चंद्रपूर, 02 जानेवारी : 'हिंदू ह्रदयसम्राटांचे बेटे उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये साधुवर हल्ला झाल्यावर सीबीआय ला तपास करण्यास नकार दिला. तीन पक्षाचे सरकार असताना उद्धव ठाकरे आधी काँग्रेसला माथा टेकवत होता, आता अखेर पूर्णच झुकले आहे', असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी टिका केली.
भाजपने मिशन 144' ची घोषणा केली आहे.
या मिशनची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज पासून
चंद्रपुरातून केली.
यावेळी जे.पी.
नड्डा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
मुख्यमंत्रिपदाच्या
खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारला मागे टाकत काँग्रेस सोबत आघाडी केली.
मोदी स्टेजवर असताना केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्रचे नारे लागत असताना शांत
होते.
मात्र निकाल समोर येताच मनात लाडू फुटले आणि विचार धारेला मागे
टाकलं. ज्यांनी भारताच्या संस्कृतीला समजण्यास नकार दिला त्यांच्या सोबत उद्धव
ठाकरे यांनी सरकार बनवलं, अशी टीका नड्डांनी ठाकरेंवर केली 'हिंदूह्रदयसम्राटांचे बेटे उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये साधुवर
हल्ला झाल्यावर सीबीआय ला तपास करण्यास नकार दिला. तीन पक्षाची सरकार असताना उद्धव
ठाकरे आधी काँग्रेसला माथा टेकवत मग काँग्रेसला माथा टेकवत आणि अखेर पूर्णच झुकले
आहे, असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी टीका
केली.
'महाविकास आघाडी
सरकारमध्ये दलाली आणि कमिशन खोरी केली महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी युती सरकारला
संधी द्या. भाजप आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. भाजपच्या विजयाची सुरुवात चंद्रपूर
पासून होईल', असं आश्वासनही नड्डांनी दिलं. 'जग संकटात असताना भारत मात्र मोदींच्या
नेतृत्वाखाली प्रगती करत आहे.
ब्रिटनने
भारतावर 200 वर्ष राज्य केलं त्याच ब्रिटनला आर्थिक मंदी असताना देखील भारत
मजबूत आहे. स्टीलच्या बाबतीत भारत जगात दुसरा क्रमांकावर आहे. मोबाईल 50 टक्के आयात केले जात होते आज 97 टक्के मोबाईल भारतात निर्माण होत आहे. मोदींच्या
नेतृत्वाखाली भारताची अर्थ व्यवस्था मजबूत होत आहे', असंही नड्डा म्हणाले.
'आज आपण
एकमेकांच्या जवळ बसू शकत आहे. कारण भारताने बूस्टर कवच लसिंच्या माध्यमातून घातले
आहे. अमेरिका सारखे देश या बाबतीत मागे आहे. काँग्रेसी अनपड त्यांना समजायला येत
नाही.
या देशात पोलिओ
लस यायला 20वर्ष लागले. कोरोना काळात 9 महिन्यात 2 लसि भारताने तयार केल्या. भारत आता मागणारा नाही तर देणारा देश
बनला आहे', असंही नड्डा म्हणाले. 'युक्रेन लढाईत भारत एकमेव देश होता ज्यांनी आपले लोक मायदेशी
परत आणले यासाठी युद्ध देखील मोदींनी थांबवलं.
एकाच वेळी
दोन्ही देशाच्या प्रमुखांशी संवाद साधला', असा दावाही त्यांनी केला. 'एक पंतप्रधान म्हणत होते, मी 1 रुपया पाठवला तर त्यातील 85 पैसे गायब होतात. आज पंतप्रधान दिल्लीतून एक बटन दाबताच 15 सेकंदात लोकांच्या थेट खात्यात पैसे जमा होतात. मोदींनी 11 डिसेंबर ला 75 हजार करोड रुपयांच्या योजना महाराष्ट्राला दिल्या. नरेंद्र -
देवेंद्रच्या डबल इंजिनने अनेक काम केले आहे.. 3000 कोटींची परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली', असा दावाही नड्डांनी केली.