झेंडेवाडी येथे एसटी बस झाली पलटी : अपघातात एकाचा मृत्यू

झेंडेवाडी येथे एसटी बस झाली पलटी : अपघातात एकाचा मृत्यू



सासवड दि.६

  पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे राज्य


परिवहन मंडळाची बस पलटी झालीय. यामध्ये एका मोटरसायकल स्वाराचा  मृत्यू झालाय .झेंडेवाडी आरटीओ कॉर्नर जवळ टू व्हीलर आणि एसटी बसचा हा अपघात झालाय. यामध्ये  राज्य परिवहन मंडळाची बस पलटी झालीय... एस टी महामंडळाची ही  बस   पुण्याहून सासवडकडे येत असताना मोटरसायकल आणि बस यांच्यात धडक झाली. बस चालकाने टू व्हीलर चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला...मात्र यावेळी ही बस देखील पलटी झालीय. बसमधील प्रवाशांना  बाहेर काढण्यात स्थानिक लोकांना यश आलंय. पोलिसही घटनास्थळी दाखल झालेत.बस मध्ये 29 प्रवाशी होते. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही . मात्र दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू झालाय...



Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.