पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता? पुरंदर : नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार. भरधाव स्कॉर्पिओनी सुमारे सहा दुचाकींना धडक देत दुचाकीस्वारांना जखमी केले असून. सर्वांवर नीरेतील विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर जखमींना बारामती व लोणंद येथे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कार्पियो क्र. एम.एच. ४२- एक. क्यू. ७८७८ या गाडीतील ऐका महिलेला सर्पदंश झाल्याने चालक गाडी वेगात दामटत असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी (दि.२९) रोजी रात्री नऊच्या सुमारास होळ (ता. बारामती) येथील एका गरोदर महिलेला सर्पदंश झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्या महिलेला थेट स्कार्पिओ गाडीत बसून आधी सोमेश्वरनगर व नंतर त्यांची टिर्टमेंट असलेल्या नीरा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाचारण केले. नीरा बारामती रोडने वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने स्कार्पिओ चालकाला गाडी वेगात चालवणे कठीण जातं होते. अती वेगात असलेल्या या स्कार्पिओ चालकाने गाडी कधी रस्त्याच्या मध्यावरुन त...
राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा.. पुरंदर : राख, कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. शनिवारी रात्री १२ ते ३ च्या सुमारास पुरंदर तालुक्यातील राख, महादेव गोठा, मानेवस्ती, कर्नलवाडी हद्दीतील बोरजाई मळा अशा वस्त्यावरील घरांचे कडिकोयंडे तोडून चोरट्यांनी डल्ला मारल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी रात्री झोपल्यानंतर रात्रीच्या साडेबाराच्या सुमारास राख गावठाणात तीन चोरटे आल्याचे निदर्शनास आले. एका घारात त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. या चोरट्यांनी गावच्या बाहेरील महादेव टेकडी शेजारील एक घरात प्रवेश मिळवला. या घरातील काही किरकोळ वस्तू चोरीला गेल्याचे घरातील लोकांनी सांगितले. याच घरात टेबलवर ठेवलेला लॅपटॉप बाजूला ठेवून लॅपटॉपची बॅग चोरटे घेउन गेल्याचे सांगण्यात आले आहे. चोरट्यांनी निरा बाजुकडे जात सुर्यवस्ती (माने वस्ती) याठिकाणी एका घराचे दार उघडून काही सोन्याचा ऐवज लंपास केल्याचे सांगितले आहे. यानंतर साडेतीनच्या सुमारास कर्नलवाडी गावाच्या हद्दीतील बोरजाईमळा येथील एक उंचावरील ब...
धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद. पुरंदर : नीरा येथील बंद घराचे कडिकोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. सुमारे १ लाख ४० हजारांचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची तक्रार जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. सौ. पंकजा अभिजीत नाकील (वय ३१) रा.नीरा प्रभाग ३ यांनी घरात चोरीची तक्रार दाखल केली आहे. नीरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि. १० मार्च सकाळी ११ ते मंगळवार दि. ११ मार्च सायंकाळी ५.३० च्या दरम्यान नीरा वार्ड नं ३ मधिल प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील सौ. पंकजा अभिजीत नाकील यांच्या बंद घराचे कडिकोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. सुमारे १ लाख ४० हजारांचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची तक्रार जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी सौ. नाकील पुणे येथील घरी असताना नीरा येथील त्यांच...
Comments
Post a Comment