प्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक करण जोहरने बॉलीवूडमध्ये खूप सारे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. नुकतेच एका कार्यक्रमात आपला बायोपिकबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याच्या भूमिकेला 'हा' अभिनेता योग्य न्याय देऊ शकेल असेही त्यांनी सांगितले.
करण जोहरचे बालपण फार सुशेगात गेले आहे.
आई वडिलांनी त्याला सर्व काही दिले. पण तरीही तो अन्य मुलांपेक्षा फार वेगळा होता.
त्यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. पुढे तो सांगतो की, जेव्हा तो मागे वळून
पाहतो त्यावेळी त्याला कळंत की त्या कटू अनुभवातूनच त्याला बरेच काही शिकायला
मिळाले.
करण त्याचे बालपण पडद्यावर दाखवू इच्छित
आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्याच्याकडे खूप साऱ्या आठवणी आहेत. त्याच्या आई-वडिलांनी दिलेली
शिकवण त्याला जगभरात पोहोचवायची आहे. त्यामुळे या बायोपिकमध्ये त्याची भूमिका
रणवीर सिंह याने करावी. कारण त्याला वाटतं की, रणवीर सिंह त्याची भूमिका उत्तम करु
शकतो. तो या रोलसाठी बेस्ट देईल. शिवाय करण जोहरने हेही सांगितले की, त्याला केजोओ असेही
बोलले जाते पण त्याला हे अजिबात आवडत नाही. त्याला वाटतं लोकांनी त्याला करण
म्हणूनच हाक मारावी.
करण जोहरने आतापर्यंत कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना केहना, माय नेम इज खान, स्टुडेण्ट ऑफ द इयर
असे बरेच सुपरहिट सिनेमा त्याने केले आहेत.