नीरा मोरगाव रोडवर झाड पडल्याने एक जखमी. वाहतूक ठप्प, झाड काढण्याचे काम सुरू.

 नीरा मोरगाव रोडवर झाड पडल्याने एक जखमी. 

वाहतूक ठप्प, झाड काढण्याचे काम सुरू. 





पुरंदर : 

      नीरा मोरगाव रोडवर झाड पडल्याने ट्रॅफिक जाम झाले आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बुवासाहेब ओढ्यालगत असलेले एक झाड रस्त्यावर कोसळले. यामध्ये एक दुचाकीस्वार सापडला असून तो गंभीर जखमी आहे. 




सातारा नगर रोड व नीरा बारामती रस्त्यावर असलेल्या येथील पंचायत मंदिरासमोरील एक जुने झाड रस्त्यावर कोसळले. झाड कोसळताना विद्युत वाहक तारांवर ही पडले आहे. यामध्ये बुलेट वरून जाणारा शंभू वाघमारे रा. कोळेवस्ती गंभीर जखमी झाला असून, त्याला नीरेतील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेली एक तासभर या रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तासभरानंतर नुकतेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. जेसीबीच्या सहायाने पडलेले झाड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शंभू वाघमारे हे बुलट मोटारसायकल क्र एम.एच. ४२ बी. ए. ७०१ वरुन जात असताना अचानक झाड त्यांच्यावर कोसळले. 



Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..