेंडे यांना या वर्षीचा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या चित्रपट पुरस्कारांमध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोमवारी (दि.१२) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते 'ऐतिहासिक लूक' डिझाईन 'प्रोस्थिटिक मेकअप आर्टिस्ट' म्हणून अमर लालासो झेंडे यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी ६० आणि ६१ वा सोहळा मुंबईच्या वरळी येथील एन.एस.सी.आय. च्या डोम मध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती. यावर्षी विविध श्रेंणीमध्ये महत्त्वपूर्ण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार. यांच्या हस्ते पुरस्कार चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ऐतिहासिक लूक डिझाईन प्रोस्थिटिक मेकअप आर्टिस्ट म्हणून निरा (ता.पुरंदर) येथील अमर लालासो झेंडे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्राच्या मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेल्या शिवप्रताप गरूडझेप, छावा, केसरी २ या चित्रपटात अमर झेंडे यांनी विविध पात्रांना ऐतिहासिक लुक डिझाईन केले होते.
निरेतील प्रसिद्ध सलुनचा व्यावसायिक, समर्थ फेटेवाले ते टिव्ही मालिका व चित्रपटातील दिग्गज कलाकारांचे मेकअप आर्टिस्ट असा प्रवास करणारे अमर झेंडे यांचा मुंबईत सन्मान करण्यात आल्याने निरेकर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. झेंडे यांना यापूर्वी ही राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच झि युवा पुरस्काराने ही नुसतेच सन्मानित करण्यात आले होते. निरेच्या सरपंच तेजश्री काकडे उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य संदिप धायगुडे, प्रसिद्धी कॉन्ट्रॅक्टर राहुल थोपटे, राजेंद्र थोपटे, विलास थोपटे, अभय थोपटे यांनी झेंडे यांनी केले. निरा शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा म्हणून झेंडे यांच्याकडे पाहिले जात आहे.
Comments
Post a Comment