Monday, March 31, 2025

नीरा येथे रमजान ईद उत्साहात साजरी मुस्लिम आणि हिंदू बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत दिल्या शुभेच्छा

 नीरा येथे रमजान ईद उत्साहात साजरी 

मुस्लिम आणि हिंदू बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत दिल्या शुभेच्छा 



नीरा - ३१


             पुरंदर तालुक्यातील नीरा येथे सोमवारी (दि.३१) रोजी मुस्लिम बांधवांची पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लहान थोरांनी एकत्र येत मोठ्या श्रध्देने सामुदायिकरीत्या नमाजपठन केले. त्याग, सदभावना आणि मनशुद्धी करणा-या रमजान ईदनिमित्ताने मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत शुभेच्छा दिल्या. यावेळी हिंदू बांधवांनी देखील मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.





        नीरेतील स्टेशन मस्जिद येथे मौलाना हाफीज मेराज यांनी प्रवचन करीत हजरत मोहंम्मद पैगंबरांच्या आठवणींना उजाळा देऊन सामुदायिक नमाजपठन केले. तर हाजी हाफिज फत्तेहमोहंम्मद एज्युकेशनल ट्रस्टच्या ईदगाह मैदानात हाफिज मुज्जम्मिल तसेच अंजुमन तालीमुल कुरआन नीरा वार्ड नं.२ येथील मस्जिद मध्ये मौलाना.अमान उल्ला शेख यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण करण्यात आले. यावेळी नीरा व परिसरातील मुस्लीम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. त्यावेळी मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांच्या उन्नती, शांतता आणि एकात्मतेसाठी दुवा करण्यात आली. तसेच मोहंम्मद पैगंबर यांच्या शिकवणुकीला उजाळा देण्यात आला. 

              यावेळी स्टेशन मस्जिदमध्ये, उपसरपंच राजेश काकडे, नियोजन मंडळाचे सदस्य विराज काकडे, माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण,समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेश चव्हाण, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण ,प्रमोद काकडे, नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार सोमनाथ पुजारी , सहाय्यक फौजदार राजेंद्र भापकर , दिपक काकडे, अमोल साबळे, योगेंद्र उर्फ आण्णा माने (भाजप,प्रचारक) , दादा गायकवाड,आदींनी रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.

------------------------------------------------------------


   नीरा येथे अंडर पासचे काम लवकरच होणार .


  नीरा येथील स्टेशन मस्जिदमध्ये जाण्यासाठी लोकांना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते.त्यामुळे लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.याठिकाणी ओव्हर ब्रीज असावा अशी मागणी मुस्लिम बांधवांची अनेक वर्षापासून आहे. त्यासाठी आता अंडर पास पुलाठीचे एस्टिमेट तयार झाले आहे.लवकरच निधी मंजूर होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागणार असून येत्या वर्षभरात या पुलाचे काम पूर्ण होईल आणि पुढील वर्षापर्यंत तो पुल कार्यान्वित होईल अस यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे यांनी यावेळी सांगितले

Saturday, March 29, 2025

कोण तो वाघ्या ? वाघ्या बीग्या कोणी नाही असं म्हणत. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद घालणाऱ्या जातीयवादी नेत्यांना खा.उदयनराजेंनी फटकारले

 कोण तो वाघ्या ? वाघ्या बीग्या कोणी नाही असं म्हणत. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद घालणाऱ्या जातीयवादी नेत्यांना खा.उदयनराजेंनी फटकारले



राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोरच असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या संभाजी राजे छत्रपती यांनी या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली होती. यानंतर महाराष्ट्रातील काही जातीयवादी नेत्यांनी नेत्यांनी विनाकारण वाद निर्माण केला होता. यानिमित्ताने अनेकांनी तोंडसुख घेतले होते. मात्र यानंतर आज वढू बुद्रुक येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कोण तो वाघ्या बीघ्या कोण नाही. असं म्हणत वाघ्या कुत्र्याचा प्रश्न निकाली काढला आहे. अशाप्रकारे वाद होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलीय..

पहा उदयनराजे नक्की काय म्हणाले..



Wednesday, March 26, 2025

पत्रकारांनो सावधान.. तुम्हाला 250 कोटींचा दंड होऊ शकतो

 पत्रकारांनो सावधान..

तुम्हाला 250 कोटींचा दंड होऊ शकतो



मुंबई :

     "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे. सरकारचा हा कायदा रोखायचा कसा? यावर चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी मुंबईतील पत्रकारांच्या नऊ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक कालच आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघात घेतली. 


या कायद्याचे परिणाम काय होणार आहेत हे आम्ही समजून घेत असतानाच केंद्र सरकार पत्रकारितेवरच बुलडोजर (ही विद्यमान सरकारची आवडती मशिनरी आहे म्हणून हा ऊल्लेख) फिरवणारा डीपीडीपी अर्थात Digital personal data protection act

लागू करू पहात आहे. 


     आपल्या जनसुरक्षा कायद्यापेक्षा किती तरी पटीनं जालिम असा DPDP कायदा आहे. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या पत्रकारांना किंवा कोणालाही किती दंडाची तरतूद या कायद्यात आहे, माहिती आहे..?

तब्बल 250 कोटी

हो 250 कोटी रूपये..

ही रक्कम भरली नाही तर तो दंड 500 कोटींचा होऊ शकतो. या देशात नागरिकांचं सरासरी उत्पन्न 5,000 रूपये देखील नाही. पत्रकारांचे पगार 50,000 हजार पेक्षाही कमी आहेत, त्यांना जर 250 कोटींचा दंड आकारला जाणार असेल तर कोण आणि कश्यासाठी पत्रकारिता करेल? हा दंड ज्या पत्रकारावर, नागरिकावर बसेल तो, पुढील पाच-पंचवीस पिढ्या देखील ही रक्कम भरू शकणार नाही.

हे नक्की.

मग तुरूंगात खितपत पडावं लागेल.

दहशत बसविणे हाच या कायद्याचा उद्देश आहे. 

नाही तर 250 कोटींचा दंड कसा लावला जाईल?

इंग्रजांच्या काळात आणि आणीबाणीतही असं घडलं नव्हतं. 


    व्यक्तीगत माहितीचं संरक्षण करण्याबाबत कुणाचं दुमत नाही, पण अनुमती शिवाय कोणाचं नावंही छापता येणार नाही. म्हणजे एखाद्यानं भ्रष्टाचार केला, त्याची पुराव्यासह माहिती तुमच्याकडं असेल तरीही संबंधित व्यक्तीची परवानगी घ्यावी लागेल.

जो आरोपी आहे तो काय म्हणून अशी परवानगी देईल? नक्कीच देणार नाही.

मग बातमी काय आणि कशी छापायची?

की फक्त हवा - पाण्याच्या आणि फुला - फळांच्याच बातम्या देत छापायच्या?

सरकारला तेच वाटतंय.. 

डीपीडीपी मुळे माहितीचा अधिकार कायदा देखील गुंडाळला जाणार आहे. म्हणजे हा कायदा अर्थहीन ठरेल.

माहितीच्या अधिकाराखाली दरवर्षी 60 लाख अर्ज केले जातात. त्यातून मिळालेली माहिती आरटीआय कार्यकर्ते प्रसिध्द करतात. पण हा कायदा लागू झाला तर अशी माहिती संबंधित व्यक्तीच्या परवानगीशिवाय तुम्ही प्रसिध्द करू शकणार नाहीत.केलीच तर 250 कोटींचा दंड आहेच.

गंमत बघा, आपल्यावर हजार निर्बंध.पण विविध कंपन्या आपला जो डेटा चोरतात त्याबद्दल कायद्यात कोणतीच तरतूद नाही.

डिजिटल व्यक्तीगत डेटा संरक्षण अधिनियम 2023 मध्ये मंजूर झाला. त्याला 11 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. आता हा कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हा कायदा लागू झाला तर भ्रष्टाचार, मनमानी बोकाळेल, त्याविरोधात कोणीच आवाज उठवू शकणार नाही. म्हणूनच कायद्याला संघटीत विरोध झाला पाहिजे. विरोध तीव्र असेल तर सरकार माघार घेते हे वारंवार दिसले आहे. 


इंदिरा गांधी यांना खूष करण्यासाठी जगन्नाथ मिश्र यांनी बिहारमध्ये 1982 मध्ये बिहार प्रेस बिल आणले होते. देशभर त्याला विरोध झाला. जगन्नाथ मिश्र यांना माघार घ्यावी लागली.

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी 2017 मध्ये बिहार प्रेस बिलाच्या धर्तीवरच बिल आणून न्यायमूर्ती, लोकप्रतिनिधी, भूतपूर्व लोकप्रतिनिधी यांना कायद्यानं संरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता.

त्यालाही विरोध झाला. वसुंधरा राजे यांना माघार घ्यावी लागली. तेव्हा माघार घ्यावी लागली म्हणून आता मोदी सरकार DPDP Act लागू करत आहे. असं दिसतंय.


हा कायदा कोणालाच सूट देत नाही..

विरोधी पक्षांचे मिडिया सेल देखील याला अपवाद नाहीत. कोणावरही डेटा फ्युडिशियरी म्हणून कायद्याचा बडगा उगारला जाऊ शकतो. लोकशाहीसाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि देशाची हुकूमशाहीकडे सुरू झालेली वाटचाल रोखण्यासाठी DPDP कायद्याला विरोध करावाच लागेल. माझा या आणि अशा सर्वच कायद्यांना विरोध आहे..आपलाही विरोध नोंदवा.. 


*एस.एम.देशमुख*

Sunday, March 23, 2025

"सत्यता न पडताळता माहिती प्रसारित केल्यास समाजातील वातावरण बिघडते" : आ. दिलीप वळसे पाटील आंबेगाव तालुका पत्रकार संघाची एक दिवसीय कार्यशाळा मंचर येथे संपन्न : मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम

 "सत्यता न पडताळता माहिती प्रसारित केल्यास समाजातील वातावरण बिघडते" : आ. दिलीप वळसे पाटील 


आंबेगाव तालुका पत्रकार संघाची एक दिवसीय कार्यशाळा मंचर येथे संपन्न : मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम 



आंबेगाव : 


      "दिवसेंदिवस युट्यूब चॅनेल व नव माध्यमांची संख्या वाढत चालली आहे. त्यांनी खातरजमा न करता बातमी देऊ नये. सत्यता न पडताळता माहिती प्रसारित केल्यास समाजातील वातावरण बिघडते" असे मत माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.  आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंचर (ता. आंबेगाव) येथील जीवन मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या एक दिवसीय पत्रकारांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.


   मराठी पत्रकार परिषद मुंबई संचलित पुणे जिल्हा पत्रकार संघ व आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कर्यशाळेचे उद्घाटन माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे, टी.व्ही.9 मराठी चे संपादक उमेश कुमावत व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्तेदीप प्रज्वल्लाने झाले. 



     यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर,  डी. के. वळसे पाटील, संतोष वळसे पाटील, निलेश कान्नव, यांच्यासह आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यातील पत्रकार मोठ्या उपस्थित होते. 



"पत्रकारांनी कोणत्याही एका विचारला प्राधान्य न देता तटस्थ पत्रकारिता केली तरच पत्रकारितेला भविष्य आहे. अन्यथा पत्रकारितेला अनेक पर्याय उपलब्ध होतील. पत्रकारांनी बदलत्या काळानुसार नव तंत्रज्ञान आत्मसात करावे." असे मत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी व्यक्त केली. 


कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त देशमुख म्हणाले, "पत्रकारांची पेन्शन, पत्रकार भवन व पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा." 



     "पत्रकारांनी काम करताना विश्वासअहर्तता टिकवून काळानुरूप बदलले पाहिजे. ग्रामीण भागातील पत्रकारांनी जोडव्यवसाय करावा असे टी.व्ही.9 मराठी चे संपादक उमेश कुमावत यांनी सांगितले. 


यावेळी उल्लेखनीय क्षेत्रात काम केलेले प्रदीप देसाई, प्रशांत कडूसकर, उदय ढगे, भरत भोर, संदीप एरंडे, निलेश थोरात, दत्ता गांजाळे, पांडुरंग निघोट, अजय घुले, रत्ना गाडे, संजय थोरात या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. 



   कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हे तंत्रज्ञान कृषी क्षेत्राप्रमाणे पत्रकारितेतही क्रांती करणार आहे. पत्रकारिता क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापर करून कार्यक्षमता वाढविण्याच्या संधी आहेत असे मत शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

    


      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे, निलेश पडवळ यांनी केले. अशी माहिती पुणे जिल्हा पत्रकार संघ प्रवक्ता सावता झोडगे यांनी दिली.

Friday, March 21, 2025

आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा दैनिकांच्या संपादकासह मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख करणार मार्गदर्शन

 आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा 


दैनिकांच्या संपादकासह मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख करणार मार्गदर्शन 



पुणे : 

     आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यातील पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा मंचर (ता. आंबेगाव) येथे जीवन मंगल कार्यालयात रविवारी (ता. २३) आयोजित केली आहे. 


या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा पत्रकार संघ प्रवक्ता सावता झोडगे व जिल्हा समन्वयक रविंद्र वाळके पत्रकार  यांनी दिली. 


पहिल्या सत्रात 'सकाळ'चे मुख्य संपादक नीलेश खरे, 'टीव्ही 9 मराठी'चे संपादक उमेश कुमावत, 'लोकमत'चे संपादक संजय आवटे, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गजानन पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, प्रांत गोविंद शिंदे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे व पत्रकार डी. के. वळसे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

दुसऱ्या समारोप सत्रात दुपारी दोन वाजता 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस मार्गदर्शन करणार असून, 'म्हाडा'चे पुणे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष अड. स्वप्नील ढमढेरे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होईल. यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेले अधिकारी व मान्यवरांचा सन्मान केला जाईल.

Thursday, March 20, 2025

पाच दिवसांपासून जनावर नीरा डाव्या कालव्यात अडकले. वाहत्या पाण्यात मृत जनावर कुजलेल्या अवस्थेत, प्रदूषित पाणी वाहते.

 पाच दिवसांपासून जनावर नीरा डाव्या कालव्यात अडकले. 


वाहत्या पाण्यात मृत जनावर कुजलेल्या अवस्थेत, प्रदूषित पाणी वाहते. 



पुरंदर : 


      नीरा पाटबंधारे विभागाचा भोंगळा कारभार समोर येत आहे. गेली पाच दिवस नीरा डाव्या कालव्यामध्ये एक जनावर अडकून पडले आहे. ते आता पोकळेवस्ती येथे अडकले असल्याचे समजते. यामुळे वाहत्या पाण्यामध्ये धोकेदायक जिवाणू जात आहेत. याबाबत मागील पाच दिवसांपूर्वी सोशल मिडियातून या पाण्यात अडकलेल्या जनावराचा फोटो व्हायरल झाले होते. ते आजही कुजलेल्या अवस्थेत असून कालव्याचे वाहते पाणी प्रदूषित होत आहे. यामुळे  परिसरात प्रचंड दुर्गंधी येते असून, स्थानिक शेतकऱ्यांना त्रास होत आहे. 


    नीरा डाव्या कालव्याच्या पिंपरे थोपटेवाडी हद्दीत हे जनावर पाण्यात ढकल्याचा अंदाज  स्थानिकांनी व्यक्त केला आहे. पुथेनिरा शिवतक्रार हद्दीतील एक लोखंडी पाईप लाईन मध्ये ते मृत जनावर अडकले. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी नीरा शिवतक्रार पासून खालील गावांनी हे पाणी पिऊ नये असा इशारा देण्यात आला. आत हे जनावर नीरा गवातील पोकळेवस्ती हद्दीतील नीरा डाव्या कालव्यात अडकलेल्या अवस्थेत आहे. मात्र पाटबंधारे विभागाने याची कुठलीही दखल घेतल्याचे दिसून येत नाही. हे जनावर आज पाच दिवसानंतर ही जनावरं कुजलेले अवस्थेत नीरा डाव्या कालव्यात अडकून पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे नीरा डाव्या कालव्या वरील पाण्याचे स्त्रोत दुषीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


   नीरा पाटबंधारे विभागाकडून मागील काळात कालव्यावर बारकाईने लक्ष ठेवत असत. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी काही करामती केल्यास धडक कारवाई करत. आता मात्र वर्षांनूवर्ष पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अधिकारी कालव्यावर फिरकत नाहीत. परिणामी कालव्यावर प्रचंड प्रमाणात प्रदुषण, केलं कचरा पडत आहे. काटेरी झुडपे वाढत आहेत. आता तर गेली पाच दिवसांपासून जनावर अडकून पडले तर ते पाण्याबाहेर कोणी काढायचे हा प्रश्न निर्माण करत पाटबंधारे विभाग हात झटकताना दिसतं आहेत. 

Wednesday, March 19, 2025

बारामती नगर परिषदेचा नगररचना अधिकारी लाच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

 बारामती नगर परिषदेचा नगररचना अधिकारी लाच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..


एक लाख रुपयाची लाच घेताना विकास ढेकळे याला पकडले रंगेहाथ...





   बारामती 

           बारामतीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला फाईलवर सही करण्यासाठी पावणे दोन लाख रुपयाची मागणी करणाऱ्या बारामती नगर परिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी रंगे हात पडले आहे.एका जिम मध्ये एक लाख रुपये स्वीकारताना हा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडला आहे.

        विकास ढेकळे असे या नगररचना अधिकाऱ्याचे नाव आहे. बारामती नगर परिषदेमध्ये तो नगर रचना अधिकारी म्हणून काम करतो. बारामतीतील एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाची एक फाईल बारामती नगर परिषदेच्या नगररचना विभागात प्रलंबित होती. या फाईलवर सही करण्यासाठी नगररचना विभागाचा अधिकारी विकास ढेकळे यांने पावणे दोन लाख रुपयाची लाच मागितली होती. या अधिकाऱ्याच्या सततच्या त्रासामुळे संबंधित बांधकाम व्यवसायकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रार ची शहानिशा केली. त्याला पकडण्यासाठी यंत्रांना कार्यान्वित झाली. या अधिकाऱ्याने तडजोडी अंती एक लाख रुपये घेऊन फाईल वर सही करण्याची तयारी दर्शवली होती.त्यानुसार बुधवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत विकास ढेकळे याला बारामती शहरातील एका जिम मध्ये एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. यामुळे बारामती नगरपरिषदेसह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विकास ढेकळे याच्यावर बुधवारी रात्री उशिरा बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आ

हे.

Tuesday, March 18, 2025

पुणे पंढरपूर मार्गावर नीरा नजीक ट्रक आणि डंपरचा अपघात: अपघातात चालक किरकोळ जखमी

पुणे पंढरपूर मार्गावर  नीरा नजीक ट्रक आणि डंपरचा अपघात: अपघातात चालक किरकोळ जखमी 





 पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर नीरा नजीक ऊस वाहतूक करणारा ट्रक आणि डंपर यांच्यामध्ये समोरासमोर धडक झालीय. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे चालक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर नीरा येथे खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली..  वाल्हे बाजूकडून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस घेऊन निघालेला ट्रक क्रमांक Mh 11 m 4911 व नीरा बाजूकडून वाल्हेच्या दिशेने निघालेला डंपर क्रमांक Mh 14 dm 6376 यांच्यामध्ये ही धडक झाली. अपघातानंतर नीरा पोलीस चौकीतील पोलीस हवलदार हरिश्चंद्र करे आणि होमगार्ड संतोष वाल्हेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी चालकांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले व वाहतूक सुरळीत केली.. तर या अपघातातील दोन्ही वाहनांच्याचालकांची नावे संतोष चव्हाण  व संजय बनसोडे अशी आहेत...


Monday, March 17, 2025

"तुमचे पैसे रोडवर पडलेत" म्हणत बॅकेतून काढलेल्या रक्कमेवर डल्ला. नीरेतील पि.डी.सी.सी. बॅंके समोरुन आठवड्यात दुसऱ्यांदा चोरी.

"तुमचे पैसे रोडवर पडलेत" म्हणत बॅकेतून काढलेल्या रक्कमेवर डल्ला. 


नीरेतील पि.डी.सी.सी. बॅंके समोरुन आठवड्यात दुसऱ्यांदा चोरी. 



पुरंदर :

       राख येथील पोल्ट्री व्यावसायिकांने बॅकेतून काढलेल्या कर्जाच्या रक्कमेवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. "तुमचे पैसे रोडवर पडलेत" म्हणत लक्ष विचलीत करुन, मोटारसायकलच्या हँडलला लावलेली प्लॅस्टिक पिशवी चोरट्यांनी लंपास केली आहे. या पिशवीत बॅकेतून काढलेले १ लाख रुपये, व्यावसायाचा रबरी शिक्का, बॅंकेचे चकबूक ठेवलेले होते. याबाबतची फिर्याद चंद्रकात बाबासो पवार वय ५०, व्यावसाय शेती रा. राख ता. पुरंदर जिल्हा पुणे यांनी नीरा पोलीस दुरक्षेत्रात दाखल केली आहे. 


    नीरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राख येथील चंद्रकात पवार यांनी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून पोल्ट्रीशेड तयार करण्यासाठी कर्ज प्रकरण केले होते. त्याची रक्कम नीरा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील खात्यात जमा झाले होते. ती रक्कम काढण्यासाठी पवार सोमवारी (दि.१७) दुपारी १२:४० च्या सुमारास आले होते. १ लाख रुपये रोख रक्कम बॅंक खात्यातून काढल्यावर ती रक्कम, व्यावसायाचा रबरी शिक्का, बॅंकेचे चेकबुक निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले होते. बॅकेतून बाहेर आल्यावर नीरा बारामती रस्त्यावर लावलेल्या बजाज प्लॅटीन मोटारसायकल क्र. एम. एच. १२ / एफ.एल. ४७७९ च्या हॅन्डेलला लावली व ते मोटरसायकल वरती जावु लागलो तेंव्हा पवार यांना एक अज्ञत इसमाने तुमचे पैसे रोडवर पडले आहेत, असे सांगीतले. त्यांना पैसे रोडवर पडलेले दिसले. म्हणून त्यांनी १ लाख रुपयांची हॅडेलला लावलेली पिशवी सह मोटरसायकल स्टॅण्डवर लावून, रस्त्यावर पडलेले पैसे गोळा केले. पवार यांनी रस्त्यावरील पडलेले पैसे गोळा करून पुन्हा आपल्या मोटारसायकलकडे आले असता मोटारसायकलच्या हँडलला लावलेली एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी दिसून आली नाही. त्यामुळे बॅंक परिसरात पिशवीचा शोध घेतला पण रक्कम असलेली पिशवी आढळून आली नाही. त्यामुळे पवार यांची खात्री झाली की आपली १ लाख रुपये रोख रक्कम, रबरी शिक्का व चेकबुक असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लक्ष विचलीत करुन चोरुन नेली आहे. या घटनेची पवार यांनी तात्काळ नीरा पोलीसांत तक्रार दाखल केली असुन, नीरा पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार रविराज चव्हाण पुढील तपास करीत आहेत. 


      नीरेच्या भरबाजारपेठेत आठवड्यात ही चोरीची दुसरी घटना घडली आहे. मागील आठवड्यात गुळूंचे येथील एकाची मोटारसायकलला लावलेली रोख रक्कमेची पिशवी चोरट्यांनी लंपास केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्याच बॅंकेसमोर पुन्हा तशीच घटना घडल्याने बॅंकच्या खातेदारांनमध्ये भिती निर्माण झाली आहे. आता मार्च अखेर सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर रक्कमा बॅंकेत भरतात किंवा काढत असतात. अशा चोरीच्या घटना वाढत राहिल्यास लोकांनी व्यवहार कसे करायचे असा प्रश्न निर्माण झा

ला आहे. 

मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन शेगांव नगरित : एस.एम. देशमुख. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची नांदेड येथील बैठकीत निर्णय‌. बैठकीत पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचे सुतोवाच.

 मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन शेगांव नगरित : एस.एम. देशमुख. 


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची नांदेड येथील बैठकीत निर्णय‌. 


बैठकीत पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचे सुतोवाच. 



नांदेड :

      "अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन संत गजानन महाराजांच्या शेगांव नगरित होत असुन ते ऑगस्ट महिन्यात होणार आहे. यावर्षीही परिषेदेच्या नावाला शोभेल असे भव्यदिव्य अधिवेशन पार पडण्यासाठी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. या राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे" असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे. 



    रविवारी (दि.१०६) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची विभागनिहाय कार्यकारिणी बैठक नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीचे नियोजन नांदेड जिल्हा पत्रकार संघाने बैठकीचे आयोजन मंत्रिमंडळ बैठक किंबहुना एखादया उच दर्जाच्या कंपनीच्या बैठकी प्रमाणे कॉर्पोरेट पद्धतीने करण्यात आले होते. या बैठकीत अध्यक्षस्थानी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख होते. विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या सह कार्यकारिणीतील  मुख्य पदाधिकारी, उपाद्यक्ष, विभागीय सचिव, जिल्हादयक्ष, परिषद प्रतिनिधी, अधिस्वीकृती समिती सदस्य, डिजिटल मीडिया व महिला आघाडी सह राज्यभरातून २७ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. 



      या बैठकीत सर्व पदाधिकारी यांना मराठवाडा  मुक्तीसंग्राम पुस्तक, भरजारी शाल आणि मोत्याचे हार घालून तसेच इतर सदस्यांना मानाची शाल देऊन सन्मानित केले. तर उज्वला व त्रिरत्न भवरे यांच्या हस्ते उपस्थितांना संविधान प्रत भेट देण्यात आली. 



       या बेठकीची सुरवात राज्या गिताने झाली. विजय जोशी यांनी महाराष्ट्र राज्याचे गीत गाऊन बैठकीत ऊर्जा निर्माण केली. बैठकीचे प्रास्ताविक व स्वागत नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी केले. सभेचे इतिवृत्त वाचन व सुत्रसंचलन मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी केले. परिषदेचा कारभार चालतो तो वार्षिक वर्गणीवर याबाबत जिल्हा संघांच्या अध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व उपस्थित जिल्हा अध्यक्षांनी पुढील महिनाभरात वार्षीक वर्गणी जमा करण्याचे सांगितले. जिल्हा संघांच्या निवडणूका या परिषदेचे घटनेप्रमाणे दर दोन वर्षांनी होणे क्रमप्राप्त आहे. या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली पाहिजे. तसेच परिषदेचा कारभार पुढे चालवण्यासाठी अशा २५ तरुण नवे चेहरे पुढे येणे गरजेचे आहे असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. 


    पत्रकार पेन्शन योजनेतून अनेक पत्रकार वंचित आहेत. ही योजना पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी नसुन ती कशी मिळणार नाही अशा जाचक अटी त्यात आहेत. याबाबत परिषद ठोस निर्णयावर आली आहे. तर ही योजना पत्रकार पेन्शन योजना नसून ती पत्रकार सन्मान योजना असल्याचे मत अधिस्वीकृती समितीचे मुंबई अध्यक्ष दिपक कैतकै यांनी मत मांडले. 


  पत्रकार पेन्शन योजनेतून गरजू पत्रकारांना निवृत्तीनंतर दोन पैशांची मदत व्हावी या हेतूने परिषद गेली २५ वर्षांपासून लढा देत आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. यावर सविस्तर चर्चा झाली. पेन्शन योजना, पत्रकारांवरील हल्ले, खोटे गुन्हे दाखल होणे, डिजिटल मिडिया मधिल पत्रकारांच्या युट्यूब व वेब पोर्टलला शासनाच्या जाहिराती मिळाव्यात अशी विविध मागण्यांसाठी एक राज्यव्यापी आंदोलन छेडून मुंबईत एस.एम. देशमुखांच्या नेतृत्व महामोर्चाचे आयोजन पुढील काळात करण्याचे सुतोवाच परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी दिले. 


   अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे द्विवार्षीक राष्ट्रीय अधिवेशन ही महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी एक पर्वणी असते. हे अधिवेशन कोणता जिल्हा पार पाडेल याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने संत गजानन महाराजांच्या शेगांव नगरित हे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचे शिवधनुष्य उचलले. याला परिषदेच्या कार्यकारणीतील सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. 


     डिजिटल मिडिया परिषदेच्या विस्ताराबाबत साधक बाधक चर्चा करण्यात आली. डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी आतापर्यंत १५ जिल्ह्यात कार्यकारिणी अस्तित्वात आल्या आहेत त्याची माहिती दिली. उर्वरित जिल्ह्यांत लवकरच अध्यक्ष व कार्यकारिणी अस्तित्वात येतील असे आश्वासन दिले. 



  साप्ताहिक व जिल्हास्तरावरील दैनिकांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली. परिषदेचे आगामी काळातील महत्वपूर्ण ध्येय धोरण एस. एम. देशमुख यांनी जाहीर केले तसेच उपस्थित पदाधिकारी यांच्या सूचनांची नोंद घेऊन परिषदेची वाटचाल ठरवण्यात आली. बैठकीला परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, सरचिटणीस प्रा सुरेश नाईकवाडे, डिजिटल मिडीयाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष गो.पी. लांडगे, विजय जोशी आदिंनी चर्चेत सहभागी होत, महत्वाच्या सुचेना मांडल्या. बैठकीला परिषदेचे शंभरहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत उपस्थित राहणाऱ्यांचे आभार प्रकाश कांबळे यांनी मानले. तर कार्यकारिणीची पुढिल बैठक १७ में २०२५ रोजी सिंधुदुर्ग येथे होणार असल्याचेही ठरले.

Thursday, March 13, 2025

संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी जेजुरी मध्ये निषेध सभा

 संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी जेजुरी मध्ये निषेध सभा 

 हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

 

  पुरंदर दि.१३



      पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे आज गुरुवारी  संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि महादेव मुंडे यांच्या हत्येचा  निषेध करण्यात आला. संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील जनतेतून संतापाची लाट उसळली आहे. याचाच परिणाम म्हणून आता गावागावांमधून लोक या हत्याचा निषेध करत आहेत. जेजुरी येथे देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र जेजुरी येथील नागरिकांनी या घटनेचा निषेध केला आहे . तर या प्रकरणांमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे 

     जेजुरी येथे आज सकाळी संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि महादेव मुंडे यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर या हत्ये मध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना फास्टट्रॅक कोर्टात केस चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी धनंजय मुंडे यांच्या निषेच्या घोषणा देखील दिल्या. या निषेध सभेमध्ये जेजुरी देव संस्थानचे माजी मुख्य विश्वस्त संदीप जगताप, सुधीर गोडसे, त्याच बरोबर  रसिक जोशी , सचिन हारपळे, विलास कड, मंगेश शेवाळे,शिवाजी बारसोडी, बाळासाहेब काळे,  विक्रम शिंदे. दशरथ उबाळे, सुरेश उबाळे, तुषार कुंभारकर, सुशांत बारसुडे, अविनाश राऊत  त्याचबरोबर जेजुरी येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. 

  जेजुरी देव संस्थांचे माजी मुख्य विश्वस्त संदीप जगताप आणि शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. याप्रकरणी केवळ वाल्मीक कराड व त्याचे सहकारी दोषी नसून ज्या कारणासाठी संतोष देशमुख यांचीही हत्या करण्यात आली ती खंडणी कोणासाठी मागितली गेली होती हे फार मह


त्त्वाचा आहे. या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे. ज्याच्यासाठी ही खंडणी मागितली जात होती त्याला देखील यामध्ये आरोपी करायला हवे.धनंजय मुंडे हे देखील या हत्येसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देखील या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांची देखील चौकशी केली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.



Wednesday, March 12, 2025

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. 


घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद. 




पुरंदर : 

       नीरा येथील बंद घराचे कडिकोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. सुमारे १ लाख ४० हजारांचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची तक्रार जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. सौ. पंकजा अभिजीत नाकील (वय ३१) रा.नीरा प्रभाग ३ यांनी घरात चोरीची तक्रार दाखल केली आहे. 


    नीरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि. १० मार्च सकाळी ११ ते मंगळवार दि. ११ मार्च सायंकाळी ५.३० च्या दरम्यान नीरा वार्ड नं ३ मधिल प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील सौ. पंकजा अभिजीत नाकील यांच्या बंद घराचे कडिकोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. सुमारे १ लाख ४० हजारांचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची तक्रार जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. 


   फिर्यादी सौ. नाकील पुणे येथील घरी असताना नीरा येथील त्यांचे शेजारी राहणारे शबाना मुनीर शेख यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर फोनकरून सांगीतले की, तुमच्या बंगल्याचे कडी कोयंडा तोडुन त्यावर असलेले कुलुप तुटलेले दिसत आहे. घराचा दरवाजा उघडा आहे. तुम्ही लवकर या असे सांगीतल्याने सौ. नाकील लागलीच नीरा येथे घरी आले. तेंव्हा त्यांच्या बंगल्याचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला दिसला व घरातील कपाटामधील साहीत्य आस्थाव्यस्थ पडलेले दिसले. त्यावेळी सौ. नाकील यांनी घरातील साहीत्य चेक केले असता, त्यातील साहित्य चोरीस गेले असल्याचे त्यांची खात्री झाली. त्यावेळी सौ. नाकील यांच्या घरात व आजुबाजुला शोध घेतला असता खालील साहीत्य मिळुन आले नाही. सर्वत्र शोध घेवुन बुधवार (दि.१२ रोजी) रात्री ०७ च्या सुमारास चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


     सौ. नाकील यांच्या घरातील चोरीस गेल्याचे मालाचे वर्णन खालील प्रमाणे. १) ४० हजार रु. कि. एक सोन्याचे लहान गंठण १५ ग्रॅम वजनाचे, २) ६० हजार रु.कि.सोन्याची साखळी ७ ग्रॅम वजनाची. ३) १२ हजार रु.कि. कानातील सोन्याचे एयरींग ०४ ग्रॅम वजनाची. ४) २५ हजार रु. कि. चांदीचे पैजन २० भाराचे, चांदीचे निरंजनी २ नग व चांदीचा कुंकवाचा करंडा १ नग असे दोन्ही २० भाराचे वजनाचे, ५) ३ हजर रु.कि. २० रूपये दराच्या १०० नोटा व ५०० रू दराच्या २ नोटा असा एकूण १ लाख ४० रुपये किंमतीचे प्रमाणेवरील वर्णनाचे सोने, चांदी व पैसे चोरीस गेले चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 



       मंगळवारी पहाटे १.५० च्या सुमारास नीरेच्या वार्ड नं तीन मधिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात चोरटे आल्याची चाहुल युवकांना लागली होती. रात्री काही काळ युवकांनी चोरट्यांच्या आवाजाच्या दिशेनं पळापळ केली. पण अंधाराचा व झाडाझुडुपांमधून चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. नीरा पोलीसांना युवकांनी चोरटे आल्याचे सांगितल्या बरोबर रात्र गस्तीस असलेल्या पोलीसांनी पोलीस गाडी फिरवत चोरट्यांचा शोध परिसरात घेतला. पण चोरी कोणाची झाली हे मंगळवारी दुपारपर्यंत कळालेच नाही. दुपारी सौ. नाकील यांचे दार उघडे दिसल्यावर शेजारच्यांना शंका आली. या चोरीची घटना ससी.सी.टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्या आधारे नीरा पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. 

Monday, March 10, 2025

पत्रकार तुषार खरात यांच्या अटकेचा मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध जयकुमार गोरेंच्या विरोधात बातमी केल्याने पत्रकार खरात यांच्यावर एका पाठोपाठ एक गुन्हे

 पत्रकार तुषार खरात यांच्या अटकेचा मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध


जयकुमार गोरेंच्या विरोधात बातमी केल्याने पत्रकार खरात यांच्यावर एका पाठोपाठ एक गुन्हे 



मुंबई : 

     खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा अत्यंत निंदनीय प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. "लई भारी" युट्यूब चँनलचे संपादक तुषार खरात या मालेतले ताजे बळी ठरले आहेत. तुषार खरात यांच्यावर विनयभंग, अँट्रॉसिटी, पाच कोटींच्या खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना अटकही करण्यात आली आहे. 


      तुषार खरात तुरूंगातून बाहेर येऊच नयेत हा तर कारवाई मागचा उद्देश आहेच त्याचबरोबर तमाम पत्रकारांवर दहशत बसविणे हा देखील हेतू आहे. याचा मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडिया परिषद तीव्र शब्दात निषेध करीत आहे. 


      जयकुमार गोरे यांच्या विरोधात बातमी केल्यानंतर लगेच तुषार खरात यांच्यावर एका पाठोपाठ एक असे गुन्हे दाखल झाले. अन्य प्रकरणात पोलीस ही तत्परता दाखवत नाहीत. हे संतापजनक असून सरकारने तुषार खरात यांच्यावरील हे खोटे गुन्हे रद्द करावेत आणि तुषार खरात यांची सुटका करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषद करीत आहे. 



       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात लक्ष घालून खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांची गळचेपी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंतीही एस. एम. देशमुख यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करावी अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.



जेजुरीच्या श्री. खंडोबा मंदिरात आजपासून वस्त्र संहिता लागू

 जेजुरीच्या श्री. खंडोबा मंदिरात आजपासून वस्त्र संहिता लागू



जेजुरी, ता. १० - महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून (ता. १० मार्च २५) वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.



यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरांत कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आले आहे. 



फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. 

याविषयी बोलताना श्री मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री. अभिजीत देवकाते म्हणाले की, "मंदिराची पावित्र्य, शालीनता जपणारी वेशभूषा भाविकांकडून अपेक्षित आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड- कमी कपडे अपेक्षित नाहीत. असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे.  


देवस्थानच्या भंडारा प्रसाद निर्मिती केंद्राचा शुभारंभ

श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरी च्या वतीने आज पासून " भंडारा प्रसाद निर्मिती केंद्राचा देखील शुभारंभ करण्यात आला. हा भंडारा प्रसाद भाविक - भक्तांनी देवाला मनोभावे अर्पण केलेल्या भंडाऱ्यापासून तयार करण्यात येणार आहे. खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना निःशुल्क हा " भंडार प्रसाद " देण्यात येणार आहे. भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

..

Saturday, March 1, 2025

अनर्थ टळला गोवा हजरत निजामुद्दीन रेल्वेतून धुर. चार तासांहून आधी काळ रेल्वे खोळंबल्या

 अनर्थ टळला 

गोवा हजरत निजामुद्दीन रेल्वेतून धुर. 


चार तासांहून आधी काळ रेल्वे खोळंबल्या 



पुरंदर : 

       मिरज पुणे लोहमार्गावरील नीरा रेल्वे स्टेशनमधील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे धोका टळला. गोव्यावरून निघालेली हजरत निजामुद्दीन कडे जाणाऱ्या गाडीच्या चाकातून धुरा येताना दिसल्याने नीरा रेल्वे कर्मचाऱ्यांनी ती गाडी रोखली. गेली पाच तासांहून आधी वेळ मिरज पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबा झाला आहे. 




     नीरा रेल्वे स्टेशनमधील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गोवा येथून हजरत निजामुद्दीनकडे निघालेली रेल्वे नीरा रेल्वे स्टेशनमधून पहाटे पाचच्या सुमारास जात असताना एम.२ डब्याच्या एका चाकातून आग दिसून आली. नीरा रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या गाडीच्या गार्डला लाला सिग्नल दिला. गाडी आहे त्या स्थितीत सकाळी आठ वाजेपर्यंत तशी उभी होती. यामुळे मागुन येणारी पहाटेची सह्याद्री एक्सप्रेस, दर्शन एक्सप्रेस, पुणे सातारा डेमो या प्रवासी गाड्या मागे अडकून पडल्या. हजारो प्रवाशांचा खोळंबा झाल्याने प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. 



Featured Post

'मी व संभाजी कु़जीर आमदार होण्यात लक्ष्मणदादांचा मोठा वाटा' - माजी आ. अशोकराव टेकवडे यांचे प्रतिपादन - नीरा येथे लक्ष्मणराव चव्हाण यांचा ८३ वा वाढदिवस साजरा

 'मी व संभाजी कु़जीर आमदार होण्यात लक्ष्मणदादांचा मोठा वाटा'  - माजी आ. अशोकराव टेकवडे यांचे प्रतिपादन  - नीरा येथे लक्ष्मणराव चव्हा...