Type Here to Get Search Results !

अद्भुत, आश्चर्यजनक अन् नयनरम्य...! समृद्धी महामार्गावरचा हा चौक डोळे दिपवणारा

 


नागपूर - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या शिवमडका एंट्री पॉईंटचे दृश्य मनोहारी झाले आहे. येथे जवळपास ७०६८५ चौरस मीटरच्या परिसरात गोल आकाराचा चौक साकारला आहे.

चारही बाजूंनी हिरवळ, बगीचा आणि एक अद्भुत दृश्य येथे दिसणार आहे. सेल्फ इल्युमिनेटिंग लाईट्सच्या बळावर चौक रंगही बदलेल. कधी गुलाबी, निळा, तर कधी पिवळा, हिरवा, पांढरा आणि केशरी असे अनेक रंग डोळ्यांसमोर येतील आणि सर्वांना मोहिनी घालतील.
हा चौक तयार करण्यासाठी १६.३७ कोटी रुपये खर्च आला आहे. येथे पामसोबतच खजुराचे लांब वृक्ष दुरूनच आकर्षित करतील. सायकसची झाडेही आपली छटा पसरविताना दिसतील.

नागपूरजवळील हा चौक विजेच्या खर्चाच्या बाबतीत आत्मनिर्भर राहणार आहे. त्यासाठी येथे सोलर ट्रीचा उपयोग करण्यात आला आहे. सोलर ट्री अशी रचना आहे, ज्याला एका वृक्षासारखी डिझाईन केली आहे. त्याच्या शाखा स्टीलच्या आहेत. त्यावर सूर्यप्रकाशापासून वीज तयार करण्यासाठी पॅनल लावण्यात आले आहेत.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies