Thursday, April 17, 2025

बारामती मधील 98 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडतीची तारीख ठरली. ग्रामपंचायतीचे सरपंच होऊ पाहणाऱ्यांच्या हृदयाची' धक धक' वाढली.

 बारामती मधील 98 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडतीची तारीख ठरली.

ग्रामपंचायतीचे सरपंच होऊ पाहणाऱ्यांच्या हृदयाची' धक धक' वाढली.



   बारामती (१८)


 आगामी काळात होऊ घातलेल्या बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सोडती संदर्भात तहसील कार्यालयाने एक पत्र प्रसिद्ध केले आहे त्यानुसार बारामती तालुक्यात पुढील काळात 98 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची निवडणूक प्रक्रिया राबवले जाणार असून या संदर्भात सरपंच पदाच्या आरक्षण सोडत जाहीर करण्यासाठी 23 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. 


      दिनांक 23/04/2025 रोजी कवि मोरोपंत सभागृह इंदापूर रोड बारामती येथे सकाळी 12:00 वाजता आरक्षण सोडत म्हणजेच ड्रॉ घेतला जाणार आहे..जिल्हाधिकारी पुणे (ग्रामपंचायत शाखा) यांचेकडील दिनांक 17/04/2025 रोजीच्या निर्देशान्वये बारामती तालुक्यातील एकुण 98 ग्रामपंचायतीचे सरपंचपदासाठी ही आरक्षण सोडत होणार आहे. याबाबतची माहिती बारामती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.




No comments:

Post a Comment

Featured Post

🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव

 🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव पुणे ग्रामीण | प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून निर्मा...