पत्रकारांच्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ पुरंदर तहसीलला आंदोलन.
पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे निवेदन
पुरंदर :
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. याच्या निषेधार्थ राज्यभरातील पत्रकार 'पत्रकार कायद्याचा होळी' व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आ. एस. एम. देशमुख सर व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे यांच्या आदेशानुसार पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुरंदर तहसील कार्यालयावर आंदोलन करत निवेदन दिले.
पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे खजिनदार निलेश भुजबळ, महिला संघटक छायाताई नानगूडे यांनी नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी यांना निवेदन दिले.
पत्रकारांवर होणारे अन्याय व त्यावर न मिळणारा न्याय यातच पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी न होणे यामुळे राज्यात विविध ठिकाणी पत्रकारांवर हल्ले होत आहेत. नुकतेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदिप महाजन यांना स्थानिक आमदारांनी आधी दमदाटी करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्या नंतर दुसऱ्या दिवशी भर चौकात दुचाकीवरुन खेचून मारहाण करण्यात आली होती. याबाबतची तक्रार पोलिसांत दिल्यानंतरही पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कलमे न लावल्याने राज्यभरातील पत्रकारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. पत्रकार संरक्षण कायदा असून नसल्यासारखा होतो म्हणून कुचकामी ठरला आहे. तेव्हा या कायद्याच्या जी. आर. होळी करण्यात आली.