Tuesday, December 24, 2024

पुरंदरमध्ये या आठवड्यात तीन दिवस पावसाची शक्यता.

 पुरंदरमध्ये या आठवड्यात तीन दिवस पावसाची शक्यता. 



पुरंदर : 

भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राच्या अंदाजानुसार पुरंदर तालुक्यात २४ व २५ डिसेंबर रोजी हवामान कोरडे राहिलं तर २६, २७, २८ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल. शेतकऱ्यांनी पीकांबाबत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे 



पुरंदर तालुका, जि. पुणे : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार तालुक्यात दिनांक २४ व २५ डिसेंबर, २०२४ रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून दिनांक २६, २७ व २८ डिसेंबर, २०२४ रोजी पावसाची शक्यता आहे.

पुढील पाच दिवसात कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४९ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ०२ ते ०५ कि.मी. दरम्यान राहील. आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहील. 


प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषि मौसम सेवा तथा प्रमुख, कृषि हवामानशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, पुणे

No comments:

Post a Comment

Featured Post

जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार

 जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार  पुरंदर :        नीरा नजिकच्या पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) गावच्या हद्दीतील जेऊर रेल्वे अंडर...