पुरंदरच्या पत्रकार निखिल जगताप यांना आदर्श युवा पुरस्कार जाहीर
पुरंदर प्रतिनिधी :
पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील दैनिक प्रभातचे पत्रकार, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य निखिल सतिश जगताप यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला आहे.
रविवार (दि.20)रोजी कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व मराठी साहित्य संस्कृती कला विकास परिषद आयोजित सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, अंथुर्णे (ता.इंदापुर) या कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
निखिल जगताप हे मागील अनेक वर्ष ग्रामीण भागात पत्रकारीता क्षेत्रात काम करीत आहेत. राजकीय, कृषी, सामाजिक, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात पत्रकारीतेच्या माध्यमातुन युवा पत्रकार म्हणून आपला ठसा उमटविला आहे. तर वंचित घटकांना न्यायहक्कांसाठी जगताप यांची पत्रकारीता प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असल्याची माहिती संमेलन कार्याध्यक्ष रानकवी जगदीप वनशिव व संस्थापक अध्यक्ष विजय गायकवाड यांनी दिली. साहित्य संमेलनामध्ये साहित्य, नाट्य चित्रपट कला, पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment