संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी जेजुरी मध्ये निषेध सभा
हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
पुरंदर दि.१३
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे आज गुरुवारी संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि महादेव मुंडे यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील जनतेतून संतापाची लाट उसळली आहे. याचाच परिणाम म्हणून आता गावागावांमधून लोक या हत्याचा निषेध करत आहेत. जेजुरी येथे देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र जेजुरी येथील नागरिकांनी या घटनेचा निषेध केला आहे . तर या प्रकरणांमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे
जेजुरी येथे आज सकाळी संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि महादेव मुंडे यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर या हत्ये मध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना फास्टट्रॅक कोर्टात केस चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी धनंजय मुंडे यांच्या निषेच्या घोषणा देखील दिल्या. या निषेध सभेमध्ये जेजुरी देव संस्थानचे माजी मुख्य विश्वस्त संदीप जगताप, सुधीर गोडसे, त्याच बरोबर रसिक जोशी , सचिन हारपळे, विलास कड, मंगेश शेवाळे,शिवाजी बारसोडी, बाळासाहेब काळे, विक्रम शिंदे. दशरथ उबाळे, सुरेश उबाळे, तुषार कुंभारकर, सुशांत बारसुडे, अविनाश राऊत त्याचबरोबर जेजुरी येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
जेजुरी देव संस्थांचे माजी मुख्य विश्वस्त संदीप जगताप आणि शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. याप्रकरणी केवळ वाल्मीक कराड व त्याचे सहकारी दोषी नसून ज्या कारणासाठी संतोष देशमुख यांचीही हत्या करण्यात आली ती खंडणी कोणासाठी मागितली गेली होती हे फार मह
त्त्वाचा आहे. या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे. ज्याच्यासाठी ही खंडणी मागितली जात होती त्याला देखील यामध्ये आरोपी करायला हवे.धनंजय मुंडे हे देखील या हत्येसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देखील या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांची देखील चौकशी केली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.