पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?
 
 पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले.  नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?  पुरंदर :        नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार. भरधाव स्कॉर्पिओनी सुमारे सहा दुचाकींना धडक देत दुचाकीस्वारांना जखमी केले असून. सर्वांवर नीरेतील विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर जखमींना बारामती व लोणंद येथे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कार्पियो क्र. एम.एच. ४२- एक. क्यू. ७८७८ या गाडीतील ऐका महिलेला सर्पदंश झाल्याने चालक गाडी वेगात दामटत असल्याचे समोर आले आहे.     मंगळवारी (दि.२९) रोजी रात्री नऊच्या सुमारास होळ (ता. बारामती) येथील एका गरोदर महिलेला सर्पदंश झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्या महिलेला थेट स्कार्पिओ गाडीत बसून आधी सोमेश्वरनगर व नंतर त्यांची टिर्टमेंट असलेल्या नीरा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाचारण केले. नीरा बारामती रोडने वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने स्कार्पिओ चालकाला गाडी वेगात चालवणे कठीण जातं होते. अती वेगात असलेल्या या स्कार्पिओ चालकाने गाडी कधी रस्त्याच्या मध्यावरुन त...
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
